CANCER CAMP
प्रारंभ कला अकॅडमी ठाणे या आमच्या संस्थेतर्फे मागील बारा वर्षात सातत्याने आम्ही विनामूल्य कॅन्सर टेस्टिंग करीत आहोत. तळहातावर पोट असणाऱ्या महिला आणि आदिवासी महिलांसाठी गर्भाशयाची चाचणी , ज्यांना आवश्यकता वाटत असेल अशा महिलांची सोनोग्राफी, मेमोग्राफी ,सोनो मेमोग्राफी, CA 125
इत्यादी तपासण्या तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने केल्या जातात. यावेळी महिलांना कॅल्शियम आणि लोह गोळ्या देखील देण्यात येतात. प्रारंभची आमचे टीम यासाठी सतत कार्य करत असते. वाड्यातील पण ठाणेकर असलेल्या मोहन पाटील यांच्या सहकाऱ्यांन आज आम्ही वाड्याच्या अलीकडे असलेल्या अबीट घर या ठिकाणी आमचा कॅम्प आयोजित केला होता. सकाळी पावणे आठ वाजता आम्ही वाड्याकडे रवाना झालो. 60 ते 70 महिलांची यावेळी चाचणी करण्यात
आली. काही क्षणचित्र
Date: 15/01/2025
Cancer Camp
Date:
Cancer Camp
Prarambha Kala Academy Thane, our organization has been continuously implementing the 'Arogya Sakhi' cancer diagnosis program for grassroots women for the past seven years. Cancer is such an expensive disease. I call it the disease of the rich. Because it affects my family. I always thought about how people who have stomachs on their hands cope with this expensive disease/ One of our friends in our organization, a trustee of the organization, passed away at a very young age due to this disease. It was always felt that we should do as much as possible for this disease and therefore, for the last seven years, I and the leading people of my organization decided to do various cancer screenings for women at the grassroots level. Not just checks but follow-ups. It was decided to give free cancer diagnosis camp along with iron and calcium, multivitamin pills to these women with stomach on their hands. For seven years we have been doing this by saving money from the funds raised through the festivals of Prarambha Kala Academy, or the money we get from our donation box activities, sometimes by getting donations, and for the last two years by getting CSR.
Even if we don't get CSR, we continue to do it.
Not only great satisfaction but considering the increasing rate of cancer, we feel that if we can save the lives of at least a few people or if we succeed in diagnosing this disease in its primary form, it will be a lot of satisfaction. Yesterday at 'Wada', two and a half hours from Thane, we conducted a cancer diagnosis camp for women housekeepers and brick kiln workers.
With the help of Manisha Acharya, Kirti Kirkar, Tina Patil, Vaishali, and Kishore Pard, my driver Rajesh Lodhi of Prarambha Kala Academy, the day-long 'Arogya Sakhi' cancer diagnosis camp was completed. Dr. Ashwini Deshpande and Dr. Rijuta Patil helped us. I would like to give special thanks to Mr. Vijay Barathe, Mohan Patil, who are associated with many organizations at 'Wada', because of the cooperation of Mr. Vijay Barathe, Mohan Patil, we were able to carry out investigations in a new place like 'Wada' in a very organized manner.
I often feel that the people I connect with are my real assets. And that's why in a place like Wada, corporator Suchita Patil, village police Patil Mrs. Borkar, our Bagul sir from Veetbhatti Workers Association, doctor Bhadange, Rajesh Patil from Veetbhatti Workers Association, Meghna Bagul our co-ordinator of Wada, social worker Nilesh Patil, president of paramedical college and hospital More Saheb, All this congregation came to meet me with great love.
It was not easy to go to the castle from Thane and take the camp. But due to the cooperation of all of them and of course all the team of my organization, we were able to do good work today for free for the whole day.
Now we will have a follow-up session after the 22 Sep 2023 date. On that day we will report to all these women workers. Our doctors will be with us. And pray to God that all will be cancer-negative and healthy.
Cancer Awareness Camp 21 सप्टेंबर 2024
आवरे , उरण
‘प्रारंभ’ कला अकॅडमी,ठाणे आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथॅारिटी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद शाळा, आवरे, उरण येथे कॅन्सर निदान तपासणी शिबिर अर्थात् ‘आरोग्य सखी’ चे आयोजन करण्यात आले होते. घरकाम करणाऱ्या तसेच आदिवासी महिलांनी ह्या शिबिराचा लाभ घेतला.
वेळीच तपासणी केल्याने कॅन्सरचा धोका ओळखून त्याला दूर ठेवण्यात मदत होते. अतिशय महाग असणार्या तपासण्या आदिवासी महिला, रोजगारीवर काम करणाऱ्या महिलांसाठी प्रारंभ तर्फे मोफत करण्यात येतात. ह्यामधे अंतर्गत तपासणी, ब्रेस्ट चेकिंग, C A 125 ही रक्त तपासणी , पॅपस्मिअर ही गर्भाशय तपासणी तज्ञ डॅाक्टर करतात. ह्या शिबिरामधे डॅा. अश्विनी देशमुख आणि डॅा. दीपश्री डोंबे ह्या तज्ञ डॅाक्टरांनी ह्या तपासण्या केल्या. प्रशिक्षित परिचारिका त्यांना सहाय्य करण्यास उपस्थित असतात. ह्यावेळी आर्यन, कॅल्शियम, मल्टिविटॅमिन गोळ्यांचे मोफत वाटपही केले . आवश्यकता असलेल्या काहीजणींना antibiotic आणि काही मलम , औषधे सुध्दा दिली. ज्यांना sonography तसेच Mammography ची गरज असेल त्यांच्याकरिता जवळील हॅास्पिटलमधे प्रारंभ च्या खर्चाने ह्या तपासण्या उपलब्ध करुन दिल्या जातात. 138 बायकांनी ह्या शिबिराचा लाभ घेतला. श्री. हेमंत गावडे सरांचे ह्याकरिता मोलाचे सहकार्य लाभले.
