Village Adoption Project
On 22 April 2026,
Prarambh Kala Academy Thane, in collaboration with Jawaharlal Nehru Port Authority, conducted a workshop under the “Shivrang” initiative in Safale village, Palghar, from 11:00 AM to 2:00 PM.
A total of 43 women participated in the workshop. From Prarambh, Vaishali Kulkarni, Pratipada, along with five team members, provided training in Warli Painting and basic bag stitching skills. The response from the participants was very positive and encouraging.
The main objective of the Shivrang initiative is to create livelihood opportunities for underprivileged tribal women and help them become self-reliant. Through this effort, around 300 women from Palghar and nearby areas are being supported towards financial independence. The initiative also aims to boost their confidence and empower them to build a better future.





01/02/2026
प्रारंभ कला ॲकॅडमीच्या आदिवासी आणि घरकाम करणाऱ्या बायकांसाठीच्या वारली पेंटिंगच्या पिशव्या या प्रकल्पांतर्गत वारली पेंटिंग प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
प्रशिक्षण वेळ दुपार २ ते संध्या. ५ वा. अशी होती.
प्रशिक्षक म्हणून गौरव म. लांजेकर यांनी वारली चित्र व पेंटिंग शिकवलं.
प्रशिक्षणाचा लाभ १३ महिलांनी घेतला.
प्रारंभतर्फे वैशाली कुलकर्णी प्रशिक्षणा दरम्यान उपस्थित होत्या.
प्रशिक्षण संध्याकाळी ठीक ५ वा. संपले.





‘प्रारंभ ‘ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेतर्फे दि. 8 आणि 9 सप्टेंबर 2025 रोजी इंदिरा नगर, वागळे प्रभाग, ठाणे येथील पाड्यामध्ये विनामूल्य वारली पेंटिंग प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. कष्टकरी महिलांना, हातावर पोट असणाऱ्या महिलांना, रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांनी आर्थिक स्वावलंबी बनावे, ह्या सामाजिक जाणिवेतून, विविध पाड्यांमधे आम्ही पिशव्या शिवण्यासाठी
कापड,रंग, दोरा वगैरे साहित्य पुरवतो. शिलाई मशीन नसेल तर ते सुद्धा देतो. पिशव्यांवर वारली पेंटिंग करून घेऊन त्या विकून, ह्या महिलांना त्यांचा शिलाई आणि पेंटिंगचा मोबदला देतो. साहित्याचा खर्च वगळता एक रुपयाही नफा प्रारंभ घेत नाही.
8 आणि 9 सप्टेंबर रोजी वागळे येथील पाड्यामधे झालेल्या वारली पेंटिंगचे प्रशिक्षण प्रारंभच्या सदस्य अलका आडगावकर ह्यांनी दिले. वारली चित्र कसे काढायचे, कापडावर ते कसे रंगवावे ह्याचे अतिशय उत्तम मार्गदर्शन त्यांनी केले.
हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असते. महिला सक्षमीकरणासाठी आमचा हा प्रयत्न.
काही क्षणचित्रं.

प्रारंभ कला अकॅडमीच्या वतीने महिला सक्षमीकरण अंतर्गत आज आम्ही प्रारंभच्या काही जणी इंदिरानगर परिसरातील रूपादेवी टेकडी येथील घरात राहणाऱ्या पण गरजू असलेल्या महिलांना त्यांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावं, आणि कष्ट करून स्वतःचे भविष्य आणि मुलांचं भविष्य चांगलं करावं या दृष्टिकोनातून त्यांच समुपदेशन करण्यासाठी गेलो होतो. 50 ते 55 महिला एकत्रित झाल्या होत्या. सगळ्याजणी काम करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यातल्या बहुतांश महिलांना शिवणकाम येत ही विशेष गोष्ट. पुढच्या महिन्यात त्यांना वारली पेंटिंग प्रशिक्षण आम्ही देतो आहोत. त्याचबरोबर त्यांना कपडा ब्रश, रंग हे आमचं नेहमीच साहित्य देऊन त्यांना आर्थिक स्वावलंबी करण्यासाठी आमचा पिशव्या प्रकल्प त्यांच्या माध्यमातून राबवणार आहोत. जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या मागचा उद्देश आहे. आजच्या समुपदेशन सत्राची ची काही दृश्य आणि छायाचित्र.



