Dr. Arundhati Bhalerao
तिचे आकाश पेलताना ही माझी 52 भागांची मालिका या महिन्याच्या शेवटी संपते आहे. आणि मी लगेचच नवीन मालिका घेऊन येतीये उद्योजकांची बाराखडी. नक्की पाहायला विसरू नका
कालचा जागतिक महिला दिन हा माझ्यासाठी विशेष ठरला. महिला दिनाच्या निमित्ताने आत्तापर्यंत इतक्या वर्षात अनेक कार्यक्रमांना जाता आलं. पण माझ्या मुंबईतल्या 24 वर्षांच्या वास्तव्यात महिला दिनाच्या निमित्ताने दूरदर्शनवर मुलाखत घेण्याची संधी पहिल्यांदा मिळाली. त्याचे श्रेय अर्थातच दूरदर्शनच्या आदिशक्ती कार्यक्रमाच्या निर्माती संध्या पुजारी यांच्यामुळे. दुपारी साडेतीन वाजता हा कार्यक्रम प्रसारित झाला. ममता सिंधुताई सपकाळ आणि सविता सचिन गोस्वामी या दोघींची मुलाखत घेतानाचा आनंद फार वेगळा होता.
सकाळी वर्तक नगरच्या थीराणी विद्यालयात पालक आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याबरोबर अतिथी म्हणून महिला दिन साजरा करण्याचा आनंद देखील वेगळा होता. त्यासाठी शाळेच्या प्राचार्य शेंडे मॅडम यांचे मनापासून आभार.
महामुंबई शिक्षण संस्था संघटना मुंबई व ठाणे आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ आयोजित 35 वे राज्यस्तरीय शैक्षणिक अधिवेशन आज दादर येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या सभागृहामध्ये 400 च्या वर शिक्षण संस्था चालकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रमाला उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी केंद्रीय मंत्री माननीय विजय नवल पाटील, हिरानंदानी समूहाचे निरंजन हिरानंदानी ,आमदार मनीषा कायंदे, आमदार निरंजन डावखरे, इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त अचलाताई जोशी, माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत, पद्मश्री डॉक्टर झहीर काझी ,डॉक्टर जयदीप मिराशी अध्यक्ष हिल स्प्रिंग इंटरनॅशनल स्कूल, मिलिंद विद्यालयाचे संस्थापक माननीय सदानंद रावराणे, सरस्वती एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका श्रीमती मीरा कोरडे ,दोस्ती फाउंडेशन एज्युकेशन ट्रस्टच्या रंजिनी कृष्णस्वामी , पत्रकार मिलिंद बल्लाळ, ज्ञानसाधना महाविद्यालयाचे कमलेश प्रधान इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत अतिशय उत्साहात पार पडले. महामुंबई शिक्षण संस्था संघटना मुंबई आणि ठाणे विभाग याचे कार्यवाह डॉक्टर विनय राऊत त्यांच्या सुविद्य पत्नी अनघा राऊत अध्यक्ष सदानंद रावराणे त्याचप्रमाणे उपाध्यक्ष राजेंद्र प्रधान माननीय श्री राजेंद्र बोऱ्हाडे आणि माननीय श्री कुंभार सर यांच्या अथक परिश्रमान हे अधिवेशन विविध ठरावां सकट जोरदार संपन्न झालं.
या संपूर्ण अधिवेशनाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी मला दिल्याबद्दल संपूर्ण समिती आणि माननीय मीरा कोरडे यांचे मी मनःपूर्वक आभार मानते. यावेळी मिलिंद बल्लाळ यांनी संपादित केलेल्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं.
प्रारंभ कला ॲकॅडमी
दि.1 मार्च 2025
आज दि. 1 मार्च 2025 रोजी आमच्या 'प्रारंभ कला ॲकॅडमी' ह्या संस्थेतर्फे ठाण्यातील यशोधन नगर येथील बालिकाश्रमात 'आओ दिया जलाए' या वार्षिक उपक्रमांतर्गत प्रिया कुर्लेकर यांनी भेट दिली.
कथ्थक नृत्य प्रकारात पोस्ट ग्रॅज्युएशन कलेल्या प्रिया कुर्लेकर यांनी सुरुवातीला कथ्थक नृत्य हे पुराणात,मंदिरात देवासमोर कशा प्रकारे सादर होत असे तसेच कृष्ण कथा,देवी ची कथा कशी नृत्याविष्काराद्वारे सादर करण्यात यायची हे त्यांनी सुंदर ताल धरत दाखवले.