Cancer Awareness Camp 24 ऑगस्ट 2024
पिरकोन , उरण
‘प्रारंभ’ कला अकॅडमी,ठाणे आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथॅारिटी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 24 ॲागस्ट 2024 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय , पिरकोन, उरण येथे कॅन्सर निदान तपासणी शिबिर अर्थात् ‘आरोग्य सखी’ चे आयोजन करण्यात आले होते. घरकाम करणाऱ्या तसेच आदिवासी महिलांनी ह्या शिबिराचा लाभ घेतला.
वेळीच तपासणी केल्याने कॅन्सरचा धोका ओळखून त्याला दूर ठेवण्यात मदत होते. अतिशय महाग असणार्या तपासण्या आदिवासी महिला, रोजगारीवर काम करणाऱ्या महिलांसाठी प्रारंभ तर्फे मोफत करण्यात येतात. ह्यामधे अंतर्गत तपासणी, ब्रेस्ट चेकिंग, C A 125 ही रक्त तपासणी , पॅपस्मिअर ही गर्भाशय तपासणी तज्ञ डॅाक्टर करतात. ह्या शिबिरामधे डॅा. अश्विनी देशमुख ह्या तज्ञ डॅाक्टरनी ह्या तपासण्या केल्या. ह्यावेळी आर्यन, कॅल्शियम, मल्टिविटॅमिन गोळ्यांचे मोफत वाटपही केले . आवश्यकता असलेल्या काहीजणींना antibiotic आणि काही मलम , औषधे सुध्दा दिली. ज्यांना sonography तसेच Mammography ची गरज असेल त्यांच्याकरिता जवळील हॅास्पिटलमधे प्रारंभ च्या खर्चाने ह्या तपासण्या उपलब्ध करुन दिल्या जातात. 107 बायकांनी ह्या शिबिराचा लाभ घेतला. श्री. हेमंत गावडे सरांचे ह्याकरिता मोलाचे सहकार्य लाभले.
CANCER Awareness Camp 8 July 2024
वेश्वी वाडी, उरण
कॅन्सर निदान तपासणी शिबिर- ‘आरोग्य सखी’
वेश्वी वाडी, उरण
8 जुलै 2024
समाजातील कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेता वेळीच आरोग्य तपासणी करणे अत्यंत महत्वाचे ठरते. घरकाम करणाऱ्या महिला, वीटभट्टी कामगार महिला, आदिवासी पाड्यांतील महिला अशांसाठी गेल्या काही वर्षांपासून प्रारंभ सातत्याने विनामूल्य कॅन्सर निदान तपासणी शिबिरांचे आयोजन करते. अंतर्गत तपासणी, ब्रेस्ट चेकिंग, पॅपस्मिअर, CA 125 अशा तपासण्या तज्ञ डॅाक्टर्सद्वारे केल्या जातात. ज्या महिलांना सोनोग्राफी, मॅमोग्राफी करण्याची गरज असेल त्यांची तपासणी जवळपासच्या हॅास्पिटलमधे केली जाते, ज्याचा खर्च प्रारंभ करते. फॅालोअप सेशन्स डॅाक्टर्सच्या उपस्थितीत होतात. शिबिरा दरम्यान आर्यन, कॅल्शियम, मल्टिविटॅमिन अशा गोळ्यांचे मोफत वाटपही केले जाते. ज्यांना अजून काही औषधांची गरज असेल तर तीही देण्यात येतात.
सोमवार दि. 8 जुलै 2024 रोजी वेश्वीवाडी, उरण येथे ‘प्रारंभ’ कला अकॅडमी, जवाहरलाल नेहरु पोर्ट ॲथॅारिटी आणि चांगुलपणाची चळवळ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर अवेअरनेस कॅंपचे आयोजन करण्यात आले होते. वेश्वीवाडी ह्या आदिवासी पाड्यातील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून ह्याचा लाभ घेतला. डॅा. दीपश्री डोंबे आणि डॅा. अनुराधा मिश्रा ह्या तज्ञ गायनॅाकॅालॅाजिस्टनी अतिशय चोखपणे सर्व तपासण्या केल्या.
प्रशिक्षित परिचारिका त्यांच्या मदतीसाठी हजर होत्या. पुढील काही महिने उरण परिसरातील विविध आदिवासी पाड्यांमधे सातत्याने अशा शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. 8 जुलै च्या ह्या उरण मधील शुभारंभाच्या शिबिराला JNPA च्या मा. मनिषा जाधव आणि मा. सिध्दार्थ उघाडे उपस्थित होते. प्रारंभच्या संस्थापिका तसेच संचालिका डॅा. अरुंधती भालेराव, JNPA च्या मा. मनिषा जाधव आणि मा. सिध्दार्थ उघाडे ह्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. डॅा. दीपश्री डोंबे ह्यांनी महिलांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी ह्याविषयी मार्गदर्शन केले.
