बालिका आश्रम सामाजिक प्रकल्प
प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे
"आओ दिया जलाए"
०१-०३-२०२४
आज "आओ दिया जलाए" ह्या प्रारंभच्या उपक्रमांतर्गत वाघबीळच्या बालिकाश्रमाला प्रारंभच्या सभासद, मानसोपचारतज्ञ श्रेया कुलकर्णी ह्यांनी भेट दिली. आज त्यांनी मानसिक स्वास्थ्या विषयी मार्गदर्शन केले.
सुरुवातीला मुलींची एकाग्रता वाढवण्यासाठी त्यांनी टाळ्या वाजवण्याची एक कृती मुलींकडून करून घेतली. आपण विचार करतो म्हणजे नक्की काय करतो हे सांगताना आपल्या मनाची विचार करण्याची प्रक्रिया समजावली. हे करताना सगळ्यात महत्त्वाचं तंत्र म्हणजे 'स्वसंवाद कसा साधावा' हे शिकवलं.
एखादी समस्या किंवा संकट आलं तर त्यावर मात करण्यासाठी कसा आणि काय विचार करायचा याचं मार्गदर्शन केलं. समस्या सोडवताना गोंधळून न जाता शांतपणे कागदावर आपल्या मनातील विचार मांडणे, स्वतःला होकारार्थी सूचना देणे अशी तंत्र वापरून योग्य विचारशृंखला कशी तयार करायची हे समजावलं. त्यासाठी हिरकणीची आणि अजून एक अशा दोन समर्पक गोष्टीही सांगितल्या. तसंच आपलं मन आणि आपण स्वतः यांच्यामधील चुकीच्या आणि योग्य संवादाचं प्रात्यक्षिकही घेतलं.
अशाप्रकारे आपल्या मनाच्याही आतल्या मनाचा म्हणजेच आपल्या अंतर्मनाचा मागोवा घेत स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवता येईल ते मुलींना शिकायला मिळालं. रोज सकाळी आरशात बघून स्वसंवाद साधत आपल्याला काय व्हायचंय ते म्हणायचं असा निश्चय करत आजच सत्र संपलं.
आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं
प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे
"आओ दिया जलाए"
२३-०२-२०२४
आज सलग तिसऱ्यांदा वाघबीळच्या बालिकाश्रमाला प्रारंभच्या सभासद शुभांगी संसारे ह्यांनी "आओ दिया जलाए" ह्या उपक्रमाअंतर्गत भेट दिली.
छानशा प्रार्थनेने शांतपणे कार्यक्रमाची सुरुवात झाली. लहान मुलींचा एक आणि मोठ्या मुलींचा एक असे मुलींचे दोन गट बनवण्यात आले.
लहान मुलींना कागदाच्या घड्या घालून दोन प्रकारचे मासे बनवायला शिकवण्यात आले. तसंच कागद कातरून त्याची सुंदर फुलेही बनवायला शिकवले. सगळ्या छोट्या मुलींनी बनवलेले रंगीबेरंगी मासे आणि फुले खूपच सुंदर दिसत होती.
मोठ्या मुलींना जुन्या सीडी पासून शोभेच्या वस्तू बनवायला शिकवले. जुन्या टाकाऊ सीडीवर कागद चिकटवून, त्यावर टिकल्या, विविध आकाराचे काचांचे तुकडे, मणी, चमकी यांची सुंदर सजावट करून त्यापासून वॉलपीस, तयार रांगोळी डिझाईन आणि टेबलावर ठेवायच्या शोभेच्या तबकड्या बनवल्या गेल्या. सर्व मोठ्या मुलींनी आपापल्या कल्पनेप्रमाणे वेगवेगळ्या सुंदर कलाकृती तयार केल्या.
ओरिगामी आणि टाकाऊ पासून टिकाऊ अशा दोन कला आज मुली खूप आनंदाने शिकल्या. ह्यातून त्यांच्या सृजनशीलतेला आणि कल्पनाशक्तीला खूप वाव मिळाला.
अशाप्रकारे नव्या कलांची ओळख करून घेत, आनंदात आजच्या सत्राची सांगता झाली.
आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं
प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे
'आओ दिया जलाए'
१६-०२-२०२४
आज प्रारंभ तर्फे राबविल्या जाणाऱ्या 'आओ दिया जलाए' ह्या उपक्रमा अंतर्गत वाघबीळच्या बालिकाश्रमात प्रारंभच्या सभासद शुभांगी संसारे ह्यांनी भेट दिली.
आज शुभांगी मॅडमनी मुलींना 'पेपर क्राफ्ट' अर्थात कागदापासून कला कौशल्य शिकवले. कार्ड पेपरची सुंदर फुले बनवायला शिकवले. कार्ड पेपर कापून, त्याचे छोटे तुकडे करून, त्यापासून छोटी छोटी फुले कशी बनवायची याचं प्रात्यक्षिक दाखवलं. बालिकाश्रमातील हौशी मुलींनीही लगेच शिकवलेले आत्मसात करून तशीच फुले बनवून दाखवली.
रंगीबेरंगी फुले बनवण्यात मुली इतक्या रंगून गेल्या की सत्र कधी संपलं त्यांना कळलंच नाही.
आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं
प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे
“आओ दिया जलाए”
०९-०२-२०२४
प्रारंभ तर्फे दर महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी वाघबीळ येथील बालिकाश्रमात “आओ दिया जलाए” हा उपक्रम राबविला जातो. त्याअंतर्गत मुलींना नेहमीच नवनवीन गोष्टी शिकवल्या जातात, जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास साधला जाईल.
आजही प्रारंभच्या आमच्या सभासद शुभांगी संसारे यांनी बालिकाश्रमातील मुलींची भेट घेतली. सुरुवात छानशा प्रार्थनेने झाली.
आज त्यांनी कचऱ्यातून कला ह्याचं एक छान प्रात्यक्षिक घेतलं. जुन्या टाकाऊ कॅलेंडरच्या पानांच्या पट्ट्या कापून, त्या गुंडाळून आणि चिकटवून त्यापासून सुंदर छोटे-मोठे मणी कसे बनवायचे ते शिकवलं. यातून मुलींच्या सर्जनशीलतेला छान वाव मिळाला. काहीतरी नवीन शिकायला तर मिळालंच पण आपण काहीतरी छान बनवल्याचा आनंदही मुलींच्या चेहऱ्यावर दिसत होता. जवळपास शंभर ते सव्वाशे मणी मुलींनी बनवले. यात मुली इतक्या रममाण झाल्या होत्या की त्यांना वेळेचं भानच उरलं नाही.शेवटी आणखीन कागदाचे काही मणी बनवण्यासाठी शुभांगी ताईंनी मुलींना पेपर देऊन ठेवले आणि या सगळ्या मण्यांपासून काय काय बनवता येईल त्याचा विचार करून ठेवायला सांगितलं.
अशा प्रकारे मुलींच्या कल्पकतेला संधी देत आजच्या सत्राची सांगता झाली.
आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं.
प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे
"आओ दिया जलाये"
०२-०२-२०२४
स्वागत टाळी, रॉकेट टाळी, पाऊस टाळी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टाळ्यांची माहिती देत, टाळ्यांच्या गजरात, आजच्या वाघबीळ मधल्या बालिकाश्रमातील भेटीची सुरुवात, आमच्या संस्थेच्या सभासद स्नेहल पुरंदरे यांनी केली. तिथल्या मुलींमध्ये त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साह निर्माण झाला.
आज 2 फेब्रुवारी हा स्वामी विवेकानंदांचा तिथीप्रमाणे जयंती दिन असल्याने, विवेकानंदांची एक बोधपर गोष्ट, ज्यात आपल्यातले दुर्गुण काढून सदगुणांची जोपासना करत आपल्या ध्येयपूर्ती कडे कशी वाटचाल करायची ते सांगितलं.
नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रजासत्ताकाचे महत्व, आपल्या देशाच्या संविधानाची थोडक्यात ओळख आणि महत्व सांगितलं. तसंच आपापसातील मैत्री जपणं, ज्येष्ठांचा मान राखणं, पर्यावरण संवर्धन करणे, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून मुलंही संविधानाची जपणूक कशी करू शकतात हे सांगून, तसा सगळ्यांनी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संकल्पही केला.
थोडसं अभ्यासाकडे वळवत मराठी व्याकरणातील चौदाखडीची ओळख तसेच व्यंजन, स्वर, कान्हा, मात्रा, उकार, वेलांटी आणि काही जोडशब्द यांचा तक्त्यांच्या माध्यमातून पाया पक्का करून घ्यायचा प्रयत्न केला गेला. शिवाय लहान मुलींकडून त्याचा सराव करून घेण्याची जबाबदारी मोठ्या विद्यार्थिनींवर सोपवण्यात आली.
सत्राच्या शेवटा कडे जाताना पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला असलेल्या संविधानाच्या साराच वाचन करण्यात आलं. प्रारंभच्या संस्थापिका, अरुंधती भालेराव यांची ओळख करून देताना त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामाची माहिती आणि त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची माहिती देत मुलींनाही अशाच प्रकारे आपलंही ध्येय निश्चित करून आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची उर्मी मिळाली.
नेहमीप्रमाणेच प्रार्थनेने सत्राची सांगता झाली.
आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे
'आओ दिया जलाए’
'श्री गणेशाय नमः
अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य' अशी रामरक्षा म्हणून सुरूवात झाली बालिकाश्रमातील भेटीची. निमित्त होतं 'प्रारंभ' तर्फे दर शुक्रवारी राबविला जाणारा 'आओ दिया जलाए’ हा उपक्रम.
ह्या अंतर्गत दि. 19 जानेवारी 2024 रोजी संस्थेच्या सभासद स्नेहल पुरंदरे ह्यांनी वाघबीळ येथील बालिकाश्रमातील मुलींची भेट घेतली. सुरुवातीला त्यांनी मुलींकडून रामरक्षा म्हणून घेतली. 22 जानेवारीला होणार्या भव्य राम मंदिराचे उद्घाटन अणि त्या अनुषंगाने होणार्या राम उत्सवाची माहिती दिली. तसंच श्रीरामाची कथा स्वरुपात माहिती दिली.
नुकत्याच झालेल्या संक्रांतीचं औचित्य साधून हा सण भोगी, संक्रांत आणि किंक्रांत असा तीन दिवस कसा साजरा केला जातो ते सांगत आपल्या संस्कृतीची ओळख करून दिली.
त्याच बरोबर सूर्याच्या मकर संक्रमणाची माहिती देत सूर्यनमस्काराचं शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वही सांगितलं. ठराविक आणि योग्य पद्धतीनी सूर्यनमस्कार कसे घालावे ह्याचं प्रात्यक्षिक त्यांची विद्यार्थिनी संचिका हिने दाखवलं व त्यानुसार सर्व मुलींकडून सूर्यनमस्कार घालून घेतले.
नंतर एक छोटासा एकाग्रता वाढविणारा खेळ आणि एक बोधपर गोष्ट सांगीतली गेली. त्यांनंतर शुभंकरोती म्हणून सत्र संपले.
अखेरीस तिळगूळा सारखं गोड वागायचं आणि बोलायचं ठरवून भेटीची गोड सांगता झाली.
निश्चितच स्नेहल पुरंदरे ह्यांची भेट बालिकाश्रमातील मुलींसाठी संस्मरणीय ठरेल.
कार्यक्रमाची काही क्षणचित्रं
‘प्रारंभ’ कला अकॅडमी , ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने आमच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत ‘आओ दिया जलाए’ हा उपक्रम नियमितपणे बालिकाश्रमामधे राबविला जातो. आज दि. 12 जानेवारी 2024 रोजी संस्थेचे सभासद स्मिता सांळगावकर, सुरेश सांळगावकर आणि व्रुषाली सावंत ह्यांनी बालिकाश्रमातील मुलींची भेट घेतली. बालवयात रुजवलेले संस्कार कायम स्मरणात रहातात. दैनंदिन जीवनात येणाऱ्या आव्हानांना कसे सामोरं जायचं ह्यासाठी विचारांची दिशा मिळते. योग्य अशा विचारधारेचं जणू बाळकडूच ह्या मूल्यशिक्षणातून मिळते.ध्यानधारणा म्हणजे काय, ती का करावी ह्याचे महत्व त्यांना समजावले. गणपती स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक, विविध प्रार्थना, काही गाणी आज मुलींना शिकवली. मुलींनी लक्षपूर्वक सर्व ऐकून आत्मसात केले.
काही क्षणचित्रं
'प्रारंभ ' कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने 'आओ दिया जलाए' ह्या आमच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत आमचे सदस्य बालिकाश्रमाला भेट देत असतात. आज दि.5 जानेवारी 2024 रोजी संस्थेच्या सदस्य अल्का आडगावकर ह्यांनी वाघबीळ गाव येथील बालिकाश्रमाला भेट दिली. ‘ प्रारंभ ' तसेच संस्थेच्या संस्थापिका संचालिका डॉ.अरूंधती भालेराव ह्यांचा परिचय करून दिला. त्याचबरोबर स्वतः चा ही परिचय करून दिला. शालेय शिक्षणाबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात केल्यास दैनंदिन जीवनात आपल्याला त्याचा फायदा होतो.छंद म्हणून जोपासल्या जाणाऱ्या कलांचे पुढील आयुष्यात व्यवसायात रूपांतर होऊ शकते. त्यामुळे मुलांना घडवताना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील असतो. आज अल्काताईंनी मुलींना टिश्यू पेपरपासून विविध प्रकारची फुले बनवायला शिकवले. आपण बनवलेली सफेद आणि क्रीम कलरची फुले बघून मुलींना खूपच आनंद झाला. नवीन काही शिकण्याचा मुलींचा उत्साह अगदी वाखाणण्याजोगा आहे. मुलींमधील कलागुण ओळखून, त्यांना प्रोत्साहन देत, योग्य ते मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आपण आपल्या हातांनी बनवलेली फुलं पाहून मुली हरखून गेल्या.नवनिर्मितीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.