सर्व मुली लक्ष देऊन ऐकत होत्या.
नंतर त्यांनी कथ्थक नृत्यातील 'तत् कार,चक्री' हे नृत्याविष्कार शिकवले.
सर्व लहान-मोठ्या मुली खूप उत्साहाने शिकत होत्या.
'हे सकल बन ..फुल रही' हे ठुमरी प्रकारातील गाणं कथ्थक नृत्याविष्काराद्वारे मुलींना शिकवले. मुलींनी पटापट हातवारे,पायांच्या स्टेप्स आत्मसात केल्या...प्रियाही अतिशय सुंदर रीतीने, मुलींच्या कलाने घेत, त्यांना शिकवत होत्या.मुली ही आनंदाने त्यांच्या साथीने ताल धरत होत्या.
अशा प्रकारे आज सुंदर बहारदार संध्याकाळ संपन्न झाली...
काही क्षणचित्रे....
आज सहा डिग्री घेतल्या याचा पहिल्यांदा समाधान आणि मुठभर मास आल. सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कार तसे मिळाले आहेत मला, पण शैक्षणिक क्षेत्रातला पुरस्कार मिळाला आणि तोही जनकवी पी. सावळाराम यांच्या नावाने मिळाला याचा आनंद खूप छान आहे .जो शब्दात नाही व्यक्त करता येणार. 2022 --23 ते 23 --24 या काळात ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेतील 180 शाळांमधील 14000 विद्यार्थ्यांना 'शिक्षण करूया सोपे 'अर्थात हसत खेळत शिक्षण हा एक आगळावेगळा उपक्रम मी आणि माझ्या सहकारी मैत्रिणींनी अतिशय जोरात राबवला. त्याच्यावर मी आजपर्यंत कधीच लिहिलं नव्हतं. लवकरच त्याच्याविषयी सविस्तर लिहीन. पण त्या माझ्या कार्याची दखल घेत ठाणे महानगरपालिका आणि पी. सावळाराम समिती यांनी माझ्या कार्याची नोंद घेतल्याबद्दल माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ,माननीय खासदार नरेश म्हस्के, महापालिकेचे आयुक्त, अधिकारी पदाधिकारी यांचे सगळ्यांची मी मनापासून आभारी आहे. 25 हजार रुपये धनादेश सन्मानचिन्ह असं ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. हे नक्कीच पुढे काम करायला प्रोत्साहन देणार ठरणार आहे. यावर्षीचा पी. सावळाराम जीवन गौरव पुरस्कार अभिनेते उदय सबनीस यांना, गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री लीना भागवत यांना उदयन्मुख कलाकार सन्मान' हवा येऊ द्या फेम 'दत्तात्रय मोरे यांना तर साहित्य क्षेत्रातला पुरस्कार निकिता भागवत यांना देऊन ठाणे महापालिकेने आपल्या ठाण्यातील लोकांना जे प्रोत्साहन दिलय त्याबद्दल त्यांचे मनापासून पुनश्च एकदा आभार. काही क्षणचित्रे.
प्रारंभ कला ॲकॅडमी
दि.22 फेब्रुवारी 2025
आज दि. 22 फेब्रुवारी 2025 रोजी आमच्या प्रारंभ कला ॲकॅडमी ह्या संस्थेतर्फे ठाण्यातील यशोधन नगर येथील बालिकाश्रमात 'आओ दिया जलाए' हया वार्षिक उपक्रमांतर्गत अपर्णा खोले आणि वसुधा जोशी यांनी भेट दिली. ‘ वक्रतुंड महाकाय सर्व कार्येषु सर्वदा’ , ‘सर्व मंगल मांगल्ये शिबे सर्वार्थ साधिके’ ह्या श्लोकांनी सुरुवात केली. आज रामदास नवमी आहे. ह्या दिवसाचे औचित्य साधून त्यांनी मुलींना रामदासांविषयी माहिती सांगितली. दासनवमीचे महत्व सांगितले. तसेच
आज शनिवार असल्याने 'भीमरुपी महारुद्रा' हे मारूती स्तोत्र सुध्दा म्हणायला शिकवले.