Cancer Awareness Camp 8 June 2024
Hamrapur Wada
प्रारंभ कला अकॅडमीतर्फे ८ जून २०२४ रोजी वाडा तालुक्याच्या हमरापुर ह्या गावातल्या कष्टकरी महिलांसाठी आरोग्य सखी विनामूल्य कॅन्सर निदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ह्यातील छायाचित्र आणि दृश्य
Cancer Awareness Camp 17 Feb 2024
Manivali Wada
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने मागील सात वर्षांपासून ‘ आरोग्य सखी’ ह्या कॅन्सर निदान तपासणी शिबिरांचे सातत्याने आयोजन केले जाते. घरकाम करणाऱ्या महिला, रोजगारीवर काम करणाऱ्या, बांधकाम मजूर कामगार महिला अशा प्रकारच्या महिलांसाठी हा उपक्रम ‘प्रारंभ’ तर्फे विनामूल्य राबविण्यात येतो. ह्यामधे तज्ञ डॅाक्टरांकरवी महिलांची तपासणी, Papsmear तपासण्या केल्या जातात. ज्या महिलांना sonography किंवा mammography करण्याची आवश्यकता असेल , त्यांची sonography, mammography प्रारंभ तर्फे हॅास्पिटल्समधे केली जाते. सर्व रिपोर्टस् आल्यानंतर डॅाक्टरांच्या उपस्थितीत फॅालो अप सेशनही घेतले जाते. सर्व महिलांना ह्या शिबिरादरम्यान काही महिने पुरेल इतक्या आर्यन तसेच कॅल्शियम गोळ्यांचे मोफत वाटपही केले जाते.
दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी मानिवली ग्रामपंचायत, ता. वाडा, जि. पालघर येथे प्रारंभ तर्फे विनामूल्य कॅन्सर निदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शंभर महिलांची तपासणी ह्या शिबिराअंतर्गत करण्यात आली.
Cancer Awareness Camp
10 Dec 2023
Wada Palghar
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने मागील सात वर्षांपासून ‘ आरोग्य सखी’ ह्या कॅन्सर निदान तपासणी शिबिरांचे सातत्याने आयोजन केले जाते. घरकाम करणाऱ्या महिला, रोजगारीवर काम करणाऱ्या, बांधकाम मजूर कामगार महिला अशा प्रकारच्या महिलांसाठी हा उपक्रम ‘प्रारंभ’ तर्फे विनामूल्य राबविण्यात येतो. ह्यामधे तज्ञ डॅाक्टरांकरवी महिलांची तपासणी, Papsmear तपासण्या केल्या जातात. ज्या महिलांना sonography किंवा mammography करण्याची आवश्यकता असेल , त्यांची sonography, mammography प्रारंभ तर्फे हॅास्पिटल्समधे केली जाते. सर्व रिपोर्टस् आल्यानंतर डॅाक्टरांच्या उपस्थितीत फॅालो अप सेशनही घेतले जाते. सर्व महिलांना ह्या शिबिरादरम्यान काही महिने पुरेल इतक्या आर्यन तसेच कॅल्शियम गोळ्यांचे मोफत वाटपही केले जाते.
दि. 10 डिसेंबर 2023 रोजी ता. वाडा, जि. पालघर येथे बांधकाम मजूर महिलांकरिता प्रारंभ तर्फे विनामूल्य कॅन्सर निदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 70 महिलांची तपासणी ह्या शिबिराअंतर्गत करण्यात आली.
Cancer Awareness Camp
17 Sept 2023
Wada Palghar
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने मागील सात वर्षांपासून ‘ आरोग्य सखी’ ह्या कॅन्सर निदान तपासणी शिबिरांचे सातत्याने आयोजन केले जाते. घरकाम करणाऱ्या महिला, रोजगारीवर काम करणाऱ्या, बांधकाम मजूर कामगार महिला अशा प्रकारच्या महिलांसाठी हा उपक्रम ‘प्रारंभ’ तर्फे विनामूल्य राबविण्यात येतो. ह्यामधे तज्ञ डॅाक्टरांकरवी महिलांची तपासणी, Papsmear तपासण्या केल्या जातात. ज्या महिलांना sonography किंवा mammography करण्याची आवश्यकता असेल , त्यांची sonography, mammography प्रारंभ तर्फे हॅास्पिटल्समधे केली जाते. सर्व रिपोर्टस् आल्यानंतर डॅाक्टरांच्या उपस्थितीत फॅालो अप सेशनही घेतले जाते. सर्व महिलांना ह्या शिबिरादरम्यान काही महिने पुरेल इतक्या आर्यन तसेच कॅल्शियम आणि मल्टीविटॅमिन गोळ्यांचे मोफत वाटपही केले जाते.