काही क्षणचित्रे.
'प्रारंभ ' कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने 'आओ दिया जलाए' ह्या आमच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत आमचे सदस्य बालिकाश्रमाला भेट देत असतात.आज दि.15 डिसेंबर 2023 रोजी संस्थेच्या सदस्य स्वाती नाईक ह्यांनी वाघबीळ गाव येथील बालिकाश्रमाला भेट दिली.शालेय शिक्षणाबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात केल्यास दैनंदिन जीवनात आपल्याला त्याचा फायदा होतो.छंद म्हणून जोपासल्या जाणाऱ्या कलांचे पुढील आयुष्यात व्यवसायात रूपांतर होऊ शकते. त्यामुळे मुलांना घडवताना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील असतो.आज स्वातीताईंनी मुलींना (कागदी) पिवळा गुलाब आणि केशरी रंगाचा गुलाब तसेच फिलर फुले बनवायला शिकवली. मुलींनी फुले बनवण्याची पद्धत अगदी चटकन आत्मसात केली.नवीन काही शिकण्याचा त्यांचा उत्साह बघण्याजोगा होता.आपण आपल्या हातांनी बनवलेली फुलं पाहून नवनिर्मितीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.
काही क्षणचित्रे.
'प्रारंभ ' कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने 'आओ दिया जलाए' ह्या आमच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत आमचे सदस्य बालिकाश्रमाला भेट देत असतात.आज दि.8 डिसेंबर 2023 रोजी संस्थेच्या सदस्य स्वाती नाईक ह्यांनी वाघबीळ गाव येथील बालिकाश्रमाला भेट दिली.शालेय शिक्षणाबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात केल्यास दैनंदिन जीवनात आपल्याला त्याचा फायदा होतो.छंद म्हणून जोपासल्या जाणाऱ्या कलांचे पुढील आयुष्यात व्यवसायात रूपांतर होऊ शकते. त्यामुळे मुलांना घडवताना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील असतो.आज स्वातीताईंनी मुलींना (कागदी) मेक्सिकन पेट्युनिया ही फुले , पाने, पाकळ्या बनवायला शिकवली.मुलींनी फुले बनवण्याची पद्धत अगदी चटकन आत्मसात केली.नवीन काही शिकण्याचा त्यांचा उत्साह बघण्याजोगा होता.आपण आपल्या हातांनी बनवलेली फुलं पाहून नवनिर्मितीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.
काही क्षणचित्रे.
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने ‘आओ दिया जलाए’ ह्या आमच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत आमचे सदस्य बालिकाश्रमाला नियमित भेट देत असतात. दि. 1 डिसेंबर 2023 रोजी संस्थेच्या सदस्य स्वाती नाईक ह्यांनी वाघबीळ गांव येथील बालिकाश्रमाला भेट दिली. संस्थेचा, तसेच डॅा. अरुंधती भालेराव (संस्थापिका, संचालिका-प्रारंभ) आणि स्वत:चा परिचय स्वातीताईंनी करुन दिला.
शालेय शिक्षणाबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात केल्यास दैनंदिन जीवनात आपल्याला त्याचा फायदा होतो. छंद म्हणून जोपासल्या जाणाऱ्या कलांचे पुढील आयुष्यात व्यवसायात रुपांतर होऊ शकते. त्यामुळे मुलांना घडवताना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील असतो. आज स्वातीताईंनी मुलींना (कागदी) अस्टरची फुले बनवायला शिकवली. मुलींनी फुले बनवण्याची पध्दत अगदी चटकन आत्मसात केली. नवीन काही शिकण्याचा त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. आपण आपल्या हातांनी बनवलेली फुलं पाहून नवनिर्मितीचा आनंद त्यांच्या चेहर्यावरुन ओसंडून वहात होता.
काही क्षणचित्रं.
'प्रारंभ ' कला अकॅडमी ह्या आमच्या संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रमाअंतर्गत "आओ दिया जलाए" हा वार्षिक उपक्रम वाघबीळ गाव ठाणे येथील बालिकाश्रमात राबवला जातो. दि.24 नोव्हेंबर 2023 रोजी प्रारंभ कला अकॅडमीच्या सभासद अनघा जाधव यांनी बालिकाश्रमाला भेट दिली.प्रारंभ कला अकॅडमी ठाणे तसेच प्रारंभ कला अकॅडमीच्या संचालिका आणि संस्थापिका डॉ.अरुंधती भालेराव यांचा परिचय करून दिला . सुरूवातीला मुलींना मनोरंजनात्मक खेळ घेऊन एकाग्रतेचे महत्व पटवून दिले. .हे शिकवत असताना मुली ही खुप आनंदी उत्साही पणे प्रतिसाद देत होत्या. संध्याकाळ ची वेळ म्हणजे प्रसन्न असं वातावरण असते. अशा वेळी आजूबाजूचे वातावरण ही प्रसन्न मय झाले होते. संस्कारचे धडे घेऊन असताना त्यांनी बोधप्रद कथा सांगितली त्यातून स्वप्न पहा ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. अशक्य काहीच नसते. तसेच स्वतःवर प्रेम करा हा मुलींना संदेश दिला आणि शेवटी शब्दकोडी घेऊन मुलींच्या बुद्धीला चालना दिली. सर्व मुलींनी स्वतः कोडी तयार करून शब्दकोड्यांचा आनंद घेतला मन मोकळे होऊन संवाद साधला अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला.
काही क्षणचित्रे.
दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी प्रारंभ कला अकॅडमी ठाणे च्या वतीने वाघबीळ गाव ठाणे इथल्या बालिकाश्रमला "आओ दिया जलाए" ह्या वार्षिक उपक्रमांतर्गत दीपश्री जडये ह्यांनी भेट दिली . प्रारंभ अकॅडमी संस्थेच्या संस्थापिका संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांचा आणि प्रारंभ संस्थेचा परिचय प्रारंभच्या समन्वयिका सौ जयश्री मदने यांनी करून दिला . प्रारंभच्या सदस्या दीपश्री जडये यांनी मुलींना नवग्रह स्तोत्र शिकवले. नवग्रह स्तोत्र श्री. व्यास ऋषींनी रचले आहे. यावरून आपल्याला प्राचीन भारतीय खगोलशास्त्राच्या प्रगतीचा अंदाज येतो. अशी माहिती त्यांनी दिली. अगदी सोप्या आणि स्पष्ट शब्दांत स्तोत्राचा अर्थ त्यांनी समजावून सांगितला . त्यामुळे मुलींनी उत्साहाने प्रतिसाद दिला.अशाप्रकारे आता वर्षभर हा उपक्रम सातत्याने सुरू राहील.
काही क्षणचित्रे
दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी प्रारंभ कला अकॅडमी ठाणे च्या वतीने वाघबीळ गाव ठाणे इथल्या बालिकाश्रमाला आओ दिया जलाए’ ह्या वार्षिक उपक्रमाअंतर्गत अपर्णा सावंत आणि माधुरी तांबे ह्यांनी भेट दिली .प्रारंभ कला अकॅडमी संस्थेच्या संस्थापिका संचालिका डॉ. अरुंधती भालेराव ह्यांचा आणि प्रारंभ संस्थेचा परिचय प्रारंभच्या समन्वयिका सौ जयश्री मदने ह्यांनी करुन दिला. प्रारंभच्या सदस्या अपर्णा सावंत आणि माधुरी तांबे यांनी मुलींना श्री सूक्त शिकवले. त्याचबरोबर गणपती स्तोत्र, हनुमान चालीसा, गायत्री मंत्र आणि महालक्ष्मी मंत्र हे सुध्दा शिकवले. श्रावण महिन्यातला शेवटचा शुक्रवार म्हणून कार्यक्रमाच्या शेवटी भोंडल्याची गाणी म्हटली. मुलींनी मोठ्या उत्साहात आनंदाने गोल फेरा धरून , अतिशय आनंदाने भोंडल्याची गाणी म्हणत त्याला प्रतिसाद दिला . त्यामुळे या कार्यक्रमाची रंगत अजून वाढली. अशा प्रकारे आता वर्षभर हा उपक्रम सातत्याने सुरू राहील.
काही छायाचित्रे.
दिनांक ८ सप्टेंबर २०२३ रोजी प्रारंभ कला अकॅडमी ठाणे च्या वतीने 'वाघबीळ 'गाव ठाणे इथल्या बालिकाश्रम येथे "आओ दिया जलाएं" ह्या वार्षिक उपक्रमा अंतर्गत श्रीसूक्त शिकवण्यासाठी प्रारंभ कला अकॅडमी च्या सभासद वासंती कुलकर्णी आणि रश्मी कुलकर्णी यांनी मुलींना श्रीसूक्त शिकवले. त्यांचा उच्चार तसेच अर्थ समजावून सांगितले. हनुमान चालीसा आणि गणपती ची गाणी ह्याला मुलींनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला. नवीन काही शिकण्याने मुली आनंदी झाल्या. त्या मुळे श्रीसूक्त शिकवण्याचे आजचे सत्र खूपच छान झाले. अशाप्रकारे आता वर्षभर हा उपक्रम सातत्याने सुरू राहील.
काही क्षणचित्रे
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेतर्फे बालकाश्रमातील मुलांसाठी ‘आओ दिया जलाए’ हा सामाजिक उपक्रम वर्षभर राबवला जातो. अभ्यासाच्या जोडीने मुलांनी अनेक कला आत्मसात कराव्या, ह्या हेतूने आमचे सदस्य मुलांना भेटतात. ‘प्रारंभ’ च्या वतीने सौ. गौतमी पुजारे व प्रारंभ चा विद्यार्थी अनिमेश पुजारे या मुलांना भेटले. त्यांनी प्रार्थना, बालगीतं, भजनं, देशभक्तीपर, चित्रपटातली अशी विविध प्रकारची गाणी मुलांना शिकवली. सगळया मुलानी खुप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. मुलानी छोट्या अनिमेश ला त्यांच्या आवडत्या गाण्यांची फर्माईश केली व सोबती ने छान गाणी शिकली आणि म्हटली.
काही क्षणचित्रं. (३१ जुलै २०२२)
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेतर्फे बालकाश्रमातील मुलांसाठी ‘आओ दिया जलाए’ हा सामाजिक उपक्रम वर्षभर राबवला जातो. अभ्यासाच्या जोडीने मुलांनी अनेक कला आत्मसात कराव्या, ह्या हेतूने आमचे सदस्य मुलांना भेटतात. ‘प्रारंभ’ च्या वतीने मनिषा घाडगे मुलांना भेटल्या. अनेक श्लोक, प्रार्थना, बालगीतं, बडबडगीतं, गुरुवंदना, भजनं अशी विविध प्रकारची गाणी त्यांनी मुलांना शिकवली. काही क्षणचित्रं.(24 जुलै 2022)
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने ‘आओ दिया जलाए’ हा सामाजिक उपक्रम अनाथाश्रमात राबवला जातो. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा ह्याकरिता विविध कला आम्ही मुलांना शिकवतो. ह्या अंतर्गत पंकज पाडाळे सरांनी प्रारंभच्या वतीने मुलांची भेट घेतली. वेगवेगळी गाणी त्यांनी मुलांना ऐकायला, म्हणायला शिकवली. त्या गाण्यांवर त्यांनी मुलांना नृत्य प्रशिक्षण दिले. मुलांनी उत्साहाने ते आत्मसात केले. काही क्षणचित्रं. 17 जुलै 2022
रविवार दि. १० जुलै २०२२ रोजी ‘प्रारंभ’ कला अकॅडमी ठाणे, ह्या आमच्या संस्थेच्या वतीने ‘आओ दिया जलाए’ हा सामाजिक उपक्रम राबवला जातो. त्या अंतर्गत श्री. सुनील भगत सर अनाथाश्रमातील मुलांना भेटले. अभ्यासाबरोबरच इतरही कला मुलांना शिकायला मिळाव्या हा आमचा मानस आहे. त्या द्रुष्टीने श्री. सुनील भगत सरांनी मुलांना गाण्याचे प्रशिक्षण दिले. प्रार्थना, सकारात्मक विचार रुजवणारी, मुलांना चटकन आत्मसात होतील अशी नादमय गाणी सरांनी मुलांना शिकवली. पसायदानाने आजच्या सत्राचा समारोप झाला. काही क्षणचित्रं.
प्रारंभ कला अकॅडमी या आमच्या संस्थेच्या अनाथाश्रम प्रकल्पाच्या अंतर्गत पंकज पाडाळे यांनी भारुडावर आमच्या अनाथाश्रमातल्या मुलांना अतिशय सुंदर प्रशिक्षण दिलं त्यातले काही अंश
प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने ‘आओ दिया जलाए’ हा वर्षभर राबवला जाणारा सामाजिक उपक्रम. संस्थेच्या वतीने पंकज पाडाळे ह्यांनी बालकाश्रमातील २५ जुन २०२२ मुलांना भेट दिली. विविध कलांचे प्रशिक्षण ह्या वेळी मुलांना देण्यात येते. लोककलांची मुलांना माहिती व्हावी,ह्या हेतूने पंकज ह्यांनी मुलांना भारुडाची ओळख करुन दिली. काही क्षणचित्रं.