प्रत्येक स्त्रीने नवऱ्याचं एटीएम कार्ड जवळ असल, आणि अजिबात तिला पैशाची गरज नसली तरीसुद्धा स्वतःच्या पायावर उभे राहावं असं मला कायम वाटत. स्वतः कमवतांना आणि खर्च करताना मिळणारा आनंद आणि आत्मविश्वास वेगळा असतो. मग ती आदिवासी महिला असो तळहातावर पोट असणारी महिला असो, किंवा अगदी सधन घरातील गृहिणी असो, त्या जाणिवेतूनच महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या दृष्टीने मी प्रारंभ कला अकॅडमी या माझ्या संस्थेतर्फे आमच्या टीम बरोबर महिलांना कपडा देणे त्यांना रंग देणे ब्रश देणे दोरा देणे, गरज असेल त्यांना शिलाई मशीन देणे, आणि त्यांना पिशव्या शिवण्याचं वारली पेंटिंग प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून पिशव्या शिवून घेणे, आणि त्या विकणे. त्यातून मिळणारे पैसे त्यांना देणे. ते काही खूप नसले तरी त्यातून त्यांना जो स्वतः कमावल्याचा आनंद असतो तो खूप छान असतो. या जाणिवेतून वाडा धावर पाडा इथे आम्ही हा प्रकल्प सुरू केला. आणि आज ठाण्यातल्या अशाच गरजू महिलांना आमच्या ऑफिसमध्ये एकत्रित केलं. त्यांची एक सभा घेतली. आता त्यांच्यासाठी लवकरच प्रशिक्षण होईल. आणि त्या देखील पिशव्या शिवायला लागतील. बहुतेकींना शिवणकाम येतच पण त्याचा उपयोग त्यांना करता आला नाही. तो त्यांनी करावा म्हणून हा खटाटोप. अशा कमीत कमी 500 महिलांना तरी आर्थिक सबलीकरण करून सक्षम करावं अशी इच्छा आहे. पण प्रश्न हा की या पिशव्या घेणार कोण? या उत्तराच्या मी शोधात आहे.
तुम्हाला काही सुचलं तर मला जरूर कळवा.
आजची काही क्षणचित्रे.



प्रारंभ कला अकॅडमीच्या अनेक उपक्रमांमधला एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे आदिवासी पाड्यातील महिलांना सक्षम करणे. त्यांना कपडा रंग ब्रश हे आम्ही देतो. वाड्याच्या जवळ असलेल्या डाहे धावरपाडा आणि गवळी पाडा इथे महिलांचे काही गटाने तयार केले आहेत. त्यांना मशीन दिली आहे. प्रशिक्षण दिलय. त्या उत्तम पिशव्या शिवून त्याच्यावर वारली पेंटिंग करतात. आम्ही त्यांना वेळोवेळी जाऊन भेटतो त्यांना प्रोत्साहन देतो. त्यांचा आळस झटकतो. आणि त्या पुन्हा कामाला लागतात. आज देखील आम्ही गवळी पाण्यामध्ये गेलो. तिथे त्यांनी शिवलेल्या पिशव्या पाहिल्या. त्यांना काही दुरुस्ती सांगितली. ज्या तयार पिशव्या होत्या त्या घेतल्या त्याचे लगेच चेकच्या रूपाने त्यांना पैसे दिले.
आता तुमचं काम आहे 120 रुपयाला एक पिशवी याप्रमाणे पिशव्या ऑर्डर करणे .त्या विकत घेणे. इतरांना त्यासाठी प्रवृत्त करणे. आणि ह्यातून मिळणाऱ्या पैशांच्या माध्यमातून आपल्या आदिवासी मैत्रिणींना सक्षम करणे.
तुम्हाला किती पिशव्या हव्यात ते खाली व्हाट्सअप वर लिहा तुमच्या फोन नंबर सह. किंवा माझा नंबर तुमच्याकडे असेल तर डायरेक्ट मला मेसेज करा.







