आजी आजोबा कट्टा


(Today under the social initiative of Prarambha Kala Academy


Aji Ajoba Katta was blessed with great enthusiasm. Manager of Vanprasthashrama Gogate Kaka welcomed today's guests Mithila Gaitonde, Asha Nayakwadi and Shalaka Desai. Grandparents were happy as each sakhi presented their greetings in a very beautiful manner and the program went on. Through this program all the friends who go to Aji Aboba Katta are always happy that they have gone to a good place. The feeling that we have to give something to the society was definitely growing in the mind. And It has been maintaining the sense of social commitment since the beginning. Heartfelt thanks to Asha Nayakwadi, Shalaka Desai and Mithila Gaitonde for participating in this initiative.)


प्रारंभ कला अकॅडमीच्या सामाजिक उपक्रमा अंतर्गत आजचा

आजी आजोबा कट्टा अतिशय उत्साहात संपन्न झाला .वानप्रस्थाश्रमा चे व्यवस्थापक गोगटे काका यांनी आजच्या अभिवाचक मिथिला गायतोंडे, आशा नायकवडी आणि शलाका देसाई यांच् स्वागत केलं . प्रत्येक सखीने आपलं अभिवाचन अतिशय सुंदर रीतीने सादर केल्याने आजी आजोबा खुश झाले आणि कार्यक्रम रंगत गेला .या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजी आजोबा कट्ट्यावर जाणार्या सर्व मैत्रिणींना आपण एका चांगल्या ठिकाणी गेलो याचा नेहमीच आनंद होतो .आपण समाजाचं काही देणं लागतो ही भावना मनामध्ये नक्कीच वृद्धिंगत होते।आणि ते सामाजिक बांधिलकीचं भान प्रारंभ कायम जपत आलेलं आहे .प्रारंभच्या या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल आशा नायकवडी शलाका देसाई आणि मिथिला गायतोंडे यांचे मनःपूर्वक आभार .

3 जून 2021


10 June 2021

( Starting from today the annual activity of "Aji Ajoba Katta" of Prarambha Kala Academy, Thane was launched at " Vanprastashram " at Angaon..This activity will be implemented throughout the year..Our favorite province is art so every month different topics are related to art..Our theme for this month is Storytelling. Today we started with our friend Uma Chande.. Uma told 3 great stories. Started with my introduction..Prasad, our activity co-ordinator assisted..some scenes..along with ashram director Gogte kaka.)

आज पासून प्रारंभ कला अकॅडमी ठाणे च्या आजी आजोबा कट्ट्याच्या वार्षिक उपक्रमाचा शुभारंभ आणगाव येथे वानप्रस्थाश्रमात झाला..वर्षभर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे..माझा आवडता प्रांत कला असल्याने दर महिन्यातील सगळे विविध विषय कलेशी संबंधित आहेत..ह्या महिन्यातील माझी थीम कथाकथान ही आहे..आज माझी मैत्रिण उमा चांदे हिच्या पासून आम्ही प्रारंभ केला.. उमानी 3 उत्तम कथा सांगितल्या. माझ्या प्रास्ताविकानी सुरवात झाली..प्रसाद ह्या आमच्या उपक्रम समन्वयक ह्याने सहकार्य केले..काही दृष्य..सोबत आश्रमाचे संचालक गोगटे काका


January 2021

("Aji Ajoba Katta" is a social activity of Parada Kala Academy by Manisha Sheetut

Storytelling is full of color On this occasion, grandparents could be blessed by giving tilgul..here is some picture & videos )

आज प्रारंभ कला अकॅडमी चा "आजी आजोबा कट्टा " हा सामाजिक उपक्रम मनिषा शीतुत ह्यांच्या

कथाकथनाने रंगून गेला.. ह्या प्रसंगी आजी आजोबाना तिळगूळ देऊन त्यांचे आशिर्वाद घेता आले..काही क्षणचित्रे


(Today, Our student, teacher and friend Anagha Jadhav in the storytelling batch I am taking under our institution called Prarambha Kala Academy under our Aji Ajoba Katta social project told wonderful stories. Anagha is moving forward in the field of storytelling..pride and appreciation ..some snapshots)

आज आमच्या आजी आजोबा कट्टा ह्या सामाजिक प्रकल्पाच्या अंतर्गत प्रारंभ कला अकॅडमी ह्या आमच्या संस्थेच्या अंतर्गत मी घेत असलेल्या निवेदन कथाकथन बॅच मधील माझी विद्यार्थिनी , शिक्षिका आणि मैत्रीण अनघा जाधव हिने अप्रतिम कथा सांगितल्या.आजी आजोबानी उदंड प्रतिसाद देत तिच कौतुक केले..खूप मेहनत करून निवेदन कथाकथन क्षेत्रात अनघा पुढे जातेय..अभिमान आणि कौतुक वाटतं ..काही क्षणचित्रे

(.. Conductor Bhimanna.. Sudha Murthy


First half fifty five... Madhuri Shanbhag


My fajiti...self experience


Kathani Aajcha Our Grandparents in Prarambha's Social Activity.Kirti Kerkar enchanted the Grandparents in the beginning.Some Snapshots )

.. कंडक्टर भिमन्ना.. सुधा मूर्ती

पहिले पाढे पंचावन्न... माधुरी शानभाग

माझी फजिती...स्वानुभव ह्या

कथानी आजचा आमचा सामाजिक उपक्रमातील आजी आजोबा कट्टा रंगला..प्रारंभच्या किर्ती केरकर ह्यांनी आजी आजोबाना मंत्रमुग्ध केले .काही क्षणचित्रे


February 2021

(We have given music as the theme for the old age home of Prarambha Kala Academy in the month of February..Today Satish Bhide from Girgaon had a program based on Savarkar's performance and singing..some visuals and glimpses.)

प्रारंभ कला अकॅडमी च्या फेब्रुवारी महिन्यातील वृद्धाश्रमाची थीम मी संगीत हा विषय ठेवला आहे..आज गिरगाव येथील सतिश भिडे ह्यांच् सावरकरांवर आधारित निरुपण आणि गायन असा कार्यक्रम ठेवला होता..काही दृष्य आणि झलक.


11 February 2021

(On February 11, 2021, as part of the social activities of our institution, Prarambha Kala Academy, this entire month is about singing and kirtan. The famous singer Prashant Kalundrikar sang yesterday's song. Administrative Manager Shri Gogate Kaka)

दि. ११ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रारंभ कला अकॅडमी ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रम अंतर्गत हा संपूर्ण महिना गायन आणि कीर्तन ही संकल्पना असल्याने प्रसिद्ध गायक प्रशांत काळुंद्रीकार ह्यांच्या गायनाने कालचा कट्टा रंगला..एकाहून एक सरस हिंदी मराठी गीते सादर करत प्रशांतनी आजी आजोबांचे आशिर्वाद घेतले..सोबत संस्थेचे प्रशासकीय व्यवस्थापक श्री गोगटे काका


18 February 2021

(On 18 February 2021, Prachi Kokiel's program was held at Aji Ajoba Katta. Prachi Tai performed old Marathi and Hindi songs as well as Bhavgeet and Natya music. He graced the program by performing old songs like Hich Amuchi Prathana and Reshmachya Reghane Lavani and Ai Dil Mujhe Batade. She also performed songs according to the wishes of the grandparents of the ashram. Some of his snaps & Videos)

दि. १८ फेब्रुवारी २०२१ गुरुवारी आजी आजोबा कट्ट्यावर प्राची कोकीळ यांचा कार्यक्रम झाला. प्राची ताईंनी जुनी मराठी व हिंदी गाणी त्याचप्रमाणे भावगीत आणि नाट्य संगीत सादर केले. त्यांनी हीच आमुची प्रार्थना आणि रेश्माच्या रेघांनी हि लावणी आणि ऐ दिल मुझे बतादे अशी जुनी गाणी सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.त्याचबरोबर आश्रमातील आजी आजोबांच्या फर्माईशी नुसार सुद्धा त्यानी गाणी सादर केली. त्याची काही क्षणचित्रे


18 March 2021

(Social activities on behalf of Prarambha Kala Academy Thane


On March 18, 2021, under the spiritual theme, Shirish and Saili Korgaonkar's kirtan made Aji Ajoba Katta Rangla. Vaishali Kulkarni, Trustee of the Foundation, introduced the Foundation. Shri Gogate Kaka introduced the guests.)

प्रारंभ कला अकॅडमी ठाणे च्या वतीने सामाजिक उपक्रमा च्या

आध्यात्मिक विषया अंतर्गत १८ मार्च २०२१ रोजी शिरीष आणि सायली कोरगावकर ह्यांच्या कीर्तनामुळे आजी आजोबा कट्टा रंगला. प्रारंभ संस्थेच्या विश्वस्त वैशाली कुलकर्णी ह्यांनी प्रारंभ संस्थेचा परिचय दिला. श्री गोगटे काका ह्यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.


25 March 2021

(Today On March 25, 2021, Samarth Buwa Ramdasi gave a very wonderful speech on behalf of Prarambha Kala Academy at Vanprastashram on behalf of our grandparents Katta. Amey Bua very effectively presented the importance of Swami Samarth's thoughts while living his life.. Jayant Gogte introduced him on behalf of the organization.)

आज दि. २५ मार्च २०२१ रोजी प्रारंभ कला अकॅडमी च्या वतीने वानप्रस्थाश्रमात आमच्या आजी आजोबा कट्ट्यावर समर्थ बुवा रामदासी ह्यांचे अतिशय अप्रतिम प्रवचन झाले. स्वामी समर्थांच्या विचारांचे जीवन जगत असतानाचे आयुष्यातील महत्व अतिशय प्रभावीरीत्या अमेय बुवांनी मांडले..जयंत गोगटे ह्यांनी संस्थेच्या वतीने त्यांचा परिचय करुन दिला.


4 June 2021

(Today under the social initiative of Prarambha Kala Academy


Aji Ajoba Katta was blessed with great enthusiasm. Manager of Vanprasthashrama Gogate Kaka welcomed today's guests Mithila Gaitonde, Asha Nayakwadi and Shalaka Desai. Grandparents were happy as each sakhi presented their greetings in a very beautiful manner and the program went on. Through this program, all the friends who go to Aji Aboba Katta are always happy that they went to a good place. The feeling that we have to give something to the society.)

प्रारंभ कला अकॅडमीच्या सामाजिक उपक्रमा अंतर्गत आजचा

आजी आजोबा कट्टा अतिशय उत्साहात संपन्न झाला .वानप्रस्थाश्रमा चे व्यवस्थापक गोगटे काका यांनी आजच्या अभिवाचक मिथिला गायतोंडे, आशा नायकवडी आणि शलाका देसाई यांच् स्वागत केलं . प्रत्येक सखीने आपलं अभिवाचन अतिशय सुंदर रीतीने सादर केल्याने आजी आजोबा खुश झाले आणि कार्यक्रम रंगत गेला .या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजी आजोबा कट्ट्यावर जाणार्या सर्व मैत्रिणींना आपण एका चांगल्या ठिकाणी गेलो याचा नेहमीच आनंद होतो .आपण समाजाचं काही देणं लागतो ही भावना मनामध्ये नक्कीच वृद्धिंगत होते।आणि ते सामाजिक बांधिलकीचं भान प्रारंभ कायम जपत आलेलं आहे .प्रारंभच्या या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल आशा नायकवडी शलाका देसाई आणि मिथिला गायतोंडे यांचे मनःपूर्वक आभार .


18 June 2021

(On behalf of Prarambha Kala Academy Thane, the felicitation program of the inaugural members Keerti Kerkar and Manisha Acharya was concluded at Aji Ajoba Katta. Written by Madhavi Gharpure and conceived and directed by Arundhati Bhalerao, based on the intimate relationship between women and men, the mood of a common woman, intimate fatherhood, as well as the essays of Ashutosh Bhalerao's book 'Bhalefek', 'Cozy Days' and 'Letter to a dead husband', were also praised for the program. Great response. Mr. Jayant Gogte, Manager of Vanaprasthashram Angaon introduction (18 June 2021)

प्रारंभ कला अकॅडमी ठाण्याच्या वतीने सामाजिक उपक्रमांतर्गत आजी आजोबा कट्ट्यावर कीर्ती केरकर आणि मनीषा आचार्य या प्रारंभच्या सदस्यांचा अभिवाचन कार्यक्रम संपन्न झाला. माधवी घारपुरे लिखित आणि अरुंधती भालेराव यांची यांचे दिग्दर्शन आणि संकल्पना असलेल्या स्त्री पुरुष अंतरंगांवर आधारित सामान्य स्त्रीचं अंतरंग वडीलांची कैफियत त्याचप्रमाणे मैत्रिणींच्या गप्पा या अभिवाचनासह आशुतोष भालेराव यांच्या भालेफेक या पुस्तकातील कोझी डेझ आणि मृत पतीस पत्र या लेखांचे अभिवाचन या दोघींनी केलं .आजी आजोबांनी या कार्यक्रमाला अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. वानप्रस्थाश्रम आनगावचे व्यवस्थापक श्री जयंत गोगटे यांनी परिचय आणि प्रास्ताविक केले (18 June 2021)


7 October 2021


14 October 2021

On behalf of Prarambha Kala Academy, today at Vrudhashram near Bhiwandi. On 14 October 2021, Shri Mukund Jog made the fans laugh by telling many funny anecdotes. The satirical poems he performed brought the entire audience into rapturous applause. His renditions of old singers brought the grandparents of the old age home a glimpse into their time and brought smiles to their faces. With clear voice, good singing and miming, he entertained the audience with his show 'Sangeet Misal'.

A few snapshots.Mukund Jog was introduced by Prarambha Kala Academy Trustee Manisha Acharya.

प्रारंभ कला अकॅडमीच्या वतीने भिवंडी जवळील व्रुध्दाश्रमामधे आज दि. १४ ऑक्टोबर २०२१ रोजी श्री मुकुंद जोग ह्यांनी अनेक गंमतीशीर किस्से सांगून रसिकांना हसवले. त्यांनी सादर केलेल्या विडंबन काव्यांनी संपूर्ण सभाग्रुह टाळ्यांच्या कडकडाने दणाणून गेले. जुन्या गायकांच्या त्यांनी केलेल्या नकलांनी व्रुध्दाश्रमातील आजी आजोबांना त्यांच्या काळात डोकावून आणले आणि त्यांच्या चेहर्यावर हसू पसरवले. स्पष्ट आवाज , उत्तम गायन आणि नकला करून त्यांनी त्यांच्या ‘संगीत मिसळ’ ह्या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करून बहार आणली.

काही क्षणचित्रे.प्रारंभ कला अकॅडमीच्या विश्वस्त मनीषा आचार्य यांनी मुकुंद जोग यांचा परिचय करून दिला .


21 October 2021

Under the Vriddhashram or Vanaprasthashram initiative organized by Prarambha Kala Academy Thane today. On October 21, 2021, I went to Angaon near Bhiwandi myself and actress Anjali Koranne to celebrate Babhulgaon Days This is my reading of Lalita's story and Anjali Kuran presented Sampada Kulkarni's story and another story. The satisfaction that we and our organization get from this year-long activity is beyond words!

प्रारंभ कला अकॅडमी ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या वृद्धाश्रम अर्थात वानप्रस्थाश्रम उपक्रमांतर्गत आज दि. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी भिवंडीजवळील अनगाव येथे मी स्वतः आणि अभिनेत्री अंजली कोरान्ने अभिवाचन करण्यासाठी गेलो होतो बाभूळगावचे दिवस या माझ्या ललिता कथेचं वाचन आणि अंजली कुराणने संपदा कुलकर्णी ची कथा आणि आणखीन एक कथा सादर केल्या . वर्षभर सुरू असलेल्या या उपक्रमातून जे समाधान मला आणि आमच्या संस्थेला मिळतं ते शब्दांच्या पलीकडचं !


28 October 2021

On behalf of our institution Prarambha Kala Academy Thane, today 28th October under our social project 'Aji Ajoba Katta' we at Vanprasthasram Angaon.

Some of the entries in Sakhi Gan Sakhi written by Parag Ghonge were greeted by my student and socially conscious artist Varsha Palshetkar, Prajakta Paranjpe, Alka Rajarshi and I, we interacted with the grandparents for an hour and a half. Manager of Vanaprasthashrama Jayant Gogte introduced. Great response from grandparents was heartwarming.

प्रारंभ कला अकॅडमी ठाणे या आमच्या संस्थेच्या वतीने २८ ऑक्टोबर आज आमच्या 'आजी आजोबा कट्टा 'या सामाजिक प्रकल्पांतर्गत वानप्रस्थाश्रम आनगाव येथे आम्ही

सखी गं सखी या पराग घोंगे लिखित दीर्घांका तील काही प्रवेशांचे अभिवाचन केले माझ्या विद्यार्थिनी आणि नाटकातील सामाजिकतेचे भान असलेल्या कलावंत वर्षा पालशेतकर , प्राजक्ता परांजपे अलका राजर्षी आणि मी , आम्ही दीड तास आजी आजोबांशी संवाद साधला. वानप्रस्थाश्रमा चे व्यवस्थापक जयंत गोगटे यांनी प्रास्ताविक केले .आजी आजोबांचा उत्तम प्रतिसाद मनाला आनंद देऊन गेला


11 Nov 2021

(Hello,

Vaishali Kishore Parad and Kishore Govind Parad, a social organization from Prarambha Kala Academy Thane, Mr. Post Angaon won the hearts of grandparents by singing Marathi Hindi songs at Vanprasthi Ashram in Bhiwandi. The program concluded on 11.11.2021 between 4.30 pm to 6.15 pm. By Vaishali

Omkar Pradhan, Keshava Madhava Afsana Likh Rahi Hoon.. ,Babuji Dhiree Chalna... Tunae O Rangile.., Tum He Mere Mandir, Bekarar Karke Hame, . Yaad kiya dil ne kaha ho tum,. She and her husband Kishore decorated Aji Ajoba Katta with their voices, singing such songs one by one)

नमस्कार,

प्रारंभ कला अकादमी ठाणे या सामाजिक संस्थे तर्फे वैशाली किशोर पराड आणि किशोर गोविंद पराड यांना मु. पोस्ट आनगाव, भिवंडी येथील वानप्रस्थी आश्रम येथे मराठी हिंदी गाणी गाऊन आजीं आजोबांची मनं जिंकली . सदर कार्यक्रम दि.11.11.2021 रोजी सायंकाळी 4.30 ते 6.15 दरम्यान संपन्न झाला. वैशाली यांनी

ओंकार प्रधान, केशवा माधवा, . अफसाना लिख रही हूं, . बाबूजी धीरे चलना,. तुने ओ रंगिले, . तुम ही मेरे मंदिर, बेकरार करके हमे, . याद किया दिल ने कहा हो तुम,. अशी एकाहून एक सरस गाणी गात त्या आणि त्यांचे पती किशोर यांनी आजी आजोबा कट्टा आपल्या स्वरांनी सजवला


वृद्धाश्रम सांगता समारंभ

आनगांव,भिवंडी

2021

Prarambha Kala Academy Thane was implemented through various activities throughout the year at Angaon near Katta Bhiwandi by our organization.


My and our organization's aim behind this activity was to entertain through various arts. We accommodated many artistes in this activity through storytelling, kirtan, spiritual lectures, music, chats and things. All the participating artists supported us a lot. Today was the closing ceremony of this year-long activity. At 10:30 am in the morning we started the ceremony by lighting the lamp at Angaon Vanprastashram. Jayant Gogate, manager of Vanprastashram, on the stage, Dr. Arundhati Bhalerao trustee and member Manisha Acharya, secretary member Kirti on the stage. Kerkar, advisor and member Manisha Shitut, parent of the initiation Rahul Bhatwadekar were present. Mrs. Risbood and Mr. Prabhu expressed their gratitude on behalf of the grandparents. Arundhati was introduced on behalf of Prarambha. A very beautiful ceremony was conducted by Shalaka Desai, a member of the initiation.