प्रारंभ कला अकडमी ठाणे या संस्थेच्या वतीने अनाथआश्रम प्रकल्पाच्या वार्षिक उपक्रमांचा अंतर्गत काल दि. ५ जून २०२२ रोजी प्रारंभ कला अकॅडमी ची माजी विद्यार्थिनी तेजश्री मुळे हिने मुलांना समूह नृत्याच प्रशिक्षण दिलं याचा काही अंश...
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने ‘आओ दिया जलाए’ हा सामाजिक उपक्रम वर्षभर राबवला जातो. संस्थेच्या सचिव कीर्ति केरकर ह्यांनी आज दि. २२ मे २०२२ रोजी बालिकाश्रमातील मुलांची भेट घेतली. मुलांच्या जाणिवा सशक्त व्हाव्यात, मोठ्या विचारवंतांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावेत हा ह्या भेटींमागचा उद्देश असतो. श्री.अरुण शेवते लिखित ‘हाती ज्यांच्या शून्य होते’ ह्या पुस्तकातील स्टीव्ह जॅाब्स ह्यांची प्रेरणादायक गोष्ट कीर्ति ह्यांनी मुलांना सांगितली. तसेच प्रवीण दवणे ह्यांच्या उद्बोधक कथा त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत सांगितल्या. मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. काही क्षणचित्रं.
‘प्रारंभ‘ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने ‘आओ दिया जलाए’ हा सामाजिक उपक्रम राबवला जातो. संस्कारक्षम वयात मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, मोठ्या व्यक्तिंचे विचार त्यांना समजावेत, त्यामधून स्फूर्ती घेऊन मुलांची जडण-घडण व्हावी हा आमचा उद्देश आहे. संस्थेच्या वतीने ‘प्रारंभ’ च्या विश्वस्त मनीषा आचार्य ह्यांनी आज दि.15 मे 2022 रोजी बालकाश्रमातील मुलांची भेट घेतली. अपयशाने मुळीच खचून न जाता, आपले ध्येय साध्य करत यशस्वी कसं व्हावं, हे सांगणार्या क्रुष्णमेघ कुंटे ह्यांच्या गोष्टी सांगितल्या. हसत्या - खेळत्या, प्रेमळ वातावरणात, अभ्यासाबरोबरच मुलांचा सर्वांगीण विकास कसा होतो, हे सांगणार्या तेत्सुको कुरोयानागी ह्यांच्या तोत्तोचान
ह्या पुस्तकातील कथा, डॅा. ए.पी.जे.अब्दुल कलाम ह्यांच्या ‘अग्निपंख’ पुस्तकातील काही उतारे ह्यांचे वाचन केलं.
निखळ आनंद देणार्या दिलीप प्रभावळकरांच्या ‘बोक्या सातबंडे’ च्या गोष्टीने तर धमाल उडवून दिली.
काही क्षणचित्रं.
प्रारंभ कला अकॅडमी,ठाणे ह्या आमच्या संस्थेतर्फे ‘आओ दिया जलाए’ हा उपक्रम वर्षभर राबवला जातो. संस्कारक्षम वयात मुलांवर चांगले संस्कार व्हावेत ह्या उद्देशाने प्रारंभच्या वतीने आमचे सदस्य बालकाश्रमातील मुलांची भेट घेतात. आज दि 1 मे 2022 रोजी वैशाली घांगरेकर ह्यांनी मुलांना छान छान गोष्टी सांगितल्या. गुरु-शिष्य नात्याच्या गोष्टी, नारायण मूर्ती लिखित मैत्री विषयी कथा,भूतदयेविषयी स्वामी विवेकानंदांची कथा अशा अनेक उत्तम कथा त्यांनी मुलांना सांगितल्या. ह्या कथासत्रात मुलं अगदी रंगून गेली. काही क्षणचित्रं.
The point of using dummy text for your paragraph is that it has a more-or-less normal distribution of letters. making it look like readable English.
प्रारंभ कला अकॅडमी , ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने येऊर बालकाश्रमममधे वर्षभर उपक्रम राबवले जातात. आज १६ एप्रिल २०२२ रोजी संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका डॅा. अरुंधती भालेराव ह्यांच्या सह संस्थेच्या विश्वस्त मनीषा आचार्य मुलांना भेटायला गेलो. आमच्या वार्षिक उपक्रमाचा विद्यार्थ्यांकडून आढावा घेतला. मुलांशी गप्पा मारल्या. त्यांना खाऊ वाटप केलं. मुलं खूप खुश होती त्यांनी मज्जा केली. दोन तास कसे गेले कळलेच नाही.
प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेतर्फे ‘आओ दिया जलाए’ हा प्रकल्प वर्षभर बालकाश्रमामधे राबवला जातो. थोर व्यक्तींची ओळख मुलांना व्हावी, त्यांच्या कार्याची महती मुलांना समजावी, त्यातून प्रेरणा घेऊन मुलांची चांगली जडणघडण व्हावी ह्या जाणीवेतून प्रारंभचे सदस्य मुलांना भेटत असतात.
आज दि १७ एप्रिल २०२२ शलाका देसाई ह्यांनी मुलांची भेट घेतली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांविषयी स्फूर्तीदायक व्याख्यान त्यांनी दिले. सावरकरांच्या अनेक गोष्टी, त्यांचे कार्य ह्यांची ओळख मुलांना करुन दिली. सावरकररचित शिवाजी महाराजांवरील आरती त्यांनी मुलांना शिकवली. त्यांच्या अनेक कविता मुलांना म्हणून दाखवल्या.
काही क्षणचित्रे.
प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने, आमच्या सामाजिक उपक्रमा अंतर्गत ‘आओ दिया जलाए’ हा प्रकल्प येऊर येथील बालकाश्रमामधे राबवला जातो. संस्थेच्या वतीने आज दि. 10 एप्रिल 2022 रोजी , अनघा जाधव ह्यांनी माननीय अटलबिहारी वाजपेयी ह्यांचा जीवनपट मुलांना उलगडून दाखवला. थोर व्यक्तिमत्वांची ओळख मुलांना व्हावी, त्यातून मुलांनी स्फूर्ती घ्यावी, हा उद्देश ह्या प्रेरणादायी व्याख्यानांमागे आहे. आजच्या सत्राची सुरुवात ‘हीच आमुची प्रार्थना’ ह्या प्रार्थनेने झाली. सकारात्मक गोष्टींच्या माध्यमांतून वाजपेयीजींची माहिती त्यांनी मुलांना सांगितली. त्यांच्या कार्याची ओळख मुलांना करुन दिली.
वाजपेयीजींच्या अनेक कविता मुलांना शिकवल्या. विविध उपयुक्त कोडी आणि खेळांद्वारे आजचे सत्र संपन्न झाले.
काही क्षणचित्रे
प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने ‘आओ दिया जलाए’ हा प्रकल्प आमच्या सामाजिक उपक्रमा अंतर्गत येऊर येथील बालकाश्रमात वर्षभर राबवण्यात येतो. आज दि. 27 मार्च 2022 रोजी प्रारंभच्या वतीने सुजाता कुरुंभटे ह्यांनी ह्या बालकाश्रमामधे जाऊन ‘मानसिक आरोग्य’ ह्या विषयावर मुलांशी संवाद साधला. विविध कथांच्या माध्यमातून तसेच काही खेळ घेऊन ,मानसिक आरोग्य म्हणजे काय, त्याचे महत्व मुलांना पटवून दिले. मुलांच्या अनुभवांचे दाखले देत, चर्चात्मक पध्दतीने सकारात्मक विचार कसा करावा, त्याचे चांगले परिणाम कसे महत्त्वाचे असतात हे त्यांनी छान समजावून दिले.
काही क्षणचित्रे.
प्रारंभ कला अकॅडमी चा आणखीन एक वार्षिक उपक्रम म्हणजे अनाथ आश्रम मध्ये विविध विषयांवर वर्षभर उपक्रम राबवणे .त्याअंतर्गत आज दि. १५ मार्च २०२२ आमचा विषय या महिन्यासाठी आहे स्व स्वच्छता. हा विषय आम्हाला अतिशय महत्त्वाचा वाटला. म्हणूनच येऊर येथील बालक आश्रमात आज वर्षा पालशेतकर या आमच्या शिक्षिका मैत्रिणी ने मुलांना स्व स्वच्छतेचे धडे दिले. काही क्षणचित्रे
दि. १३ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रारंभ कला अकॅडमीच्या "आओ दिया जलाये" या आमच्या वर्षभर राबवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमाच्या अंतर्गत "येऊर "येथील बालक आश्रमामध्ये प्रारंभ चा आमच्या प्रत्येक उपक्रमांमध्ये सहभागी होणारा मित्र नृत्य शिक्षक ,पंकज पाडाळे याने मुलांना भारुडाच प्रशिक्षण दिलं. बालकाश्रम मधील मुलांना घटका दोन घटका त्यामुळे नक्कीच आनंद मिळाला. काही अंश.
प्रारंभ कला अकॅडमी या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत रविवारी ३१ जानेवारी २०२२ रोजी येऊर येथे बालिकाश्रमामध्ये
मुलांना, आमच्या प्रारंभ कला अकॅडमी वर प्रेम करणारी, आमच्या विविध उपक्रमांमधून जोडल्या गेलेली सखी नेहा बागवे यांनी एकाहून एक सरस अशी समूहगीत शिकवली .मुलांनी ताल, लय ,शब्द याचा मनापासून आनंद घेतला.
आज दि. २३ जानेवारी २०२२ रोजी प्रारंभ कला अकॅडमी ठाण्याच्या वतीनं येऊर येथील आमच्या अनाथाश्रम प्रकल्पा अंतर्गत प्रारंभच्या प्रारंभ वर प्रेम करणार्या सदस्या नेहा बागवे यांनी मुलांना उत्तमोत्तम प्रेरक बोधपर बालकथा सांगितल्या आणि त्याचबरोबर मुलांना समूह गीतं शिकवली .आमच्या सुनील भगत सरानंतर नेहा बागवेंनी शिकवलेली गाणी मुलांना खूप आवडली.
काल दि. १५ जानेवारी २०२२ रोजी प्रारंभ कला अकॅडमीच्या यावर्षीच्या बालिकाश्रम उपक्रमांतर्गत येऊर येथील विवेकानंद बालिकाश्रमात आमचे सुनील भगत सर आणि नवाळे सर यांनी मुलांना विविध समूह गीत प्रकार शिकवलेत. त्याची क्षणचित्रे ...
प्रारंभ कला अकॅडमीचा बालिकाश्रम उपक्रम २०२२
मागच संपूर्ण वर्षभर आम्ही भिवंडीजवळ आनगाव येथे अनाथाश्रमामध्ये ज्या कला या मुलांपर्यंत पोचत नाहीत त्या घेऊन काम करत होतो. नाट्य ,नृत्य, संगीत ,स्व स्वच्छता, मानसिक आरोग्य असे अनेक विषय हाताळत होते .नाटक मी स्वतः घेत होते आणि बाकी विषयांसाठी त्या त्या विषयाचे तज्ज्ञ मिळून आम्ही वर्षभर काम करत होतो .तीन जानेवारीला आम्ही आनगावच्या बालिकाश्रमामध्ये आमच्या या उपक्रमाचा समारोप केला.
आणि आता आमचा मोर्चा आम्ही वळवलाय येऊरच्या बालिकाश्रमामध्ये .संगीत या विषयापासून जानेवारी २०२२ महिन्यापासून आमच्या या उपक्रमाला सुरुवात झाली .आता वर्षभर आम्ही असू येऊरच्या बालिकाश्रमात .समूहगीत हा विषय घेताना आमचे सुनील भगत सर .
प्रारंभ कला अकॅडमीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत आज येऊर येथील बालकाश्रमामध्ये प्रारंभ ची अनेक वर्ष नाट्यकलेची विद्यार्थिनी राहीलेली आणि सध्याची उत्तम नृत्यांगना तेजश्री मुळे हिने सगळ्या मुलांना अतिशय सुंदर समूह नृत्यानं या फेब्रुवारी महिन्याच्या नृत्य संकल्पनेची सुरवात केली .आपली विद्यार्थिनी जेव्हा दुसर्या विद्यार्थ्यांना एखादी कला शिकवते किंवा त्यांना घडवण्यासाठी प्रयत्न करते तो आनंद शब्दांच्या पलीकडचा .खूप समाधान देणारा आजच्या तिच्या सत्राची ही छोटीशी झलक.
