बालिकाश्रम
23 Aug 2024
'Prarambha' Kala Academy Thane, our organization is doing social work in various old age homes and girls' homes through art, every month throughout the year. On behalf of our organization, I have attached 25-- 25 artists each year to old age homes and orphanages. Those who do the training work, in which I am also involved. Various subjects are taken up for old age homes and orphanages throughout the year. We hire a needy woman as a coordinator for this work by paying. Our artists do training work in old age homes and orphanages for free but only with travel expenses. In which I am also involved as a drama coach. Yesterday, this year-long activity was concluded in the evening at Balikashram in Waghbeel. Vaishali Parad, Sneha Ravande and Jayashree Madane planned the finale. Vaishali Parad moderated. On this occasion we honored all these girls by gifting them with beautiful crowns on their heads saying 'how important you are to us'. On this occasion they were also given refreshments on behalf of the start. This is spent from the money received.
Many thanks to Amjad Khan for giving us some financial support for this initiative.
On the occasion of this activity, the girls presented the arts that our teachers had taught them throughout the year. This is a brief account of it.
During the annual period from September 2023 to August 2024, the following members visited the Balikashram.
Alpana Tipnis, Vasudha Joshi, Mrunalini Kulkarni, Vasanti Kulkarni, Rashmi Kulkarni, Aparna Sawant, Shubhangi Joglekar, Deepshree Jadaye, Anjali Borole, Dipali Kurlekar, Angha Jadhav, Vasudha Nigudkar, Swati Naik, Alka Adgaonkar, Snehal Purandare, Shubhangi Sansare, Shreya Kulkarni , Neeta Kolhatkar, Sunita Shejwalkar, Neha Bagve, Rohini Rasal, Ragini Sane, Sneha Ravande, Smita Salgaonkar, Sushma Bhagwat, , Vrushali Sawant, Suresh Salgaonkar.
These members should share their art skills, their knowledge, their culture, exchange of good thoughts with the girls, develop the inherent skills of the girls, get inspiration from the stories of the elders, and get information about our culture.
During this period many different things have been taught to the girls here
Taught different hymns and verses like Shreesukta, Navagraha Stotra, Mahalakshmi Ashtaka, Rama Raksha, Choti Choti Stotra, Mahishasur Mardini Devi's Stotra.
Told the stories and biographies of inspiring, great people. Narrated the importance of various days and festivals like Holi, World Water Day, Maha Shivratra, World Women's Day, Mangalore, Ashadhi Ekadashi, Guru Poornima. Learned how to make paper and tissue paper flowers and card paper flowers. Learned to draw beautiful henna designs by giving detailed information about henna. Learned to paint pottery by giving information about pottery. Taught Rajasthani folk dances and Mangagouri games. Introduced their short plays in a very nice way. By raising awareness about mental health, its importance was proved through small tricks and games. Learned how to make sustainable items from waste. Taught great songs, group songs.
23 ऑगस्ट 2024 बालिकाश्रम समारोप
प्रारंभ कला अकॅडमी ठाणे, ही आमची संस्था कलेच्या माध्यमातून वर्षभर विविध वृद्धाश्रम आणि बालिकाश्रमांमध्ये सामाजिक कार्य सातत्याने वर्षभर दर महिन्यात करत असते. आमच्या संस्थेच्या वतीने मी वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमाला प्रत्येकी 25-- 25 कलाकार वर्षभर जोडलेले असतात. जे प्रशिक्षणाचे काम करतात.ज्यात माझाही सहभाग असतो. वर्षभर वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रमासाठी विविध विषय घेतले जातात. एका गरजू महिलेला आम्ही पैसे देऊन समन्वयक म्हणून या कामासाठी नियुक्त करतो. विनामूल्य पण फक्त जाण्या-येण्याचा खर्च देऊन वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमात प्रशिक्षणाचे काम आमचे कलाकार करतात. ज्यात माझा देखील नाट्य प्रशिक्षक म्हणून सहभाग असतो. काल वर्षभर सुरू असलेल्या या उपक्रमाचा वाघबीळ येथील बालिकाश्रमात संध्याकाळी समारोप झाला. प्रारंभच्या वैशाली पराड,स्नेहा रवंदे आणि जयश्री मदने यांनी या समारोपाचे नियोजन केलं होतं. वैशाली पराड यांनी सूत्रसंचालन केलं.याप्रसंगी आम्ही सगळ्या या बालिकांना त्यांच्या डोक्यावर सुंदर मुकुट त्यांना भेट म्हणून देऊन' तुम्ही आमच्यासाठी किती महत्त्वाचे आहात 'हे सांगत त्यांच्या गौरव केला.याप्रसंगी त्यांना अल्पोपहार देखील प्रारंभ च्या वतीने देण्यात आला.विविध कार्यक्रमांमधून प्रारंभची जी दानपेटी ठेवलेली असते त्यातून मिळणाऱ्या पैशातून हा खर्च केला जातो.