प्रारंभ कला अकॅडमी ठाणे या आमच्या संस्थे तर्फे वर्षभर आजी आजोबा कट्टा भिवंडीजवळ आनगाव येथे विविध उपक्रमांत मार्फत राबविण्यात आला .वृद्धाश्रमातील आजी आजोबांच घटका दोन घटका

विविध कलांच्या माध्यमातून मनोरंजन करावं हा या उपक्रमामागचा माझा आणि आमच्या संस्थेचा उद्देश होता .कथाकथन अभिवाचन कीर्तन आध्यात्मिक व्याख्यान संगीत गप्पा आणि गोष्टी यामार्फत अनेक कलाकार या उपक्रमातून आम्ही सामावून घेतले . सगळ्याच सहभागी कलाकारांनी आम्हाला खूप सहकार्य केलं .या वर्षभर चाललेल्या उपक्रमाचा आज सांगता समारंभ होता .सकाळी साडेदहा वाजता आनगाव वानप्रस्थाश्रमात दीपप्रज्वलनाने आम्ही या सोहळ्याचा प्रारंभ केला .मंचावर वानप्रस्थाश्रमा चे व्यवस्थापक जयंत गोगटे प्रारंभाच्या संचालिका डॉ अरुंधती भालेराव ,विश्वस्त आणि सदस्य मनीषा आचार्य ,सचिव सदस्य कीर्ती केरकर,सल्लागार आणि सदस्य मनीषा शितूत , प्रारंभ चे पालक राहुल भाटवडेकर उपस्थित होते . आजी आजोबांच्या वतीनं सौ रिसबूड आणि श्री प्रभू यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.प्रारंभ च्या वतीनं अरुंधती च प्रास्ताविक झालं .आश्रमाच्या वतीने गोगटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं .याप्रसंगी राहुल भाटवडेकर यांनी किशोर कुमारची एक से बढकर एक गीते गाऊन सगळ्या उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली.कार्यक्रमाचं अतिशय सुंदर असे सुत्रसंचालन प्रारंभच्या सदस्य स्पर्धक शलाका देसाई यांनी केलं .याप्रसंगी प्रारंभ च्या वतीनं आजी आजोबांना जीवनोपयोगी वस्तूंचा संच भेट देण्यात आला .त्याची काही क्षणचित्रे


18 January 2022

Yesterday, Prarambha Kala Academy's old age home activity started again in another old age home. After a year of activities in Angaon, now we have turned our march to the old age home in Yeur. In this year-long activity, we are going to entertain our grandparents through various arts. In this, we get a lot of help from my friends who work in many fields. In the session of January 18, 2022, my friend Varsha Palshetkar, a retired teacher, narrated a story for grandparents. Some snapshots...

काल प्रारंभ कला अकॅडमीचा वृद्धाश्रम उपक्रम पुन्हा नव्यानं दुसर्या वृद्धाश्रमामध्ये सुरू झाला .वर्षभर आनगाव येथे केलेल्या उपक्रमानंतर आता आम्ही येऊर येथील वृद्धाश्रमाकडे आमचा मोर्चा वळवला आहे .आमचा 'कला' हा विषय बाजूला न करता कलेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत आमचं सामाजिकतेचे भान जपण्याचा प्रयत्न करतोय.आता वर्षभराच्या या उपक्रमात विविध कलांचा माध्यमातून आम्ही आजीआजोबांच रंजन करणार आहोत.यात आम्हाला अनेक क्षेत्रात काम करणार्या माझ्या विविध मित्र मैत्रिणींकडून खूप मदत होते.कालच्या दि. १८ जानेवारी २०२२ च्या सत्रात निवृत्त शिक्षिका वर्षा पालशेतकर या माझ्या सखीनं आजी आजोबांसाठी कथाकथन केलं .काही क्षणचित्र...



1 February 2022

Aji Ajoba Katta is a socio-cultural activity of Prarambha Kala Academy. Under this initiative, this year we are conducting various activities in the old age home of Yeoor. Today's Grandmother Ajoba Katta Rangala To Sangeet Concert of Prarambha Kala Academy has always had an aim to give scope to the talents of friends who have not got a platform, but who have good art in their body, and friends who love art, by involving them in different activities on this occasion. Vaishali Pard, who lives in Ambernath, is one such gifted sakhi. She loves me, our organization and regularly participates in our activities. Her one-of-a-kind Hindi Marathi songs brightened up our grandmother and grandfather today.

प्रारंभ कला अकॅडमी चा आजी आजोबा कट्टा हा एक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम . या उपक्रमाच्या अंतर्गत यावर्षी आम्ही येऊरच्या वृद्धाश्रमामध्ये विविध उपक्रम राबवतोय . आजचा आजी आजोबा कट्टा रंगला तो संगीताच्या मैफिली न.प्रारंभ कला अकॅडमीच्या नेहमीच एक उद्देश असतो कि व्यासपीठ न मिळालेल्या, पण अंगी उत्तम कला असणार्या मैत्रिणींना,कलेवर प्रेम करणार्या सख्यांना या निमित्तानं वेगवेगळ्या उपक्रमात सामील करून घेत त्यांच्या कलागुणांना वाव देणं . अंबरनाथमध्ये राहणारी वैशाली परड ही अशीच एक गुणी सखी .माझ्यावर, आमच्या संस्थेवर प्रेम करताना सातत्याने आमच्या उपक्रमात सहभागी होणारी .तिच्या एकाहून एक सरस हिंदी मराठी गीतांनी आज आमचा आजी आजोबा कट्टा रंगला .


15 February 2022

On 15 February 2022 Manisha Ghadage and Ruchita Mestry at Vriddashram

Sangeet


15 फेब्रुवारी 2022 रोजी मनीषा घाडगे आणि रुचिता मेस्त्री वृद्धाश्रम

संगीत


15 March 2022

Old age will come to everyone. Someone will get the love of family. So someone's old age is unbearable with diseases. Not getting family love. But we are part of society and we should do something for society. This is our small effort to take like-minded friends around and do whatever we can for the grandparents. Today On March 15, 2022, Vijayatai Mangaonkar, on behalf of our organization, Prarambha Kala Academy, spoke to the grandparents on Naamsmaran and the power of the mind at the old age home in Yeoor. She herself belongs to the seventy-five-year-old house! But the enthusiasm is immeasurable. She became an example for her grandparents today. Some snapshots

वार्धक्य हे प्रत्येकाला येणार.कोणाचं सुसह्य असणार आहे. कुणाला कुटुंबाचा प्रेम मिळणार आहे. तर कुणाचं वार्धक्य हे व्याधींनी युक्त असं असाह्य. कुटुंबाचं प्रेम न मिळणारे. पण आपण समाजाचा भाग आहोत आणि आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी सभोवतालच्या समविचारी मित्रमैत्रिणींना घेऊन आजी आजोबांसाठी जे काही करता येईल येईल ते करता यावं यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न असतो. आज दि. १५ मार्च २०२२ रोजी येऊर येथील वृद्धाश्रमांमध्ये प्रारंभ कला अकॅडमी ह्या आमच्या संस्थेच्या वतीने विजयाताई माणगावकर यांनी नामस्मरण आणि मनाची शक्ती यावर आजी आजोबांशी संवाद साधला. त्या स्वतः पंच्याहत्तरीच्या घरातल्या! पण उत्साह अमाप. त्या स्वतः आजी-आजोबांसाठी आज एक उदाहरण ठरल्या.काही क्षणचित्रे



25 March 2022

The members of our organization Prarambha Kala Academy visit the grandparents with the aim of entertaining the grandparents through art. We strive to make them hear quality stories and entertain them. Kirti Kerkar, member and secretary of the organization, narrated the stories of Nirupama Mahajan and Mangala Godbole in Khumasdar style. There was a good response from grandparents. Such was the Aaji Ajoba Katta. 25 March 2022

कलेच्या माध्यमातून आजी-आजोबांचं मन रिझवावं, त्यांना विरंगुळा मिळावा ह्या उद्देशाने प्रारंभ कला अकॅडमी ह्या आमच्या संस्थेचे सदस्य आजी-आजोबांची भेट घेत असतात. दर्जेदार कथा त्यांना ऐकायला मिळाव्या, त्यांचे मन रमावं ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. संस्थेच्या सदस्य आणि सचिव कीर्ति केरकर ह्यांनी निरुपमा महाजन आणि मंगला गोडबोले ह्यांच्या कथांचे कथन खुमासदार शैलीत केलं. आजी-आजोबांचा चांगला प्रतिसाद मिळाला. असा होता आजी-आजोबा कट्टा. २५ मार्च २०२२


12 April 2022

On behalf of our organization Prarambha Kala Academy Thane, under our social activities, . Through the medium of various arts, one communicates with the grandparents on various topics. The purpose behind it is to entertain them with four strokes and bring joy to their faces. Manisha Acharya, member and trustee of the organization, visited here today on 12 April 2022 on behalf of the organization. He praised many inspiring and compassionate stories of kindness, gentle relationships and how one can help others even when struggling to live, maintaining self-respect and maintaining one's own courage.


Founder and director of the organization Dr.Arundhati Bhalerao He also commented on some articles such as ‘काय हवं जगण्यासाठी’, 'Shodh Niragas Anandacha' in the book 'Anandkul' written by Dr.Arundhati Bhalerao. Great response from grandparents.


These are some snapshots of today's grandparents Katta.

प्रारंभ कला अकॅडमी,ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने, आमच्या सामाजिक उपक्रमा अंतर्गत, . विविध कलांच्या माध्यामांतून, निरनिराळ्या विषयांवर आजी-आजोबांशी संवाद साधला जातो. चार धटका त्यांचे मनोरंजन व्हावे, त्यांच्या चेहर्यावर आनंद फुलावा हा हेतू त्यामागे आहे. संस्थेच्या वतीने आज दि.12 एप्रिल 2022 रोजी संस्थेच्या सदस्य आणि विश्वस्त मनीषा आचार्य ह्यांनी येथे भेट दिली. माणसातील माणूसपण जपणार्या, चांगुलपणाच्या, हळुवार नात्यांच्या तसेच स्वत:च्या हिंमतीवर , आत्मसन्मान जपत, जगण्याचा संघर्ष सुरु असताना देखील इतरांना मदत कशी करता येते अशा अनेक स्फूर्तीदायी, सह्रदयतेच्या कथांचं त्यांनी अभिवाचन केलं.

संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका डॅा. अरुंधती भालेराव लिखित ‘आनंदकुळ’ ह्या पुस्तकातील ‘काय हवं जगण्यासाठी’ , ‘शोध निरागस आनंदाचा’ अशा काही लेखांचं अभिवाचनही त्यांनी केलं. आजी-आजोबांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

आजच्या आजी-आजोबा कट्ट्याची ही काही क्षणचित्रे.


20 April 2022


20th April 2022 on behalf of our organization Prarambha Kala Academy Thane, our members visit the grandparents in Vrudhashram. The aim is to entertain them through art, to give them some diversion in their routine.

today Dr. Anuradha Kunte Meena Narurkar's stories were told to him Performed the roles of Vaadi, wife of Tukaram Maharaj and Satyabhama from Suvarnatule.

A few snapshots

प्रारंभ कला अकॅडमी,ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने 20 एप्रिल २०२२ आमचे सदस्य व्रुध्दाश्रमातील आजी-आजोबांची भेट घेतात. कलेच्या माध्यमातून त्यांचे मनोरंजन करावे, त्यांच्या दिनचर्येत त्यांना थोडा विरंगुळा मिळावा हा त्यामागचा उद्देश.

अनुराधा कुंटे ह्यांनी आज डॅा. मीना नेरुरकरांच्या कथा त्यांना सांगितल्या. तुकाराम महाराजांची पत्नी आवडी आणि सुवर्णतुले मधील सत्यभामा ह्या व्यक्तिरेखांचे सादरीकरण केले.

काही क्षणचित्रे


24 May 2022

Our members visit grandparents through our organization 'Prarambh' Kala Academy, Thane. The aim is to make them happy through art, to make their hearts happy by listening to music. Neha Bagwe met the grandparents today on May 24, 2022 on behalf of 'Prambha'. He won the admiration of his fans by performing many old and new Hindi-Marathi songs melodiously. Such was the Aaji Ajoba Katta.

‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेतर्फे आमचे सदस्य आजी-आजोबांची भेट घेत असतात. कलेच्या माध्यमातून त्यांना आनंद मिळावा, संगीत ऐकून त्यांचे मन प्रफुल्लित व्हावे असा ह्यामागचा उद्देश असतो. नेहा बागवे ह्यांनी आज २४ मे २०२२ रोजी ‘प्रारंभ’ च्या वतीने आजी-आजोबांची भेट घेतली. अनेक जुनी-नवी हिंदी- मराठी गाणी सुरेल सादर करुन त्यांनी रसिकांची वाहवा मिळवली. असा होता आजी-आजोबा कट्टा.


7 June 2022

On June 7, 2022, a program organized by Prarambha Kala Academy was presented at Jeshtha Nagarik Niwas at Yeur Thane.


Archana Morgi, Neeti Foundation was the convenor. Mental health is the topic and these programs were planned accordingly.

Mrs. Neha Devalkar talked about Kavyarya Padgaonkar's poem "Sanga Kesan Jagachain" and how to get mental health and Shri. Pradeep Bagdekar's inherent art of delivering jokes made everyone laugh and Mr. and Mrs. Vaiti shot photos and videos.

दि. ७ जुन २०२२ रोजी प्रारंभ कला अकादमी आयोजित कार्यक्रम येऊर ठाणे येथे जेष्ठ नागरिक निवासमध्ये सादर करण्यात आला.

अर्चना मोरगी , नीती फाऊंडेशन हे आमंत्रक होते. मानसिक आरोग्य हा विषय व त्या अनुषंगाने या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली होती.

सौ. नेहा देवलकर यांनी कविवर्य पाडगावकर यांची कविता " सांगा कसं जगायचं " व मानसिक आरोग्य कसं मिळवता येईल या बद्दल संवाद साधला आणि श्री. प्रदीप बागडेकर यांची जोक्स सादर करण्याची अंगभूत कला सर्वांनाच खूप हसवून गेली तसेच श्री व सौ वैती यांनी फोटोस आणि व्हिडियोसचे चित्रीकरण केले.


18 July 2022

Prarambha Kala Academy, Thane on behalf of our organization Mr. Mukund Jog today on 18th July 2022 met the grandparents in Vrudhashram. The aim behind these visits is to entertain the grandparents by performing various arts and to give them pure happiness. Mr. Mukund Jog performed satirical songs as well as nakla . There was a spontaneous response from the audience.

A few snapshots.

प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने श्री. मुकुंद जोग ह्यांनी आज 18 जुलै 2022 रोजी व्रुध्दाश्रमातील आजी-आजोबांची भेट घेतली. विविध कला सादर करुन आजी-आजोबांचे मनोरंजन व्हावे, त्यांना निखळ आनंद मिळावा, हा ह्या भेटींमागचा उद्देश असतो. श्री. मुकुंद जोग ह्यांनी विडंबनात्मक गाणी तसेच नकला सादर करुन बहार आणली. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही क्षणचित्रं.


26 July 2022

On behalf of our organization 'Prarambha' Kala Academy, Thane, our members regularly meet grandparents. We strive to make them happy and maintain their mental health by introducing various arts to them. Today on behalf of the organisation. On July 26, 2022, Alka Vadhavkar and Geeta Sule met their grandparents. The program started with Ganesha Gauravgana. Along with abhang, poetry, satirical songs, 'Chaha Akhyan' was presented. Such was the Aajiajoba Katta.

‘प्रारंभ’ कला अकॅडमी,ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने, आमचे सदस्य नियमितपणे आजी-आजोबांना भेटत असतात. विविध कला त्यांच्यासाठी सादर करुन, त्यांना आनंद मिळावा आणि त्यांचे मानसिक आरोग्य जपावे ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. संस्थेच्या वतीने आज दि. 26 जुलै 2022 रोजी अल्का वढावकर आणि गीता सुळे ह्यांनी आजी-आजोबांची भेट घेतली. गणेश गौरवगानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अभंग, कविता, विडंबन गीतं ह्याबरोबरच ‘चहा आख्यान’ सादर झालं. असा होता आजी-आजोबा कट्टा.


23 August 2022

Vaidehi Bhide met the grandparents on behalf of our organization 'Prarambha' Kala Academy, Thane. Chatted freely with them. Made them talk. Everyone needs a listening ear Nicely presented songs. He spoke to the seniors about how life can be beautiful if you adapt to the situation with positive thoughts. A few snapshots.

‘प्रारंभ’ कला अकॅडमी,ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने वैदेही भिडे ह्यांनी आजी-आजोबांची भेट घेतली. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांना बोलतं केलं. ऐकणारा कान प्रत्येकाला हवा असतो. छान छान गाणी सादर केली. सकारात्मक विचारांनी परिस्थितीशी जुळवून घेतलं की जगणं कसं सुंदर होतं ह्याविषयी त्यांनी ज्येष्ठांशी संवाद साधला. काही क्षणचित्रं.


13 September 2022

On behalf of our organization Prarambha Kala Academy, Thane, our members visit the grandparents in Vrudhashram. The aim is to entertain them through various arts. Urmila Bhootkar met him on 13 September 2022 on behalf of the organization. He performed many poems. Satyaghatana narrated. The importance of good behavior was revealed through things. The grandparents participated with great joy. A few snapshots.

प्रारंभ’ कला अकॅडमी,ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने आमचे सदस्य व्रुध्दाश्रमातील आजी-आजोबांची भेट घेतात. विविध कलांच्या माध्यमातून त्यांचे मनोरंजन व्हावे हा उद्देश असतो. संस्थेच्या वतीने १३ सप्टेंबर २०२२ रोजी उर्मिला भूतकर त्यांना भेटल्या. अनेक कवितांचे सादरीकरण त्यांनी केले. सत्यधटना कथन केले. गोष्टींच्या माध्यमातून चांगल्या आचरणाचे महत्व उलगडले. आजी-आजोबा खूप आनंदाने सहभागी झाले. काही क्षणचित्रं.


20 September 2022

As part of our social activities through our organization 'Prarambha' Kala Academy Thane, our members regularly visit the grandparents in Vrudhashram. Our aim is to put a smile on their face and protect their mental health. Vaishali Kulkarni, Trustee of 'Prarambha' today. Met grandparents on 20 September 2022. He gave fundamental guidance about Manaspuja. He explained what Manaspuja is, why it should be done, the purpose behind doing it, its importance and its results. The grandparents got a good response. A few snapshots.

‘प्रारंभ’ कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेतर्फे आमच्या सामाजिक उपक्रमा अंतर्गत आमचे सदस्य व्रुध्दाश्रमातील आजी-आजोबांची नियमित भेट घेतात. त्यांच्या चेहर्यावर हसू फुलवावे, त्यांचे मानसिक आरोग्य जपावे हा आमचा उद्देश असतो. ‘प्रारंभ’ च्या विश्वस्त वैशाली कुलकर्णी ह्यांनी आज दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी आजी आजोबांची भेट घेतली. मानसपुजेविषयी त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले. मानसपूजा म्हणजे काय, ती का करावी, ती करण्यामागचे प्रयोजन, महत्व आणि त्याचे फलित त्यांनी समजावून सांगितले. आजी आजोबांचा चांगला प्रतिसाद मिळाला. काही क्षणचित्रं.