सगळ्यांना सर्व प्रथम नविन वर्षाच्या खुप शुभेच्छा. प्रारंभ कला अकॅडमी ह्या मी सुरु केलेल्या संस्थेला वीस वर्ष कधी झाली कळलच नाही..माझ्या संस्थेपासून आमची संस्था म्हणणार्या अनेक सख्या सातत्याने जोडल्या गेल्या आणि जात आहेत..संस्थेचे विविध उपक्रम, माझ्या विविध कार्यशाळा, त्यात सहभागी होणाऱ्या अणि त्यासह विविध उपक्रमात सामील होणार्या वेगवेगळया वयोगटातील मैत्रिणी ,त्यांची ऊर्जा आणि त्यांच्या सहकार्याने माझा वाढणारा उत्साह . दरवर्षी विविध उपक्रमातून एक एक नविन पाऊल टाकताना होणारा आनंद. माझे ,आमचे प्रत्येक सामाजिक उपक्रम हे कलेच्या माध्यमातून जोडलेले असतात..आमच्या कलेच्या मूळ छंदाला आम्ही सोडत नाही. पण सामाजिकतेच भान ठेवत काही वेगळं करण्याचा आमचा कायम प्रयत्न असतो. असेच आमचे पुढचे पाऊल म्हणजे बालिकाश्रम .नृत्य. नाट्य,संगीत आणि इतर अनेक गोष्टी इच्छा असूनही परिस्थिती मुळे ज्या मुलांना खाजगी वर्ग लावून शिकता येत नाही अश्या मुलांना त्यांच्या पर्यंत वर्षभर जाऊन त्यांना विनामूल्य शिकविण्यासाठी मी एक अभ्यासक्रम माझ्या संस्थेच्या सख्यांच्या मदतीने केलाय. हा उपक्रम काल पासुन नृत्य वर्गाने सुरू झाला.आमची मैत्रीण उत्तम नर्तिका , अभिनेत्री ,दिग्दर्शिका गायिका, वर्षा ओगले हिने स्वतःहून उत्साहाने ह्या उपक्रमात सहभागी होत काल आमच्या "आओ दिया जलाये" ह्या उपक्रमाचा बालिकाश्रम मधील मुलीना लोक नृत्याचे धडे देत शुभारंभ केला. आमचा संस्थेचा प्रसाद सावंत जो ह्या उपक्रमाचा समन्वयक आहे त्याची मोलाची साथ ही आणखीन जमेची बाजु...नवीन वर्षाची सुरवात मस्त झाली. काही दृश्य
प्रारंभ कला अकॅडमी ह्या आमच्या संस्थेच्या बालिकाश्रम येथील मुलांसाठी आम्ही सुरू केलेल्या आओ दिया जलाये अर्थात "साथी हात बढाना " ह्या उपक्रमाचा आजचा आनगाव येथील दिवस..मुलानी वर्षा मावशीचे लोक नृत्याचे धडे एन्जॉय केलेत. काही क्षणचित्रे.
प्रारंभ कला अकॅडमी ह्या आमच्या संस्थेच्या बालिकाश्रम येथील मुलांसाठी आम्ही सुरू केलेल्या आओ दिया जलाये अर्थात "साथी हात बढाना " ह्या उपक्रमाचा
आनगाव येथील दिवस..मुलानी वर्षा मावशीचे लोक नृत्याचे धडे एन्जॉय केलेत. काही क्षणचित्रे.
ह्या अनाथ मुलांच्या चेहर्यावर दिसणारा आनंद मला ऊर्जा तर देतोच पण जे आहे त्यात समाधानी राहण्याचा मंत्रही..एकच आयुष्य आहे ..मला काय मिळेल ह्या पेक्षा ह्याना, मला ,आम्हाला काय देता येईल हा विचार करायला सतत प्रोत्साहित करतो.
प्रारंभ कला अकॅडमी ह्या आमच्या संस्थेचा आजचा बालिकाश्रम उपक्रम आणि त्याची झलक..वर्षा ओगले आणि आमचा प्रसाद सावंत ह्यांच मनापासून कौतुक
प्रारंभ चा बालिकाश्रम ३१ जानेवारी २०२१ रोजीचा उपक्रम
आज दि. ७ फेब्रुवारी २०२१ रोजी बालिकाश्रम आश्रमातील माझा दिवस मुलांच्या बरोबर मजेत
गेला. मी लॉक डाऊन नंतर अभिनय आणि त्यातून व्यक्तिमत्त्व विकास हा माझा लाडका विषय तब्बल दहा महिन्याच्या नंतर मुलांच्या बरोबर घेतला..बालिकाश्रम मधील ह्या पासुन लांब असणारी आणि इच्छा असुनही शिकायला न मिळणारया मुलींचा उत्साह आणि ऊर्जा मला दुप्पट आनंद देऊन गेला..खुप समाधान मिळाले.
१४ फेब्रुवार २०२१ प्रारंभ कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या '"आओ दिया जलाये "ह्या प्रकल्पाच्या अंतर्गत सध्या ह्या महिन्याची थीम नाटक आणि व्यक्तिमत्त्व विकास आहे..मी दर रविवारी आणगाव ह्या गावांत दिड तासाच्या अंतरावर नाटक विष य घ्यायला जातेय. वेळ कसा जातो कळत नाही.. बालिकाश्रम मधील त्या गोजिरवाण्या मुली माझ्याकडून काय शिकतात माहिती नाही .पण मी मात्र आनंदी कस रहायचे ,प्राप्त परिस्थितीत हसत त्याचा स्विकार कसा करायचा. आणि आहे ते आनंदात स्विकारायला त्यांच्या कडून शिकतेय..काही क्षणचित्रे
रविवार दि. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी भिवंडी जवळील बालिका आश्रमामद्ये मी नाटकाच्या माध्यमातून मुलींना संवाद , देहबोली , उच्चार व आवाज यांचे प्रशिक्षण दिले. हि तयारी करून घेताना असं लक्षात आलं कि ह्या मुलींमद्ये खुप उत्साह आहे. आणि त्याचबरोबर शिकवलेल आत्मसात करण्याची क्षमता सुद्धा
दि. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रारंभ कला अकॅडमी च्या अंतर्गत बालिका आश्रम येथे झालेल्या अभिनय आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण वर्गात मुलींना उच्चार, भाषा, आत्मविश्वास, देहबोली, संवाद याचे सराव करून घेण्यात आले. ते करून घेत असताना त्यांच्यामद्ये पहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्वास दिसून आला. लवकरच आश्रमातील ह्या मुलींचा विविधरंगी कार्यक्रम आपल्या समोर सादर होईल. आपले आशिर्वाद सदैव ह्या मुलींच्या पाठीशी असुद्या.
स्नायू लवचिकता आणि हाडांची बळकटी ह्या विषयाचे प्रात्यक्षिकांसह विवेचन करीत आजचा बालिकाश्रम येथील प्रारंभ कला अकॅडमी च्या सामाजिक कार्या अंतर्गत आमच्या 'आओ दीप जलाये' ह्या प्रकल्पा अंतर्गत वर्षा पालशेतकर ह्यांनी मुलींना मार्गदर्शन केले
प्रारंभ कला अकॅडमी ठाणे च्या सामाजिक प्रकल्पाच्या अंतर्गत बालिकाश्रम येथील मुलींसाठी आम्ही मासिक पाळी आणि त्यासंबंधीची काळजी कशी घ्यावी ,त्यामधील आरोग्य कसे सांभाळावे ह्या बाबत आमच्या वर्षा पालशेतकर ह्यांनी अतिशय सोप्या शब्दात मुलीना मार्गदर्शन केल..त्यातील काही क्षणचित्रे.
आज दि. ४ एप्रिल २०२१ प्रारंभ कला अकॅडमी ह्या आमच्या संस्थेच्या 'आओ दिया जलाये ' ह्या बालिकाश्रम अंतर्गत उपक्रमात ह्या महिन्याची सुरवात संगीत ह्या विषयाने झाली. सरगम, स्वागतगीत आणि इतर सांगीतिक स्वरांनी माझा मैत्रिणी अनघा बोडस आणि राजश्री लेले ह्यांनी मुलीना गाते केले..मुलीना उत्तम गाता येते फक्त बस थोडेसे प्रशिक्षण द्यावे लागेल असे वाटतेय..त्यांच्या पर्यंत ह्या सगळ्या कलांच्या माध्यमातून आमचा हा सामाजिक छोटासा कलात्मक वाटा. समाजातून जे घेतो ते काही रुपाने सामाजिकतेचे भान ठेवत समाजाला परत द्यावे हाच प्रारंभ कला अकॅडमी चा उद्देश
प्रारंभ कला अकॅडमी ठाण्याच्या सामाजिक उपक्रमांतर्गत आओ दिया जलाएं अर्थात साथी हाथ बढाना हा बालिकाश्रम मधील कट्टा सुनील भगत सरांच्या सांगीतिक मार्गदर्शनाखाली रंगला सरांनी मुलींना अतिशय उत्तम असं समूहगीत शिकवलं .बालिकाश्रम मधील सगळ्याच मुलींना गाण्याचं उत्तम अंग आहे हे सिद्ध झालं. या मुलींच्या नृत्य नाट्य संगीताचा देखणा सोहळा लवकरच संपन्न होईल.
आज दि. २७ जून प्रारंभच्या बालिकाश्रम कट्ट्यांवरील उपक्रमाचा संगीत हा विषय या महिन्यांपुरता संपला. सुनील भगत सर यांनी मुलींना एका एकापेक्षा एक सरस समूह गीतं शिकवली .मुली त्यांच्याबरोबर खूश होत्य। मुलींकडे अतिशय गोड गळा आहे हे जाणवलं .सुनील भगत सर हे माझ्याबरोबर मी बीएड करत असताना काही वर्षांपूर्वी होत. तेव्हाही ते उत्तम गायच। मधल्या काळात आमचा संपर्क तुटला होत. परंतु संतोष म्हात्रे सरांमुळे तो परत आला. आणि माझ्या एका शब्दावर भगत सरांनी कोविद किंवा इतर कुठलंही कारण न सांगता कुठलेही आढेवेढे न घेता मुलींना अतिशय मनापासून फार सुंदर गाणे शिकवले. प्रारंभच्या या बालिकाश्रम उपक्रमात मी स्वतः नाट्यशास्त्र हा विषय घेतला. वर्षा पालशेतकर यांनी आत्तापर्यंत स्वच्छता आणि मासिक पाळीतील स्वच्छता याविषयी उपक्रम घेतला. वर्षा उगले यांनी नृत्याची बाजू उत्तम सांभाळल। आणि अशाप्रकारे हा कट्टा दरदिवशी रंगत जातो आह. आणि ववर्षभर असाच रंगत जाणार आहे .
प्रारंभ कला अकॅडमी ह्या आमच्या संस्थेचा ११ जुलै बालिकाश्रम उपक्रम आणि त्याची झलक..वर्षा ओगले ह्यांच मनापासून कौतुक..
The point of using dummy text for your paragraph is that it has a more-or-less normal distribution of letters. making it look like readable English.
प्रारंभ कला अकॅडमीचा 'आओ दिया जलाएं' या सामाजिक उपक्रमाअंतर्गत बालिकाश्रमातील लोकनाट्याचा कट्टा काल आणि आज मस्त रंगला .लोकनाट्य शिक्षक अनिल केंगार यांनी मुलांना अतिशय मनापासून लोकनाट्याच्या विविध प्रकारांची दोन दिवस सातत्याने ओळख करून दिली . आश्रमातील मुलींना शिकत असताना याचा आनंद घेतला जो त्यांच्या कृतीतून आपल्याला बघायला मिळतो .
प्रारंभ कला अकॅडमीच्या वतीने बालिकाश्रम अर्थात आओ दिया जलाएं या आमच्या उपक्रमांतर्गत शनिवार २३ ऑक्टोबर रविवार २४ ऑक्टोबर रोजी बालिकाश्रमातील मुलींना लोकनाट्याच मार्गदर्शन लोकनाट्य कलाकर अनिश बांगर यांनी अतिशय उत्तमपणे केलं .त्यांचे आणि प्राध्यापक शिवाजी वाघमारे यांचे मनःपूर्वक आभार
आपण सगळेच वेगवेगळ्या मार्गाने आपला आनंद शोधत असतो. परंतु सामाजिकतेच भान ठेवून, दुसऱ्यासाठी वेळ काढून इतरांना दिला जाणारा आनंद काही औरच असतो. त्यासारखं समाधान मला तरी दुसऱ्या कशातच मिळत नाही. प्रारंभ कला अकॅडमी ठाणे ही आमची संस्था दरवर्षी वर्षभर एक वृद्धाश्रम आणि एक अनाथाश्रम यासाठी विविध मित्रमंडळींच्या ,कलाकारांच्या माध्यमातून विनामूल्य वार्षिक उपक्रम राबवत असते .आज आमच्या या वार्षिक उपक्रमाचा "येऊर "येथील विवेकानंद बालकाश्रमामध्ये समारोप झाला. वर्षभर आमचे कार्यकर्ते, आणि मी मी स्वतः , विविध कलांच्या माध्यमातून दर रविवारी इथे येत होतो. आज आमच्या समारोपाला मर्चंट नेव्हीचे कॅप्टन वैभव दळवी त्यांच्या सुविद्य पत्नी कीर्ती दळवी आणि मातोश्री सुनिता दळवी उपस्थित होते .यावेळी विवेकानंद बालकाश्रमाच्या प्राची कसबेकर यादेखील उपस्थित होत्या .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रारंभच्या विद्यार्थिनी आणि पालक गौतमी पुजारे यांनी केलं. कार्यक्रमाची सुरुवात प्रारंभचा विद्यार्थी अनिमेष पुजारे याच्या गायनाने झाली. प्रारंभ कला अकॅडमीच्या विश्वस्त वैशाली कुलकर्णी आणि मनीषा आचार्य यावेळी उपस्थित होत्या .कॅप्टन वैभव दळवी यांनी मुलांना गोष्टीच्या माध्यमातून फार सुंदर मार्गदर्शन केलं. सुनीला दळवी यांनी देखील मुलांना आशीर्वाद दिले. प्रारंभच्या संस्थापिका संचालिका अरुंधती भालेराव यांनी प्रास्ताविक केलं आणि मनीषा आचार्य यांनी वार्षिक अहवाल सादर केला .यावेळी आश्रमातील सगळ्या बालगोपालांना प्रारंभ कला अकॅडमी च्या वतीने चवनप्राशचे डबे भेट म्हणून देण्यात आले. तसेच चॉकलेट्स आणि खाऊ वाटप करण्यात आल यावेळी प्रारंभचे पालक अनिरुद्ध पुजारे देखील उपस्थित होते.आता आमचा मोर्चा नवीन बालकाश्रमाकडे वळणार ! (25 Dec 2022)
प्रारंभ कला अकॅडमी ठाणे या आमच्या संस्थेच्या वतीने २८ ऑक्टोबर आज आमच्या 'आजी आजोबा कट्टा 'या सामाजिक प्रकल्पांतर्गत वानप्रस्थाश्रम आनगाव येथे आम्ही
सखी गं सखी या पराग घोंगे लिखित दीर्घांका तील काही प्रवेशांचे अभिवाचन केले माझ्या विद्यार्थिनी आणि नाटकातील सामाजिकतेचे भान असलेल्या कलावंत वर्षा पालशेतकर , प्राजक्ता परांजपे अलका राजर्षी आणि मी , आम्ही दीड तास आजी आजोबांशी संवाद साधला. वानप्रस्थाश्रमा चे व्यवस्थापक जयंत गोगटे यांनी प्रास्ताविक केले .आजी आजोबांचा उत्तम प्रतिसाद मनाला आनंद देऊन गेला
प्रारंभ कला अकॅडमी या आमच्या संस्थेच्यावतीने आम्ही मागचं सबंध वर्षभर भिवंडीजवळ आनगाव येथे बालिकाश्रमामध्ये कलेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत होतो .आज दि. ३ जानेवारी २०२२ ला त्या उपक्रमाचा समारोप आम्ही मुलींना खाऊ आणि बक्षीस देऊन केला .यावेळी राष्ट्रीय सेवा संघाचे दादा वेदक बालिकाश्रमाच्या विश्वस्त डॉ अश्विनी बापट मी स्वतः डॉ. अरुंधती भालेराव ,प्रारंभच्या विश्वस्त सचिव ,सल्लागार आणि इतर अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते .दादा वेदक यांनी आम्हा सगळ्यांकडून विठ्ठल भक्ती करणारा सत्संग करुन घेतला .बालिकाश्रमातील मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद हा शब्दांच्या पलीकडचा .काही क्षणचित्रे .