दि. 17 सप्टेंबर 2023 रोजी पी. जे. हायस्कूल , ता. वाडा, जि. पालघर येथे बांधकाम मजूर महिलांकरिता प्रारंभ तर्फे विनामूल्य कॅन्सर निदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 85 महिलांची तपासणी ह्या शिबिराअंतर्गत करण्यात आली. डॅा. ऋजुता पाटील आणि डॅा. अश्विनी देशपांडे ह्या तज्ञ डॅाक्टर्सनी महिलांची तपासणी केली.
Cancer Awareness Camp
4,5,6 Jan 2022
Bhiwandi
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने मागील सात वर्षांपासून ‘ आरोग्य सखी’ ह्या कॅन्सर निदान तपासणी शिबिरांचे सातत्याने आयोजन केले जाते. घरकाम करणाऱ्या महिला, रोजदारीवर काम करणाऱ्या, बांधकाम मजूर कामगार महिला अशा प्रकारच्या महिलांसाठी हा उपक्रम ‘प्रारंभ’ तर्फे विनामूल्य राबविण्यात येतो. ह्यामधे तज्ञ डॅाक्टरांकरवी महिलांची अंतर्गत तपासणी, Papsmear तपासणी, CA 125 ही रक्त तपासणी केल्या जातात. ज्या महिलांना sonography किंवा mammography करण्याची आवश्यकता असेल , त्यांची sonography, mammography प्रारंभ तर्फे हॅास्पिटल्समधे केली जाते. सर्व रिपोर्टस् आल्यानंतर डॅाक्टरांच्या उपस्थितीत फॅालो अप सेशनही घेतले जाते. सर्व महिलांना ह्या शिबिरादरम्यान काही महिने पुरेल इतक्या आर्यन तसेच कॅल्शियम गोळ्यांचे, मल्टीविटॅमिन गोळ्यांचे मोफत वाटपही केले जाते.
जानेवारी 2022 मधे प्रारंभ , भूमी वर्ल्ड आणि UST Blue Conch ह्यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळास गांव, भिवंडी येथे रोजदारीवर काम करणाऱ्या महिलांकरिता विनामूल्य कॅन्सर निदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या शिबिरांची आवश्यकता आणि महत्व ह्यावेळी महिलांना सांगण्यात आले. साधारण 150 महिलांनी ह्या तीन दिवसीय शिबिराचा लाभ घेतला.
प्रारंभच्या संस्थापिका आणि संचालिका डॅा. अरुंधती भालेराव, भूमी वर्ल्ड आणि गेबीचे संस्थापक नानजी पटेल, UST Blueconch चे श्री. प्रसन्न जोशी आणि संपदा पेठे ह्यांनी महिलांना मार्गदर्शन केले. डॅा. रेखा थोटे आणि डॅा. ऋजुता पाटील ह्या निष्णात डॅाक्टरांनी महिलांची तपासणी केली.
Today is the last and third day of the cancer diagnosis camp organized by Prarambha Kala Academy bhumi world and UST Blue Conch. Even after a lot of counseling by the entire team, the need for this examination was strongly felt even today, considering the fear and different types of infections among the women. I truly feel that every woman in every village in Maharashtra should be examined after 30. Prarambha Kala Academy will continuously strive for this. Some moments of today's picture. Along with the entire initial team, Dr. Rekha Thote and Dr. Firdos.
A free cancer diagnosis camp was organized for the needy women daily wage earners in Pimplas village near Bhiwandi today on behalf of Prarambha Kala Academy Thane in association with UST Blueconch and Bhumi World. This time Pap smear examination of the uterus of these women was done by a specialist doctor. Dr. Arundhati Bhalerao, founder and director of Prarambha Kala Academy, informed us that this cancer screening has been organized for such women on the 4th, 5th, and 6th of January, 2022. Prasanna Joshi, Finance and Administration Vice President of Blue Conch, and Sampada Pethe, Finance Manager were present on this occasion. Nanji Patel, founder of Bhumi World, and Gebi, CEO Juben Sangvi, and Geeta Achrekar of HR were also present. The need and importance of cancer diagnosis camps were made known to these needy women. On this occasion, multivitamin tablets were distributed to them on behalf of Prarambha Kala Academy. Dr. Arundhati Bhalerao said on this occasion that in view of the increasing incidence of cancer, Prarambha Kala Academy Thane has been conducting cancer screening for women who are housewives and needy women for the past five years. Free sonography and mammography are also done for cancer diagnosis. The program was moderated by Manisha Acharya. This time Sampada Pethe, Prasanna Joshi, Juben Sanghvi, and Nanji Patel guided everyone. Prarambh Kala Academy Advisor Manisha Shitut, Trustee Manisha Acharya Trustee Vaishali Kulkarni Secretary Kirti Kerkar, and other dignitaries were present. Gynecologist Dr. Rekha Thote and Dr. Rujuta Patil examined the patients.