27 Sep. 2022

Our members regularly visit grandparents on behalf of our organization 'Prarambha' Kala Academy Thane. In order to preserve the mental health of the grandparents through the awareness of social responsibility, we entertain them through various arts. Bharti Bachhao presented devotional songs, devotional songs and many beautiful Navratri songs. Grandparents responded well. Everyone enjoyed the program with great joy. Some snapshots.

27 Sep. 2022

‘प्रारंभ’ कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने आमचे सदस्य आजी-आजोबांची नियमित भेट घेतात. सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून आजी-आजोबांचे मानसिक आरोग्य जपावे ह्याकरिता विविध कलांच्या माध्यमातून आम्ही त्यांचे मनोरंजन करतो. भारती बच्छाव ह्यांनी भावगीते , भक्तिगीते तसेच नवरात्रीची अनेक सुंदर गीते सादर केली. आजी-आजोबांनी उत्तम प्रतिसाद दिला. खूप आनंदाने सर्वांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. काही क्षणचित्रं.27 सप्टें. 2022


20 September 2022

As part of our social activities through our organization 'Prarambha' Kala Academy Thane, our members regularly visit the grandparents in Vrudhashram. Our aim is to put a smile on their face and protect their mental health. Vaishali Kulkarni, Trustee of 'Prarambha' today. Met grandparents on 20 September 2022. He gave fundamental guidance about Manaspuja. He explained what Manaspuja is, why it should be done, the purpose behind doing it, its importance and its results. The grandparents got a good response. A few snapshots.

‘प्रारंभ’ कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेतर्फे आमच्या सामाजिक उपक्रमा अंतर्गत आमचे सदस्य व्रुध्दाश्रमातील आजी-आजोबांची नियमित भेट घेतात. त्यांच्या चेहर्यावर हसू फुलवावे, त्यांचे मानसिक आरोग्य जपावे हा आमचा उद्देश असतो. ‘प्रारंभ’ च्या विश्वस्त वैशाली कुलकर्णी ह्यांनी आज दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी आजी आजोबांची भेट घेतली. मानसपुजेविषयी त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले. मानसपूजा म्हणजे काय, ती का करावी, ती करण्यामागचे प्रयोजन, महत्व आणि त्याचे फलित त्यांनी समजावून सांगितले. आजी आजोबांचा चांगला प्रतिसाद मिळाला. काही क्षणचित्रं.


4 October 2022

Members of our organization 'Prarambha' Kala Academy Thane visit grandparents regularly. This activity is started throughout the year out of the sense of social responsibility that they should get some relaxation in their daily routine, they should be able to experience moments of rest. This Grandparents Katta was colored with heartwarming chat and presentation by Vandana Vidwans. The program started with the praise of Saraswati. He reviewed stories and articles written by Mangala Godbole. Beautifully presented his poems. He elaborated the fun of Marathi language in an interesting way through the play of words. He had a nice conversation with his grandparents. All the seniors were very happy. A few snapshots. 4 October 2022

‘प्रारंभ’ कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेचे सदस्य नियमित आजी-आजोबांची भेट घेतात. त्यांच्या दिनचर्येत त्यांना थोडा विरंगुळा मिळावा, दोन घटका विसाव्याचे क्षण अनुभवता यावेत ह्या सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून हा उपक्रम वर्षभर सुरु असतो. हा आजी-आजोबा कट्टा आज वंदना विद्वांस ह्यांच्या दिलखुलास गप्पा आणि सादरीकरणाने रंगला. सरस्वती स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंगला गोडबोले लिखित कथा आणि लेखांचे अभिवाचन त्यांनी केले. त्यांच्या स्वरचित कवितांचे सुंदर सादरीकरण केले. शब्दांच्या खेळाद्वारे मराठी भाषेतील गंमत त्यांनी रंजक पध्दतीने विशद केली. मनमोकळ्या गप्पा मारत आजी-आजोबांशी त्यांनी छान संवाद साधला. सर्व ज्येष्ठ अतिशय खुष झाले. काही क्षणचित्रं. 4 ऑक्टोबर 2022


11 Oct. 2022

On behalf of the Prarambha Kala Academy

Today 11 Oct. On 2022, Kavya Kale's Kavya Pushpanjali was presented at the old age home in Yeur.

Everyone enjoyed the event

Enjoyed it.

He presented poems on natural flowers. the flowers

How we come at different stages in our lives

An attempt was made to convey this through this program. Grandparents were very happy. Some snapshots.

प्रारंभ कला अकॅडमी च्या वतीने

आज दि. 11 ऑक्टो. 2022 रोजी येऊर येथे वृद्धाश्रमात कल्याणी काळे यांचा काव्य पुष्पांजली हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

सगळ्यांनी कार्यक्रमाचा खूप

आनंद घेतला.

स्वरचित फुलांवरील कविता त्यांनी सादर केल्या. फुलं

आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर कशी येतात

हे या कार्यक्रमातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला.आजी-आजोबांना खूप आनंद झाला.काही क्षणचित्रं.


19 October 2022

Members of our organization 'Prarmbha' Kala Academy Thane regularly visit grandparents with the aim of bringing joy to senior citizens through art. Madhavi Deshmukh met the grandparents on behalf of the initiation. Today's session started with the singing of the world prayer by Vamanrao Pai. He said the importance of prayer. He reviewed articles by Praveen Daven. Some snapshots (19 Oct 2022)

कलेच्या माध्यमातून ज्येष्ठांना आनंद वाटावा, ह्या उद्देशाने ‘प्रारंभ’ कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेचे सदस्य नियमित आजी आजोबांची भेट घेतात. माधवी देशमुख प्रारंभ च्या वतीने आजी आजोबांना भेटल्या.वामनराव पै ह्यांच्या विश्वप्रार्थना गायनाने आजच्या सत्राची सुरुवात झाली. प्रार्थनेचे महत्व त्यांनी सांगितले. प्रवीण दवणे ह्यांच्या लेखांचे अभिवाचन त्यांनी केले.काही क्षणचित्रं (19 ऑक्टो. 2022)


2 November 2022

On behalf of our organization 'Prarambha' Kala Academy Thane, our members meet the grandparents regularly. We take care of their mental health through various arts. Music has the magic of cheering up the mind. Happy mind, fit body. Vaishali Parad said today. Met grandparents on 2 Nov2 022. He graced the concert by singing Bhakti Geet, Bhav Geet, many Marathi Hindi film songs. Grandparents were very happy. A few snapshots.

‘प्रारंभ’ कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने आमचे सदस्य नियमित आजी-आजोबांना भेटतात. विविध कलांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतो. मन प्रफुल्लित करण्याची जादू संगीतात आहे.प्रसन्न मन तंदुरुस्त तन. वैशाली पराड ह्यांनी आज दि. 2 नोव्हें. 2022 रोजी आजी आजोबांची भेट घेतली. भक्तिगीतं, भावगीतं, अनेक मराठी हिंदी चित्रपट गीते गाऊन त्यांनी मैफल छान सजवली. आजी आजोबा खूप खुश झाले. काही क्षणचित्रं.


8 November 2022

The members of our organization 'Prarambha' Kala Academy, Thane meet the grandparents regularly. Our aim behind these visits is to present various arts to them and get them to enjoy them. Music has the extraordinary power to give positive energy by pleasing the mind. Meghna Kalundrekar and Prajakta Joshi met the grandparents on behalf of Pradham. He won the admiration of seniors by performing Bhavgeet, old-new Marathi and Hindi songs. Grandparents participated with a very spontaneous response.

Some Snapshots.(8 Nov 2022)

‘प्रारंभ’ कला अकॅडमी ,ठाणे ह्या आमच्या संस्थेचे सदस्य नियमितपणे आजी- आजोबांना भेटतात. विविध कला त्यांच्या समोर सादर करुन त्यांना त्यातून आनंद मिळावा हा आमचा ह्या भेटींमागचा उद्देश असतो.मन प्रसन्न करुन सकारात्मक ऊर्जा देण्याची विलक्षण ताकद संगीतामध्ये आहे.’ प्रारंभ’च्या वतीने मेघना काळुंद्रेकर आणि प्राजक्ता जोशी आजी-आजोबांना भेटल्या. भावगीतं, जुनी-नवी मराठी आणि हिंदी गाणी अप्रतिम सादर करुन त्यांनी ज्येष्ठांची वाहवा मिळवली. अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद देत आजी आजोबा सहभागी झाले. काही क्षणचित्रं.(8 नोव्हें 2022)


15 Nov 2022

On behalf of our organization Prarambha Kala Academy, Thane, 'Aji-Ajoba Katta' is organized throughout the year to entertain grandparents through art. There is an alchemy in music to make the elders sway to your tune. Music works to fill the mind with positivity. Our members regularly visit the grandparents to add some fun to their daily routine and boost their spirits. Today Neelam Bhogte and Mangala Kunte met the grandparents on behalf of the organization. He performed various types of songs like Bhakti Geet, Bhav Geet, Hindi-Marathi in a very melodious and beautiful manner. He got great response from grandparents. Some snapshots.(15 Nov 2022)

प्रारंभ’ कला अकॅडमी,ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने, कलेच्या माध्यमातून आजी-आजोबांचे मनोरंजन व्हावे ह्याकरिता वर्षभर ‘आजी-आजोबा कट्टा’ चे आयोजन केले जाते. आबाल व्रुध्दांना आपल्या तालावर डोलायला लावण्याची किमया संगीतामधे आहे. मन सकारात्मकतेने भारून टाकण्याचे काम संगीत करते. आजी-आजोबांच्या दिनचर्येत त्यांना थोडा विरंगुळा मिळावा, त्यांचा उत्साह वाढावा ह्याकरिता आमचे सदस्य नियमितपणे आजी-आजोबांची भेट घेतात. आज संस्थेच्या वतीने नीलम भोगटे आणि मंगला कुंटे आजी-आजोबांना भेटल्या. भक्तिगीतं, भावगीतं, हिंदी-मराठी अशी विविध प्रकारची गाणी त्यांनी अतिशय सुरेल आणि सुरेख पध्दतीने सादर केली. आजी-आजोबांचा उत्तम प्रतिसाद त्यांना मिळाला. काही क्षणचित्रं.(15 नोव्हें 2022)


22 NOV 2022

On behalf of our organization 'Prarambha' Kala Academy, Thane, our members regularly visit senior citizens under our social activity 'Aji-Ajoba Katta'. We strive to keep their minds happy so that their mental health remains good. On behalf of the organization, Manisha Situt met her grandparents today. The session started with chanting of Lord Ganesha. He performed many songs and beautiful bhajans. He told funny, humorous as well as instructive things. He spoke to the seniors about how to find happiness, how life becomes easier if you have a positive outlook. He got great response from grandparents.

A few snapshots. (22 NOV 2022)

‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने आमचे सदस्य नियमितपणे ‘आजी-आजोबा कट्टा’ ह्या आमच्या सामाजिक उपक्रमा अंतर्गत ज्येष्ठांची भेट घेतात.. विविध कलांच्या माध्यमातून आजी आजोबांचे मनोरंजन करावे, त्यांना आनंद मिळावा हा ह्या भेटींचा उद्देश असतो. त्यांचे मन प्रफुल्लित रहावे जेणेकरुन त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहील, ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. संस्थेच्या वतीने आज मनिषा शितूत आजी आजोबांना भेटल्या. गणपतीच्या नामस्मरणाने सत्राची सुरुवात झाली. अनेक गाणी, छान छान भजने त्यांनी सादर केली. गंमतीशीर, विनोदी तसेच बोधप्रद गोष्टी त्यांनी सांगितल्या. आनंद कसा शोधावा, सकारात्मक द्रुष्टिकोन ठेवल्यास जगणं कसं सोपे होते ह्याविषयी त्यांनी ज्येष्ठांशी संवाद साधला. आजी आजोबांचा उत्तम प्रतिसाद त्यांना लाभला. काही क्षणचित्रं. (22 NOV 2022)


वृद्धाश्रम सांगता समारंभ

येऊर

December 27 2022

Prarambha Kala Academy, our organization conducts annual activities throughout the year in an old age home with the help of many artists. We in our organization are also part of it as artists. It ends in the month of December. Then we were ready to entertain the grandparents again in the new old age home. The annual closing ceremony of this year's old age home is being held on December 27 at Yeoor.

प्रारंभ कला अकॅडमी ही आमची संस्था वर्षभर एका वृद्धाश्रमामध्ये अनेक कलाकारांच्या मदतीने वार्षिक उपक्रम राबवत असते. आमच्या संस्थेतील आम्ही देखील कलाकार म्हणून त्याचा भाग असतो. डिसेंबर महिन्यात त्याचा समारोप असतो . मग आम्ही पुन्हा नवीन वृद्धाश्रमात आजी-आजोबांचं मनोरंजन करायला सज्ज होतो. यावर्षीच्या वृद्धाश्रमाचा वार्षिक सांगता समारंभ 27 डिसेंबरला येउर येथे होत आहे.


27 DEC 2022

The annual activity of Prarambha Kala Academy is Aji Ajoba Katta. Throughout the year, our 48 socially conscious artist friends visit grandparents and entertain them through different arts. Satisfying intellectual hunger is also important. Today was the concluding ceremony of our annual activity. On this occasion, two of my friends, singers Prachi Kokiel and Vaishali Pard, sang songs for the grandparents. Our friend Ulhas Gandhi, retired employee of Thane Bharat Sahakari Bank was present on this occasion. Commencement Trustees Vaishali Kulkarni Manisha Acharya Kirti Kerkar were also present. Ashwini Bhatwadekar, the parent of the initiation, conducted the program wonderfully. Urmila Bhutkar presented very beautiful poetry. On this occasion, Solapuri chadri and food were given to the grandparents on behalf of Prambha Art Academy and on behalf of Ulhas Gandhi. Mr. and Mrs. Kumudini Gosavi, new members of Prambha, were present on this occasion. Now our march to the new old age home in the new year.

प्रारंभ कला अकॅडमी चा वार्षिक उपक्रम म्हणजे आजी आजोबा कट्टा. वर्षभर आजी-आजोबांसाठी आमचे 48 सामाजिककतेचे भान असणारे कलावंत मित्र मैत्रिणी आजी-आजोबांसाठी जाऊन त्यांचं वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून मनोरंजन करतात .बौद्धिक भूक भागवणे हे देखील महत्त्वाच .आज या आमच्या वार्षिक उपक्रमाचा सांगता समारंभ होता. यावेळी गायिका प्राची कोकीळ आणि वैशाली परड या माझ्या दोन सख्यांनी आजी-आजोबांसाठी गाणी गायली. आमचे मित्र ठाणे भारत सहकारी बँकेचे निवृत्त कर्मचारी उल्हास गांधी यावेळी उपस्थित होते. प्रारंभचे विश्वस्त वैशाली कुलकर्णी मनीषा आचार्य कीर्ती केरकर हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाच अप्रतिम सूत्रसंचालन प्रारंभच्या पालक अश्विनी भाटवडेकर यांनी केलं. उर्मिला भुतकर यांनी अतिशय सुंदर काव्य रचना सादर केल्या. यावेळी प्रारंभ कला अकॅडमीच्या वतीने आणि उल्हास गांधींच्या वतीने आजी-आजोबांना सोलापुरी चादरी आणि जेवण देण्यात आलं .प्रारंभच्या नवीन सदस्य श्री व सौ कुमुदिनी गोसावी यावेळी उपस्थित होते. आता आमचा मोर्चा नवीन वृद्धाश्रमाकडे नवीन वर्षात.


5 September 2023

On 5th September 2023, the annual activity of Aji-Ajoba Katta was launched at the old age home at Kalher village through our organization Prarambha Kala Academy. At this time, Smit was present at the scheme house of the old age home. Dr. Arundhati Bhalerao, the founder and director of the institute, made an introduction on behalf of the initiation. Trustee Manisha Acharya introduced the initiation. Secretary of the organization Kirti Kerkar, Vaishali Kulkarni, Member Vaishali Parad, Coordinator Jayashree Madane were present. Shri Vidyadhar Apashankar, Anjali Sant, Anant Mule, members of Vardham Kala Academy, sang various Hindi Marathi songs on Karaoke very rhythmically and beautifully and entertained the grandparents as part of our activities. Our 60 to 70 members will carry out this activity continuously throughout the year. Vardham Kala Academy has been continuously contributing through various arts for all in old age homes and orphanages.

Jayashree Madane

Member- Coordinator - Aji Ajoba Katta Prarambha Kala Academy

A few snapshots.

दि. ५ सप्टेंबर 2023 रोजी प्रारंभ कला अकॅडमी या आमच्या संस्थेमार्फत काल्हेर गाव येथील वृद्धाश्रमात आजी-आजोबा कट्टा या वार्षिक उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी स्मित वृद्धाश्रमाच्या योजना घरत उपस्थित होत्या. प्रारंभ च्या वतीने संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका डॉ.अरूंधती भालेराव यांनी प्रास्ताविक केले.विश्वस्त मनीषा आचार्य यांनी प्रारंभ चा परिचय करून दिला. संस्थेच्या सचिव कीर्ती केरकर , वैशाली कुलकर्णी, सदस्य वैशाली पराड , समन्वयिका जयश्री मदने उपस्थित होते. प्रारंभ कला अकॅडमी चे सदस्य श्री विद्याधर अपशंकर , अंजली संत, अनंत मुळे यांनी या आमच्या उपक्रमांतर्गत विविध हिंदी मराठी गाणी कराओके वर अतिशय तालबद्ध आणि सुंदर रीतीने गायली आणि आजी आजोबांचे मनोरंजन केले. वर्षभर आता आमचे ६०ते७० सभासद हा उपक्रम सातत्याने राबवतील. प्रारंभ कला अकॅडमी वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमातील सर्वांसाठी सातत्याने विविध कलांच्या माध्यमातून आपले योगदान देत आहे.

जयश्री मदने

सदस्य- समन्वयिका - आजी आजोबा कट्टा प्रारंभ कला अकॅडमी

काही क्षणचित्रे.


12 September 2023

Today on September 12, 2023, the second session of "Aji Ajoba Katta" was concluded on behalf of Prarambha Kala Academy Thane at the old age home in Kalher village Thane. Trupti Sardesai and Chandrasekhar Thakur, members of Prarambha Kala Academy, presented a feast of various songs from their program Geet Trupti. Started from Bhakti Gita. He sang different types of songs like Hindi, Marathi Bhavgeeta, Lavani, Ovya in a beautiful voice. Chandrasekhar Thakur made a very beautiful statement. They were telling information about the meaning and sentiment of the song. Hearing all this, the grandparents reveled in their past. Music has an extraordinary power to uplift the mind. Grandparents participated in this very enthusiastically. Some grandparents wanted this one-hour program not to end. In this way the program was great.


Some photographs.

आज दिनांक १२ सप्टेंबर २०२३रोजी प्रारंभ कला अकॅडमी ठाणे च्या वतीने काल्हेर गाव ठाणे इथल्या वृद्धाश्रमामधे "आजी आजोबा कट्टा" चे दुसरे सत्र संपन्न झाले. प्रारंभ कला अकॅडमी च्या सदस्या तृप्ती सरदेसाई आणि चंद्रशेखर ठाकूर यांनी गीत तृप्ती या त्यांच्या कार्यक्रमामधून विविध प्रकारच्या गाण्यांची मेजवानी दिली. भक्ती गीता पासून सुरुवात केली . हिंदी,मराठी भावगीते,लावणी , ओव्या अशी निरनिराळ्या प्रकारची गाणी त्यांनी सुंदर आवाजात गायली. चंद्रशेखर ठाकूर ह्यांनी अतिशय सुंदर निवेदन केले. गाण्याचा अर्थ , भाव ह्याबद्दल माहिती सांगत होते . हे सर्व ऐकताना आजी आजोबा त्यांच्या गतकाळात रममाण झाले. संगीतामध्ये मन प्रफुल्लित करण्याची विलक्षण ताकद असते. आजी आजोबा अतिशय उत्साहाने ह्यामधे सहभागी झाले. हा एक तासाचा कार्यक्रम संपू नये असं काही आजी आजोबांना वाटत होतं. अशा प्रकारे कार्यक्रम छान झाला.