आता आमची रवानगी नवीन बालिकाश्रमात !पुन्हा कलेच्या माध्यमातून सामाजिक देवाणघेवाण .
आजी आजोबा कट्टा
प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे
"आजी-आजोबा कट्टा"
०५-०३-२०२४
प्रारंभ तर्फे "आजी-आजोबा कट्टा" हा कार्यक्रम काल्हेर येथील वृद्धाश्रमात दर मंगळवारी आयोजित केला जातो. आज प्रारंभचे एक सभासद, श्री. प्रफुल साने ह्यांनी वृद्धाश्रमाला भेट दिली.
श्री. प्रफुल साने हे स्वतः एक चांगले गायक आहेत. विविध प्रकारची गाणी कॅरावके वर म्हणून त्यांनी आज आजी-आजोबांचं खूप छान मनोरंजन केलं. गणपतीच्या गाण्याने सुरुवात केली. त्यानंतर मराठी भावगीते आणि जुनी हिंदी गाणी यांची सुरेल मैफल रंगली. आमचे आजी-आजोबा मनापासून ज्यात रमतात आणि आनंद लुटतात अशी काही कोळी गीतंही त्यांनी म्हटली. त्यानंतर गवळण गायली.
आजी-आजोबांनी त्यांच्या सर्वच गाण्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि गाण्यांवर नाचून मनमुराद आनंद लुटला. आजी आजोबांचा उत्साह आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्वांनाच समाधान देऊन गेला आणि जणू काही आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अवस्था झाली.
शेवटी एका कोळी गीतानेच कार्यक्रमाची सांगता झाली.
आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं.
प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे
"आजी-आजोबा कट्टा"
२७-०२-२०२४
काल्हेर येथील वृद्धाश्रमात दर मंगळवारी होणाऱ्या "आजी-आजोबा कट्टा" ह्या कार्यक्रमाची धुरा आज प्रारंभचे सभासद श्रीयुत नंदन भालवणकर यांनी स्वीकारली.
श्रीयुत नंदन भालवणकर हे चांगले गायक आहेत व त्यांनी आज वेगवेगळ्या धाटणीची गाणी म्हणून आजी-आजोबांचं मनोरंजन केलं.
'मंदिरात अंतरात तोच नांदताहे' ह्या भक्ती गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर काही उडत्या चालीची हिंदी गाणी गायली गेली आणि आजी आजोबांचा मूड एकदम छान झाला. आजी-आजोबांनी कोळीगीतांची फर्माईश केली आणि थोड्या वेळ कोळी गीतेही लावली गेली. त्यावर नेहमीप्रमाणेच सगळेच थिरकले. एकमेकांना धरून आगगाडीचे डबे करून नाच केला.
त्यानंतर श्रीयुत भालवणकरांनी उडत्या चालीचं कृष्ण गीत गायलं. तसंच गरबा गीते आणि गरब्याच्या ठेक्यावरची गाणीही गायली.
शेवटी झिंगाट ह्या गाण्यावर सगळेच बेभान होऊन नाचले आणि 'परत या' असं आग्रहाचे निमंत्रण करत कार्यक्रम संपला.
सुख म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सगळ्या आजी-आजोबांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद आणि गाण्याच्या तालावर बेभान होऊन नाचताना, क्षणभर का होईना त्यांना पडलेला दुःखाचा विसर, हेच सुख आहे याची अनुभूती सगळ्यांनाच आली.
आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं
प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे
"आजी आजोबा कट्टा"
२०-०२-२०२४
काल्हेर येथील वृद्धाश्रमात दर मंगळवारी प्रारंभ तर्फे होणाऱ्या "आजी-आजोबा कट्टा" ह्या कार्यक्रमात प्रारंभचे सभासद श्रीयुत सुबोध चितळे ह्यांनी पु़. ल. देशपांडे लिखित 'असा मी असामी' ह्या लेखनाधारे, विनोदी एकपात्री प्रयोग सादर केला.
पुलंचं लिखाण आपल्याला क्षणभर आपली दुःख, काळज्या ह्यांचा विसर पडायला मदत करतं. आज वृद्धाश्रमातल्या आजी-आजोबांना देखील पुलंच्या विनोदी साहित्याची जणू मेजवानीच मिळाली. पुलंच्या खास भाषाशैलीतून आणि दमदार लेखणीतून साकारलेले कोकणातील एका मध्यमवर्गीय कारकूनाचे काल्पनिक चित्र श्री सुबोध चितळे ह्यांनी, धोंडू भिकाजी जोशी ह्या व्यक्तिमत्त्वातून अतिशय खुमासदार पद्धतीने, सुंदररित्या साकारले. हे सादर करताना त्यांचा ह्या व्यक्तिमत्वाला साजेसा धोतर, सदरा, टोपी असा पेहराव आणि त्यांचे वाणीकौशल्य दाद देण्यायोग्य होते. कोकणातील लग्नप्रसंगी घेण्यात येणाऱ्या उखाण्यांची गंमतही त्यांनी सादर केली. एकूणच उत्कृष्ट अभिनय आणि सहज, सोपे वाणीकौशल्य ह्यामुळे हा एकपात्री प्रयोग सुंदर साकार झाला आणि आजी-आजोबांची एक वेगळ्या प्रकारे करमणूक झाली.
त्यानंतर श्रीयुत अभय कुलकर्णी यांनी करावकेवर काही मराठी आणि हिंदी गाणी सादर केली. त्यालाही आजी-आजोबांनी मनापासून दाद दिली. नंतर आजी आजोबांच्या मागणीनुसार त्यांच्या आवडीची कोळीगीतेही लावण्यात आली ज्यावर नेहमीप्रमाणेच आजी आजोबांनी उत्स्फूर्तपणे नाच केला.
अशाप्रकारे खूप उत्साही वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं
प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे
आजी आजोबा कट्टा
१३-०२-२०२४
प्रारंभ कला अकॅडमी तर्फे दर मंगळवारी काल्हेर येथील वृद्धाश्रमात आजी-आजोबा कट्टा भरतो. आज आमच्या संस्थेच्या सभासद मनीषा शितूत, त्यांची नात तन्वी शितूत आणि सुलक्ष्मी बाळगी ह्यांनी खूप छान मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले.
सुरुवातीला आमच्या शितूत मॅडमनी गणपती स्तवन, तर सुलक्ष्मी बाळगी ह्यांनी देवी स्तवन म्हटले.
सुलक्ष्मी बाळगी ह्यांनी 'चहा एक वरदान' नावाची चहा वरची एक खुमासदार कविता सादर केली. आपल्या दैनंदिन जीवनात स्त्रियांच्या नवऱ्याकडून अपेक्षा आणि नवरा-बायकोतील गमतीशीर किस्से सांगणारी, 'रघुनाथापाशी मागणे' ही एक, तसंच वृद्धांचे मनोगत सांगणारी एक, अशा दोन वेगळ्या धाटणीच्या कविता शितूत मॅडमनी सादर केल्या.
पुराणातल्या काही अनुल्लेखनीय पण ज्यांच्याबद्दल आपल्याला कुतूहल असतं अशा काही स्त्री व्यक्तिरेखांपैकी एक म्हणजे लक्ष्मणाची पत्नी उर्मिला. सुलक्ष्मी बाळगी ह्यांनी 'मी उर्मिला' ह्या एकपात्री प्रयोगातून उर्मिलेची व्यक्तिरेखा, तिचं मनोगत आणि व्यथा मांडली.
तन्वी शितूत हिने काही गाणी लावली. ह्या गाण्यांच्या ठेक्यावर खुर्चीत बसल्या बसल्या काही शारीरिक हालचाली करून घेत, आजी-आजोबांकडून नकळतपणे बैठे व्यायाम करून घेतले.
नेहमीप्रमाणेच आजी-आजोबांच्या मागणीनुसार त्यांच्या आवडीची काही गाणी लावली, ज्याच्यावर नाचून त्यांनी त्यांच्यातल्या ऊर्जेला वाट मोकळी करून दिली. नंतर आजी आजोबांच्याच मागणीवरून त्यांच्या आवडीचा संगीत खुर्ची हा खेळ घेतला गेला आणि विजेत्याला पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं.
शेवटी, 'एकविरा आई तू डोंगरावरी' ह्या कोळीगीताच्या ठेक्यावर ताल धरत आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली.
आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं.
प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे
"आजी-आजोबा कट्टा"
०६-०२-२०२४
आज, काल्हेरच्या वृद्धाश्रमातील प्रारंभच्या आजी-आजोबा कट्ट्यावर चक्क 'बुफे पार्टी' हा एकपात्री प्रयोग रंगला. कोल्हापूरच्या गावातली एक बाई, आपल्या नवऱ्याबरोबर मुंबईत एका लग्नाच्या बुफे पार्टीला येते आणि मग तिथलं वातावरण बघून ती कशी भांबावून जाते आणि काय काय गमती जमती करते आणि अनुभवते, याचं छान विनोदी सादरीकरण आमच्या प्रारंभच्या सभासद, वैशाली वाडेकर यांनी केलं.
त्यानंतर प्रारंभच्या अजून एक सभासद स्नेहल पुरंदरे यांनी स्मितहास्य, सहजहास्य, खळाळणारं हास्य, बालक हास्य आणि विडंबन हास्य अशा, वेगवेगळ्या हास्य प्रकारांची ओळख करून देत आणि हास्याची कारंजी उडवत काही वेळापूरती जणू काही तिथे हास्य जत्राच भरवली.
वारकरी संप्रदायात आणि समस्त विश्वात पवित्र मानला जाणारा ग्रंथ म्हणजेच, ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेली ग्रंथराज ज्ञानेश्वरी. अशा या ज्ञानेश्वरीचं संक्षिप्त सार सांगणारी एक सात मिनिटांची क्लिप ऐकवली गेली आणि सगळेच आध्यात्मिक आनंदात नाहून निघाले.
नंतर स्नेहल पुरंदरे यांनी प्रख्यात हृदयरोग तज्ञ कै. नीतू मांडके यांची एक हृदयस्पर्शी अनुभव कथा सांगितली. मनात अढळ श्रद्धा असेल, तर कोणत्या ना कोणत्या रूपात तो कृपाळू परमेश्वर खऱ्या भक्तासाठी कसा उभा राहतो हे अनुभवल्यानंतर, त्यांचं नास्तिकातून अस्तिकात कसं परिवर्तन झालं त्याची गोष्ट सांगितली.
नंतर चिठ्ठ्यांचा खेळ खेळण्यात आला. चिठ्ठ्यांमध्ये लिहिल्याप्रमाणे अभिनय करून म्हण, सिनेमा, गाणं, सण, देवांची नावे, टीव्ही सिरीयलची नावे ओळखण्यात सगळे आजी-आजोबा आनंदाने सहभागी झाले. विजेत्यांना मुकुट आणि अभिनंदनाची पट्टी गळ्यात घालून गौरवण्यात आले. सगळ्या आजी-आजोबांनी लगेच त्यांच्या आवडत्या गाण्यांवर नाचून, त्यांचा आनंद साजरा केला.
शेवटी प्रार्थना म्हणून आणि रोज सकाळी सूर्याला नमस्कार करून गायत्री मंत्र म्हटल्याने, दिवसभरासाठी कशी सकारात्मक ऊर्जा मिळते त्याचं महत्त्व सांगून आजच्या सत्राचा समारोप झाला.
आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं.