Date:
प्रारंभ कला अकॅडमी ने 15 ऑगस्ट 2024 रोजी वाड्यापासून पंधरा किलोमीटरवर असलेल्या 'धावरपाडा' येथे आदिवासी महिलांना सक्षम करण्याचा उपक्रम हाती घेतला.त्यांना सुरुवातीला वारली पेंटिंग प्रशिक्षण दिलं. पिशव्या शिवायला कपडा आणि रंग देण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांना वारली पेंटिंगच पहिल्यांदा प्रशिक्षणही देण्यात आलं. एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते ती म्हणजे त्या फार कोंडलेल्या आहेत.त्याच्यामध्ये ऊर्जा आणि उत्साह निर्माण करण्याची नितांत गरज आहे. साlतत्याने त्यांच समुपदेशन करणं महत्त्वाचं आहे. आपण आपल्या पायावर उभ राहिल पाहिजे ही जाणीव त्यांना करून देणं फार गरजेचं वाटतं. त्यांना स्वप्न दाखवणं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करणं हे देखील महत्त्वाचं वाटतं.अर्थात हे सगळं एका रात्रीतून बदलणार नाही. त्यासाठी भरपूर अवधी द्यावा लागेल.परंतु मी आणि माझी संपूर्ण टीम हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी अहोरात्र काम करणार आहोत. अडीच महिन्यामध्ये त्यांना शिलाई मशीन दिल्यानंतर पिशव्या आणि त्यावर वारली पेंटिंग तसेच गोधड्या शिवण्याचं काम त्यांच्यातील काही महिलांनी उत्तम रीतीने केलं.आमच्या व्हाट्सअप वरनं आम्ही आवाहन केल्यानंतर आमच्याच परिचित मैत्रिणींनी अतिशय उत्साहाने त्या पिशव्या आणि गोधड्या विकत घेतल्या. काल याबाबत आढावा मीटिंग घेण्यात आली आणि या महिलांची आम्ही प्रमुख म्हणून नेमलेली वाड्यातील मेघना हिच्या ताब्यात आम्ही शिवलेल्या पिशव्यांचे पैसे आणि गोधड्यांचे पैसे सुपूर्त केले.
त्यांना जर उत्तम मार्गदर्शन केल,त्यांना हिम्मत दिली तर या महिला नक्कीच स्वतःच्या पायावर अधिक खंबीरपणे उभ्या राहतील असं वाटतं. प्रारंभ सामाजिक उपक्रमातून जो निधी गोळा करते त्यातूनच हे उपक्रम राबवते.त्यामुळे या महिलांना लागणारे सगळे साहित्य प्रारंभ कला अकॅडमी त्यांना पुरवते. कुठलाही फायदा प्रारंभ कला अकॅडमी घेत नाही. काल अधिक 25 मीटर कपडा महिलांना सुपूर्त करण्यात आला.यावेळी प्रारंभ कला अकॅडमीच्या ऑफिसमध्ये प्रारंभ च्या कार्यकर्त्या वैशाली, मनीषा, कीर्ती, मनीषा शितुत, जयश्री,मी स्वतः, वैशाली पराड, आणि वाड्याहून आलेली आमची तिथली प्रतिनिधी मेघना आणि आमच्या त्या प्रकल्पाला वाड्यातील मदत करणारे कार्यकर्ते विजय सर आणि बागुल सर उपस्थित होते.


















© 2026. Prarambha Kala Academy. All rights reserved.
© 2026. Prarambha Kala Academy. All rights reserved.