या उपक्रमासाठी आम्हाला थोडी आर्थिक मदत केल्याबद्दल अमजद खान यांचे मनःपूर्वक आभार.
या उपक्रमाच्या प्रसंगी वर्षभर आमच्या शिक्षकांनी ज्या ज्या कला या मुलींना शिकवल्या होत्या त्याचं सादरीकरण मुलींनी केलं.त्याचा थोडक्यात हा लेखाजोखा.
सप्टेंबर 2023 ते अॅागस्ट 2024 ह्या वार्षिक कालावधीमधे बालिकाश्रमला प्रारंभच्या पुढील सदस्यांनी भेट दिली.
अल्पना टिपणीस, वसुधा जोशी, म्रुणालिनी कुलकर्णी, वासंती कुलकर्णी, रश्मी कुलकर्णी, अपर्णा सावंत, शुभांगी जोगळेकर, दीपश्री जडये, अंजली बोरोले, दिपाली कुर्लेकर, अनघा जाधव, वसुधा निगुडकर, स्वाती नाईक, अल्का आडगावकर, स्नेहल पुरंदरे, शुभांगी संसारे, श्रेया कुलकर्णी, नीता कोल्हटकर, सुनीता शेजवलकर, नेहा बागवे, रोहिणी रसाळ, रागिणी साने, स्नेहा रवंदे, स्मिता साळगांवकर, सुषमा भागवत, , व्रुषाली सावंत, सुरेश साळगावकर.
या सदस्यांनी आपलं कला कौशल्य ,आपलं ज्ञान,आपली संस्कृती, चांगल्या विचारची देवाण-घेवाण या मुलींना मिळावी, मुलींमधील अंगभूत कौशल्यांचा विकास व्हावा, थोरामोठ्यांच्या गोष्टींमधून त्यांना प्रेरणा मिळावी, आपल्या संस्क्रुतीची माहिती व्हावी ह्या उद्देशाने
या कालावधीमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी इथल्या मुलींना शिकवल्या आहेत.जसं की
श्रीसूक्त, नवग्रह स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक, रामरक्षा, छोटी छोटी स्तोत्र , महिषासूर मर्दिनी देवीचे स्तोत्र अशी वेगवेगळी स्तोत्र, श्लोक शिकवलेत.
प्रेरणादायी, थोर व्यक्तिंच्या कथा , चरित्र सांगितली. होळी, जागतिक जल दिन, महाशिवरात्र, जागतिक महिला दिन, मंगळागौर , आषाढी एकादशी , गुरुपौर्णिमा अशा विविध दिवस आणि सणवारांच्या गोष्टी, त्यांचे महत्व कथन केले. कागदी तसेच टिश्यू पेपर पासून फुले आणि कार्ड पेपरपासून फुले बनवायला शिकवली. मेंदी विषयी सविस्तर माहिती सांगून सुंदर सुंदर मेंदीची डिझाईन्स काढायला शिकवली. मातीच्या भांड्यांबद्दल माहिती देऊन मातीची भांडी रंगवायला शिकवली. राजस्थानी लोकन्रुत्य धुमर तसेच मंगळागौरीचे खेळ शिकवले.नाटक म्हणजे काय ह्याची अतिशय छान पध्दतीने तोंडओळृख करुन त्यांच्या छोट्या नाटुकल्या बसवल्या. मानसिक स्वास्थ्याविषयी सजग करून छोट्या छोट्या क्रुतींतून , खेळांतून त्याचे महत्व पटवले. टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवायला शिकवले. छान छान गाणी, समूह गीते शिकवलीत.