आज दिनांक 23 जानेवारी 2024 ची आजी-आजोबा कट्टयाच्या भेटीची सुरूवात छान भक्तिमय वातावरणात झाली. सामाजिक उपक्रमाअंतर्गत दर मंगळवारी काल्हेर येथील वृद्धाश्रमात 'आजी-आजोबा कट्टा' ह्या संकल्पनेतून आश्रमातील आजी-आजोबांना चार क्षण विरंगुळयाचे द्यायचा प्रयत्न केला जातो.
आजच्या भेटीत संस्थेच्या सभासद सुवर्णा मादुस्कर ह्यांनी गणेश स्तवन तर मनिषा शितूत ह्यांनी देवी स्तवन गायले. तसेच नुकत्याच पार पडलेल्या राम मंदिर सोहोळ्याच्या निमित्ताने राम गीतेही सादर केली आणि सगळेच जणू राममय झाले. काही आजी-आजोबांनीही गाणी म्हणून आनंद लुटला.
इथले सगळेच आजी-आजोबा खूपच उत्साही आहेत. त्यांच्यासाठी एक साधाच पण शारिरीक हालचालीं मधून थोडा व्यायाम होईल असा बादलीत चेंडू टाकण्याचा खेळ खेळला गेला आणि आजी-आजोबांच्या गटातून प्रत्येकी पहिल्या चार विजेत्यांना बक्षीसंही देण्यात आली. अर्थात, बाकीच्यांनाही उत्तेजनार्थ बक्षिसे देऊन प्रोत्साहन देण्यात आलं.
सगळ्या आजी-आजोबांची आवड लक्षात घेऊन त्यांच्यासाठी कोळीगीतं आणि रीमिक्स गाणी लावण्यात आली ज्यावर सगळ्यांनी ठेका धरला आणि सत्तरीपार असूनही तरुणांनाही लाजवेल असे सगळे नाचले.
एकूणच आजच्या सत्राची सांगता खूप आनंदात झाली ती, 'पुन्हा पुढच्या आठवड्यात नक्की या' अशा प्रेमाच्या आमंत्रणानी.
कार्यक्रमाची काही क्षणचित्रे.
प्रारंभ ' कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत 'आजी-आजोबा कट्टा ' चे नियमित आयोजन केले जाते. काल्हेर गाव येथे दि. 16 जानेवारी 2024 रोजी ‘प्रारंभ’ कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने संस्थेच्या सभासद मनिषा शितूत आणि सुवर्णा मादुस्कर ह्यांनी भेट दिली. 'प्रारंभ ' तसेच संस्थेच्या संस्थापिका संचालिका डॉ.अरुंधती भालेराव ह्यांचा परिचय त्यांनी करून दिला. त्याचबरोबर स्वतः चा ही परिचय त्यांनी करून दिला. भक्तीरसपूर्ण अशा भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आजी-आजोबांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन केले होते. जसे की पेपर ग्लासेसचा मनोरा बनवणे, उलट्या क्रमाने अंक म्हणणे, नाणी एका विशिष्ट पध्दतीने गोळा करणे इत्यादी. अशा खेळांमुळे चित्त एकाग्र व्हायला मदत होते. मेंदूला चालना मिळते, आपल्या अंगभूत कौशल्यांचा कस लागून ती अधिक विकसित होण्यास मदत होते. आणि महत्वाचं म्हणजे आपले रोजचे दैनंदिन व्यवहार थोडा वेळ विसरुन खेळांमधून मिळणाऱ्या आनंदात आपण रममाण होतो. समोरच्याच्या चेहर्यावर हसू फुलवणं हीच तर आमची ह्या सर्व उपक्रमामागची भावना आहे. वेगवेगळी गाणी आणि भजने त्यांनी सुंदर रीतीने सादर केली. त्यांनी सादर केलेली विडंबन गीते तर अप्रतिम. आजी-आजोबा खूपच खूष झाले. तर असा खेळ, गाणी आणि विडंबन गीतांनी रंगला आजचा आजी-आजोबा कट्टा.'
काही क्षणचित्रे.
'प्रारंभ ' कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत 'आजी-आजोबा कट्टा 'चे नियमित आयोजन केले जाते. काल्हेर गाव येथे दि. 02 जानेवारी 2024 रोजी ‘प्रारंभ’ कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सभासद छाया कोयंडे ह्यांनी भेट दिली. 'प्रारंभ ' तसेच संस्थेच्या संस्थापिका संचालिका डॉ.अरुंधती भालेराव ह्यांचा परिचय त्यांनी करून दिला. त्याचबरोबर स्वतः चा ही परिचय करून दिला. छाया ताईंनी ' सुखकर्ता दुःखहर्ता' हया गणपती आरतीने कार्यक्रमाला सुरुवात केली . तसेच बालपणीच्या आठवणी असलेले एक लोकगीत म्हणजे 'बाई सुया घे गं दाभण घे' हे लोकगीत अतिशय सुंदर पध्दतीने सादर केले. अनेक हिंदी, मराठी गाणी, लावणी , कोळीगीते त्यांनी सादर केली. गाण्याबरोबरच काही गोष्टी सांगून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. उडत्या चालीच्या गाण्यांनी आजी- आजोबांना नाचायला, डोलायला लावले. ह्या गीतांनी बहार आणली. कार्यक्रम संपू नये असं वाटत होतं. संपूर्ण वातावरण संगीतमय आणि प्रसन्न झाले. सर्वजण उत्साहाने नाचू लागले. सर्व आजी आजोबा हे अतिशय खूष झाले. अशाप्रकारे सैराट मधील गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.
काही क्षणचित्रे.
'प्रारंभ ' कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत 'आजी-आजोबा कट्टा ' चे नियमित आयोजन केले जाते. काल्हेर गाव येथे दि. 09 जानेवारी 2024 रोजी ‘प्रारंभ’ कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सभासद स्मिता साळगावकर, सुरेश साळगावकर आणि वृषाली सावंत ह्यांनी भेट दिली. 'प्रारंभ ' तसेच संस्थेच्या संस्थापिका संचालिका डॉ.अरुंधती भालेराव ह्यांचा परिचय त्यांनी करून दिला. त्याचबरोबर स्वतः चा ही परिचय त्यांनी करून दिला. ‘सुखकर्ता दुःखहर्ता ' ह्या गणपतीच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अनेक जुनी, नवी मराठी तसेच हिंदी गाणी, कोळी गीते , लावणी अशी विविध प्रकारची गाणी त्यांनी सुंदर रीतीने सादर केली. तसेच प्रेक्षकांनी फर्माईश केलेली गीतेसुध्दा गायली. मनाची मरगळ दूर करुन मन प्रफुल्लित करण्याची किमया संगीतामध्ये आहे. संगीतमय वातावरणाने भारावलेल्या आजी-आजोबांना पुन्हा भेटीला येण्याचे आश्वासन देत त्यांची रजा घेतली.
काही क्षणचित्रे.
'प्रारंभ ' कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत 'आजी-आजोबा कट्टा 'चे नियमित आयोजन केले जाते. काल्हेर गाव येथे दि. 26 डिसेंबर 2023 रोजी ‘प्रारंभ’ कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सभासद तृप्ती सरदेसाई आणि चंद्रशेखर ठाकूर ह्या दोघांनी भेट दिली. आज दत्तजयंतीच्या निमित्ताने तृप्ती सरदेसाई हयांनी “ स्वप्नात मला दत्त दिसले" हया गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. अनेक हिंदी तसेच मराठी गाणी त्यांनी सादर केली. तसेच चंद्रशेखर ठाकूर हयांनी गाण्या बरोबरच काही गोष्टी सांगून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. थोडी गंमत म्हणून तृप्ती ताई हयांनी काही गाणी गुणगुणून आजी आजोबांना ओळखायला लावली. कोळीगीतांनी तर धमाल उडवून दिली. ह्या गीतांनी आजी- आजोबांना गाण्यांच्या तालावर नाचायला, डोलायला लावले. संपूर्ण कार्यक्रम बहारदार झाला. काहीजण खुर्ची वर बसून उत्स्फूर्तपणे हातवारे करून नाचत होते . आनंद घेत होते. कार्यक्रम संपू नये असं वाटत होतं. संपूर्ण वातावरण संगीतमय आणि प्रसन्न झाले. सर्व आजी आजोबा अतिशय खूष झाले. अशाप्रकारे आजचा कार्यक्रम संपन्न झाला.
काही क्षणचित्रे.
'प्रारंभ ' कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत 'आजी-आजोबा कट्टा 'चे नियमित आयोजन केले जाते. काल्हेर गाव येथे दि. 19 डिसेंबर 2023 रोजी ‘प्रारंभ’ कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सभासद कल्पना बागडेकर आणि प्रदीप बागडेकर ह्या दोघांनी भेट दिली. कल्पना बागडेकर ह्यांनी प्रारंभ तसेच संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका डॉ.अरुंधती भालेराव ह्यांचा परिचय करून दिला. त्याचबरोबर स्वतः चा आणि प्रदीप बागडेकर ह्यांचाही परिचय करून दिला. मनाचे श्लोक म्हणून कार्यक्रमाची सुरुवात झाली. अनेक भक्तीगीते तसेच हिंदी गीते त्यांनी सादर केली. विविध विनोदी खुमासदार किश्श्यांनी प्रेक्षकांना हसवले. लावणी तसेच कोळीगीतांनी धमाल उडवून दिली. ह्या गीतांनी आजी- आजोबांना गाण्यांच्या तालावर नाचायला, डोलायला लावले. प्रदीप बागडेकर ह्यांनी ‘ही चाल तुरुतुरु’ ह्या गाण्यावर माऊथ ऑर्गन वाजवून बहार आणली. काहीजण खुर्ची वर बसून उत्स्फूर्तपणे हातवारे करून नाचत होते . आनंद घेत होते. कार्यक्रम संपू नये असं वाटत होतं. संपूर्ण वातावरण संगीतमय आणि प्रसन्न झाले. लग्नामधील हळदीला गायल्या जाणाऱ्या गाण्यांनी सर्वजण उत्साहाने नाचू लागले. सर्व आजी आजोबा अतिशय खूष झाले. अशाप्रकारे आजचा कार्यक्रम संपन्न झाला.
काही क्षणचित्रे.
'प्रारंभ ' कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत 'आजी-आजोबा कट्टा 'चे नियमित आयोजन केले जाते. काल्हेर गाव येथे दि. 12 डिसेंबर 2023 रोजी ‘प्रारंभ’ कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सभासद वैशाली पराड आणि किशोर पराड ह्या दोघांनी भेट दिली. वैशाली पराड यांनी प्रारंभ तसेच संस्थेच्या संस्थापिका संचालिका डॉ.अरुंधती भालेराव ह्यांचा परिचय करून दिला. त्याचबरोबर स्वतः चा आणि किशोर पराड ह्यांचाही परिचय करून दिला.’केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा’ ह्या गोड भक्तिगीतेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अनेक मराठी , हिंदी गीते त्यांनी सादर केली, लावणी आणि कोळीगीतांनी तर बहार आणली. आजी- आजोबांना मधुर गाण्याच्या तालावर नाचायला, डोलायला लावले.काहीजण खुर्ची वर बसून उत्स्फूर्तपणे हातवारे करून नाचत होते . आनंद घेत होते. कार्यक्रम संपू नये असं वाटत होतं. गाण्यावर धरलेला ठेक्यामुळे वातावरण एकदम प्रसन्न झाले. ‘ हसता हुआ नुरानी चेहरा’ या हिंदी गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. आजी आजोबा अतिशय खूष झाले. अशाप्रकारे आजचा कार्यक्रम संपन्न झाला.
काही क्षणचित्रे.
'प्रारंभ 'कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत 'आजी-आजोबा कट्टा 'चे नियमित आयोजन केले जाते. काल्हेर गाव येथे दि.5 डिसेंबर 2023 रोजी 'प्रारंभ ' कला अकॅडमी ठाणे संस्थेच्या सभासद नीलम भोगटे आणि सुखदा ठाकूर ह्या दोघींनी भेट दिली.नीलम भोगटे यांनी प्रारंभ तसेच संस्थेच्या संस्थापिका संचालिका डॉ.अरुंधती भालेराव ह्यांचा परिचय करून दिला. त्याचबरोबर स्वतः चा आणि सुखदा ठाकूर ह्यांचाही परिचय करून दिला.गणेशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अनेक मराठी -हिंदी गाणी, भक्तीगीते, लावणी, कोळीगीते त्यांनी सादर केली. आजी आजोबांना तालावर डोलायला लावले. काहीजण उत्स्फूर्ततेने नाचूसुद्धा लागले. कार्यक्रम संपू नये असं वाटलं तरी वेळमर्यादेनुसार थांबणे भागच होतं. गाण्यावर धरलेल्या ठेक्यामुळे वातावरण एकदम प्रसन्न झाले. सायोनारा या हिंदी गाण्यांने कार्यक्रमाची सांगता झाली.आजी आजोबा अतिशय खूष झाले.अशाप्रकारे आजचा कार्यक्रम संपन्न झाला.
काही क्षणचित्रे.