त्यानंतर त्या दोघींनीही '‘कभी राम बन के कभी शाम बन के' हे भजन मुलींना शिकवले.
काही मुलींनी स्वतःहून काही गाणी म्हणून दाखवली.
एक नवीन खेळही खेळायला शिकवला.
सर्व मुली जे जे स्तोत्र ऐकत होत्या ,ते आत्मसात करून घेत होत्या.
काही क्षणचित्र...
आज ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात डिपार्टमेंट ऑफ मास मीडियाच्या वतीने Routes to Roots या विषयावर आधारित कल्चरल हेरिटेज panel discussion आयोजित करण्यात आलं होतं. त्यात वक्ता म्हणून मला आमंत्रित करण्यात आलं होतं. माझ्या सह आर्किऑलॉजी या विषयाचे तज्ञ अथर्व बेडेकर आणि लॉयर आणि श्रेया क्रिएशन चा हेड श्रेया मराठे उपस्थित होत्या. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन करत हा कार्यक्रम आखीव रेखीव केला. महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मानसी मॅडम मोहनती मॅडम आणि महेश पाटील सर यांचे मनापासून आभार. काही क्षणचित्रे
Date: 25/01/2025
काल मेघनासाने यांच्या ॲडजस्टमेंट आणि गुणीजनांचे कलाविष्कार या दोन पुस्तकाचे प्रकाशन सहयोग मंदिर ठाणे येथे अतिशय उत्साहात संपन्न झालं. कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून ॲडजस्टमेंट या कथासंग्रहावर बोलण्यासाठी मला आमंत्रित करण्यात आलं होतं. माझ्याबरोबर रंगमंचावर प्रसिद्ध निवेदिका वासंती वर्तक अभिनेते प्रमोद पवार मेघनाताई साने महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिकेचे राजीव भालेराव उदवेली बुक्स चे विवेक म्हेत्रे आणि डिंपल प्रकाशनचे कौतुक अशोक मुळे उपस्थित होते. मेघना त्यांच्या कोवळी उन्हे या कार्यक्रमा तील काही अंश त्यांनी सादर केले. त्यांची कथा सांगण्याची पद्धत मनाला भावून गेली. हेमंत साने आणि इंडियन आयडल मधील गायिका आकांक्षा यांनी अतिशय सुरेख गाणी हा प्रसंगी सादर केली. सगळ्याच मान्यवरांनी पुस्तकाबद्दल आपले निरीक्षण अतिशय सकारात्मक पद्धतीने नोंदवले. कार्यक्रमाला प्रेक्षकांमध्ये देखील मान्यवरांची मांदियाळी उपस्थित होती. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रतीक्षा बोर्डे यांनी केलं. हेमंत साने आणि मेघना साने यांनी आपल्या प्रेमात स्वभावाने अनेक माणसं जोडली आहेत याचा अनुभव काल आला. अतिशय देखणा असा हा पुस्तक प्रकाशन सोहळा काल संपन्न झाला. गुणी जनांचे कलाविष्कार या त्यांच्या पुस्तकात भारतात आणि भारताबाहेर काम करणाऱ्या अनेक संस्थांविषयी अतिशय अभ्यासपूर्ण असं त्यांनी आपलं निरीक्षण नोंदवलय. प्रारंभ कला अकॅडमी आमच्या संस्थेवर देखील त्याच्यात एक प्रकरण समाविष्ट करण्यात आला आहे.काही क्षणचित्र.
Date: 23/01/2025
आज जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या गंधर्व 2025 महोत्सवांमध्ये पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट मध्ये परीक्षक म्हणून सहभागी व्हायची संधी मिळाली. माझ्याबरोबर कॉमर्स विभागाच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर रश्मी अग्निहोत्री यादेखील परीक्षक होत्या. मुलांनी तिन्ही राऊंड मध्ये एकाहून एक सरस असे परफॉर्मन्स दिले. डॉक्टर मुग्धा बापट महाविद्यालयाच्या प्राचार्या ब सुचित्रा नाईक मॅडम प्राध्यापिका मानसी जंगम आणि संपूर्ण मॅनेजमेंट चे मनापासून आभार.