काही छायाचित्रे.


26 September 2023

On September 26, 2023, a session of "Aji Ajoba Katta" was organized in the old age home at Kalher village Thane on behalf of our organization, Prarambha Kala Academy Thane. Smita Modak, a member of the Prarambha Kala Academy, and her co-artists, Sangita Gokhale, Nivedita Gupte, Deepa Joshi and Neena Mestri, started the program with a beautiful prayer. They sang various devotional songs and the atmosphere was mesmerized by Aroh Veerkar and Peti Smita Modak was present. The whole program was wrapped up in nice words. All the grandparents were listening intently. The program was great.

Some photographs.

दिनांक 26 सप्टेंबर 2023रोजी प्रारंभ कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने आमच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत काल्हेर गाव ठाणे इथल्या वृद्धाश्रमात “आजी आजोबा कट्टा" चे सत्र आयोजित केले होते. प्रारंभ आणि प्रारंभच्या संस्थापिका संचालिका डॅा.अरुंधती भालेराव ह्यांचा परिचय करुन दिला संस्थेच्या समन्वयिका जयश्री मदने ह्यांनी. प्रारंभ कला अकॅडमी च्या सदस्या स्मिता मोडक आणि त्यांच्या सहकलाकार संगीता गोखले, मुग्धा फडके, निवेदिता गुप्ते, दीपा जोशी आणि नीना मेस्त्री ह्यांनी सुंदर अशा प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. विविध प्रकारची भक्तीगीते तसेच भावगीते गायली आणि वातावरण मंत्रमुग्ध झाले. तबल्याची साथ दिली आरोह वीरकर ह्यांनीआणि पेटी वर होत्या स्मिता मोडक. संपूर्ण कार्यक्रम छानशा शब्दांत गुंफला होता निवेदिका अपर्णा मोडक ह्यांनी. सर्व आजी आजोबा तल्लीनतेने ऐकत होते. कार्यक्रम छान झाला.

काही छायाचित्रे.



3 OCT 2023

Our organization 'Prarambha' Kala Academy Thane organizes 'Aji-Ajoba Katta' as part of our social project at Vrudhashram at Kalher. Our co-ordinator Jayashree Madane inaugurated the event as well as the founder and director of the event Dr. Arundhati Bhalerao was introduced. Member of the organization Shri. Manohar Vatharkar, Mrs. Alka Vatharkar and Chandrasekhar Thakur met the grandparents today. They explained the subject of spirituality in a very simple way through various things. We do many things according to custom. But what is the science behind it, for what purpose those customs and traditions were started, he explained in a very good way. Grandparents were listening intently and responding well. Alka Vatharkar and Chandrasekhar Thakur delighted the audience with their beautiful singing.

A few snapshots.

३ ऑक्टोबर २०२३

‘प्रारंभ’ कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेतर्फे काल्हेर येथील व्रुध्दाश्रमात आमच्या सामाजिक प्रकल्पाअंतर्गत ‘आजी-आजोबा कट्टा’ चे आयोजन केले जाते. आमची समन्वयिका जयश्री मदने ह्यांनी प्रारंभ तसेच प्रारंभच्या संस्थापिका आणि संचालिका डॅा. अरुंधती भालेराव ह्यांचा परिचय करुन दिला. संस्थेचे सदस्य श्री. मनोहर वठारकर, सौ. अल्का वठारकर आणि चंद्रशेखर ठाकूर ह्यांनी आज आजी आजोबांची भेट घेतली.अध्यात्म हा विषय विविध गोष्टींच्या माध्यमातून त्यांनी अतिशय सोपा करुन सांगितला. प्रथेनुसार आपण अनेक गोष्टी करत असतो. पण त्यामागील शास्त्र काय आहे, कोणत्या हेतूने त्या प्रथा तसेच परंपरा सुरु झाल्या हे खूप छान पध्दतीने त्यांनी उलगडून दाखविले. आजी आजोबा एकाग्रतेने ऐकत चांगला प्रतिसाद देत होते. अल्का वठारकर आणि चंद्रशेखर ठाकूर ह्यांच्या सुंदर गीतगायनाने प्रेक्षक खूष झाले.

काही क्षणचित्रं.


11 OCT 2023

'Aji-Ajoba Katta' is organized regularly under the social activities of our organization 'Prarambha' Kala Academy, Thane. Members of the organization Dipali Kurlekar, Smita Salgaonkar, Suresh Salgaonkar met the grandparents at Kalher today. Commencement Coordinator Jayashree Madane introduced the Commencement as well as Commencement Director Dr. Arundhati Bhalerao. Dipali Kurlekar's lecture was organized. The topic was 'We were born to laugh'. He told about the importance of laughter, the benefits of laughter from various things. He presented the subject well by telling many anecdotes and jokes. Be it to overcome mental stress or to get out of a crisis - our smile is what helps us get out of bad situations. He said with some examples that one can conquer the world by making others like him with a happy smile on his face. Smita and Suresh Salgaonkar rocked the audience with Prarthana, many old and new Hindi Marathi songs. Music has a wonderful alchemy to cheer up the mind. The program ended with the National Anthem giving the message that it is Anandashram and not Vrudhashram. So this is our laughter-music feast today.

A few snapshots.

‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत ‘आजी-आजोबा कट्टा’ चे नियमित आयोजन केले जाते. संस्थेचे सदस्य दिपाली कुर्लेकर, स्मिता साळगांवकर, सुरेश साळगांवकर ह्यांनी आज काल्हेर येथे आजी-आजोबांची भेट घेतली. प्रारंभच्या समन्वयिका जयश्री मदने ह्यांनी प्रारंभ तसेच प्रारंभच्या संस्थापिका संचालिका डॅा.अरुंधती भालेराव ह्यांचा परिचय करुन दिला. दिपाली कुर्लेकर ह्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. विषय होता-‘हसण्यासाठी जन्म आपुला’. हसणे किती महत्वाचे आहे, हास्याचे फायदे त्यांनी विविध गोष्टींमधून सांगितले. अनेक किस्से, विनोद सांगत त्यांनी विषय छान मांडला. मानसिक तणावावर मात करणे असेल किंवा एखाद्या संकटातून मार्ग काढणे असेल- आपले हसणेच आपल्याला बिकट परिस्थितीतून बाहेर यायला मदत करते. आपल्या चेहर्यावरील प्रसन्न हास्याने समोरच्याला आपलंसं करुन जग जिंकता येतं हे काही उदाहरणांसहित त्यांनी सांगितले. स्मिता आणि सुरेश साळगांवकर ह्यांनी प्रार्थना, अनेक जुनी नवी हिंदी मराठी गीतांनी प्रेक्षकांना डोलायला लावले. मन प्रफुल्लित करण्याची विलक्षण किमया संगीतामधे आहे. व्रुध्दाश्रम नव्हे तर आनंदाश्रम आहे असा संदेश देत राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.तर अशी ही आमची आजची हास्य-संगीताची मेजवानी.

काही क्षणचित्रं.


31 October 2023

'Aji-Ajaoba Katta' is organized regularly under the social activities of our organization 'Prarambha' Kala Academy Thane. On October 31, 2023, Angha Jadhav and Vrishali Sawant, members of Prarambha Kala Academy, visited Kalher village. Anagha Jadhav introduced the Prarambha Kala Academy and Dr. Arundhati Bhalerao, the founding director of the institute. Anagha Jadhav gave a lecture on Positivity. He told why positivity is important, how to cultivate it through various anecdotes and small things. He told stories from the biographies of many great men who reached the heights of success by overcoming adverse situations in life with positive thoughts. Learn to love yourself. Vrishali Sawant presented beautiful songs in Marathi and Hindi. Koli songs, patriotic songs were enthusiastically supported by grandparents. Thus, today's Katta, which started with an open dialogue in the lecture, ended with the patriotic song "Ai Mere Watan Ke Logo".

A few snapshots.

'प्रारंभ' कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत 'आजी-आजोबा कट्टा 'चे नियमित आयोजन केले जाते. काल्हेर गाव येथे दि.31 ॲाक्टोबर 2023 रोजी प्रारंभ कला अकॅडमी संस्थेच्या सभासद अनघा जाधव आणि वृषाली सावंत ह्यांनी भेट दिली. अनघा जाधव यांनी प्रारंभ कला अकॅडमी संस्थेचा आणि संस्थेच्या संस्थापिका संचालिका डॉ.अरुंधती भालेराव यांचा परिचय करून दिला. अनघा जाधव ह्यांनी सकारात्मकता ह्या विषयावर व्याख्यान दिले. सकारात्मकता का महत्वाची, ती कशी जोपासावी हे त्यांनी विविध किस्से तसेच छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून सांगितले. आयुष्यात आलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर सकारात्मक विचारांनी मात करत यशाची उंच शिखरे गाठणार्या अनेक थोरामोठ्यांच्या चरित्रामधील गोष्टी त्यांनी सांगितल्या. स्वत:वर प्रेम करायला शिका असा संदेश दिला. वृषाली सावंत यांनी मराठी, हिंदी मधील छान छान गीते सादर केली. कोळी गीते, देशभक्तीपर गीतांना आजी आजोबांनी उत्फू्र्त साथ दिली. अशाप्रकारे व्याख्यानातील मोकळ्या संवादाने सुरु झालेला आजचा कट्टा " ऐ मेरे वतन के लोगो "ह्या देशभक्तीपर गीताने संपला.

काही क्षणचित्रे.


7 October 2023


'Aji-Ajoba Katta' is organized regularly under the social activities of our organization 'Pramamba' Kala Academy Thane. Chandrasekhar Shinde, Adv. Suhas Mondkar, Madhuri Gadkari, members of Prarambha Kala Academy visited Kalher village on October 7, 2023. Prarambha Kala Academy Thane and Dr. Arundhati Bhalerao, founder director of the institute, were introduced by Chandrashekhar Shinde. All of them gave a feast of songs like Marathi, Hindi, Lavani, Koli songs. Grandparents responded by dancing to each of his songs. was enjoying Grandparents really wanted today's program not to end. The program concluded in an atmosphere filled with music.

Some snapshots.

'प्रारंभ 'कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत 'आजी-आजोबा कट्टा 'चे नियमित आयोजन केले जाते. काल्हेर गाव येथे दि.7 ऑक्टोबर 2023 रोजी प्रारंभ कला अकॅडमी संस्थेचे सभासद चंद्रशेखर शिंदे,अॅड.सुहास मोंडकर, माधुरी गडकरी यांनी भेट दिली.प्रारंभ कला अकॅडमी ठाणे आणि संस्थेच्या संस्थापिका संचालिका डॉ.अरुंधती भालेराव यांचा परिचय चंद्रशेखर शिंदे ह्यांनी करून दिला. मराठी ,हिंदी , लावणी , कोळी गीते अशी गाण्यांची मेजवानी ह्या सर्वांनी दिली. आजी आजोबा त्यांच्या प्रत्येक गाण्यावर नाचून प्रतिसाद देत होते . आनंद घेत होते. आजचा कार्यक्रम संपू नये अशी आजी आजोबा यांची खूप इच्छा होती. संगीताने भारावलेल्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.

काही क्षणचित्रे .


21 November 2023

'Aji-Ajoba Katta' is organized regularly under the social activities of our organisation 'Pramamba' Kala Academy Thane. On November 21, 2023 at Kalher village, Alka Wadhavkar and Geeta Sule, members of the 'Pramamba' Kala Academy Thane organization, told wonderful stories through storytelling. By telling the funny story 'Bhavji Yeta Ghara', the grandparents smiled. Hearing the story 'Dane Dane pe likha hai khane wale ka naam', the grandparents started laughing. And finally, Alka Tai and Geeta Tai danced to Hindi songs and made the grandparents dance too. Humorous stories, anecdotes, and singing of songs made the atmosphere very happy. Humorous stories relieve stress. The mind is excited with light stories. The grandparents were very happy. Thus ended today's program.

A few snapshots.

'प्रारंभ 'कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत 'आजी-आजोबा कट्टा 'चे नियमित आयोजन केले जाते. काल्हेर गाव येथे दि.21 नोव्हेंबर 2023 रोजी ‘प्रारंभ ‘ कला अकॅडमी ठाणे संस्थेच्या सभासद अलका वढावकर आणि गीता सुळे या दोघाींनी कथाकथनाच्या माध्यमातून छान छान कथा सांगितल्या. ‘भावजी येता घरा' ही विनोदी कथा सांगून आजी-आजोबांच्या चेहर्यावर हास्य फुलवलं. ‘दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम' ही प्रवासामध्ये अनुभवलेली कथा ऐकून तर आजी आजोबा पोट धरून हसू लागले. आणि शेवटी अलका ताई आणि गीता ताई यांनी हिंदी गाण्यांवर पदन्यास करत आजी आजोबांनाही नाचायला लावलं . विनोदी कथा, किस्से, गाण्यांवर धरलेला ठेका ह्यामुळे वातावरण एकदम प्रसन्न झाले. विनोदी कथांनी मनावरचा ताण दूर होतो. हलक्या -फुलक्या किश्श्यांनी मन उत्साही होते. आजी-आजोबा अतिशय खुष झाले. अशाप्रकारे आजचा कार्यक्रम संपन्न झाला.

काही क्षणचित्रे.


28 November 2023

'Aji-Ajoba Katta' is organized regularly under the social activities of our organization 'Pramamba' Kala Academy Thane. On November 28, 2023 at Kalher village, the members of Prabhavati Deshpande and Vinita Bivalkar of the Prarambha Kala Academy Thane organization visited the old age home. Prabhavati Deshpande introduced the institution, Dr. Arundhati Bhalerao, founder and director of the institution, Kala Academy Thane, and started the program. Devotional songs, chants of Omkar, funny stories, songs, Hindi songs etc. Through this, there was joy and enthusiasm among the grandparents. The grandparents were humming songs. Some were dancing and expressing their happiness. In this way, the program started with devotional songs and ended with Pasaydan.


A few snapshots.

'प्रारंभ 'कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत 'आजी-आजोबा कट्टा 'चे नियमित आयोजन केले जाते. काल्हेर गाव येथे दि.28 नोव्हेंबर 2023 रोजी प्रारंभ कला अकॅडमी ठाणे संस्थेच्या सभासद प्रभावती देशपांडे आणि विनिता बिवलकर यांनी वृध्दाश्रमला भेट दिली. प्रभावती देशपांडे यांनी प्रारंभ कला अकॅडमी ठाणे ह्या संस्थेचा आणि संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका डॉ.अरूंधती भालेराव यांचा परिचय दिला.आणि कार्यक्रमाला सुरुवात केली. भक्तीगीते,ॐकार चे उच्चार , विनोदी कथा, गाणी, हिंदी गाणी इ. माध्यमातून आजी-आजोबा यांच्या मध्ये आनंद उत्साह संचारला होता .आजी आजोबा गाणी गुणगुणत होते.काहीजण मनसोक्त नाचत आनंद व्यक्त करत होते.अशाप्रकारे भक्तीगीत पासून सुरू झालेला कार्यक्रम पसायदानाने संपन्न झाला.

काही क्षणचित्रे.


5 December 2023

'Aji-Ajoba Katta' is organized regularly under the social activities of our organization 'Pramamba' Kala Academy Thane. Neelam Bhogte and Sukhda Thakur, members of Prarambha Kala Academy Thane Institute, visited Kalher village on 5th December 2023. Neelam Bhogte introduced Dr. Arundhati Bhalerao, founder and director of the institute. At the same time, he also introduced himself and Sukhda Thakur. The program started with Ganesh Stavan. He performed many Marathi-Hindi songs, devotional songs, lavani, koli songs. Grandparents were made to sway to the beat. Some even started dancing spontaneously. Even if you don't want the program to end, you have to stop as per the time limit. The atmosphere was very happy due to the singing of the song. The program ended with the Hindi song Sayonara. Grandparents were very happy. Thus today's program ended.

A few snapshots.

'प्रारंभ 'कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत 'आजी-आजोबा कट्टा 'चे नियमित आयोजन केले जाते. काल्हेर गाव येथे दि.5 डिसेंबर 2023 रोजी 'प्रारंभ ' कला अकॅडमी ठाणे संस्थेच्या सभासद नीलम भोगटे आणि सुखदा ठाकूर ह्या दोघींनी भेट दिली.नीलम भोगटे यांनी प्रारंभ तसेच संस्थेच्या संस्थापिका संचालिका डॉ.अरुंधती भालेराव ह्यांचा परिचय करून दिला. त्याचबरोबर स्वतः चा आणि सुखदा ठाकूर ह्यांचाही परिचय करून दिला.गणेशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अनेक मराठी -हिंदी गाणी, भक्तीगीते, लावणी, कोळीगीते त्यांनी सादर केली. आजी आजोबांना तालावर डोलायला लावले. काहीजण उत्स्फूर्ततेने नाचूसुद्धा लागले. कार्यक्रम संपू नये असं वाटलं तरी वेळमर्यादेनुसार थांबणे भागच होतं. गाण्यावर धरलेल्या ठेक्यामुळे वातावरण एकदम प्रसन्न झाले. सायोनारा या हिंदी गाण्यांने कार्यक्रमाची सांगता झाली.आजी आजोबा अतिशय खूष झाले.अशाप्रकारे आजचा कार्यक्रम संपन्न झाला.

काही क्षणचित्रे.


12 December 2023

'Aji-Ajoba Katta' is regularly organized under the social activities of our organization 'Pramamba' Kala Academy Thane. Kalher village On December 12, 2023, 'Prarambha' Kala Academy Thane was visited by members of our organization, Vaishali Parad and Kishore Parad. Vaishali Parad inaugurated and introduced Dr. Arundhati Bhalerao, Founder and Director of the Institute. At the same time, he also introduced himself and Kishore Parad. The program started with the sweet devotional song 'Keshava Madhava Tishna Naamaat Re Godwa'. He performed many Marathi and Hindi songs, lavani and koli songs brought out the best. The grandparents were made to dance and sway to the rhythm of the melodious song. was enjoying It seemed that the program should not end. The atmosphere on the song was very happy. The program concluded with the Hindi song 'Hasata Hua Nurani Chehra'. Grandparents were very happy. Thus ended today's program.

A few snapshots.

'प्रारंभ ' कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत 'आजी-आजोबा कट्टा 'चे नियमित आयोजन केले जाते. काल्हेर गाव येथे दि. 12 डिसेंबर 2023 रोजी ‘प्रारंभ’ कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सभासद वैशाली पराड आणि किशोर पराड ह्या दोघांनी भेट दिली. वैशाली पराड यांनी प्रारंभ तसेच संस्थेच्या संस्थापिका संचालिका डॉ.अरुंधती भालेराव ह्यांचा परिचय करून दिला. त्याचबरोबर स्वतः चा आणि किशोर पराड ह्यांचाही परिचय करून दिला.’केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा’ ह्या गोड भक्तिगीतेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अनेक मराठी , हिंदी गीते त्यांनी सादर केली, लावणी आणि कोळीगीतांनी तर बहार आणली. आजी- आजोबांना मधुर गाण्याच्या तालावर नाचायला, डोलायला लावले.काहीजण खुर्ची वर बसून उत्स्फूर्तपणे हातवारे करून नाचत होते . आनंद घेत होते. कार्यक्रम संपू नये असं वाटत होतं. गाण्यावर धरलेला ठेक्यामुळे वातावरण एकदम प्रसन्न झाले. ‘ हसता हुआ नुरानी चेहरा’ या हिंदी गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. आजी आजोबा अतिशय खूष झाले. अशाप्रकारे आजचा कार्यक्रम संपन्न झाला.