16th August 2024
'Prarambha' Art Academy, Thane as part of our social activities by our organization Prarambha members regularly visit Balikashram at Waghbeel from September 2023 onwards. Members of the organization Vaishali Parad and Jayashree Madane met the girls today. Various hymns, songs and dances were taught to the girls during this year. Training was also imparted in henna extraction, pottery painting, making durable goods from waste and making flowers from paper and tissue paper. A very good guide on what drama is. We felt happy to introduce them to these arts and teach them. Vaishali and Jayashree reviewed what they had learned during the year, revised by the girls. The girls participated with great enthusiasm. His enthusiasm to demonstrate what he had learned was admirable.
A few snapshots.
16 अॅागस्ट 2024
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेतर्फे आमच्या सामाजिक उपक्रमांतर्गत वाघबीळ येथील बालिकाश्रमात सप्टेंबर 2023 पासून प्रारंभचे सदस्य नियमित भेट देतात. संस्थेच्या सदस्या वैशाली पराड आणि जयश्री मदने ह्यांनी आज मुलींची भेट घेतली. ह्या वर्षभराच्या कालावधीमध्ये विविध स्तोत्र, गाणी, नाच मुलींना शिकवले. मेंदी काढणे, मातीभांडी रंगवणे, टाकाऊतून टिकाऊ वस्तू तसेच पेपर आणि टिश्यू पेपरपासून फुले बनवणे ह्याचे सुध्दा प्रशिक्षण दिले. नाटक म्हणजे काय ह्याचे खूप छान मार्गदर्शन केले. ह्या कलांची त्यांना तोंडओळख करुन त्यांना त्या शिकवताना आम्हांला आनंद वाटला. वैशाली आणि जयश्री ह्यांनी वर्षभरात शिकवलेल्या गोष्टींचा आढावा घेतला, त्यांची उजळणी मुलींकडून करुन घेतली. अतिशय उत्साहाने मुली सहभागी झाल्या. त्यांनी आत्मसात केलेल्या गोष्टी करुन दाखवण्याचा त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता.
काही क्षणचित्रं.
9 Aug 2024
9 August 2024
On behalf of our organization 'Prarambh' Kala Academy, Thane, under our social activities, the activity 'Ao Diya Jalaye' is being implemented in the Balikashram at Waghbeel. The members of the organization Sushma Bhagwat and Shraddha Dabake today. Met girls on 9th August 2024.
Explained the difference between dramatization and monologue. What is Natya Chhata and how to present it with demonstration. In the previous session, Diwakar's theatrical shades were given for recitation. After reading it, he told how to make the characters around him while performing it.
Told the importance of transition. Revised what is verbal and physical acting. The unique importance of body language and gestures while portraying the characters in the play was given with examples.
While teaching different characters like Manjula, Rajkumar, Raja, Master while teaching passages from 'Ti Phulrani', he described in detail the language, gestures and body language of each of them.
He told examples from his daily watching that he will understand how to find the characters he is playing in the play, how to create other characters around him, how should be his behavior on the stage and with the co-actors. Important instructions were given for what to study, how to work hard to do justice to the role that you are going to play.
The girls really enjoyed this session. Today's sessions were colorful as they showed interest in reading paragraphs and presentations by themselves.
A few snapshots.