Date: 21/01/2025
आज नौपाडा हिंदू जागृती भगिनी मंडळाचा 79 व वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झालं. त्याला प्रमुख अतिथी म्हणून राहण्याचा योग आला. त्यासाठी सर्व अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार. याप्रसंगी कुस्तीपटू सौ राजपूत यांचाही सन्मान करण्यात आला. काही क्षणचित्र.
आज दिनांक 12 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता वैश्यवाणी समाजाच्या ग्लोबल business स्नेह मेळाव्याच भव्य प्रमाणात आयोजन रूपाली तेलवणे आणि डॉक्टर संतोष कामेरकर यांच्या नेतृत्वाखाली मेजारी सरांच्या उपस्थितीत आर्य क्रीडा मंडळात करण्यात आलं होतं. यावेळी हे मोटिवेशनल स्पीकर म्हणून मला निमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी खासदार नरेश मस्के देखील उपस्थित त्यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला.काही क्षणचित्र. 40 मिनिटं मी सगळ्या बांधवांशी संवाद साधला.
आज दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी काशिनाथ घाणेकर लघु नाट्यगृहामध्ये उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत, डॉक्टर रवींद्र शोभणे, सदानंद मोरे, प्राध्यापक अशोक बागवे प्रवीण दवणे, नाटककार अशोक समेळ कवी सौमित्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष नमिता कीर शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठूसे शारदा प्रकाशन चे प्रकाशक संतोष राणे यांच्या उपस्थितीत प्राध्यापक प्रदीप ढवळ लिखित संन्यास्त ज्वालामुखी या विवेकानंदांच्या कार्यावर आधारित चरित्र ग्रंथाचे उद्घाटन अतिशय उत्साहात पार पडलं. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मंदार टिल्लू आणि टीमने केलं होतं. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी मला देण्यात आली होती . त्याबद्दल कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी, आणि आनंद विश्व गुरुकुल तसंच शारदा प्रकाशन आणि विशेषता डॉक्टर प्रदीप ढवळे यांचे मनापासून आभार. काही क्षणचित्र.
काल दिनांक 11 जानेवारी २०२५ रोजी कानसुरमार्गाच्या वात्सल्य ट्रस्टचा वार्षिक स्नेहसंमेलन दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात होतं. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली. माझ्याबरोबर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सकाळ समूहाचे संपादक साम टीव्हीचे एडिटर निलेश खरे होते. डॉक्टर ऐनापुरे सीए झालेल्या गद्रे बाई बर्वे बाई या आणि इतर अनेक मंडळींनी 1983 साली गजानन दामले यांनी सुरू केलेल्या या ट्रस्टची धुरा आता सचिव श्रीकांत जोशी यांच्या नेतृत्वाखाली अतिशय समर्थपणे सुरू ठेवली आहे. अनेक अनाथ मुलांना, समाजातील माता-पितांनी टाकून दिलेल्या अनाथ बालकांना, निराधार महिलांना आश्रय देण्याचं त्यांना त्यांच्या पायावर उभ करण्याचं ते करत असतानाच त्यांना कुटुंब वत्सल प्रेम देण्याचं काम वात्सल्य परिवारातली सगळी मंडळी अतिशय प्रेमाने आणि सातत्याने करतात आहे. ह्या ट्रस्टने सानपाडा अलिबाग आणि कांजूर या ठिकाणी आपल्या कामाचा खूप मोठ्या प्रमाणात वाढवलाय. समाजातल्या दानशूर मंडळी विविध कंपनी त्यांचे सी एस आर यांच्या मदतीने ही संस्था अत्यंत भरीव काम करते आहे. या ट्रस्ट बद्दल मी खूप ऐकून होते. माझ्या ओळखीतल्या अनेकांनी इथून मुलं दत्तक घेतलेली आहेत. त्यामुळे अमृतसरून मी सकाळी आल्यानंतर सुद्धा या कार्यक्रमाला अतिथी म्हणून जायचा मोह नाकारू शकले नाही. समाजात किती माणसं वेगवेगळ्या प्रकारचे काम करत असतात, ते पाहिलं की मन भरून येतं. माणुसकी अजूनही शिल्लक आहे याचा पुन्हा प्रत्यय येतो. कालच्या कार्यक्रमाचे काही फोटो.