काही क्षणचित्रे.


19 December 2023

'Aji-Ajoba Katta' is regularly organized under the social activities of our organization 'Pramambha' Kala Academy Thane. Kalher village dt. On 19th December 2023, 'Prarambha' Kala Academy Thane was visited by Kalpana Bagdekar and Pradeep Bagdekar, members of our organization. Kalpana Bagdekar started and introduced Dr. Arundhati Bhalerao, founder and director of the institute. He also introduced himself and Pradeep Bagdekar. The program started as a verse of the mind. He performed many devotional songs as well as Hindi songs. Various humorous anecdotes made the audience laugh. Lavani as well as Koli songs created a sensation. These songs made the grandparents dance and sway to the rhythm of the songs. Pradeep Bagdekar brought out the song 'Hi Chal Turuturu' by playing the mouth organ. Some were sitting on chairs and dancing spontaneously. was enjoying It seemed that the program should not end. The whole atmosphere became musical and cheerful. Everyone started dancing enthusiastically with the songs sung to Haldi in Lagna. All the grandparents were very happy. Thus ended today's program.

A few snapshots.

'प्रारंभ ' कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत 'आजी-आजोबा कट्टा 'चे नियमित आयोजन केले जाते. काल्हेर गाव येथे दि. 19 डिसेंबर 2023 रोजी ‘प्रारंभ’ कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सभासद कल्पना बागडेकर आणि प्रदीप बागडेकर ह्या दोघांनी भेट दिली. कल्पना बागडेकर ह्यांनी प्रारंभ तसेच संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका डॉ.अरुंधती भालेराव ह्यांचा परिचय करून दिला. त्याचबरोबर स्वतः चा आणि प्रदीप बागडेकर ह्यांचाही परिचय करून दिला. मनाचे श्लोक म्हणून कार्यक्रमाची सुरुवात झाली. अनेक भक्तीगीते तसेच हिंदी गीते त्यांनी सादर केली. विविध विनोदी खुमासदार किश्श्यांनी प्रेक्षकांना हसवले. लावणी तसेच कोळीगीतांनी धमाल उडवून दिली. ह्या गीतांनी आजी- आजोबांना गाण्यांच्या तालावर नाचायला, डोलायला लावले. प्रदीप बागडेकर ह्यांनी ‘ही चाल तुरुतुरु’ ह्या गाण्यावर माऊथ ऑर्गन वाजवून बहार आणली. काहीजण खुर्ची वर बसून उत्स्फूर्तपणे हातवारे करून नाचत होते . आनंद घेत होते. कार्यक्रम संपू नये असं वाटत होतं. संपूर्ण वातावरण संगीतमय आणि प्रसन्न झाले. लग्नामधील हळदीला गायल्या जाणाऱ्या गाण्यांनी सर्वजण उत्साहाने नाचू लागले. सर्व आजी आजोबा अतिशय खूष झाले. अशाप्रकारे आजचा कार्यक्रम संपन्न झाला.

काही क्षणचित्रे.


26 December 2023

'Aji-Ajoba Katta' is regularly organized under the social activities of our organization 'Pramamba' Kala Academy Thane. Kalher village dt. On December 26 2023, 'Prarambha' Kala Academy Thane was visited by Tripti Sardesai and Chandrasekhar Thakur, members of our organization. Today on the occasion of Dutt Jayanti, Trupti Sardesai Haya started the program with the song "I saw Dutt in my dream". She performed many Hindi as well as Marathi songs. Also Chandrasekhar Thakur Haya entertained the audience by telling some stories along with the song. For a bit of fun, Tripti Tai Haya hummed some songs. The songs made the grandpa dance. Some people were dancing on the chair Musically and happily, all the grandparents were very happy.


A few snapshots.

'प्रारंभ ' कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत 'आजी-आजोबा कट्टा 'चे नियमित आयोजन केले जाते. काल्हेर गाव येथे दि. 26 डिसेंबर 2023 रोजी ‘प्रारंभ’ कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सभासद तृप्ती सरदेसाई आणि चंद्रशेखर ठाकूर ह्या दोघांनी भेट दिली. आज दत्तजयंतीच्या निमित्ताने तृप्ती सरदेसाई हयांनी “ स्वप्नात मला दत्त दिसले" हया गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. अनेक हिंदी तसेच मराठी गाणी त्यांनी सादर केली. तसेच चंद्रशेखर ठाकूर हयांनी गाण्या बरोबरच काही गोष्टी सांगून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. थोडी गंमत म्हणून तृप्ती ताई हयांनी काही गाणी गुणगुणून आजी आजोबांना ओळखायला लावली. कोळीगीतांनी तर धमाल उडवून दिली. ह्या गीतांनी आजी- आजोबांना गाण्यांच्या तालावर नाचायला, डोलायला लावले. संपूर्ण कार्यक्रम बहारदार झाला. काहीजण खुर्ची वर बसून उत्स्फूर्तपणे हातवारे करून नाचत होते . आनंद घेत होते. कार्यक्रम संपू नये असं वाटत होतं. संपूर्ण वातावरण संगीतमय आणि प्रसन्न झाले. सर्व आजी आजोबा अतिशय खूष झाले. अशाप्रकारे आजचा कार्यक्रम संपन्न झाला.

काही क्षणचित्रे.


2 Jan 2024

'Aji-Ajoba Katta' is regularly organized under the social activities of our organization 'Pramambha' Kala Academy Thane. Kalher village On January 02, 2024, Chhaya Koinde, a member of our organization, 'Pramambha' Kala Academy Thane, visited. He introduced Dr. Arundhati Bhalerao, the founder and director of the institute. At the same time, he introduced himself. Chhaya Tai started the program with Ganpati Aarti as 'Sukhkarta Dukhaharta'. Also, a folk song with childhood memories i.e. 'Bai Suya Ghe Ga Dabhan Ghe' was presented in a very beautiful manner. He performed many Hindi, Marathi songs, lavani, koli songs. He entertained the audience by telling some stories along with the song. The songs of flying moves made the grandparents dance and sway. These songs brought out. It seemed that the program should not end. The whole atmosphere became musical and cheerful. Everyone started dancing enthusiastically. All the grandparents were very happy. Thus the program concluded with a song from Sairat.

A few snapshots.

'प्रारंभ ' कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत 'आजी-आजोबा कट्टा 'चे नियमित आयोजन केले जाते. काल्हेर गाव येथे दि. 02 जानेवारी 2024 रोजी ‘प्रारंभ’ कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सभासद छाया कोयंडे ह्यांनी भेट दिली. 'प्रारंभ ' तसेच संस्थेच्या संस्थापिका संचालिका डॉ.अरुंधती भालेराव ह्यांचा परिचय त्यांनी करून दिला. त्याचबरोबर स्वतः चा ही परिचय करून दिला. छाया ताईंनी ' सुखकर्ता दुःखहर्ता' हया गणपती आरतीने कार्यक्रमाला सुरुवात केली . तसेच बालपणीच्या आठवणी असलेले एक लोकगीत म्हणजे 'बाई सुया घे गं दाभण घे' हे लोकगीत अतिशय सुंदर पध्दतीने सादर केले. अनेक हिंदी, मराठी गाणी, लावणी , कोळीगीते त्यांनी सादर केली. गाण्याबरोबरच काही गोष्टी सांगून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. उडत्या चालीच्या गाण्यांनी आजी- आजोबांना नाचायला, डोलायला लावले. ह्या गीतांनी बहार आणली. कार्यक्रम संपू नये असं वाटत होतं. संपूर्ण वातावरण संगीतमय आणि प्रसन्न झाले. सर्वजण उत्साहाने नाचू लागले. सर्व आजी आजोबा हे अतिशय खूष झाले. अशाप्रकारे सैराट मधील गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.

काही क्षणचित्रे.


January 09, 2024

'Aji-Ajaoba Katta' is regularly organized under the social activities of our organization 'Pramamba' Kala Academy Thane. Kalher village dt. On January 09, 2024, Smita Salgaonkar, Suresh Salgaonkar and Vrishali Sawant, members of our organization, 'Prarambh' Kala Academy Thane visited. He introduced Dr. Arundhati Bhalerao, the founder and director of the institute. At the same time, he introduced himself. The program started with 'Sukhkarta Dukhaharta' aarti of Lord Ganesha. He performed many old and new Marathi as well as Hindi songs, Koli Geeta, Lavani and other types of songs in a beautiful manner. He also sang the songs requested by the audience. Music has the alchemy to remove the dullness of the mind and cheer up the mind. Overwhelmed by the musical atmosphere, the grandparents took their leave, promising to visit again.

A few snapshots.

'प्रारंभ ' कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत 'आजी-आजोबा कट्टा ' चे नियमित आयोजन केले जाते. काल्हेर गाव येथे दि. 09 जानेवारी 2024 रोजी ‘प्रारंभ’ कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सभासद स्मिता साळगावकर, सुरेश साळगावकर आणि वृषाली सावंत ह्यांनी भेट दिली. 'प्रारंभ ' तसेच संस्थेच्या संस्थापिका संचालिका डॉ.अरुंधती भालेराव ह्यांचा परिचय त्यांनी करून दिला. त्याचबरोबर स्वतः चा ही परिचय त्यांनी करून दिला. ‘सुखकर्ता दुःखहर्ता ' ह्या गणपतीच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अनेक जुनी, नवी मराठी तसेच हिंदी गाणी, कोळी गीते , लावणी अशी विविध प्रकारची गाणी त्यांनी सुंदर रीतीने सादर केली. तसेच प्रेक्षकांनी फर्माईश केलेली गीतेसुध्दा गायली. मनाची मरगळ दूर करुन मन प्रफुल्लित करण्याची किमया संगीतामध्ये आहे. संगीतमय वातावरणाने भारावलेल्या आजी-आजोबांना पुन्हा भेटीला येण्याचे आश्वासन देत त्यांची रजा घेतली.

काही क्षणचित्रे.


16 January 2024

'Aji-Ajaoba Katta' is regularly organized under the social activities of our organization 'Pramambha' Kala Academy Thane. Kalher village dt. On January 16, 2024, Manisha Shitoot and Suvarna Maduskar, members of the organization, visited 'Prarambha' Kala Academy Thane on behalf of our organization. He introduced Dr. Arundhati Bhalerao, the founder and director of the institute. At the same time, he introduced himself. The program started with a devotional hymn. Various recreational games were organized for the grandparents. Like making a tower of paper glasses, saying numbers in reverse order, collecting coins in a certain order etc. Such games help to concentrate the mind. Stimulates the brain, helping to further develop our innate skills. And the important thing is that we forget our daily routine for a while and revel in the joy of games. Bringing smiles to the faces of others is our feeling behind all these activities. He performed various songs and bhajans beautifully. The parody songs performed by him are amazing. The grandparents were very happy. So, today's grandparents are colorful with games, songs and parody songs.

A few snapshots.

'प्रारंभ ' कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत 'आजी-आजोबा कट्टा ' चे नियमित आयोजन केले जाते. काल्हेर गाव येथे दि. 16 जानेवारी 2024 रोजी ‘प्रारंभ’ कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने संस्थेच्या सभासद मनिषा शितूत आणि सुवर्णा मादुस्कर ह्यांनी भेट दिली. 'प्रारंभ ' तसेच संस्थेच्या संस्थापिका संचालिका डॉ.अरुंधती भालेराव ह्यांचा परिचय त्यांनी करून दिला. त्याचबरोबर स्वतः चा ही परिचय त्यांनी करून दिला. भक्तीरसपूर्ण अशा भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आजी-आजोबांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन केले होते. जसे की पेपर ग्लासेसचा मनोरा बनवणे, उलट्या क्रमाने अंक म्हणणे, नाणी एका विशिष्ट पध्दतीने गोळा करणे इत्यादी. अशा खेळांमुळे चित्त एकाग्र व्हायला मदत होते. मेंदूला चालना मिळते, आपल्या अंगभूत कौशल्यांचा कस लागून ती अधिक विकसित होण्यास मदत होते. आणि महत्वाचं म्हणजे आपले रोजचे दैनंदिन व्यवहार थोडा वेळ विसरुन खेळांमधून मिळणाऱ्या आनंदात आपण रममाण होतो. समोरच्याच्या चेहर्यावर हसू फुलवणं हीच तर आमची ह्या सर्व उपक्रमामागची भावना आहे. वेगवेगळी गाणी आणि भजने त्यांनी सुंदर रीतीने सादर केली. त्यांनी सादर केलेली विडंबन गीते तर अप्रतिम. आजी-आजोबा खूपच खूष झाले. तर असा खेळ, गाणी आणि विडंबन गीतांनी रंगला आजचा आजी-आजोबा कट्टा.

काही क्षणचित्रे.


23 Jan 2024

Prarambh Kala Academy, Thane

'Aaji Ajoba Katta'

Today, 23rd January 2024, the grandparent's visit to Katta started in a nice devotional atmosphere. As part of a social initiative, every Tuesday in the old age home at Kalher, an attempt is made to give four moments of entertainment to the grandparents in the ashram through the concept of 'Aji-Ajoba Katta'.

In today's meeting Suvarna Maduskar, a member of the organization, sang Ganesha hymn and Manisha Shitut sang Devi hymn. Also, on the occasion of the recently held Ram Mandir Sohola, Ram Geeta was also performed and everyone was in a state of Ram Moya. Some grandparents also enjoyed singing along.

All the grandparents here are very enthusiastic. A simple but physically active game of throwing balls in a bucket was played for them and prizes were awarded to each of the first four winners from the grandparent group. Of course, the rest were also encouraged with incentive prizes.

Keeping in mind the interest of all the grandparents, Koli songs and remix songs were arranged for them, to which everyone agreed and everyone danced to the shame of even the youth, despite being in their seventies.

Overall today's session ended on a happy note with a loving invitation to 'come back next week'.

Some snapshots of the event.

'प्रारंभ ' कला अकॅडमी, ठाणे

'आजी-आजोबा कट्टा '

आज दिनांक 23 जानेवारी 2024 ची आजी-आजोबा कट्टयाच्या भेटीची सुरूवात छान भक्तिमय वातावरणात झाली. सामाजिक उपक्रमाअंतर्गत दर मंगळवारी काल्हेर येथील वृद्धाश्रमात 'आजी-आजोबा कट्टा' ह्या संकल्पनेतून आश्रमातील आजी-आजोबांना चार क्षण विरंगुळयाचे द्यायचा प्रयत्न केला जातो.

आजच्या भेटीत संस्थेच्या सभासद सुवर्णा मादुस्कर ह्यांनी गणेश स्तवन तर मनिषा शितूत ह्यांनी देवी स्तवन गायले. तसेच नुकत्याच पार पडलेल्या राम मंदिर सोहोळ्याच्या निमित्ताने राम गीतेही सादर केली आणि सगळेच जणू राममय झाले. काही आजी-आजोबांनीही गाणी म्हणून आनंद लुटला.

इथले सगळेच आजी-आजोबा खूपच उत्साही आहेत. त्यांच्यासाठी एक साधाच पण शारिरीक हालचालीं मधून थोडा व्यायाम होईल असा बादलीत चेंडू टाकण्याचा खेळ खेळला गेला आणि आजी-आजोबांच्या गटातून प्रत्येकी पहिल्या चार विजेत्यांना बक्षीसंही देण्यात आली. अर्थात, बाकीच्यांनाही उत्तेजनार्थ बक्षिसे देऊन प्रोत्साहन देण्यात आलं.

सगळ्या आजी-आजोबांची आवड लक्षात घेऊन त्यांच्यासाठी कोळीगीतं आणि रीमिक्स गाणी लावण्यात आली ज्यावर सगळ्यांनी ठेका धरला आणि सत्तरीपार असूनही तरुणांनाही लाजवेल असे सगळे नाचले.

एकूणच आजच्या सत्राची सांगता खूप आनंदात झाली ती, 'पुन्हा पुढच्या आठवड्यात नक्की या' अशा प्रेमाच्या आमंत्रणानी.

कार्यक्रमाची काही क्षणचित्रे.


06-02-2024

Prarambha Kala Academy, Thane

"Aaji Ajoba Katta"

06-02-2024

Today, a 'buffet party' monologue was staged at Kahler's inaugural grandparent's home. Our inaugural member, Vaishali Wadekar, gave a very humorous presentation of how a woman from a village in Kolhapur comes to Mumbai with her husband for a wedding buffet party and then gets overwhelmed by the atmosphere and the fun she has and experiences.

Then Snehal Purandare, another member of the beginning, introduced the different types of laughter like smile, spontaneous laughter, sarcastic laughter, childish laughter and ironic laughter and blew the fountain of laughter as if there was a laughter fair.

Granthraj Dnyaneshwari, written by Dnyaneshwar Mauli, is considered sacred in the Varkari sect and in the whole world. A seven-minute clip narrating the brief essence of such Dnyaneshwari was played and everyone left in spiritual bliss.

Later Snehal Purandare noted cardiologist. A touching story of Neetu Mandke's experience was told. He narrated the story of his transformation from an atheist to an atheist after experiencing how the gracious Lord stands for a true devotee in one way or another if he has unshakable faith in his heart.

Later a game of cards was played. All the grandparents happily participated in identifying proverbs, movies, songs, festivals, names of Gods, names of TV serials by acting as written in the notes. The winners were felicitated with crowns and congratulatory ribbons around their necks. All the grandparents immediately danced to their favorite songs and celebrated.

Finally today's session concluded with the importance of saying Gayatri Mantra as a prayer and salutation to the sun every morning, how to get positive energy for the day.

A few snapshots of today's program.

प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे

"आजी-आजोबा कट्टा"

०६-०२-२०२४


आज, काल्हेरच्या वृद्धाश्रमातील प्रारंभच्या आजी-आजोबा कट्ट्यावर चक्क 'बुफे पार्टी' हा एकपात्री प्रयोग रंगला. कोल्हापूरच्या गावातली एक बाई, आपल्या नवऱ्याबरोबर मुंबईत एका लग्नाच्या बुफे पार्टीला येते आणि मग तिथलं वातावरण बघून ती कशी भांबावून जाते आणि काय काय गमती जमती करते आणि अनुभवते, याचं छान विनोदी सादरीकरण आमच्या प्रारंभच्या सभासद, वैशाली वाडेकर यांनी केलं.

त्यानंतर प्रारंभच्या अजून एक सभासद स्नेहल पुरंदरे यांनी स्मितहास्य, सहजहास्य, खळाळणारं हास्य, बालक हास्य आणि विडंबन हास्य अशा, वेगवेगळ्या हास्य प्रकारांची ओळख करून देत आणि हास्याची कारंजी उडवत काही वेळापूरती जणू काही तिथे हास्य जत्राच भरवली.

वारकरी संप्रदायात आणि समस्त विश्वात पवित्र मानला जाणारा ग्रंथ म्हणजेच, ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेली ग्रंथराज ज्ञानेश्वरी. अशा या ज्ञानेश्वरीचं संक्षिप्त सार सांगणारी एक सात मिनिटांची क्लिप ऐकवली गेली आणि सगळेच आध्यात्मिक आनंदात नाहून निघाले.

नंतर स्नेहल पुरंदरे यांनी प्रख्यात हृदयरोग तज्ञ कै. नीतू मांडके यांची एक हृदयस्पर्शी अनुभव कथा सांगितली. मनात अढळ श्रद्धा असेल, तर कोणत्या ना कोणत्या रूपात तो कृपाळू परमेश्वर खऱ्या भक्तासाठी कसा उभा राहतो हे अनुभवल्यानंतर, त्यांचं नास्तिकातून अस्तिकात कसं परिवर्तन झालं त्याची गोष्ट सांगितली.