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे
9 अॅागस्ट 2024
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने आमच्या सामाजिक उपक्रमांतर्गत ‘आओ दिया जलाए’ हा उपक्रम वाघबीळ येथील बालिकाश्रमात राबविला जातो. संस्थेच्या सदस्या सुषमा भागवत आणि श्रध्दा दाबके ह्यांनी आज दि. 9 अॅागस्ट 2024 रोजी मुलींची भेट घेतली.
नाट्यछटा आणि एकपात्री ह्यामधील फरक समजावून सांगितला. नाट्यछटा म्हणजे काय, की कशी सादर करावी हे प्रात्यक्षिकासहित सांगितले. मागील सत्रामधे कै. दिवाकरांच्या नाट्यछटा पाठांतरासाठी दिल्या होत्या. त्या वाचून घेऊन, ती सादर करताना त्यातील आपल्या अवतीभोवतीची पात्रे कशी उभी करावी हे सांगितले.
पाठांतराचे महत्व सांगितलं. वाचिक आणि कायिक अभिनय म्हणजे काय ह्याची उजळणी करुन घेतली. नाटकातील पात्रं साकारताना देहबोली आणि हावभाव ह्यांचे अनन्यसाधारण महत्व उदाहरणासहित दिले.
‘ती फुलराणी’ मधील परिच्छेद शिकवताना मंजुळा, राजकुमार, राजा, मास्तर अशी वेगवेगळी पात्रं शिकवताना त्यांची प्रत्येकाची भाषा, हावभाव, देहबोली ह्यांचे सविस्तर वर्णन केले.
नाटकातील आपण साकारत असलेले पात्रं कसं शोधायचं, आपल्या भोवतालीची इतर पात्रं कशी उभी करावी, रंगमंचावर आपला आणि सहकलाकारांबरोबरचा वावर कसा असला पाहिजे हे त्यांना समजेल अशा त्यांच्या रोजच्या पहाण्यातील उदाहरणांवरुन सांगितले. आपण वठवणार असलेल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी काय अभ्यास केला पाहिजे, कशा प्रकारे मेहनत घ्यावी ह्यासाठी महत्वाच्या सूचना दिल्या.
मुलींना हे सत्र खूपच आवडले. स्वत:हून समोर येत परिच्छेद वाचन, सादरीकरण ह्यासाठी उत्सुकता दाखवल्याने आजचं सत्रं छान रंगले.
काही क्षणचित्रं.
2 August 2024
Prarambha Kala Academy, Thane
2 August 2024
On behalf of our organization 'Prarambha' Kala Academy, Thane, as part of our social activities, the activity 'Ao Diya Jalaye' is being implemented in the orphanage at Waghbeel. Today On 2nd August 2024, Snehal Purandare, a member of the organization, met the girls. First, he informed the girls about Ashadhi Ekadashi, the timing of Ashadhi Ekadashi, its importance. Narrated Gurupurnima as a story on the occasion of the recent Gurupurnima. World Famous Cricketer Sachin Tendulkar - His Guru Shri. Ramakant Achrekar, Actress Madhuri Dixit- Her Guru Pt. Birju Maharaj, badminton player P.V. Sindhu- her guru Phulela Gopichand, famous singer Shankar Mahadevan- her guru Sri. Told information about Srinivas Khale. Emphasized the importance of Guru. Eklavya, Dronacharya, Guru of Kauravas, Sandipani Rishi, Guru of Srikrishna Balarama, Arya Chanakya, Guru of Chandragupta Maurya, convinced the importance of Gurus by saying many things. It is the Guru who leads from darkness to light. The prayer 'Gurubrahma Guruvishnu' was said.
Yesterday 1 August. Death anniversary of Lokmanya Tilak. Once as a child, Tilak asked his father for a book of Banabhatta. Father asked to solve the most difficult maths. After many attempts he solved it and got the book of Banabatta. We should develop an attitude of dedication and hard work for what we want to achieve. He told many stories about Tilak's childhood. Tilak's work, his contribution in the freedom struggle was highlighted.