Date:-
Date:-
Date:
काल आनंद विश्व गुरुकुल, डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन,डॉक्टरसं असोसिएशन, साधना फॉउंडेशन, ब्राम्हण सभा, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, आमची संस्था प्रारंभ कला अकॅडमी आणि इतर अनेक संस्थांच्या वतीने ठाण्याच्या tiptop प्लाझा येथे डॉक्टर उदय निरगुडकर -माजी संपादक झी 24 तास यांचं १००% 'मतदान करूया' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टर प्राध्यापक ढवळ आणि डॉक्टर भोर यांनी अथक परिश्रम घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. डॉक्टर निरगुडकर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण असं विवेचन केलं. हजाराच्या वर श्रोते कार्यक्रमाला उपस्थित होते. त्या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित राहण्याची संधी मिळाली त्यासाठी सर्व समितींचे मनापासून आभार.
Date:-
1970 साली सुरू झालेल्या नी.गो पंडितराव वक्तृत्व स्पर्धेच्या मार्गदर्शन कार्यशाळेसाठी त्यांच्या समितीकडून ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या कात्ययान सभागृहात सीनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं.त्यामध्ये मी आणि ज्येष्ठ पत्रकार आणि महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर वक्ता म्हणून उपस्थित होतो. विद्यार्थ्यांचा अतिशय उत्तम प्रतिसाद आमच्या कार्यशाळेला होता. आमंत्रित केल्याबद्दल चैतन्य साठे, महाविद्यालयालयाच्या विमुक्ता राजे, महेश पाटील सर,राजश्री जोशी मॅडम माननीय श्री खामकर सर यांचे मनःपूर्वक आभार.
Date:-
Date:-
आज ठाण्याच्या Rmall येथील बँक्वेट हॉल मध्ये 'अनाहत' या संस्थेतर्फे मला influencer Award मिळाला. माझ्या समवेत हा अवॉर्ड ममता सिंधुताई सपकाळ, राष्ट्रीय पारितोषिक विजेती अभिनेत्री छाया कदम,अभिनेत्री वनश्री पांडे, एअर इंडिया कमांडर दीप्ती शिंदे, आणि सेलिब्रिटी फिटनेस कोच राखी यांनाही देण्यात आला. "अनाहत" च्या मधुरा सराफ आणि श्वेता वैद्य यांचे मनापासून आभार. अतिशय उत्तम आयोजित केलेल्या ह्या भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्यात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. पुरस्कारासाठी जेव्हा तुमच्या नावाचा विचार होतो तेव्हा आनंद होतोच,पण जबाबदारी देखील वाढते. हा पुरस्कार हा माझा एकटीचा नसून प्रारंभ कला अकॅडमी या माझ्या संस्थेत मला मदत करणाऱ्या संपूर्ण टीमचा, प्रारंभच्या पाठीशी उभ्या असलेल्या अनेक सभासदांचा आणि हितचिंतकांचा देखील आहे. त्यांच्या वतीने मी आज अतिशय नम्रतेने हा पुरस्कार स्वीकारताना मला आनंद झाला. पुन्हा एकदा मधुरा आणि श्वेता यांचे धन्यवाद.
Date:-
आज टिळक एज्युकेशन सोसायटीच्या घणसोली येथील जे.के कॉलेजमध्ये सूत्रसंचालन या विषयावर माझं भाषण आयोजित करण्यात आलं होतं. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर श्रद्धा भोमे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील शिस्त महाविद्यालयातले सगळेच उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहेत. 200 च्या वर विद्यार्थ्यांनी भाषणाला उपस्थिती लावली होती हे विशेष. अन्यथा महाविद्यालयातील विद्यार्थी अशा कार्यक्रमांना येण्याचा थोडासा कंटाळा करतात. प्रात्यक्षिकासह माझं भाषण असल्यामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग उत्तम होता. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी देखील भरपूर प्रमाणात उपस्थिती दर्शवत प्राचार्यांसह माझा उत्साह वाढवला. काही क्षणचित्र.