Cancer Awareness Camp
2 & 5 Dec 2022
Manpada Thane
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने मागील सात वर्षांपासून ‘ आरोग्य सखी’ ह्या कॅन्सर निदान तपासणी शिबिरांचे सातत्याने आयोजन केले जाते. घरकाम करणाऱ्या महिला, रोजगारीवर काम करणाऱ्या, बांधकाम मजूर कामगार महिला अशा प्रकारच्या महिलांसाठी हा उपक्रम ‘प्रारंभ’ तर्फे विनामूल्य राबविण्यात येतो. ह्यामधे तज्ञ डॅाक्टरांकरवी महिलांची अंतर्गत तपासणी, Papsmear तपासणी, CA 125 ही रक्त तपासणी केल्या जातात. ज्या महिलांना sonography किंवा mammography करण्याची आवश्यकता असेल , त्यांची sonography, mammography प्रारंभ तर्फे हॅास्पिटल्समधे केली जाते. सर्व रिपोर्टस् आल्यानंतर डॅाक्टरांच्या उपस्थितीत फॅालो अप सेशनही घेतले जाते. सर्व महिलांना ह्या शिबिरादरम्यान काही महिने पुरेल इतक्या आर्यन तसेच कॅल्शियम गोळ्यांचे मोफत वाटपही केले जाते.
डिसेंबर 2022 मधे प्रारंभ आणि Xpanxion International Pvt. Ltd ह्यांच्या संयुक्त विद्यमाने मानपाडा, ठाणे येथे महिलांकरिता विनामूल्य कॅन्सर निदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. साधारण 100 ते 125 महिलांनी ह्या दोन दिवसीय शिबिराचा लाभ घेतला.
Followup Session Manpada Thane Dec. 2022
We recently conducted a cancer awareness camp by our organization Prarambha Kala Academy in association with Bhumi World in Pimplas village and Gynecologists were with us for this. Mammography sonography paps smear along with some other tests were done. On this occasion, multivitamin tablets were distributed to these women. The main objective of raising awareness about cancer is to know the importance of cancer screening among women who are daily wage earners or house workers in the company. We have been working on this project for the last five years. For this, we are getting support from Thane Municipal Corporation and Hon'ble Naresh Mhaske. At the same time, our Prarambha Kala Academy team is working tirelessly. We do not leave these women only by taking the camp, but we also invite doctors and do their follow-up check-ups. Today, this follow-up check-up was organized. Gynecologist Dr. Rekha Thote helped us a lot. The possibility of cancer in two women cannot be ruled out. We are now going to try for further investigation and treatment. Because of ignorance, these women feel a lot of indifference to going to the hospital. We will conduct this follow-up camp on February 14, 2022, at 8.30 am in collaboration with bhumi world at Ashirwad restaurant in the village.
PRARAMBHA'S HELP FOR FLOOD AFFECTED AT SANGLI - AUGUST 2021
सांगली परिसरामध्ये देखील पावसाचा धुमाकूळ, पूर आणि त्यामुळे झालेलं नुकसान यामुळे आम्ही प्रारंभ कला अकॅडमी आणि चांगुलपणाच्या चळवळीच्या वतीनं काही मैत्रिणींनी एकत्र येऊन अल्पशी मदत गोळा केली जी आज सांगलीकडे रवाना झाली. मदत करणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार. महाराष्ट्रावर आलेल्या या भीषण संकटाला चला एकत्रित मानव साखळी करून सामोरे जाऊ या.
Cancer Awareness Camp
17,18 & 20 Aug 2021
Kopari Thane
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने मागील सात वर्षांपासून ‘ आरोग्य सखी’ ह्या कॅन्सर निदान तपासणी शिबिरांचे सातत्याने आयोजन केले जाते. घरकाम करणाऱ्या महिला, रोजगारीवर काम करणाऱ्या, बांधकाम मजूर कामगार महिला अशा प्रकारच्या महिलांसाठी हा उपक्रम ‘प्रारंभ’ तर्फे विनामूल्य राबविण्यात येतो. ह्यामधे तज्ञ डॅाक्टरांकरवी महिलांची अंतर्गत तपासणी, Papsmear तपासणी, CA 125 ही रक्त तपासणी केल्या जातात. ज्या महिलांना sonography किंवा mammography करण्याची आवश्यकता असेल , त्यांची sonography, mammography प्रारंभ तर्फे हॅास्पिटल्समधे केली जाते. सर्व रिपोर्टस् आल्यानंतर डॅाक्टरांच्या उपस्थितीत फॅालो अप सेशनही घेतले जाते. सर्व महिलांना ह्या शिबिरादरम्यान काही महिने पुरेल इतक्या आर्यन तसेच कॅल्शियम गोळ्यांचे मोफत वाटपही केले जाते.
ॲागस्ट 2021 मधे प्रारंभ आणि Xpanxion International Pvt. Ltd ह्यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरी गांव, ठाणे पूर्व येथे महिलांकरिता विनामूल्य कॅन्सर निदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. साधारण 150 महिलांनी ह्या तीन दिवसीय शिबिराचा लाभ घेतला.