Tilak is our great leader
Our salutations to them
Kesari Maratha Newspaper
The British were shocked.
He taught some songs that spoke about the importance of Tilak's work.
Also played some fun games. The session was full of stories, songs and games and the girls loved it.
A few snapshots.
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे
2 ॲागस्ट 2024
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने आमच्या सामाजिक उपक्रमांतर्गत ‘आओ दिया जलाए’ हा उपक्रम वाघबीळ येथील बालिकाश्रमात राबवला जातो. आज दि. 2 अॅागस्ट 2024 रोजी संस्थेच्या सभासद स्नेहल पुरंदरे ह्यांनी मुलींची भेट घेतली. प्रथम त्यांनी आषाढी एकादशी, आषाढी एकादशीची वारी, त्याचे महत्व अशी माहिती मुलींना दिली. अलिकडे झालेल्या गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गोष्टीरुप गुरुपौर्णिमा कथन केली. जगद्विख्यात क्रिकेटियर सचिन तेंडुलकर - त्याचे गुरु श्री. रमाकांत आचरेकर, अभिनेत्री माधुरी दिक्षीत- तिचे गुरु पं. बिरजू महाराज, बॅटमिंटनपटू पी.व्ही. सिंधू- तिचे गुरु फुलेला गोपीचंद, सुप्रसिध्द गायक शंकर महादेवन- त्यांचे गुरू श्री. श्रीनिवास खळे ह्यांच्याबद्दल माहिती सांगितली. गुरुचे महत्व अधोरेखित केले. एकलव्य, कौरवांचे गुरू द्रोणाचार्य, श्रीकृष्ण बलरामाचे गुरू सांदिपनी ऋषी, चंद्रगुप्त मौर्याचे गुरु आर्य चाणक्य अशा खूप गोष्टी सांगून गुरुंचे महत्व पटवून दिले. अंध:कारातून प्रकाशाकडे नेतो तो गुरु. ‘गुरुर्ब्रह्मा गुरु्र्विष्णू ‘ ही प्रार्थना म्हटली.
काल दि. 1 अॅागस्ट . लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. एकदा लहान असताना टिळकांनी वडिलांकडे बाणभट्टाचे पुस्तक मागितले. वडिलांनी कठिणातले कठीण गणित सोडवायला सांगितले. पुष्कळ प्रयत्नांती त्यांनी ते सोडवले आणि बाणभट्टाचे पुस्तक त्यांना मिळाले. जे आपल्याला मिळवायचे त्याकरिता झोकून देऊन कष्ट करायची वृत्ती अंगी बाणवली पाहिजे. अशा टिळकांच्या लहानपणीच्या अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. टिळकांचे कार्य, स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान विषद केले.
‘टिळक आमचे महान नेते
त्यांना आमचा सादर प्रणाम
केसरी मराठा वर्तमानपत्र
इंग्रज झाले हैराण’
अशी टिळकांच्या कार्याची महती सांगणारी काही गाणी त्यांनी शिकवली.
काही गंमतीशीर खेळ सुध्दा घेतले. गोष्टी, गाणी, खेळ ह्यांनी परिपूर्ण असे हे सत्र मुलींना खूपच आवडले.
काही क्षणचित्रं.
26 July 2024
Prarambha Kala Academy, Thane
26 July 2024
Prarambha Kala Academy, Thane
On behalf of our organization, under our social activities, the activity 'Ao Diya Jalaye' is being implemented in the Balikashram at Waghbeel. The members of the organization Sushma Bhagwat and Shraddha Dabake today. Met girls on 26th July 2024. Looking at the current falling rain, he recited poet Indira Sant's poem 'Noko Nako Re Pavasa'. He learned how to read poetry from this.
Today's topic was - Drama.