नंतर चिठ्ठ्यांचा खेळ खेळण्यात आला. चिठ्ठ्यांमध्ये लिहिल्याप्रमाणे अभिनय करून म्हण, सिनेमा, गाणं, सण, देवांची नावे, टीव्ही सिरीयलची नावे ओळखण्यात सगळे आजी-आजोबा आनंदाने सहभागी झाले. विजेत्यांना मुकुट आणि अभिनंदनाची पट्टी गळ्यात घालून गौरवण्यात आले. सगळ्या आजी-आजोबांनी लगेच त्यांच्या आवडत्या गाण्यांवर नाचून, त्यांचा आनंद साजरा केला.

शेवटी प्रार्थना म्हणून आणि रोज सकाळी सूर्याला नमस्कार करून गायत्री मंत्र म्हटल्याने, दिवसभरासाठी कशी सकारात्मक ऊर्जा मिळते त्याचं महत्त्व सांगून आजच्या स‌‌त्राचा समारोप झाला.


आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं.


13-02-2024

Prarambha Kala Academy, Thane


Aaji Ajoba Katta


13-02-2024


Pradham Kala Academy conducts Grandparents Katta every Tuesday at the old age home in Kalher. Today our organization member Manisha Shitut, her grand daughter Tanvi Shitut and Sulakshmi Baalgi presented a very nice entertaining program.

in the beginning, Madmani gave praise to Ganpati and Sulakshmi Baagi gave praise to Goddess.

Sulakshmi Baalgi presented a witty poem on tea titled 'Chaha Ek Varadaan'. Shitut madam presented two different styled poems, one about the expectations of women from their husbands in their daily lives and funny stories between husband and wife, one 'Request to Raghunathapa' and one about old people.

Urmila, wife of Lakshmana, is one of the few female characters in the Puranas who are unremarkable but about whom we are curious. Sulakshmi Baalgi presented the character of Urmila, her secret and pain through her monologue 'Me Urmila'.

Tanvi Shitut sang some songs. By doing some physical movements while sitting in a chair to the tune of these songs, I learned sitting exercises unconsciously from my grandparents.

As always, as per the demand of the grandparents, some of their favorite songs were played, to which they released their energy by dancing. Later, on the demand of the grandparents, their favorite game of musical chair was taken and the winner was felicitated with a bouquet.

Finally, today's program concluded with the beat of the Koli song 'Ekvira Ai Tu Dongaravari'.

A few snapshots of today's program.

प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे

आजी आजोबा कट्टा

१३-०२-२०२४

प्रारंभ कला अकॅडमी तर्फे दर मंगळवारी काल्हेर येथील वृद्धाश्रमात आजी-आजोबा कट्टा भरतो. आज आमच्या संस्थेच्या सभासद मनीषा शितूत, त्यांची नात तन्वी शितूत आणि सुलक्ष्मी बाळगी ह्यांनी खूप छान मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले.

सुरुवातीला आमच्या शितूत मॅडमनी गणपती स्तवन, तर सुलक्ष्मी बाळगी ह्यांनी देवी स्तवन म्हटले.

सुलक्ष्मी बाळगी ह्यांनी 'चहा एक वरदान' नावाची चहा वरची एक खुमासदार कविता सादर केली. आपल्या दैनंदिन जीवनात स्त्रियांच्या नवऱ्याकडून अपेक्षा आणि नवरा-बायकोतील गमतीशीर किस्से सांगणारी, 'रघुनाथापाशी मागणे' ही एक, तसंच वृद्धांचे मनोगत सांगणारी एक, अशा दोन वेगळ्या धाटणीच्या कविता शितूत मॅडमनी सादर केल्या.

पुराणातल्या काही अनुल्लेखनीय पण ज्यांच्याबद्दल आपल्याला कुतूहल असतं अशा काही स्त्री व्यक्तिरेखांपैकी एक म्हणजे लक्ष्मणाची पत्नी उर्मिला. सुलक्ष्मी बाळगी ह्यांनी 'मी उर्मिला' ह्या एकपात्री प्रयोगातून उर्मिलेची व्यक्तिरेखा, तिचं मनोगत आणि व्यथा मांडली.

तन्वी शितूत हिने काही गाणी लावली. ह्या गाण्यांच्या ठेक्यावर खुर्चीत बसल्या बसल्या काही शारीरिक हालचाली करून घेत, आजी-आजोबांकडून नकळतपणे बैठे व्यायाम करून घेतले.

नेहमीप्रमाणेच आजी-आजोबांच्या मागणीनुसार त्यांच्या आवडीची काही गाणी लावली, ज्याच्यावर नाचून त्यांनी त्यांच्यातल्या ऊर्जेला वाट मोकळी करून दिली. नंतर आजी आजोबांच्याच मागणीवरून त्यांच्या आवडीचा संगीत खुर्ची हा खेळ घेतला गेला आणि विजेत्याला पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं.

शेवटी, 'एकविरा आई तू डोंगरावरी' ह्या कोळीगीताच्या ठेक्यावर ताल धरत आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली.


आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं.


20-02-2024

Prarambha Kala Academy, Thane


"Aaji Ajoba Katta"

20-02-2024

Mr. Subodh Chitale, the member of the initiative, in the program "Aji-Ajoba Katta" organized by the initiative every Tuesday at the old age home in Kalher. Presented a humorous monologue based on 'Asa Me Asami' written by Deshpande.

The writing of bridges helps us to forget our sorrows and worries for a moment. Today the grandparents in the old age home also got a feast of Pul's comedy. The fictional picture of a middle-class clerk in Konkan, created through Pul's special style of language and powerful penmanship, was beautifully portrayed by Mr. Subodh Chitale, through the personality of Dhondu Bhikaji Joshi. While performing this, his attire like dhotar, sadra, hat and his vocal skills were commendable. He also presented the humor of wedding feasts in Konkan. All in all excellent acting and easy, effortless vocal skills made this monologue beautifully realized and entertained grandparents in a different way.

After that Mr. Abhay Kulkarni performed some Marathi and Hindi songs on Karawake. Grandparents also appreciated him wholeheartedly. Later, as per the demand of the grandparents, their favorite Koli songs were also played, to which the grandparents danced spontaneously as usual.

Thus the program concluded in a very enthusiastic atmosphere.

A few snapshots of today's program

प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे

"आजी आजोबा कट्टा"

२०-०२-२०२४

काल्हेर येथील वृद्धाश्रमात दर मंगळवारी प्रारंभ तर्फे होणाऱ्या "आजी-आजोबा कट्टा" ह्या कार्यक्रमात प्रारंभचे सभासद श्रीयुत सुबोध चितळे ह्यांनी पु़. ल. देशपांडे लिखित 'असा मी असामी' ह्या लेखनाधारे, विनोदी एकपात्री प्रयोग सादर केला.

पुलंचं लिखाण आपल्याला क्षणभर आपली दुःख, काळज्या ह्यांचा विसर पडायला मदत करतं. आज वृद्धाश्रमातल्या आजी-आजोबांना देखील पुलंच्या विनोदी साहित्याची जणू मेजवानीच मिळाली. पुलंच्या खास भाषाशैलीतून आणि दमदार लेखणीतून साकारलेले कोकणातील एका मध्यमवर्गीय कारकूनाचे काल्पनिक चित्र श्री सुबोध चितळे ह्यांनी, धोंडू भिकाजी जोशी ह्या व्यक्तिमत्त्वातून अतिशय खुमासदार पद्धतीने, सुंदररित्या साकारले. हे सादर करताना त्यांचा ह्या व्यक्तिमत्वाला साजेसा धोतर, सदरा, टोपी असा पेहराव आणि त्यांचे वाणीकौशल्य दाद देण्यायोग्य होते. कोकणातील लग्नप्रसंगी घेण्यात येणाऱ्या उखाण्यांची गंमतही त्यांनी सादर केली. एकूणच उत्कृष्ट अभिनय आणि सहज, सोपे वाणीकौशल्य ह्यामुळे हा एकपात्री प्रयोग सुंदर साकार झाला आणि आजी-आजोबांची एक वेगळ्या प्रकारे करमणूक झाली.

त्यानंतर श्रीयुत अभय कुलकर्णी यांनी करावकेवर काही मराठी आणि हिंदी गाणी सादर केली. त्यालाही आजी-आजोबांनी मनापासून दाद दिली. नंतर आजी आजोबांच्या मागणीनुसार त्यांच्या आवडीची कोळीगीतेही लावण्यात आली ज्यावर नेहमीप्रमाणेच आजी आजोबांनी उत्स्फूर्तपणे नाच केला.

अशाप्रकारे खूप उत्साही वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं


27-02-2024

Prarambha Kala Academy, Thane


"Aaji Ajoba Katta"

27-02-2024

Mr. Nandan Bhalwankar, the inaugural member of the program "Aji-Ajoba Katta" held every Tuesday at the old age home in Kalher, took over the initiative today.

Mr. Nandan Bhalwankar is a good singer and he entertained the grandparents today by singing different songs.

The program started with the devotional song 'Mandirat Antarat Toch Nandtahe'. Later, some upbeat Hindi songs were sung and the grandparents were in a great mood. Grandparents ordered Koli songs and after a while Koli songs were also performed. As always, everyone was shocked. They held each other and danced with firecrackers.

After that Shriyut Bhalwankar sang the Krishna Geet of Udtya Chali. Also sang Garba songs and Garba songs.

At the end, everyone danced to the song Zingat and the program ended with an urgent invitation to 'come back'.

Happiness is nothing else but the joy overflowing from the faces of all the grandparents and dancing unconsciously to the beat of the song, even for a moment forgetting their sorrows, everyone felt that this is happiness.

A few snapshots of today's program

प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे

"आजी-आजोबा कट्टा"

२७-०२-२०२४

काल्हेर येथील वृद्धाश्रमात दर मंगळवारी होणाऱ्या "आजी-आजोबा कट्टा" ह्या कार्यक्रमाची धुरा आज प्रारंभचे सभासद श्रीयुत नंदन भालवणकर यांनी स्वीकारली.

श्रीयुत नंदन भालवणकर हे चांगले गायक आहेत व त्यांनी आज वेगवेगळ्या धाटणीची गाणी म्हणून आजी-आजोबांचं मनोरंजन केलं.

'मंदिरात अंतरात तोच नांदताहे' ह्या भक्ती गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर काही उडत्या चालीची हिंदी गाणी गायली गेली आणि आजी आजोबांचा मूड एकदम छान झाला. आजी-आजोबांनी कोळीगीतांची फर्माईश केली आणि थोड्या वेळ कोळी गीतेही लावली गेली. त्यावर नेहमीप्रमाणेच सगळेच थिरकले. एकमेकांना धरून आगगाडीचे डबे करून नाच केला.

त्यानंतर श्रीयुत भालवणकरांनी उडत्या चालीचं कृष्ण गीत गायलं. तसंच गरबा गीते आणि गरब्याच्या ठेक्यावरची गाणीही गायली.

शेवटी झिंगाट ह्या गाण्यावर सगळेच बेभान होऊन नाचले आणि 'परत या' असं आग्रहाचे निमंत्रण करत कार्यक्रम संपला.

सुख म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सगळ्या आजी-आजोबांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद आणि गाण्याच्या तालावर बेभान होऊन नाचताना, क्षणभर का होईना त्यांना पडलेला दुःखाचा विसर, हेच सुख आहे याची अनुभूती सगळ्यांनाच आली.

आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं


05-03-2024

Prarambha Kala Academy, Thane

"Aaji Ajoba Katta"

05-03-2024

A program called "Aji-Ajoba Katta" by Prarambha is organized every Tuesday at the old age home in Kalher. Today, one of the initial members, Mr. Praful Sane visited the old age home.

Mr. Praful Sane is a good singer himself. He entertained the grandparents very well today by singing different kinds of songs on Karaoke. It started with the song of Lord Ganesha. Then there was a melodious concert of Marathi hymns and old Hindi songs. He also recited some Koli songs that our grandparents used to relish and enjoy. After that Gavalan sang.

Grandparents responded enthusiastically to all his songs and enjoyed dancing to the songs. The enthusiasm of the grandparents and the happiness on their faces satisfied everyone and it was like a wave of happiness.

Finally, the program ended with a Koli song.

A few snapshots of today's program.

प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे

"आजी-आजोबा कट्टा"

०५-०३-२०२४


प्रारंभ तर्फे "आजी-आजोबा कट्टा" हा कार्यक्रम काल्हेर येथील वृद्धाश्रमात दर मंगळवारी आयोजित केला जातो. आज प्रारंभचे एक सभासद, श्री. प्रफुल साने ह्यांनी वृद्धाश्रमाला भेट दिली.

श्री. प्रफुल साने हे स्वतः एक चांगले गायक आहेत. विविध प्रकारची गाणी कॅरावके वर म्हणून त्यांनी आज आजी-आजोबांचं खूप छान मनोरंजन केलं. गणपतीच्या गाण्याने सुरुवात केली. त्यानंतर मराठी भावगीते आणि जुनी हिंदी गाणी यांची सुरेल मैफल रंगली. आमचे आजी-आजोबा मनापासून ज्यात रमतात आणि आनंद लुटतात अशी काही कोळी गीतंही त्यांनी म्हटली. त्यानंतर गवळण गायली.

आजी-आजोबांनी त्यांच्या सर्वच गाण्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि गाण्यांवर नाचून मनमुराद आनंद लुटला. आजी आजोबांचा उत्साह आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्वांनाच समाधान देऊन गेला आणि जणू काही आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अवस्था झाली.

शेवटी एका कोळी गीतानेच कार्यक्रमाची सांगता झाली.


आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं.


12-03-2024

Prarambha Kala Academy, Thane


Aaji Ajoba Katta


12-03-2024

A program called "Aji-Ajoba Katta" is organized by Prarambha every Tuesday at the old age home in Kalher.

Today, the initial four members namely Vidyadhar Apashankar, Anant Mule, Anjali Sant and Manali Chewle visited this Kattaya.

Anjali Sant and Anant Mule started the program as Ganesh Vandana. Later, the four of them entertained the grandparents a lot by singing various Hindi and Marathi songs on the karaoke track. Koli songs are the most favorite of grandparents. He also sang some Koli songs, on which the grandparents, as always, agreed.

No one knew how an hour passed while dancing happily to different songs.

Finally, the program concluded with the Zingat song.

A few snapshots of today's program.

प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे

आजी-आजोबा कट्टा

१२-०३-२०२४

प्रारंभ तर्फे "आजी-आजोबा कट्टा" हा कार्यक्रम काल्हेर येथील वृद्धाश्रमात दर मंगळवारी आयोजित करण्यात येतो.

आज ह्या कट्टयाला विद्याधर अपशंकर, अनंत मुळे, अंजली संत व मनाली चेवले ह्या प्रारंभच्या चार सभासदांनी भेट दिली.

अंजली संत आणि अनंत मुळे ह्यांनी गणेशवंदना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली. नंतर कॅराओके ट्रॅकवर विविध प्रकारची हिंदी आणि मराठी गाणी गाऊन चौघांनीही आजी-आजोबांचं भरपूर मनोरंजन केलं. आजी आजोबांच्या सगळ्यात आवडीची म्हणजे कोळीगीतं. अशी काही कोळीगीतंही त्यांनी गायली, ज्यावर नेहमीप्रमाणेच आजी-आजोबांनी ठेका धरला.

वेगवेगळ्या गाण्यांमध्ये रममाण होत नाच करताना एक तास कसा निघून गेला कोणालाच कळलं नाही.

शेवटी झिंगाट गाण्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.


आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं.


19-03-2024

Prarambha Kala Academy, Thane

"Grandma and Grandpa Katta"

19-03-2024

The program "Aji-Ajoba Katta" is organized every Tuesday by Prarambha at the old age home in Kalher. Today's program was chaired by the inaugural member Neha Bagve.

Neha Bagwe entertained the grandparents by singing Marathi and Hindi songs on karaoke. Different types of songs like flying spider songs, lavani were sung. He tried to take the grandparents back in time by singing some popular songs from the olden days and interacting with them. Grandparents reveled in the memories of the nut-nuts of that time. Grandparents were reminisced while listening to the songs they had heard in their youth.

Grandparents also appreciated the songs wholeheartedly.

Thus, the program ended with the favorite songs of grandparents.

A few snapshots of today's program.

प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे

"आजी आजोबा कट्टा"

१९-०३-२०२४

प्रारंभ तर्फे दर मंगळवारी काल्हेर येथील वृद्धाश्रमात "आजी-आजोबा कट्टा" ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. आजच्या कार्यक्रमाची धूरा प्रारंभच्या सभासद नेहा बागवे ह्यांनी सांभाळली.

नेहा बागवे ह्यांनी कॅराओके वर मराठी आणि हिंदी गाणी म्हणून आजी आजोबांचं छान मनोरंजन केलं. उडत्या चालीची कोळी गीतं, लावणी अशी वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हटली. जुन्या काळातील काही लोकप्रिय गाणी गाऊन आणि आजी-आजोबांशी संवाद साधत त्यांनी आजी-आजोबांना जुन्या काळात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्या काळातील नट-नट्यांच्या आठवणीत आजी-आजोबा रमले. त्यांच्या तरुणपणी त्यांनी ऐकलेली गाणी ऐकताना आजी-आजोबा जुन्या आठवणीत गढून गेले.

आजी-आजोबांनीही गाण्यांना मनापासून दाद दिली.

अशाप्रकारे आजी-आजोबांच्याच आवडीच्या गाण्यांनी कार्यक्रमाची सांगता झाली.


आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं.


26-03-2024

Prarambha Kala Academy, Thane

"Aaji Ajoba Katta"

26-03-2024

Aji-Ajaba Katta is organized by Prarambha every Tuesday at the old age home in Kalher. Today, Vaishali Parad, the first member, visited this ashram.

Our grandparents here are very fond of songs. They love to listen to songs. So Vaishali Parad entertained the grandparents by singing Marathi and Hindi songs.

The program started with the devotional song 'My Bhavani Tujhe Lekeru'. Later he sang some Marathi and Hindi songs. As always, the grandparents enjoyed the event. He also danced spontaneously on several songs.

Finally, the program concluded by dancing to a Koli song called Hamkhas, which is a must in wedding ceremonies.

A few snapshots of today's program

प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे

"आजी आजोबा कट्टा"

२६-०३-२०२४

प्रारंभ तर्फे दर मंगळवारी काल्हेर येथील वृद्धाश्रमात आजी-आजोबा कट्ट्याचे आयोजन केले जाते. आज प्रारंभच्या सदस्या वैशाली पराड ह्यांनी या आश्रमाला भेट दिली.

आमचे येथील आजी आजोबा गाण्यांमध्ये खूप रमतात. त्यांना गाणी ऐकायला अतिशय आवडतात. त्यामुळे वैशाली पराड यांनी मराठी आणि हिंदी गाणी गाऊन आजी-आजोबांचं मनोरंजन केलं.

'माय भवानी तुझे लेकरू' या भक्तीगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर काही मराठी व हिंदी गाणी त्यांनी गायली. नेहमीप्रमाणेच आजी-आजोबांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. कित्येक गाण्यांवर त्यांनी उत्स्फूर्तपणे नाचही केला.

शेवटी लग्न समारंभात हमखास म्हटल्या जाणाऱ्या एका कोळी गीतावर नाच करत कार्यक्रमाची सांगता झाली.


आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं


02-04-2024

Prarambha Kala Academy, Thane

"Aaji Ajoba Katta"

02-04-2024

Aji-Ajaba Katta is organized by Pradham every Tuesday at the old age home in Kalher. Today the initial members Sunita Chavan and Sneha Ravande visited this ashram.