'प्रारंभ 'कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत 'आजी-आजोबा कट्टा 'चे नियमित आयोजन केले जाते. काल्हेर गाव येथे दि.28 नोव्हेंबर 2023 रोजी प्रारंभ कला अकॅडमी ठाणे संस्थेच्या सभासद प्रभावती देशपांडे आणि विनिता बिवलकर यांनी वृध्दाश्रमला भेट दिली. प्रभावती देशपांडे यांनी प्रारंभ कला अकॅडमी ठाणे ह्या संस्थेचा आणि संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका डॉ.अरूंधती भालेराव यांचा परिचय दिला.आणि कार्यक्रमाला सुरुवात केली. भक्तीगीते,ॐकार चे उच्चार , विनोदी कथा, गाणी, हिंदी गाणी इ. माध्यमातून आजी-आजोबा यांच्या मध्ये आनंद उत्साह संचारला होता .आजी आजोबा गाणी गुणगुणत होते.काहीजण मनसोक्त नाचत आनंद व्यक्त करत होते.अशाप्रकारे भक्तीगीत पासून सुरू झालेला कार्यक्रम पसायदानाने संपन्न झाला.
काही क्षणचित्रे.
'प्रारंभ 'कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत 'आजी-आजोबा कट्टा 'चे नियमित आयोजन केले जाते. काल्हेर गाव येथे दि.21 नोव्हेंबर 2023 रोजी ‘प्रारंभ ‘ कला अकॅडमी ठाणे संस्थेच्या सभासद अलका वढावकर आणि गीता सुळे या दोघाींनी कथाकथनाच्या माध्यमातून छान छान कथा सांगितल्या. ‘भावजी येता घरा' ही विनोदी कथा सांगून आजी-आजोबांच्या चेहर्यावर हास्य फुलवलं. ‘दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम' ही प्रवासामध्ये अनुभवलेली कथा ऐकून तर आजी आजोबा पोट धरून हसू लागले. आणि शेवटी अलका ताई आणि गीता ताई यांनी हिंदी गाण्यांवर पदन्यास करत आजी आजोबांनाही नाचायला लावलं . विनोदी कथा, किस्से, गाण्यांवर धरलेला ठेका ह्यामुळे वातावरण एकदम प्रसन्न झाले. विनोदी कथांनी मनावरचा ताण दूर होतो. हलक्या -फुलक्या किश्श्यांनी मन उत्साही होते. आजी-आजोबा अतिशय खुष झाले. अशाप्रकारे आजचा कार्यक्रम संपन्न झाला.
काही क्षणचित्रे.
'प्रारंभ' कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत 'आजी-आजोबा कट्टा 'चे नियमित आयोजन केले जाते. काल्हेर गाव येथे दि.31 ॲाक्टोबर 2023 रोजी प्रारंभ कला अकॅडमी संस्थेच्या सभासद अनघा जाधव आणि वृषाली सावंत ह्यांनी भेट दिली. अनघा जाधव यांनी प्रारंभ कला अकॅडमी संस्थेचा आणि संस्थेच्या संस्थापिका संचालिका डॉ.अरुंधती भालेराव यांचा परिचय करून दिला. अनघा जाधव ह्यांनी सकारात्मकता ह्या विषयावर व्याख्यान दिले. सकारात्मकता का महत्वाची, ती कशी जोपासावी हे त्यांनी विविध किस्से तसेच छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून सांगितले. आयुष्यात आलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर सकारात्मक विचारांनी मात करत यशाची उंच शिखरे गाठणार्या अनेक थोरामोठ्यांच्या चरित्रामधील गोष्टी त्यांनी सांगितल्या. स्वत:वर प्रेम करायला शिका असा संदेश दिला. वृषाली सावंत यांनी मराठी, हिंदी मधील छान छान गीते सादर केली. कोळी गीते, देशभक्तीपर गीतांना आजी आजोबांनी उत्फू्र्त साथ दिली. अशाप्रकारे व्याख्यानातील मोकळ्या संवादाने सुरु झालेला आजचा कट्टा " ऐ मेरे वतन के लोगो "ह्या देशभक्तीपर गीताने संपला.
काही क्षणचित्रे.
आज दिनांक १२ सप्टेंबर २०२३रोजी प्रारंभ कला अकॅडमी ठाणे च्या वतीने काल्हेर गाव ठाणे इथल्या वृद्धाश्रमामधे "आजी आजोबा कट्टा" चे दुसरे सत्र संपन्न झाले. प्रारंभ कला अकॅडमी च्या सदस्या तृप्ती सरदेसाई आणि चंद्रशेखर ठाकूर यांनी गीत तृप्ती या त्यांच्या कार्यक्रमामधून विविध प्रकारच्या गाण्यांची मेजवानी दिली. भक्ती गीता पासून सुरुवात केली . हिंदी,मराठी भावगीते,लावणी , ओव्या अशी निरनिराळ्या प्रकारची गाणी त्यांनी सुंदर आवाजात गायली. चंद्रशेखर ठाकूर ह्यांनी अतिशय सुंदर निवेदन केले. गाण्याचा अर्थ , भाव ह्याबद्दल माहिती सांगत होते . हे सर्व ऐकताना आजी आजोबा त्यांच्या गतकाळात रममाण झाले. संगीतामध्ये मन प्रफुल्लित करण्याची विलक्षण ताकद असते. आजी आजोबा अतिशय उत्साहाने ह्यामधे सहभागी झाले. हा एक तासाचा कार्यक्रम संपू नये असं काही आजी आजोबांना वाटत होतं. अशा प्रकारे कार्यक्रम छान झाला.
काही छायाचित्रे.
दि. ५ सप्टेंबर 2023 रोजी प्रारंभ कला अकॅडमी या आमच्या संस्थेमार्फत काल्हेर गाव येथील वृद्धाश्रमात आजी-आजोबा कट्टा या वार्षिक उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी स्मित वृद्धाश्रमाच्या योजना घरत उपस्थित होत्या. प्रारंभ च्या वतीने संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका डॉ.अरूंधती भालेराव यांनी प्रास्ताविक केले.विश्वस्त मनीषा आचार्य यांनी प्रारंभ चा परिचय करून दिला. संस्थेच्या सचिव कीर्ती केरकर , वैशाली कुलकर्णी, सदस्य वैशाली पराड , समन्वयिका जयश्री मदने उपस्थित होते. प्रारंभ कला अकॅडमी चे सदस्य श्री विद्याधर अपशंकर , अंजली संत, अनंत मुळे यांनी या आमच्या उपक्रमांतर्गत विविध हिंदी मराठी गाणी कराओके वर अतिशय तालबद्ध आणि सुंदर रीतीने गायली आणि आजी आजोबांचे मनोरंजन केले. वर्षभर आता आमचे ६०ते७० सभासद हा उपक्रम सातत्याने राबवतील. प्रारंभ कला अकॅडमी वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमातील सर्वांसाठी सातत्याने विविध कलांच्या माध्यमातून आपले योगदान देत आहे.
जयश्री मदने
सदस्य- समन्वयिका - आजी आजोबा कट्टा प्रारंभ कला अकॅडमी
काही क्षणचित्रे.
प्रारंभ कला अकॅडमीच्या सामाजिक उपक्रमा अंतर्गत आजचा आजी आजोबा कट्टा अतिशय उत्साहात संपन्न झाला .वानप्रस्थाश्रमा चे व्यवस्थापक गोगटे काका यांनी आजच्या अभिवाचक मिथिला गायतोंडे, आशा नायकवडी आणि शलाका देसाई यांच् स्वागत केलं . प्रत्येक सखीने आपलं अभिवाचन अतिशय सुंदर रीतीने सादर केल्याने आजी आजोबा खुश झाले आणि कार्यक्रम रंगत गेला .या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजी आजोबा कट्ट्यावर जाणार्या सर्व मैत्रिणींना आपण एका चांगल्या ठिकाणी गेलो याचा नेहमीच आनंद होतो .आपण समाजाचं काही देणं लागतो ही भावना मनामध्ये नक्कीच वृद्धिंगत होते।आणि ते सामाजिक बांधिलकीचं भान प्रारंभ कायम जपत आलेलं आहे .प्रारंभच्या या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल आशा नायकवडी शलाका देसाई आणि मिथिला गायतोंडे यांचे मनःपूर्वक आभार .
आज पासून प्रारंभ कला अकॅडमी ठाणे च्या आजी आजोबा कट्ट्याच्या वार्षिक उपक्रमाचा शुभारंभ आणगाव येथे वानप्रस्थाश्रमात झाला..वर्षभर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे..माझा आवडता प्रांत कला असल्याने दर महिन्यातील सगळे विविध विषय कलेशी संबंधित आहेत..ह्या महिन्यातील माझी थीम कथाकथान ही आहे..आज माझी मैत्रिण उमा चांदे हिच्या पासून आम्ही प्रारंभ केला.. उमानी 3 उत्तम कथा सांगितल्या. माझ्या प्रास्ताविकानी सुरवात झाली..प्रसाद ह्या आमच्या उपक्रम समन्वयक ह्याने सहकार्य केले..काही दृष्य..सोबत आश्रमाचे संचालक गोगटे काका
आज प्रारंभ कला अकॅडमी चा "आजी आजोबा कट्टा " हा सामाजिक उपक्रम मनिषा शीतुत ह्यांच्या कथाकथनाने रंगून गेला.. ह्या प्रसंगी आजी आजोबाना तिळगूळ देऊन त्यांचे आशिर्वाद घेता आले..काही क्षणचित्रे
आज आमच्या आजी आजोबा कट्टा ह्या सामाजिक प्रकल्पाच्या अंतर्गत प्रारंभ कला अकॅडमी ह्या आमच्या संस्थेच्या अंतर्गत मी घेत असलेल्या निवेदन कथाकथन बॅच मधील माझी विद्यार्थिनी , शिक्षिका आणि मैत्रीण अनघा जाधव हिने अप्रतिम कथा सांगितल्या.आजी आजोबानी उदंड प्रतिसाद देत तिच कौतुक केले..खूप मेहनत करून निवेदन कथाकथन क्षेत्रात अनघा पुढे जातेय..अभिमान आणि कौतुक वाटतं ..काही क्षणचित्रे
.. कंडक्टर भिमन्ना.. सुधा मूर्ती
पहिले पाढे पंचावन्न... माधुरी शानभाग
माझी फजिती...स्वानुभव ह्या
कथानी आजचा आमचा सामाजिक उपक्रमातील आजी आजोबा कट्टा रंगला..प्रारंभच्या किर्ती केरकर ह्यांनी आजी आजोबाना मंत्रमुग्ध केले .काही क्षणचित्रे
प्रारंभ कला अकॅडमी च्या फेब्रुवारी महिन्यातील वृद्धाश्रमाची थीम मी संगीत हा विषय ठेवला आहे..आज गिरगाव येथील सतिश भिडे ह्यांच् सावरकरांवर आधारित निरुपण आणि गायन असा कार्यक्रम ठेवला होता..काही दृष्य आणि झलक.
दि. ११ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रारंभ कला अकॅडमी ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रम अंतर्गत हा संपूर्ण महिना गायन आणि कीर्तन ही संकल्पना असल्याने प्रसिद्ध गायक प्रशांत काळुंद्रीकार ह्यांच्या गायनाने कालचा कट्टा रंगला..एकाहून एक सरस हिंदी मराठी गीते सादर करत प्रशांतनी आजी आजोबांचे आशिर्वाद घेतले..सोबत संस्थेचे प्रशासकीय व्यवस्थापक श्री गोगटे काका
दि. १८ फेब्रुवारी २०२१ गुरुवारी आजी आजोबा कट्ट्यावर प्राची कोकीळ यांचा कार्यक्रम झाला. प्राची ताईंनी जुनी मराठी व हिंदी गाणी त्याचप्रमाणे भावगीत आणि नाट्य संगीत सादर केले. त्यांनी हीच आमुची प्रार्थना आणि रेश्माच्या रेघांनी हि लावणी आणि ऐ दिल मुझे बतादे अशी जुनी गाणी सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.त्याचबरोबर आश्रमातील आजी आजोबांच्या फर्माईशी नुसार सुद्धा त्यानी गाणी सादर केली. त्याची काही क्षणचित्रे
प्रारंभ कला अकॅडमी ठाणे च्या वतीने सामाजिक उपक्रमा च्या
आध्यात्मिक विषया अंतर्गत १८ मार्च २०२१ रोजी शिरीष आणि सायली कोरगावकर ह्यांच्या कीर्तनामुळे आजी आजोबा कट्टा रंगला. प्रारंभ संस्थेच्या विश्वस्त वैशाली कुलकर्णी ह्यांनी प्रारंभ संस्थेचा परिचय दिला. श्री गोगटे काका ह्यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.
आज दि. २५ मार्च २०२१ रोजी प्रारंभ कला अकॅडमी च्या वतीने वानप्रस्थाश्रमात आमच्या आजी आजोबा कट्ट्यावर समर्थ बुवा रामदासी ह्यांचे अतिशय अप्रतिम प्रवचन झाले. स्वामी समर्थांच्या विचारांचे जीवन जगत असतानाचे आयुष्यातील महत्व अतिशय प्रभावीरीत्या अमेय बुवांनी मांडले..जयंत गोगटे ह्यांनी संस्थेच्या वतीने त्यांचा परिचय करुन दिला..
प्रारंभ कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेतर्फे भिवंडी जवळील आंनगांव येथील व्रुध्दाश्रमामध्ये आज दि. ७ ऑक्टो. २०२१ रोजी श्री.अरविंद बेलवलकर ह्यांनी काव्य वाचन करून रसिकांचे मन रिझवले. विं दा करंदीकर, मंगेश पांडगांवकर, संदीप खरे , सुरेश भट अशा अनेक दिग्गज कवींच्या कविता सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. करोनाविषयी चे पसायदान त्यांनी म्हटले. त्यांच्या गीतगायनाने आजी आजोबा भारावून गेले.
संस्थेच्या वतीने मनीषा आचार्य ह्यांनी प्रास्ताविक केले.