Date:-
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा प्राप्त करून दिला. मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी एक आनंद सोहळ्याच आयोजन बीकेसी, बांद्रा कुर्ला कॉम्लेक्स मधील नॅशनल स्टॉक एक्सचेंज च्या मिनि ऑडिटोरियम मध्ये करण्यात आलं होतं. निमंत्रित लोकांसाठी या कार्यक्रमाच आयोजन
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातर्फे करण्यात आल होत. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रम अतिशय देखणा आणि शिस्तबद्ध रीतीने आयोजित करण्यात आला होता. ह्या कार्येक्रमात निमंत्रित लोकांमध्ये मला संधी मिळाली, माझे आवडते नेते नरेंद्र मोदीजी ह्यांना जवळून ऐकता, बघता आल हे माझं भाग्य.मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी नेहेमीप्रमाणे अतिशय उत्तम भाषण करत उपस्थित प्रेक्षकांची मन जिंकली.ह्या प्रसंगी राज्यपाल देखील उपस्थित होते.
कार्येक्रमाला अभिनेते सचिन, निशिगंधा वाड, आशाताई भोसले, प्रसाद महाडकर, मधू मंगेश कर्णिक, वैजयंती आपटे, पत्रकार जयश्री देसाई, लेखिका अनुपमा उजगरे, देहू आळंदी संस्थांनाचे अध्यक्ष, नांदेडचे माजी कुलगुरू डॉ पंडित विदयासागर, अभिनेत्री मधुरा वेलणकर, मोनिका गजेंद्रगडकर, वैजयंती आपटे,डॉ ढवळ,, मनीषा म्हैस्कर, भाजप प्रवक्ता केशव उपाध्ये आणि मराठी साहित्य क्षेत्रातील नामांकित उपस्थित होते.काही क्षणचित्र.
Date:-
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री धनश्री कडगावकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मैत्रिणींना मनसे नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आल. याठिकाणी माझ्यासह वृषाली राजे, प्राध्यापिका हर्षला लिखिते, नीतल वढावकर आदी मैत्रिणींना गौरवण्यात आलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मा अविनाश जाधव,अभिजीत पानसे नैनेश पाटणकर सुबोध वैद्य आणि मनसे परिवाराचे मनापासून आभार
Date:-
आज आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाच्या वतीने Fun and Food Festa आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सीमा हर्डीकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकाहून एक सरस असे 24 फूड स्टॉल लावले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अनेक वस्तूंचे प्रदर्शन देखील भरवण्यात आलं होतं. कार्यक्रमाला आनंद विश्व गुरुकुल चे अध्यक्ष विलास ठुसे,रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्य हर्षला लिखिते, law कॉलेजचे प्राचार्य सुयश प्रधान, प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य दिपाली दm कोळमकरआणि दीपिका तलाठी उपस्थित होते. यावेळी फाल्गुनी नातू यांनी अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालन करत कार्यक्रमांमध्ये रंग भरला. महाविद्यालयाचे विद्यार्थी सुरज, पूर्वा आणि इतर विद्यार्थ्यांनी एक से बढकर एक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संपूर्ण महाविद्यालयाचा परिसर हा विद्यार्थ्यांनी फुलून गेला होता. महाविद्यालयाच्या चित्रकला विभागाचे प्रमुख पंडित सर यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनेते गुरुदत्त आणि त्यांच्याशी संबंधित चित्रांचं सुंदर प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या संपूर्ण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सीमा हर्डीकर आणि व्यवस्थापनाचे मनापासून आभार. संपूर्ण कार्यक्रम फिल्म मेकर गुरुदत्त ह्यांना समर्पित करण्यात आला होता.काही क्षणचित्र.
APPOINTMENT OF DR. ARUNDHATI BHALERAO ON NATIONAL HUMAN RIGHTS COMMISSION
SUPER 50 ARTICLE
WRITTEN BY : DR. ARUNDHATI BHALERAO
ARTICLE ON ACTING WORKSHOPS CONDUCTED BY DR. ARUNDHATI BHALERAO
Very happy to Announce that today Dr. Arundhati Bhalerao received
'Multitalented Face Of the year ' International Brilliance Award
by Hypage group at Holiday Inn,condolim Goa.
Along with this
Prarambha Kala Academy, our NGO has received the Best NGO Award in Maharashtra by the Hypedge grp at the honorable hands of the Guest of Honour Mr.Sanjay Ghodwat- Founder Director of Ghodawat Group
Dr Jeetu Lal Meena-Divison Head And Joint Director,
Aayushyaman Bharat Jan Aarogya yojna,
National Health Authority
And Mahabharat Actor Satyenra Singh Pal..
I am very happy to share this moment with you all.
SANT GADGEBABA VRUDDHASHRAM VISIT - VALGAON, AMRAVATI