The program started with Ganpati's song 'Tu Sukhkarta Tu Dukhharta'. After that, old Hindi and Marathi songs, Koligeet, Lavani, etc. were sung to him.

As always, the grandparents enjoyed the songs to their heart's content and even danced to the songs with enthusiasm. Our members also supported the grandparents on some Koli songs.

This is how the lyrical evening at Aji-Ajoba Katta came to an end today.

A few snapshots of today's program.

प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे

"आजी आजोबा कट्टा"

०२-०४-२०२४


प्रारंभ तर्फे दर मंगळवारी काल्हेर येथील वृद्धाश्रमात आजी-आजोबा कट्ट्याचे आयोजन केले जाते. आज प्रारंभच्या सदस्या सुनिता चव्हाण आणि स्नेहा रवंदे ह्यांनी या आश्रमाला भेट दिली.

'तू सुखकर्ता तू दुःखहर्ता' या गणपतीच्या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर आजी-आजोबांच्या आवडीची जुनी हिंदी आणि मराठी गाणी, कोळीगीतं, लावणी अशा वेगवेगळ्या प्रकारची गाणी त्यांना ऐकवली.

नेहमीप्रमाणेच आजी-आजोबांनी गाण्यांचा मनमुराद आनंद लुटला आणि उत्साहाने गाण्यांवर नाच देखील केला. काही कोळी गीतांवर आजी-आजोबांना आमच्या सदस्यांनीही साथ दिली.

अशाप्रकारे आज आजी-आजोबा कट्ट्यावरच्या गीतमय संध्याकाळीची सांगता झाली.


आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं.


16-04-2024

Aaji Ajoba Katta

16-04-2024

Prarambha organizes aaji ajoba Katta every Tuesday at Kalher old age home. Today the inaugural members Rupeshree Patil and Yogesh Kelkar entertained the grandparents with a program of songs and poems.

Rupeshree Patil started with the song Achyutam Kesavam Ramnarayanam. He then performed some songs. Then the grandparents' favorite Koli songs were played on the karaoke, to which the grandparents danced their hearts out as usual. Every Tuesday, grandparents release their energy by dancing to their favorite songs. Their enthusiasm is admirable.

Yogesh Kelkar presented poems on old age and mind. Age-related physical problems were presented with a smile. All the grandparents also applauded him from their own experience. He tried to tell in an entertaining way that physical problems will come with age, but if we change our attitude towards them, those problems will become lighter. Finally, the program ended with the song Zingat.

A few snapshots of today's program.

प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे

आजी आजोबा कट्टा

१६-०४-२०२४

प्रारंभ तर्फे दर मंगळवारी काल्हेर येथील वृद्धाश्रमात आजी-आजोबा कट्ट्याचं आयोजन केलं जातं. आज प्रारंभचे सदस्य रुपेश्री पाटील आणि योगेश केळकर ह्यांनी गाण्यांच्या आणि कवितांच्या कार्यक्रमातून आजी आजोबांचं मनोरंजन केलं.

रुपेश्री पाटील ह्यांनी अच्युतम केशवम रामनारायणम या गाण्यानी सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी काही गाणी सादर केली. मग कॅराओके वर आजी आजोबांच्या आवडीची कोळीगीतं लावण्यात आली, ज्यावर आजी-आजोबांनी नेहमीप्रमाणेच मनसोक्त नाच केला. दर मंगळवारी आपल्या आवडीच्या गाण्यांवर नाचून येथील आजी आजोबा त्यांच्या ऊर्जेला वाट करून देतात. त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो.

योगेश केळकर ह्यांनी म्हातारपण आणि मन ह्यावरील कविता सादर केल्या. वयानुरूप येणाऱ्या शारीरिक समस्या हसत खेळत मांडल्या. सगळ्या आजी-आजोबांनी स्वानुभवातून त्याला हसत खेळत दादही दिली. वयाप्रमाणे शारीरिक समस्या येणारच पण त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला तर त्या समस्याही हलक्या फुलक्या होऊन जातात हे मनोरंजनात्मक पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. शेवटी झिंगाट या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.

आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं.


22-04-2024

Prarambha Kala Academy, Thane


"Aaji Ajoba Katta"

22-04-2024

Prarambha organizes Aaji Ajoba Katta every Tuesday at Kalher old age home. Today the initial members Sunita Chavan and Sneha Ravande visited the old age home.

As today is Hanuman's birthday, it started of course with Hanuman's prayer. After that, Sunita Chavan entertained the grandparents by singing some Hindi and Marathi songs. He also sang Koli song, which was the favorite of his grandparents. Sneha Ravande also danced to songs with her grandparents. After relishing the songs, the grandparents recited 'Om Namah Shivaay' five times to calm the mind a bit. And for five minutes everyone sat meditating.

Finally, the program concluded with the Hindi song 'Kabhi Alvida Na Kehna'.

A few snapshots of today's program

प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे

"आजी आजोबा कट्टा"

२२-०४-२०२४

प्रारंभ तर्फे दर मंगळवारी काल्हेर येथील वृद्धाश्रमात आजी-आजोबा कट्ट्याचं आयोजन केलं जातं. आज प्रारंभच्या सदस्या सुनिता चव्हाण आणि स्नेहा रवंदे ह्यांनी वृद्धाश्रमाला भेट दिली.

आज हनुमान जन्मोत्सव असल्याकारणाने सुरुवात अर्थातच हनुमानाच्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर काही हिंदी आणि मराठी गाणी म्हणून सुनिता चव्हाण ह्यांनी आजी-आजोबांचं मनोरंजन केलं. आजी आजोबांच्या आवडीचं कोळीगीतही गायलं. स्नेहा रवंदे यांनी आजी-आजोबांबरोबर गाण्यांवर नाचही केला. गाण्यांचा मनमुराद आस्वाद घेतल्यानंतर थोडं मन शांत करण्यासाठी आजी-आजोबांकडून पाच वेळा 'ओम नमः शिवाय' म्हणून घेतलं गेलं. आणि पाच मिनिटं सगळे ध्यान लावून बसले.

शेवटी 'कभी अलविदा ना कहना' ह्या हिंदी गाण्यानी कार्यक्रमाची सांगता झाली.


आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं


7 May 2024

" Aaji Ajoba Katta "

7-5-2024

Prarambha organizes Aaji Ajoba Katta every Tuesday at Kalher old age home. Today Vaishali Parad, a member of the foundation, visited the old age home and entertained the grandparents with melodious songs.


"What is impossible to avoid, give power to help


Determine what is possible


What is possible, what is impossible


May I be enlightened, give me wisdom, God.


The program started with this beautiful opening prayer.


After that, Vaishali Parad sang two or three koligitas of her grandparents. Koligee is very much loved by the grandparents, so as always, the grandparents gave him a spontaneous ovation.


Later they also sang seven-eight Hindi songs one after the other, which the grandparents enjoyed a lot. Finally, the program concluded with the song 'Aadha Hai Chandama Raat Adi...'. In this way, a nice concert of songs took place in the old age home today.


A few snapshots of today's program

"आजी-आजोबा कट्टा"

०७-०५-२०२४

प्रारंभ तर्फे दर मंगळवारी काल्हेर येथील वृद्धाश्रमात आजी-आजोबा कट्ट्याचं आयोजन केलं जातं. आज प्रारंभच्या सदस्या वैशाली पराड यांनी वृद्धाश्रमाला भेट दिली आणि सुरेल गाणी म्हणून आजी आजोबांचं मनोरंजन केलं.

"जे टाळणे अशक्य, ते शक्ति दे सहाया

जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया

मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय

माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया"

ह्या प्रारंभच्या सुंदर प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

त्यानंतर वैशाली पराड ह्यांनी आजी आजोबांच्या आवडीची दोन-तीन कोळीगीते गायली. कोळीगीतं आजी आजोबांना खूप आवडतात, त्यामुळे नेहमीप्रमाणेच आजी आजोबांनी त्याला उत्स्फूर्त दाद दिली.

नंतर एका मागून एक सात-आठ हिंदी गाणीही गायली, ज्याचा आजी आजोबांनी खूप आनंद लुटला. शेवटी 'आधा है चंद्रमा रात आधी...' या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. अशाप्रकारे आज वृद्धाश्रमात गाण्यांची छान मैफल रंगली.

आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं


14 May 2024

Regular 'Aji-Ajoba Katta' is organized by our organization 'Prarambha' Kala Academy, Thane. Today On 14 May 2024, the initial member Shri. Suresh Salgaonkar, Mrs. Smita Salgaonkar and Mrs. Vrishali Sawant met the grandparents of Vrudhashram. Vrushali Sawant started the program with Ganesha praise. On the occasion of the recently held Mother's Day, songs expressing respect and love towards mother were presented. Many old and new Hindi and Marathi songs were released. As always, grandparents performed dances on lavani and koli songs.

Old Hindi songs sung by Suresh, Smita and Vrishali Haya took the grandparents back to their youth. Today's katta ended with the overflowing enthusiasm of the grandparents.

A few snapshots.

‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने नियमित ‘आजी-आजोबा कट्टा’ चे आयोजन केले जाते. आज दि. 14 मे 2024 रोजी प्रारंभचे सभासद श्री. सुरेश साळगांवकर, सौ. स्मिता साळगांवकर आणि सौ. वृषाली सावंत ह्यांनी व्रुध्दाश्रमातील आजी-आजोबांची भेट घेतली. वृषाली सावंत ह्यांनी गणेश स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. नुकत्याच झालेल्या मातृदिना निमित्ताने आईप्रती असलेला आदर, प्रेम भावना व्यक्त करणारी गीते सादर केली. अनेक जुनी-नवी हिंदी आणि मराठी गीतांनी बहार आणली. लावणी, कोळीगीतांवर नेहमीप्रमाणेच आजी-आजोबांनी नृत्य सादर केले.

सुरेश, स्मिता आणि वृषाली हयांनी गायलेल्या एकाहून एक सरस अशा जुन्या हिंदी गाण्यांनी आजी-आजोबांना त्यांच्या तरुणपणात सफर घडवून आणली. आजी-आजोबांच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात आजचा कट्टा संपन्न झाला.

काही क्षणचित्रं.


21-05-2024

Prarambha organizes "Aji-Ajoba" Katta every Tuesday at the old age home in Kalher. Today, Vaishali Pard, the first member, visited the grandparents and entertained them. In the beginning, Ganesh Geeta started. Vaishalitai entertained the grandparents by singing some of their favorite Koli songs. As always, the grandparents appreciated him wholeheartedly. Later some Hindi and Marathi songs were sung which made the grandparents happy.

Grandparents danced a lot to their favorite song 'Hasata Hua Noorani Chehra'. Thus ended today's program in a great musical atmosphere.

A few snapshots of today's program

२१-०५-२०२४


प्रारंभ तर्फे दर मंगळवारी काल्हेर येथील वृद्धाश्रमात "आजी-आजोबा" कट्टाचं आयोजन केलं जातं. आज प्रारंभच्या सभासद वैशाली परड यांनी आजी-आजोबांची भेट घेऊन त्यांचं मनोरंजन केलं. सुरुवातीला गणेश गीताने आरंभ केला. आजी आजोबांच्या आवडीची काही कोळीगीते गाऊन वैशालीताईंनी त्यांचं खूप मनोरंजन केलं. नेहमीप्रमाणेच आजी-आजोबांनी ही त्याला मनापासून दाद दिली. नंतर काही हिंदी आणि मराठी गाणी म्हटली ज्यानी आजी आजोबा खुश झाले.

'हसता हुआ नूरानी चेहरा' या आवडीच्या गाण्यावर आजी-आजोबा खूप नाचले. अशाप्रकारे मस्त संगीतमय वातावरणात आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली.


आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं


२८-०५-२०२४

Aji Ajoba Katta is organized every Tuesday by Prarambha at the old age home in Kalher. Today the initial members Shri Vidyadhar Apashankar, Anjali Sant, Anant Mule visited the old age home. Pramod Mehndale and Snehal Tapkire also sang songs with him. All of them together sang many favorite songs of grandparents.

The program started with the Ganesha song 'Omkar Pradhan Roop Ganeshache'. She also sang some koli songs and lavani as per the request of her grandparents. Grandparents enjoyed themselves as usual by dancing to some bouncy songs.

Grandparents appreciated all the singers.

At the end, all the artistes expressed their heartfelt thanks to the Prarambha as they were able to go to the old age home and perform their singing for the grandparents there.

Some snapshots of program.

प्रारंभ तर्फे दर मंगळवारी काल्हेर येथील वृद्धाश्रमात आजी आजोबा कट्टाचं आयोजन केलं जातं. आज प्रारंभचे सदस्य श्री विद्याधर अपशंकर, अंजली संत, अनंत मुळे ह्यांनी वृद्धाश्रमाला भेट दिली. त्यांच्याबरोबर प्रमोद मेहंदळे आणि स्नेहल तापकिरे ह्यांनीही गाणी गायली. ह्या सगळ्यांनी मिळून आजी आजोबांच्या आवडीची भरपूर गाणी म्हटली.

'ओमकार प्रधान रूप गणेशाचे' या गणेश गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आजी आजोबांच्या फर्माईशीनुसार काही कोळीगीतं आणि लावणीही गायली. काही उडत्या चालीच्या गाण्यांवर आजी आजोबांनी नेहमीप्रमाणे नाच करून आनंद लुटला.

सगळ्या गायकांना आजी आजोबांनी मनापासून दाद दिली.

शेवटी प्रारंभमुळे वृद्धाश्रमात जाऊन तेथील आजी आजोबांसाठी आपली गाण्याची कला सादर करता आली म्हणून सर्व कलाकारांनी प्रारंभचे मनापासून आभार मानले.


4 जून 2024

" Aaji Ajoba Katta "

Through our organization 'Prarambha' Kala Academy, our members regularly visit the grandparents in the old age home. Members of the organization Neha Bagve and Shri. Suresh Dhumal met his grandparents in Kalher today. They love songs that are light-hearted and make them sway and dance. Today's program started with the song 'Omkar Pradhan Roop Ganesha'. He sang many Hindi as well as Marathi duet songs, Koli songs. Suresh Dhumal also gave a nice presentation following the songs. He interacted with the audience by listening to the melody of the song, asking the audience to identify it.

Music has a wonderful magic to cheer up the mind. All the grandparents were very happy.

Grandparents bid him farewell with a promise to come again. A few snapshots.

“आजी-आजोबा कट्टा”

‘प्रारंभ’ कला अकॅडमी ह्या आमच्या संस्थेतर्फे आमचे सदस्य वृद्धाश्रमातील आजी- आजोबांची नियमित भेट घेतात. संस्थेच्या सदस्या नेहा बागवे आणि श्री. सुरेश धुमाळ ह्यांनी आज काल्हेर येथील आजी-आजोबांची भेट घेतली. हलकी-फुलकी तसेच डोलायला आणि नाचायला लावणारी गाणी त्यांना खूप आवडतात. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ‘ओंकार प्रधान रुप गणेशाचे’ ह्या गीताने केली. अनेक हिंदी तसेच मराठी युगुल गीते , कोळीगीते त्यांनी गायली. सुरेश धुमाळ ह्यांनी गाण्यांना अनुसरुन छानसं निवेदनही केले. गाण्याची धून ऐकवून, प्रेक्षकांना ते ओळखायला सांगत, प्रेक्षकांशी संवाद साधला.

मन प्रफुल्लित करण्याची विलक्षण जादू संगीतामध्ये आहे. सर्व आजी-आजोबा अतिशय खुष झाले.

पुन्हा भेटायला येण्याचे वचन घेऊनच आजी-आजोबांनी त्यांना निरोप दिला. काही क्षणचित्रं.


11 June 2024

On behalf of our organization 'Prarambha' Kala Academy, Thane, our members visit grandparents regularly. Our member Shubhangi Pawar today. On June 11, 2024, visited the grandparents in the old age home at Kalher. Music that pleases the mind. Shubhangi started today's program with the hymn 'Achutan Kesavan Krishna Damodaran'. He sang many Hindi songs like 'Tu Ne Ho Rangile Kaisa Jadu Kiya', 'Ek Do Tin'. Lavani also said. Koligita is a special favorite of grandparents. He added to the color of the program by performing several Koli songs that made theka hold their breath. The mind energized by the music energizes and the ears and mind of the listeners are satisfied in an environment charged with positive energy.

Some snapshots of today.

‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने आमचे सदस्य नियमित आजी-आजोबांची भेट घेतात. आमच्या सदस्या शुभांगी पवार ह्यांनी आज दि. 11 जून 2024 रोजी काल्हेर येथील वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची भेट घेतली. मन प्रसन्न करते ते संगीत. ‘अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं’ ह्या भजनाने शुभांगी ह्यांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. ‘तू ने हो रंगीले कैसा जादू किया’, ‘एक दो तीन’ अशी अनेक उडत्या चालीची हिंदी गाणी त्यांनी गायली. लावणी सुध्दा म्हटली. कोळीगीते तर आजी आजोबांच्या खासच आवडीची. ठेका धरायला लावणारी अनेक कोळीगीते सादर करुन त्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. संगीताने उत्साही झालेल्या मनाला ऊर्जा मिळते आणि सकारात्मक ऊर्जेने भारलेल्या वातावरणात श्रोत्यांचे कान आणि मन तृप्त झाले.

आजची काही क्षणचित्रं.



18 June 2024

'Aji-Ajaoba Katta' is organized as part of our social activities on behalf of our organization Prarambha Kala Academy, Thane. Our members visit grandparents regularly. We strive to make them happy and entertained. Our member Shri. Sachin Dalvi today On June 18, 2024, visited the grandparents in the old age home at Kalher. Sachin started today's program with the cool song 'Gulabi Aankhe Jo Teri Dekhi'. He sang many soulful Hindi songs of the 70s-80s. Koligita is a special favorite of grandparents. At the end of the session, he performed several Koligitas that made theka stand. Grandparents even danced on it. It seemed that the program should not end in an atmosphere that was clouded by music.

Some snapshots of today.

प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने आमच्या सामाजिक उपक्रमातंर्गत ‘आजी-आजोबा कट्टा’ चे आयोजन केले जाते. आमचे सदस्य नियमित आजी-आजोबांची भेट घेतात. त्यांना आनंद मिळावा, त्यांचे मनोरंजन व्हावे ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. आमचे सदस्य श्री. सचिन दळवी ह्यांनी आज दि. 18 जून 2024 रोजी काल्हेर येथील वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची भेट घेतली. ‘गुलाबी ॲांखे जो तेरी देखी’ ह्या मस्त गाण्याने सचिन ह्यांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. अनेक उडत्या चालीची , मन प्रफुल्लित करणारी 70-80 च्या दशकातील हिंदी गाणी त्यांनी गायली. कोळीगीते तर आजी आजोबांच्या खासच आवडीची. सत्राच्या शेवटी ठेका धरायला लावणारी अनेक कोळीगीते त्यांनी सादर केली. आजी-आजोबांनी त्यावर मनसोक्त नाच सुध्दा केला. संगीताने धुंद झालेल्या वातावरणातील हा कार्यक्रम संपूच नये असं वाटतं होतं.

आजची काही क्षणचित्रं.


25 June 2024

Prarambha Kala Academy, Thane

'Grandparents Katta'

25 June 2024

Prarambha Kala Academy, Thane

On behalf of our organization, 'Aji-Ajaoba Katta' is organized as part of our social activities. Our members visit grandparents regularly. We strive to make them happy and entertained. Our member Chhaya Koinde today. On June 25, 2024, met the grandparents in the old age home at Kalher.