Press Conference GYNAC CHECK UP CAMP FOR CANCER AWARENESS "Arogya Sakhi" held at Gadkari Rangayatan Lawn, Thane on 29 December 2021
In association with Prarambha Kala Academy Thane, Expansion International Pvt Ltd, and corporator Malti Patil, we recently organized a three-day cancer diagnosis camp for women housewives in which mammography, sonography, uterine examination, pap smear test, etc. were carried out. Keeping in mind the increasing incidence of cancer, there is a continuous effort to create public awareness about cancer among all types of people. Today we held the follow-up session for the diagnosis and check-up of this cancer, which took place for three consecutive days last month. The purpose behind this follow-up was to get the women treated if they had any disease, rather than just doing the tests and handing over their reports in their hands. Fortunately, two to three women out of two hundred women are predicted to have cancer. We will definitely try now on how to treat them further. Most women realize that they have an infection after giving birth because they do not go to the hospital for self-diagnosis. On that, our Dr. Rekha Thote, and Dr. Sangeeta Arenke prescribed the medicines to be taken. Considering the increasing rate of cancer, it was also realized at this time how important it is for the women in the slums who neglect themselves in the rush of work to take care of their health. Honorable Mayor Naresh Mhaske Sujay Patki of Bharatiya Janata Party, Dean of Kalwa Hospital Doctor Bhosle, Doctor Rani Shinde, Doctor Khushboo, Dr. Geetanjali Amin Dr. Rekha Thote Dr. Sangeeta Aranke. We are deeply grateful to Dr. Devgekar corporator Namrata Pamnani, corporator Sharmila Pimpolkar.
Press conference organised today at Gadkari Katta on the occasion of Aarogya Sakhi house maid cancer Awareness Checkup Camp held on 17 th 18 th and 20 th august in association with xpanxion international pvt.ltd.pune Rotary thane and Corporator Malti Patil along with BJP leader Sujay Patki.
लसीकरण जनजागृती मोहिम, येऊर, ठाणे
मे - जून 2020
लसीकरण जनजागृती मोहिम, येऊर, ठाणे
मे - जून 2020
संपूर्ण जगावर 2020 मधे अकस्मात कोरोनाचे संकट कोसळले. प्रथम उपाय म्हणून सर्वत्र लॅाकडाऊन जाहीर झाला. हळूहळू लॅाकडाऊन शिथिल होईल, संशोधकांच्या अथक प्रयत्नांतून लसनिर्मिती होणार आहे अशी चिन्हे दिसू लागली. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत, ‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेने, ठाणे महानगरपालिकेचे परवानगीपत्र घेऊन , ठाण्यातील येऊर भागातील आदिवासी पाड्यांमधे, लसीकरण जनजागृती मोहिम राबवली. लोकं बोलायला, दार उघडायलाही तयार नसत. लसीबद्दल प्रचंड भीती आणि गैरसमज लोकांच्या मनात होते. पण प्रारंभची आमची टीम सातत्याने तेथे जाऊन स्थानिकांचे समुपदेशन करत राहिली. अनेक उदाहरणे देत, लस घेण्याबद्दल त्यांचे मन आम्ही वळवत राहिलो. येऊर मधे लसीकरण केंद्र नव्हते. सातत्याने घरोघरी , पाड्या-पाड्यांमधे जाऊन लोकांना लसीकरणाचे महत्व पटवण्यात आम्ही यशस्वी झालो. तेथील लोकांची नांवे नंबर यादी केली. आमच्या प्रयत्नांना यश येऊन ठाणे महानगरपालिकेने येऊर येथील स्थानिकांसाठी तेथे लसीकरण केंद्र सुरु केले. महापौर मा. नरेश म्हस्के ह्यांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले. काही क्षणचित्रं.
Health Checkup Camp for Children ( मोफत आरोग्य शिबीर )
Yeoor Thane
28 Feb 2019
Free Medical Health Check up Camp at Yeoor with the Help of Civil Hospital Thane and Mr. Vinay Sahastrabuddhe and Sujay Patki
Free Iron and Calcium Tablets Distribution &The Team behind Success of Prarambha Kala Academy and Civil Hospital
Cancer Awareness Camp 2018
कोपरी गांव, ठाणे 2018
Cancer Awareness Camp
कोपरी गांव, ठाणे 2018
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने, घरकाम करणाऱ्या तसेच रोजगारीवर काम करणाऱ्या कष्टकरी महिलांसाठी मोफत कॅन्सर निदान तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते. ब्रेस्ट चेकअप, गर्भाशय तपासणी, आवश्यक असेल त्यांची sonography, mammography करण्यात येते. तज्ञ डॅाक्टर्स ह्या तपासण्या करतात. डॅा. संगीता आरणके. डॅा. अमीन ह्या गायनॅाकॅालॅाजिस्ट तज्ञ डॅाक्टर्स म्हणून उपस्थित होत्या. 2018 मधे कोपरी येथे भरविण्यात आलेल्या ह्या शिबिराचा फायदा तेथील महिलांनी घेतला. अतिशय खर्चिक अशा ह्या तपासण्या आपण त्यांच्याच विभागात उपलब्ध करून देतो त्याही मोफत. शिवाय ह्यावेळी आर्यन, कॅल्शियम, मल्टिविटॅमिन गोळ्यांचे मोफत वाटपही केले जाते. आर्यन कॅल्शियम तसेच मल्टिविटॅमिन गोळ्यांनी कंबरदुखी, पाय दुखणे ह्यांसारख्या छोट्या तक्रारी दूर होतात. शिवाय जर काही जंतुसंसर्ग असेल तर तो दूर करण्यासाठी औषधे, मलम ही दिले जाते. त्यामुळे त्या महिलाही पुढचा कॅंप कधी करणार अशी विचारणा करतात. ज्यांच्या तपासणीत sonography किंवा mammography आवश्यक असेल त्यांना त्यांच्या जवळपासच्या हॅास्पिटलमधे ह्या तपासण्यांसाठी पाठवले जाते. ज्यांचा पूर्ण खर्च प्रारंभ उचलते. Sonography Mammography ह्यासारख्या तपासण्यांसाठी ह्या हातावर पोट असलेल्या महिला काही व्हायला लागल्याशिवाय कधीही जात नाहीत. नियमित तपासण्यांमुळे कॅन्सर सारख्या आजाराला आपण नक्कीच दूर ठेवू शकतो. कॅन्सर कोणालाच होऊ नये पण जर काही तत्सम लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार मिळावेत, जिवावरचं संकट टळावं, ह्यासाठी आमची ही धडपड.