Explaining the theoretical aspect of drama, the types of drama, its elements were explained. There are types of plays like one act, two act, three act. The elements of a play are writer, director, scenery, stage design, costumes, sound combination, lighting scheme. How the play takes place, the author writes the play, what are the roles of the director, the costume designer and all the other elements are well explained. He gave detailed information about what kind of studies a theater artist has to study. Abhinaya forms are physical, verbal, sattvic and aharya.
Recitation, voice, voice fluctuations, dialogues are verbal acting. Here are some tricks to improve your voice. Taught different types of exercises to improve language. While telling what is Kayik Abhinaya, what we want to say through body language such as how a rural and urban woman walks, posture, hand movements, eye and facial expressions conveys to the front without words i.e. Kayika Abhinaya is demonstrated. Dressing up and adorning the costumes means food acting.
'Tula Shukeen Chalchan Chadha' from the play 'Ti Phulrani' was introduced and shown. Through this entry, the girls came to know how the different characters in the play come to life through their verbal, physical and dietary performances.
During the play, he performed a scene from the Rajasthani play 'Mole Desde Radaya' to show that the opposite actor's gestural response to the co-star's dialogues helps to make the play better.
He told the girls about the benefits of drama that learning drama, acting in drama increases confidence, personality development, language mastery, language conservation, memory development.
He told the story of Jai's key while telling why to do drama to entertain the audience, to make them happy. Jai's bud asks mother - why should we flower? Then mother says, we feel good when we see peacocks dancing, deer walking, butterflies fluttering, so we should bloom to make people happy. Just like this Jai Kalli, the play should be done to give sheer joy to the audience.
What is the other satisfaction like seeing the happiness on the other's face?
The girls really liked today's session.
A few snapshots
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे
26 जुलै 2024
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे
ह्या आमच्या संस्थेच्या वतीने आमच्या सामाजिक उपक्रमांतर्गत ‘आओ दिया जलाए’ हा उपक्रम वाघबीळ येथील बालिकाश्रमात राबविला जातो. संस्थेच्या सदस्या सुषमा भागवत आणि श्रध्दा दाबके ह्यांनी आज दि. 26 जुलै 2024 रोजी मुलींची भेट घेतली. सध्या कोसळणार्या पावसाचे रुप बघता, कवियित्री इंदिरा संत ह्यांची ‘ नको नको रे पावसा’ ही कविता त्यांनी वाचून दाखवली. कविता कशी वाचावी हे त्यांनी ह्यामधून शिकवले.
आजचा विषय होता- नाटक.
नाटक म्हणजे काय हे नाट्यकलेची तात्विक बाजू(theoretically) समजून सांगताना , नाटकाचे प्रकार, त्याचे घटक सांगितले. एक अंकी, दोन अंकी, तीन अंकी असे नाटकाचे प्रकार असतात. लेखक, दिग्दर्शक, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, ध्वनी संयोजन, प्रकाश योजना असे नाटकाचे घटक असतात. नाटक कसं घडतं, लेखक नाटक लिहितो, दिग्दर्शक, रंगभूषाकार आणि बाकी सर्व घटकांच्या काय काय भूमिका असतात हे छान समजावून सांगितले. नाट्य कलाकाराला कोणता अभ्यास करावा लागतो ह्याची सविस्तर माहिती दिली. कायिक, वाचिक, सात्विक आणि आहार्य हे अभिनयाचे प्रकार असतात. पाठांतर, आवाज, आवाजातील चढउतार, संवादफेक म्हणजे वाचिक अभिनय. आवाज सुधारण्यासाठी काही युक्त्या सांगितल्या. भाषा सुधारण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम शिकवले. कायिक अभिनय म्हणजे काय हे सांगताना, ग्रामीण आणि शहरी स्री कशी चालेल, उभं रहाण्याची पध्दत, हातांच्या हालचाली, डोळ्यांतील आणि चेहर्यावरील भाव अशा देहबोलीतून आपल्याला काय म्हणायचे आहे ते शब्दाविना समोरच्यापर्यंत पोहोचते म्हणजे कायिक अभिनय हे प्रात्यक्षिकातून दाखवले. रंगभूषा आणि वेशभूषा अलंकरण म्हणजेच आहार्य अभिनय.