Today's session got off to a great start with the powerful song 'Darya Keerin Ek Bungalow Ga Pori Dai Jo Dai'. The folk song 'Datachin Datvanan Hyane Ho Koni' brought fun. He performed many beautiful Marathi and Hindi songs that evoke enthusiasm like 'Dhol kunacha wajato under the purple leaves'. Koligeetha brings the joy of dancing to grandparents by making them dance. Today's program was concluded by singing the audience's favorite songs. Grandparents enjoy a music filled environment. This energy makes them happy. They bid farewell to visitors who come with a sweet insistence on a return visit.

Some snapshots of today.

‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे

‘आजी-आजोबा कट्टा’

25 जून 2024

‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे

ह्या आमच्या संस्थेच्या वतीने आमच्या सामाजिक उपक्रमातंर्गत ‘आजी-आजोबा कट्टा’ चे आयोजन केले जाते. आमचे सदस्य नियमित आजी-आजोबांची भेट घेतात. त्यांना आनंद मिळावा, त्यांचे मनोरंजन व्हावे ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. आमच्या सदस्या छाया कोयंडे ह्यांनी आज दि. 25 जून 2024 रोजी काल्हेर येथील वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची भेट घेतली.

‘दर्या किनारे एक बंगलो ग पोरी दै जो दै’ ह्या दमदार गाण्याने आजच्या सत्राची मस्त सुरुवात झाली. ‘दाताचं दातवणं घ्या हो कोणी’ ह्या लोकगीताने गंमत आणली. ‘जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो’ ह्यांसारखी उत्साह निर्माण करणारी अनेक सुंदर मराठी आणि हिंदी गीते त्यांनी सादर केली. कोळीगीते ठेका धरायला लावून आजी-आजोबांना नाच करण्याचा आनंद मिळवून देतात. प्रेक्षकांच्या आवडीची लावणीगीते गाऊन आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली. संगीताने भारलेल्या वातावरणाने आजी आजोबांना खूप आनंद वाटतो. ही ऊर्जा त्यांना आनंद देऊन जाते. परत भेटीच्या गोड आग्रहाने आलेल्या पाहुण्यांचा ते निरोप घेतात.

आजची काही क्षणचित्रं.


Prarambha Kala Academy, Thane

9 July 2024

Our members visit grandparents regularly through our organization 'Prarambha' Kala Academy, Thane. We are trying to make them have some fun in their daily life and entertain them. Today On July 9, 2024, Vaishali Parad, a member of the organization, met the grandparents in the old age home at Kalher. Initially, the founder and director of the institute, Dr. He introduced Arundhati Bhalerao. The verse 'Vakratunda Mahakaya Suryakoti Samaprabh' was first uttered. The audience was deeply engrossed in the devotional song 'Tuj Magto Me Ata'. He sang many Hindi Marathi songs like 'Hasata Hua Noorani Chehra Kali Zulfe Rang Sunhara', 'Jab Chhaye Mera Jadu', 'Jhalya Tinhi Sanja', 'Hatanam Bharlya Yaresh Bangdya' and won the applause of the audience.

Grandparents love to dance to the beat. The program concluded with the popular Koli song 'Ekvira Ai Tu Dongaravari Nazar Hi Tuji'. The joy on the faces of grandparents charged with energy and enthusiasm due to music is simply indescribable.

A few snapshots.

‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे

9 जुलै 2024

‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेतर्फे आमचे सदस्य नियमितपणे आजी-आजोबांची भेट घेतात. त्यांच्या दैनंदिनीमधे त्यांना थोडा विरंगुळा मिळावा, त्यांचे मनोरंजन व्हावे ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. आज दि. 9 जुलै 2024 रोजी संस्थेच्या सदस्या वैशाली पराड ह्यांनी काल्हेर येथील वृद्धाश्रमातील आजी - आजोबांची भेट घेतली. सुरुवातीला संस्थेचा आणि संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका डॅा. अरुंधती भालेराव ह्यांचा परिचय त्यांनी करुन दिला. ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ’ हा श्लोक प्रथम म्हटला. ‘तुज मागतो मी आता’ ह्या भक्तीगीतामधे प्रेक्षक आकंठ तल्लीन झाले. ‘हसता हुआ नुरानी चेहरा काली झुल्फे रंग सुनहरा’ , ‘जब छाये मेरा जादू’, ‘झाल्या तिन्ही सांजा’, ‘हातानं भरल्या हिरव्या बांगड्या’ अशी कितीतरी उडत्या चालीची हिंदी मराठी गाणी त्यांनी गायली आणि प्रेक्षकांची वाहव्वा मिळवली.

तालावर ठेका धरुन नाचायला आजी आजोबांना खूपच आवडते. ‘एकवीरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी ‘ ह्या सुप्रसिध्द कोळीगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. संगीतामुळे ऊर्जा आणि उत्साहाने भारलेल्या आजी आजोबांच्या चेहर्यावरील आनंद केवळ अवर्णनीय.

काही क्षणचित्रं.


16 July 2024

Prarambha Kala Academy, Thane

16 July 2024

'Aji-Ajoba Katta' is regularly organized by our organization 'Prarambha' Kala Academy, Thane as part of our social project. Our members regularly visit grandparents. We try to make them have some fun in their daily life, entertain them and chat with them freely. Today on July 16, 2024, Gautami Pujare, a member of the organization, and Animesh Pujare, a student of the beginning, met the grandparents in the old age home at Kalher. Initially, the founder and director of the institute, Dr. He introduced Arundhati Bhalerao.

The program started with the song 'Ekdantai Vakratundai Gauritnaya Dhimhi'. Gautami and Animesh sang Vitthala's hymn 'Vithumauli Tu Mauli Jagachi, Maulich Murti Vitthalachi' on the occasion of Ashadhi Ekadashi tomorrow. All the listeners were bathed in devotion. Later Gautami and Animesh performed Hindi-Marathi songs like 'Dhipadi Dhipang', 'Preeticha Vinchu', 'Chandan Chandanam Jhali Raat', 'Deva Shriganesha' and many other flying moves that enticed one to dance. As usual, grandparents expressed their joy by dancing to their favorite songs. The program ended with the song 'Mauli Mauli' by Vitthala. Aji praised Animesh profusely and blessed him wholeheartedly. The songs were accompanied by Animesh's casio playing. The atmosphere became very foggy.


A few snapshots.

‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे

16 जुलै 2024

‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेतर्फे आमच्या सामाजिक प्रकल्पांतर्गत ‘आजी-आजोबा कट्टा’ चे नियमित आयोजन केले जाते. आमचे सदस्य नियमितपणे आजी-आजोबांची भेट घेतात. त्यांच्या दैनंदिनीमधे त्यांना थोडा विरंगुळा मिळावा, त्यांचे मनोरंजन व्हावे , त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा माराव्या ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. आज दि.16 जुलै 2024 रोजी संस्थेच्या सदस्या गौतमी पुजारे आणि प्रारंभचा विद्यार्थी अनिमेष पुजारे ह्यांनी काल्हेर येथील वृद्धाश्रमातील आजी - आजोबांची भेट घेतली. सुरुवातीला संस्थेचा आणि संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका डॅा. अरुंधती भालेराव ह्यांचा परिचय त्यांनी करुन दिला.

‘एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमही’ ह्या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद्या असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने ‘विठूमाऊली तू माऊली जगाची , माऊलीच मूर्ती विठ्ठलाची’ हे विठ्ठलाचे भजन गौतमी आणि अनिमेष ह्यांनी गायले. सर्व श्रोते भक्तीरसामधे न्हाऊन निघाले. नंतर ‘धिपाडी धिपांग’ , ‘प्रीतीचा विंचू’, ‘चांदणं चांदणं झाली रात’ , ‘देवा श्रीगणेशा’ अशी अनेक उडत्या चालीची, ठेका धरायला लावून नाच करण्यासाठी मोहवणारी हिंदी-मराठी गीते गौतमी आणि अनिमेष ह्यांनी सादर केली. नेहमीप्रमाणे आजी-आजोबांनी त्यांच्या आवडत्या गाण्यांवर नाच करुन आपला आनंद व्यक्त केला. विठ्ठलाच्या ‘माऊली माऊली’ ह्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. आजींनी अनिमेषचे भरभरून कौतुक केले आणि तोंडभरून मनापासून त्याला आशीर्वाद दिले. गाण्यांच्या साथीला अनिमेषच्या कॅसिओवादनाने विशेष मजा आणली. वातावरण अगदी धुंद झाले.


काही क्षणचित्रं.


23 July 2024

‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे

23 जुलै 2024

‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने आमच्या सामाजिक प्रकल्पांतर्गत ‘आजी-आजोबा कट्टा’ चे नियमित आयोजन केले जाते. काल्हेर मधील वृद्धाश्रमातील आजी आजोबा प्रारंभ सदस्यांची आतुरतेने वाट बघत असतात. संस्थेचे सदस्य श्री. सुरेश साळगावकर, स्मिता साळगावकर आणि वृषाली सावंत ह्यांनी दि. 23 जुलै 2024 रोजी आजी आजोबांची भेट घेतली. नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त ‘मन लागो रे लागो गुरुभजनी’ ह्या गीताने त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. अलिकडेच होऊन गेलेल्षा आषाढी एकादशीनिमित्ताने ‘ विठूमाऊली तू माऊली जगाची’ हे भजन सादर केले. ‘आला आला वारा संगे पावसाच्या धारा’, ‘रिमझिम गिरे सावन’ , ‘चाक धूम धूम’ अशी अनेक मस्त आणि सदाबहार पावसाची गाणी गाऊन रसिक श्रोत्यांचे मन प्रसन्न केले. आजी आजोबांना अतिशय आवडणारी अनेक कोळीगीते आणि ‘ढोलकीच्या तालावर’ अशी काही लावणी गीते सादर करुन श्रोत्यांचा आनंद द्विगुणित केला. बाहेर पडणारा पाऊस आणि बेधुंद करणारी गाणी ह्यांनी वातावरण प्रफुल्लित झाले. आजी आजोबांच्या चेहर्यावरील आनंद अवर्णनीय.

काही क्षणचित्रं.


6 Aug 2024

Prarambha Kala Academy, Thane

6 August 2024

'Aji-Ajoba Katta' is regularly organized by our organization 'Prarambha' Kala Academy, Thane. Our member Shri. Vidyadhar Apashankar, Shobha Surve and Shri. Sridhar Yadav today d. On 6th August 2024, met the grandparents in the old age home at Kalher. The founder and director of the organization Dr. He introduced Arundhati Bhalerao.

The program started with Ganesh Vandan 'Vakratund Mahakaya Suryakoti Samprabh'.

Dum dum diga diga, kya khoob lagti ho, hai apna dil to awara, jahan dal dal par sone ki chidiya, one after the other, created a great atmosphere. Airni's Deva Tula, Me Hai Koli, Kathinen Ghongadya Ki Ram Mala Bee Jatrela Jaundya Ki Ram, Jiva-Shiva's Bull Jod, Mana Dhundi Wali Ye Na Ye Na, created a lot of excitement and enthusiasm. Grandparents started dancing to these songs.

It is music that removes the deadness that comes to the mind in a moment. Music has an extraordinary power to refresh the mind. Grandparents always want this program not to end. Even today, even if the time is over, the grandparents were lovingly insisting that you sing one more song, say one more song. Respecting his insistence, some more beautiful songs were performed.

A few snapshots.

‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे

6 ॲागस्ट 2024

‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने ‘आजी-आजोबा कट्टा’ चे नियमित आयोजन केले जाते. आमचे सदस्य श्री. विद्याधर अपशंकर, शोभा सुर्वे आणि श्री. श्रीधर यादव ह्यांनी आज दि. 6 ॲागस्ट 2024 रोजी काल्हेर येथील वृद्धाश्रमातील आजी आजोबांची भेट घेतली. प्रारंभ संस्थेचा तसेच संस्थापिका आणि संचालिका डॅा. अरुंधती भालेराव ह्यांचा परिचय त्यांनी करुन दिला.

‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ’ ह्या गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

डम डम डिगा डिगा, क्या खूब लगती हो, है अपना दिल तो आवारा, जहां डाल डाल पर सोने की चिडिया अशा एकाहून एक सरस हिंदी गाण्यांनी मस्त माहोल तयार झाला. ऐरणीच्या देवा तुला, मी हाय कोली, काठीनं घोंगडं घेऊद्या की रं मला बी जत्रेला जाऊंद्या की रं, जीवा-शीवाची बैलजोडं , मनाच्या धुंदीत लहरीत ये ना अशा उत्साह आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या मराठी गाण्यांनी फारच धमाल आणली. आजी-आजोबा ह्या गाण्यांवर नाचू डोलू लागले.

मनाला आलेली मरगळ क्षणात दूर करते ते संगीत. मन ताजंतवानं करण्याची विलक्षण ताकद संगीतामध्ये आहे. हा कार्यक्रम संपूच नये असे आजी आजोबांना नेहमीच वाटत असतं . आजही वेळ संपली तरी अजून एक गाणं गा, अजून एकच म्हणा ना असा प्रेमळ आग्रह आजी आजोबा करत होते. त्यांच्या आग्रहाचा आदर करत आणखी काही छान छान गाणी सादर केली.

काही क्षणचित्रं.


13 August 2024

Our members regularly visit grandparents as part of our social activities on behalf of our organization 'Prarambha' Kala Academy, Thane. In old age home at Kalher d. On 13th August 2024, 'Aji-Ajoba Katta' was sung by Deepa Revankar, Madhura Parekar, Shailaja Jadhav, Vandana Paste, Sandhya Alshi and Pooja Mahajan.

Music makes the mind happy. Music has the ability to instantly refresh the mind.

He sang many Marathi and Hindi songs like 'Hil Hill Hill Pori Hila', 'Hee Chaal Turuturu', 'Bilanchi Naagin Chhali Nagoba Dulayla Ladai', 'Dil Hai Chotasa', 'Ekveera Ai Tu Dongaravari'. These songs brought great excitement to the grandparents. As usual they started swaying, dancing.

A few snapshots

13 ॲागस्ट 2024

‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने आमच्या सामाजिक उपक्रमांतर्गत आमचे सदस्य नियमित आजी आजोबांची भेट घेतात. काल्हेर येथील वृद्धाश्रमात दि. 13 ॲागस्ट 2024 रोजी ‘आजी-आजोबा कट्टा’ रंगला तो दीपा रेवणकर, मधुरा पारेकर, शैलजा जाधव, वंदना पास्ते, संध्या आळशी आणि पूजा महाजन ह्यांच्या सुंदर गीतगायनाने.

संगीताने मन प्रसन्न होते. मन क्षणार्धात ताजतवानं करण्याची किमया संगीतामध्ये आहे.

‘हिल हिल हिल पोरी हिला’, ‘ही चाल तुरुतुरु’ , ‘बिलनची नागीन निघाली नागोबा डुलायला लागला’ , ‘दिल है छोटासा ‘ , ‘एकवीरा आई तू डोंगरावरी’ अशी अनेक मराठी आणि हिंदी गाणी त्यांनी गायली. ह्या गाण्यांनी आजी आजोबांमध्ये एकदम उत्साह आला. नेहमीप्रमाणे ते डोलू लागले, नाचू लागले.

काही क्षणचित्रं.

20 Aug 2024

20th August 2024

On behalf of our organization 'Prarambha' Kala Academy, Thane, 'Aji-Ajoba Katta' is regularly organized as part of our social activities. We try to preserve their mental health by meeting the grandparents in the old age home, interacting with them, performing beautiful songs that uplift the mind. Today On 20 August 2024, Vaishali Parad, a member of the organization, met the grandparents of Kalher. The program started with Ganesh praise 'Tuj Magto Mi Ata'. The audience responded well to Devi's song 'Jai Jai Santoshi Mata'. Evergreen Koli songs like 'Hinglai Devi', 'Ekveera Ai Tu Dongaravari' came out. Grandparents expressed their happiness by dancing to these songs. Many Marathi as well as Hindi songs enlivened the atmosphere of the audience. The program ended with the song 'Hasata Hua Nurani Chehra'. A few snapshots.

20 अॅागस्ट 2024

‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने आमच्या सामाजिक उपक्रमांतर्गत ‘आजी-आजोबा कट्टा’ चे नियमित आयोजन केले जाते. वृद्धाश्रमातील आजी आजोबांना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधणे, मनाला उभारी देणारी सुंदर गीते त्यांच्यासाठी सादर करणे ह्यामधून त्यांचे मानसिक आरोग्य जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आज दि. 20 अॅागस्ट 2024 रोजी संस्थेच्या सभासद वैशाली पराड ह्यांनी काल्हेर येथील आजी आजोबांची भेट घेतली.

‘तुज मागतो मी आता’ ह्या गणेश स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘जय जय संतोषी माता’ ह्या देवीच्या गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

‘हिंगलाय देवी’ , ‘ एकवीरा आई तू डोंगरावरी’ अशासारख्या सदाबहार कोळीगीतांनी बहार आणली. आजी आजोबांनी ह्या गाण्यांवर मनमुराद नाच करत आपला आनंद व्यक्त केला. अनेक मराठी तसेच हिंदी गीतांनी संगीतमय झालेल्या वातावरणामुळे उपस्थितांचे मन प्रफुल्लित झाले. ‘हसता हुआ नुरानी चेहरा’ ह्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.

काही क्षणचित्रं.


वार्षिक व्रुध्दाश्रम सांगता समारोप

२६ ऑगस्ट २०२४

Today was the end of our activity at Kalher Old Age Home for a year from September 2023 to August 2024. We are using the money received from the donation box from the various activities of the beginning, the little help received from the charitable persons of the society, we are entertaining the grandparents through various arts by connecting 25 artists to the old age home throughout the year. We have appointed a coordinator for that. Singer Suhas Kale and singer Vaishali Parad sang songs for all these grandparents today. The presentation of the entire program was started by Ragini Sane of Kala Academy. Schemes of Smit Foundation were present on this occasion. Each of the grandparents was gifted with refreshments and a set of everyday items by Pradhan Kala Academy. Jayashree Madane, Sneha Ravande, Prarambh Trustee Manisha Acharya Advisor Manisha Shitut I myself was present on the occasion. some degrees.

सप्टेंबर 2023 ते ऑगस्ट 2024ह्या वर्षभर काल्हेर येथे सुरू असलेल्या वृद्धाश्रमामध्ये आमच्या उपक्रमाचा आज समारोप होता. प्रारंभच्या विविध उपक्रमांमधून दानपेटीतून जे पैसे मिळतात, समाजातील दानशूर व्यक्तींकडून जी काही थोडीफार मदत मिळते त्याचा उपयोगआम्ही वर्षभर 25 कलाकार वृद्धाश्रमाला जोडून विविध कलांच्या माध्यमातून आजी-आजोबांचं मनोरंजन करत करीत असतो. त्यासाठी आम्ही एक समन्वयिका नियुक्त केलेली असते. आज या सगळ्या आजी-आजोबांसाठी गायक सुहास काळे आणि गायिका वैशाली पराड यांनी गाणी म्हटली. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन प्रारंभ कला अकॅडमीच्या रागिनी सानेनी केलं. याप्रसंगी स्मित फाउंडेशनच्या योजना घरत उपस्थित होत्या. आजी आजोबांना प्रारंभ कला अकॅडमी तर्फे अल्पोपहार तसंच नित्यपयोगी वस्तूंचा सेट भेट म्हणून प्रत्येकाला देण्यात आला. जयश्री मदने, स्नेहा रवंदे,प्रारंभच्या विश्वस्त मनिषा आचार्य सल्लागार मनीषा शितूत मी स्वतः याप्रसंगी उपस्थित होतो. काही अंश.


वार्षिक व्रुध्दाश्रम सांगता समारोप

२६ ऑगस्ट २०२४ - THIS IS TEST TEXT ONLY