Cancer Awareness Camp 2017
Manpada Thane
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ही आमची संस्था शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत गेल्या बावीस वर्षांपासून कार्यरत आहे. घरकाम करणाऱ्या महिला, आदिवासी पाड्यांतील महिला ह्या आर्थिक कारणांमुळे तसेच हातावर पोट असल्याकारणाने वेळेअभावी डॅाक्टरकडे जाऊन स्वत:ची आरोग्य तपासणी करत नाहीत. कॅन्सरचं वाढते प्रमाण लक्षात घेता, कॅन्सरविषयी
जनजागृती करावी, कॅन्सरचा धोका वेळीच ओळखून त्याला रोखण्यात यश यावं, आरोग्य रक्षण व्हावं ह्या हेतूने अशा महिलांसाठी विनामूल्य कॅन्सर निदान शिबिरांचे आयोजन केले जाते. मानपाडा ठाणे येथे 2017 मधे तज्ञ डॅाक्टर्स, प्रशिक्षित परिचारिकांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडले.
आर्यन, कॅल्शियम, मल्टिविटॅमिन गोळ्यांचे मोफत वाटपही ह्या शिबिरांत केले . अंतर्गत तपासणी, ब्रेस्ट चेकअप , पॅपस्मिअर, गरज असेल तर सोनोग्राफी, मॅमोग्राफी तज्ञ डॅाक्टर्स द्वारे केली जाते. फॅालो अप सेशन सुध्दा घेतले जाते.
ह्यावेळी उपस्थित संस्थेच्या संस्थापिका, संचालिका डॅा. अरुंधती भालेराव, माजी महापौर मीनाक्षी शिंदे
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ही आमची संस्था शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत गेल्या बावीस वर्षांपासून कार्यरत आहे. घरकाम करणाऱ्या महिला, आदिवासी पाड्यांतील महिला ह्या आर्थिक कारणांमुळे तसेच हातावर पोट असल्याकारणाने वेळेअभावी डॅाक्टरकडे जाऊन स्वत:ची आरोग्य तपासणी करत नाहीत. कॅन्सरचं वाढते प्रमाण लक्षात घेता, कॅन्सरविषयी
जनजागृती करावी, कॅन्सरचा धोका वेळीच ओळखून त्याला रोखण्यात यश यावं, आरोग्य रक्षण व्हावं ह्या हेतूने अशा महिलांसाठी विनामूल्य कॅन्सर निदान शिबिरांचे आयोजन केले जाते. मानपाडा ठाणे येथे 2017 मधे तज्ञ डॅाक्टर्स, प्रशिक्षित परिचारिकांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडले.
आर्यन, कॅल्शियम, मल्टिविटॅमिन गोळ्यांचे मोफत वाटपही ह्या शिबिरांत केले . अंतर्गत तपासणी, ब्रेस्ट चेकअप , पॅपस्मिअर, गरज असेल तर सोनोग्राफी, मॅमोग्राफी तज्ञ डॅाक्टर्स द्वारे केली जाते. फॅालो अप सेशन सुध्दा घेतले जाते.
ह्यावेळी उपस्थित संस्थेच्या संस्थापिका, संचालिका डॅा. अरुंधती भालेराव, माजी महापौर मीनाक्षी शिंदे
Cancer Awareness Camp 2016
Kokanipada Thane
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ही आमची संस्था शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत गेल्या बावीस वर्षांपासून कार्यरत आहे. घरकाम करणाऱ्या महिला, आदिवासी पाड्यांतील महिला ह्या आर्थिक कारणांमुळे तसेच हातावर पोट असल्याकारणाने वेळेअभावी डॅाक्टरकडे जाऊन स्वत:ची आरोग्य तपासणी करत नाहीत. कॅन्सरचं वाढते प्रमाण लक्षात घेता, कॅन्सरविषयी
जनजागृती करावी, कॅन्सरचा धोका वेळीच ओळखून त्याला रोखण्यात यश यावं, आरोग्य रक्षण व्हावं ह्या हेतूने अशा महिलांसाठी विनामूल्य कॅन्सर निदान शिबिरांचे आयोजन प्रारंभ करते.
कोकणीपाडा, ठाणे येथील प्रथम शिबीर 27 मे 2016 रोजी तज्ञ डॅाक्टर्स, प्रशिक्षित परिचारिकांच्या उपस्थितीत पार पडले.