काही क्षणचित्रे
प्रारंभ कला अकॅडमीच्या वतीने भिवंडी जवळील व्रुध्दाश्रमामधे आज दि. १४ ऑक्टोबर २०२१ रोजी श्री मुकुंद जोग ह्यांनी अनेक गंमतीशीर किस्से सांगून रसिकांना हसवले. त्यांनी सादर केलेल्या विडंबन काव्यांनी संपूर्ण सभाग्रुह टाळ्यांच्या कडकडाने दणाणून गेले. जुन्या गायकांच्या त्यांनी केलेल्या नकलांनी व्रुध्दाश्रमातील आजी आजोबांना त्यांच्या काळात डोकावून आणले आणि त्यांच्या चेहर्यावर हसू पसरवले. स्पष्ट आवाज , उत्तम गायन आणि नकला करून त्यांनी त्यांच्या ‘संगीत मिसळ’ ह्या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करून बहार आणली.
काही क्षणचित्रे.प्रारंभ कला अकॅडमीच्या विश्वस्त मनीषा आचार्य यांनी मुकुंद जोग यांचा परिचय करून दिला .
प्रारंभ कला अकॅडमी ठाणे या आमच्या संस्थे तर्फे वर्षभर आजी आजोबा कट्टा भिवंडीजवळ आनगाव येथे विविध उपक्रमांत मार्फत राबविण्यात आला .वृद्धाश्रमातील आजी आजोबांच घटका दोन घटका
विविध कलांच्या माध्यमातून मनोरंजन करावं हा या उपक्रमामागचा माझा आणि आमच्या संस्थेचा उद्देश होता .कथाकथन अभिवाचन कीर्तन आध्यात्मिक व्याख्यान संगीत गप्पा आणि गोष्टी यामार्फत अनेक कलाकार या उपक्रमातून आम्ही सामावून घेतले . सगळ्याच सहभागी कलाकारांनी आम्हाला खूप सहकार्य केलं .या वर्षभर चाललेल्या उपक्रमाचा आज सांगता समारंभ होता .सकाळी साडेदहा वाजता आनगाव वानप्रस्थाश्रमात दीपप्रज्वलनाने आम्ही या सोहळ्याचा प्रारंभ केला .मंचावर वानप्रस्थाश्रमा चे व्यवस्थापक जयंत गोगटे प्रारंभाच्या संचालिका डॉ अरुंधती भालेराव ,विश्वस्त आणि सदस्य मनीषा आचार्य ,सचिव सदस्य कीर्ती केरकर,सल्लागार आणि सदस्य मनीषा शितूत , प्रारंभ चे पालक राहुल भाटवडेकर उपस्थित होते . आजी आजोबांच्या वतीनं सौ रिसबूड आणि श्री प्रभू यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.प्रारंभ च्या वतीनं अरुंधती च प्रास्ताविक झालं .आश्रमाच्या वतीने गोगटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं .याप्रसंगी राहुल भाटवडेकर यांनी किशोर कुमारची एक से बढकर एक गीते गाऊन सगळ्या उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली.कार्यक्रमाचं अतिशय सुंदर असे सुत्रसंचालन प्रारंभच्या सदस्य स्पर्धक शलाका देसाई यांनी केलं .याप्रसंगी प्रारंभ च्या वतीनं आजी आजोबांना जीवनोपयोगी वस्तूंचा संच भेट देण्यात आला .त्याची काही क्षणचित्रे
काल प्रारंभ कला अकॅडमीचा वृद्धाश्रम उपक्रम पुन्हा नव्यानं दुसर्या वृद्धाश्रमामध्ये सुरू झाला .वर्षभर आनगाव येथे केलेल्या उपक्रमानंतर आता आम्ही येऊर येथील वृद्धाश्रमाकडे आमचा मोर्चा वळवला आहे .आमचा 'कला' हा विषय बाजूला न करता कलेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत आमचं सामाजिकतेचे भान जपण्याचा प्रयत्न करतोय.आता वर्षभराच्या या उपक्रमात विविध कलांचा माध्यमातून आम्ही आजीआजोबांच रंजन करणार आहोत.यात आम्हाला अनेक क्षेत्रात काम करणार्या माझ्या विविध मित्र मैत्रिणींकडून खूप मदत होते.कालच्या दि. १८ जानेवारी २०२२ च्या सत्रात निवृत्त शिक्षिका वर्षा पालशेतकर या माझ्या सखीनं आजी आजोबांसाठी कथाकथन केलं .काही क्षणचित्र...
प्रारंभ कला अकॅडमी चा आजी आजोबा कट्टा हा एक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम . या उपक्रमाच्या अंतर्गत यावर्षी आम्ही येऊरच्या वृद्धाश्रमामध्ये विविध उपक्रम राबवतोय . आजचा आजी आजोबा कट्टा रंगला तो संगीताच्या मैफिली न.प्रारंभ कला अकॅडमीच्या नेहमीच एक उद्देश असतो कि व्यासपीठ न मिळालेल्या, पण अंगी उत्तम कला असणार्या मैत्रिणींना,कलेवर प्रेम करणार्या सख्यांना या निमित्तानं वेगवेगळ्या उपक्रमात सामील करून घेत त्यांच्या कलागुणांना वाव देणं . अंबरनाथमध्ये राहणारी वैशाली परड ही अशीच एक गुणी सखी .माझ्यावर, आमच्या संस्थेवर प्रेम करताना सातत्याने आमच्या उपक्रमात सहभागी होणारी .तिच्या एकाहून एक सरस हिंदी मराठी गीतांनी आज आमचा आजी आजोबा कट्टा रंगला .
On 15 february 2022 Manisha Ghadage and Ruchita Mestry at Vriddashram
Sangeet
वार्धक्य हे प्रत्येकाला येणार.कोणाचं सुसह्य असणार आहे. कुणाला कुटुंबाचा प्रेम मिळणार आहे. तर कुणाचं वार्धक्य हे व्याधींनी युक्त असं असाह्य. कुटुंबाचं प्रेम न मिळणारे. पण आपण समाजाचा भाग आहोत आणि आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी सभोवतालच्या समविचारी मित्रमैत्रिणींना घेऊन आजी आजोबांसाठी जे काही करता येईल येईल ते करता यावं यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न असतो. आज दि. १५ मार्च २०२२ रोजी येऊर येथील वृद्धाश्रमांमध्ये प्रारंभ कला अकॅडमी ह्या आमच्या संस्थेच्या वतीने विजयाताई माणगावकर यांनी नामस्मरण आणि मनाची शक्ती यावर आजी आजोबांशी संवाद साधला. त्या स्वतः पंच्याहत्तरीच्या घरातल्या! पण उत्साह अमाप. त्या स्वतः आजी-आजोबांसाठी आज एक उदाहरण ठरल्या.काही क्षणचित्रे.
कलेच्या माध्यमातून आजी-आजोबांचं मन रिझवावं, त्यांना विरंगुळा मिळावा ह्या उद्देशाने प्रारंभ कला अकॅडमी ह्या आमच्या संस्थेचे सदस्य आजी-आजोबांची भेट घेत असतात. दर्जेदार कथा त्यांना ऐकायला मिळाव्या, त्यांचे मन रमावं ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. संस्थेच्या सदस्य आणि सचिव कीर्ति केरकर ह्यांनी निरुपमा महाजन आणि मंगला गोडबोले ह्यांच्या कथांचे कथन खुमासदार शैलीत केलं. आजी-आजोबांचा चांगला प्रतिसाद मिळाला. असा होता आजी-आजोबा कट्टा. २५ मार्च २०२२
प्रारंभ कला अकॅडमी,ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने, आमच्या सामाजिक उपक्रमा अंतर्गत, . विविध कलांच्या माध्यामांतून, निरनिराळ्या विषयांवर आजी-आजोबांशी संवाद साधला जातो. चार धटका त्यांचे मनोरंजन व्हावे, त्यांच्या चेहर्यावर आनंद फुलावा हा हेतू त्यामागे आहे. संस्थेच्या वतीने आज दि.12 एप्रिल 2022 रोजी संस्थेच्या सदस्य आणि विश्वस्त मनीषा आचार्य ह्यांनी येथे भेट दिली. माणसातील माणूसपण जपणार्या, चांगुलपणाच्या, हळुवार नात्यांच्या तसेच स्वत:च्या हिंमतीवर , आत्मसन्मान जपत, जगण्याचा संघर्ष सुरु असताना देखील इतरांना मदत कशी करता येते अशा अनेक स्फूर्तीदायी, सह्रदयतेच्या कथांचं त्यांनी अभिवाचन केलं.
संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका डॅा. अरुंधती भालेराव लिखित ‘आनंदकुळ’ ह्या पुस्तकातील ‘काय हवं जगण्यासाठी’ , ‘शोध निरागस आनंदाचा’ अशा काही लेखांचं अभिवाचनही त्यांनी केलं. आजी-आजोबांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
आजच्या आजी-आजोबा कट्ट्याची ही काही क्षणचित्रे.
प्रारंभ कला अकॅडमी,ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने २० एप्रिल २०२२ आमचे सदस्य व्रुध्दाश्रमातील आजी-आजोबांची भेट घेतात. कलेच्या माध्यमातून त्यांचे मनोरंजन करावे, त्यांच्या दिनचर्येत त्यांना थोडा विरंगुळा मिळावा हा त्यामागचा उद्देश.
अनुराधा कुंटे ह्यांनी आज डॅा. मीना नेरुरकरांच्या कथा त्यांना सांगितल्या. तुकाराम महाराजांची पत्नी आवडी आणि सुवर्णतुले मधील सत्यभामा ह्या व्यक्तिरेखांचे सादरीकरण केले.
काही क्षणचित्रे
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेतर्फे आमचे सदस्य आजी-आजोबांची भेट घेत असतात. कलेच्या माध्यमातून त्यांना आनंद मिळावा, संगीत ऐकून त्यांचे मन प्रफुल्लित व्हावे असा ह्यामागचा उद्देश असतो. नेहा बागवे ह्यांनी आज २४ मे २०२२ रोजी ‘प्रारंभ’ च्या वतीने आजी-आजोबांची भेट घेतली. अनेक जुनी-नवी हिंदी- मराठी गाणी सुरेल सादर करुन त्यांनी रसिकांची वाहवा मिळवली. असा होता आजी-आजोबा कट्टा.
दि. ७ जुन २०२२ रोजी प्रारंभ कला अकादमी आयोजित कार्यक्रम येऊर ठाणे येथे जेष्ठ नागरिक निवासमध्ये सादर करण्यात आला.
अर्चना मोरगी , नीती फाऊंडेशन हे आमंत्रक होते. मानसिक आरोग्य हा विषय व त्या अनुषंगाने या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली होती.
सौ. नेहा देवलकर यांनी कविवर्य पाडगावकर यांची कविता " सांगा कसं जगायचं " व मानसिक आरोग्य कसं मिळवता येईल या बद्दल संवाद साधला आणि श्री. प्रदीप बागडेकर यांची जोक्स सादर करण्याची अंगभूत कला सर्वांनाच खूप हसवून गेली तसेच श्री व सौ वैती यांनी फोटोस आणि व्हिडियोसचे चित्रीकरण केले.
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने श्री. मुकुंद जोग ह्यांनी आज 18 जुलै 2022 रोजी व्रुध्दाश्रमातील आजी-आजोबांची भेट घेतली. विविध कला सादर करुन आजी-आजोबांचे मनोरंजन व्हावे, त्यांना निखळ आनंद मिळावा, हा ह्या भेटींमागचा उद्देश असतो. श्री. मुकुंद जोग ह्यांनी विडंबनात्मक गाणी तसेच नकला सादर करुन बहार आणली. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही क्षणचित्रं.
‘प्रारंभ’ कला अकॅडमी,ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने, आमचे सदस्य नियमितपणे आजी-आजोबांना भेटत असतात. विविध कला त्यांच्यासाठी सादर करुन, त्यांना आनंद मिळावा आणि त्यांचे मानसिक आरोग्य जपावे ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. संस्थेच्या वतीने आज दि. 26 जुलै 2022 रोजी अल्का वढावकर आणि गीता सुळे ह्यांनी आजी-आजोबांची भेट घेतली. गणेश गौरवगानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अभंग, कविता, विडंबन गीतं ह्याबरोबरच ‘चहा आख्यान’ सादर झालं. असा होता आजी-आजोबा कट्टा.
‘प्रारंभ’ कला अकॅडमी,ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने वैदेही भिडे ह्यांनी आजी-आजोबांची भेट घेतली. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांना बोलतं केलं. ऐकणारा कान प्रत्येकाला हवा असतो. छान छान गाणी सादर केली. सकारात्मक विचारांनी परिस्थितीशी जुळवून घेतलं की जगणं कसं सुंदर होतं ह्याविषयी त्यांनी ज्येष्ठांशी संवाद साधला. काही क्षणचित्रं.
प्रारंभ कला अकॅडमी ही आमची संस्था वर्षभर एका वृद्धाश्रमामध्ये अनेक कलाकारांच्या मदतीने वार्षिक उपक्रम राबवत असते. आमच्या संस्थेतील आम्ही देखील कलाकार म्हणून त्याचा भाग असतो. डिसेंबर महिन्यात त्याचा समारोप असतो . मग आम्ही पुन्हा नवीन वृद्धाश्रमात आजी-आजोबांचं मनोरंजन करायला सज्ज होतो. यावर्षीच्या वृद्धाश्रमाचा वार्षिक सांगता समारंभ 27 डिसेंबरला येउर येथे होत आहे.