आर्यन, कॅल्शियम, मल्टिविटॅमिन गोळ्यांचे मोफत वाटपही ह्या शिबिरांत केले जाते.अंतर्गत तपासणी, ब्रेस्ट चेकअप , पॅपस्मिअर, गरज असेल तर सोनोग्राफी, मॅमोग्राफी तज्ञ डॅाक्टर्स द्वारे केली जाते. फॅालो अप सेशन सुध्दा घेतले जाते.
ह्यावेळी उपस्थित संस्थेच्या संस्थापिका, संचालिका डॅा. अरुंधती भालेराव, विश्वस्त मनीषा आचार्य, सचिव कीर्ति केरकर, विश्वस्त वनीता थोरात, मनिषा शितूत, डॅा. उज्ज्वला बर्दापूरकर.
Cancer Awareness Camp
कोकणीपाडा 2015
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने, घरकाम करणाऱ्या कष्टकरी महिलांसाठी मोफत कॅन्सर निदान तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते. ब्रेस्ट चेकअप, गर्भाशय तपासणी, आवश्यक असेल त्यांची sonography, mammography करण्यात येते. तज्ञ डॅाक्टर्स ह्या तपासण्या करतात. शिवाय ह्यावेळी आर्यन, कॅल्शियम, मल्टिविटॅमिन गोळ्यांचे मोफत वाटपही केले जाते. आर्यन कॅल्शियम तसेच मल्टिविटॅमिन गोळ्यांनी कंबरदुखी, पाय दुखणे ह्यांसारख्या छोट्या तक्रारी दूर होतात. शिवाय जर काही जंतुसंसर्ग असेल तर तो दूर करण्यासाठी औषधे, मलम ही दिले जाते. त्यामुळे त्या महिलाही पुढचा कॅंप कधी करणार अशी विचारणा करतात. ज्यांच्या तपासणीत sonography किंवा mammography आवश्यक असेल त्यांना त्यांच्या जवळपासच्या हॅास्पिटलमधे ह्या तपासण्यांसाठी पाठवले जाते. ज्यांचा पूर्ण खर्च प्रारंभ उचलते. Sonography Mammography ह्यासारख्या तपासण्यांसाठी ह्या हातावर पोट असलेल्या महिला काही व्हायला लागल्याशिवाय कधीही जात नाहीत. नियमित तपासण्यांमुळे कॅन्सर सारख्या आजाराला आपण नक्कीच दूर ठेवू शकतो. कॅन्सर कोणालाच होऊ नये पण जर काही तत्सम लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार मिळावेत, जिवावरचं संकट टळावं, ह्यासाठी आमची ही धडपड.
Cancer Awareness Camp
मानपाडा 2014
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेतर्फे मोफत कॅन्सर निदान तपासणी शिबिरं अर्थात् ‘आरोग्य सखी’ भरवली जातात. घर मदतनीस महिला, कष्टकरी महिला, रोजगारीवर काम करणाऱ्या महिलांसाठी ही शिबिरं आम्ही घेतो. ह्या महिला नियमित तपासणीसाठी डॅाक्टरांकडे जात नाहीत. काही होऊ लागल्यावर डॅा. कडे गेल्यावर कधी कधी आजार बळावलेला असतो. कॅन्सरचा धोका वेळीच ओळखून त्याला अटकाव करण्यासाठी अशा तपासण्या महत्वाच्या असतात. ह्या महिलांच्या रहात्या वस्तीत तज्ञ डॅाक्टर्सची टीम, प्रशिक्षित परिचारिका वगैरे टीम घेऊन आपण त्यांच्या कॅन्सरविषयक मोफत तपासण्या करतो. गरज असेल त्यांची sonography, mammography केली जाते. डॅाक्टरांच्या उपस्थितीत फॅालोअप सेशन घेतले जाते. आर्यन, कॅल्शियम, शक्तिवर्धक गोळ्यांचे मोफत वाटपसुध्दा केले जाते. मानपाडा येथे 2014 रोजी घेण्यात आलेल्या शिबिरातील काही क्षणचित्रं.
Cancer Awareness Camp
कोकणीपाडा 2013
समाजातील कॅन्सरचं वाढते प्रमाण लक्षात घेता, प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेने कॅन्सर निदान तपासणी शिबिरं अर्थात् ‘आरोग्य सखी’ चे आयोजन करण्याचे ठरविले. घरकाम करणाऱ्या मदतनीस महिला आर्थिक कारणांमुळे आणि वेळेअभावी डॅाक्टरांकडे जाऊन त्यांची तपासणी- Gynac checkup- करत नाहीत. योग्य वेळी तपासण्या केल्या तर कॅन्सरचा धोका वेळीच ओळखून त्याला दूर ठेवण्यात मदत होऊ शकते. अशा महिलांसाठी पूर्णपणे मोफत कॅन्सर निदान तपासणी शिबिर कोकणीपाडा, ठाणे येथे 2013 मधे घेण्यात आले. तज्ञ डॅाक्टरांकरवी ब्रेस्ट चेकअप, गर्भाशय तपासणी अशा स्त्री-रोग विषयक तपासण्या केल्या. आर्यन, कॅल्शियम, मल्टिविटॅमिन गोळ्यांचे मोफत वाटपही करण्यात आले. ज्यांना इतर काही औषधांची गरज वाटली, ती औषधेही त्यांना मोफत देण्यात आली.
काही क्षणचित्रं.