‘ती फुलराणी’ ह्या नाटकातील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ हा प्रवेश करून दाखवला. नाटकातील वेगवेगळी पात्रं त्यांच्या वाचिक, कायिक आणि आहार्य अभिनयानुळे ठसठशीतपणे कशी जिवंत उभी रहातात हे मुलींना ह्या प्रवेशातून कळले.
नाटक सुरु असताना, सहकलाकाराच्या संवादांना समोरच्या नटाने हावभावातून दिलेला प्रतिसाद , नाटक उत्तम वठवायला मदत करतो हे सांगण्यासाठी ‘मोले घातले रडाया’ हा राजस्थानी नाटकातील सीन त्यांनी करून दाखवला.
नाटक शिकल्याने, नाटकात काम केल्याने आत्मविश्वास वाढतो, व्यक्तिमत्व विकास होतो, भाषेवर प्रभुत्व येते, भाषा संवर्धन होते, स्मरणशक्तीचा विकास होतो, असे नाटकाचे फायदे त्यांनी मुलींना सांगितले.
नाटक का करायचं तर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी, त्यांना आनंद देण्यासाठी हे सांगताना त्यांनी जाईच्या कळीची गोष्ट सांगितली. जाईची कळी आईला विचारते- आपण का फुलायचं ? तेव्हा आई म्हणते, मोर नाचताना बघून, हरिणं बागडताना पाहून, फुलपाखरं भिरभिरताना दिसल्यावर आपल्याला छान वाटतं, तसं आपण फुलायचं ते लोकांना प्रसन्न वाटण्यासाठी. ह्या जाईच्या कळीप्रमाणेच नाटक करायचं ते प्रेक्षकांना निखळ आनंद देण्यासाठीच.
समोरच्याच्या चेहर्यावरील आनंद बघण्यासारखं दुसरं समाधान ते काय ?
मुलींना आजचं सत्र खूपच आवडलं.
काही क्षणचित्रं
19 July 2024
19 July 2024
Prarambha Kala Academy, Thane
On behalf of our organization, under our social project, the activity 'Ao Diya Jalaye' is regularly implemented in the Balikashram at Waghbeel. Our members visit the girls regularly and teach them different arts. Information is given about various things. Today on July 19, 2024, members of the organization Ragini Sane and Sneha Ravande met the girls. The month of Shravan will begin in a few days. Mangalagouri is worshiped in Shravana. Mangagouri is awakened by playing games. He informed the girls about what is Mangalore and how it started. Mangalore means worship and adoration of Goddess Parvati and Mahadev. Mangalore Pujan is an ancient tradition and an important part of our culture. In earlier times, women used to work continuously in the fields and at home in the villages. They started playing different games like Zimma and Fugdya together with the aim of getting some rest from work. These games were started with the intention that when a girl gets newly married and comes to her in-laws, she should be introduced to everyone, her senility will be reduced, and her in-laws will get rid of her. An important purpose behind this was to increase her conversation with relatives and everyone in the area, to strengthen the relationship. He taught the girls about Zimma like 'Mango ripens, juice flows, King of Konkan plays Zimma' and different types of balloons. The girls had a lot of fun while playing the Mangalore games.
The girls also got information about the wild vegetables that grow in Shravan, their importance, as well as the beautiful flowers that bloom in Shravan.
He also taught beautiful dances based on folk songs by explaining what folk art is.
Information about Vitthal was also told on the occasion of the recently held Ashadhi Ekadashi.
Dancing makes your mind happy, negative thoughts go away from your mind, it is also important to give good exercise to your body. Information about various forms of dance such as Bharatnatyam, Kathak, Odissi, Kuchipudi etc. Dancing makes us happy. Dance is a powerful medium of expression. The girls liked this session which gave information about dance in this way.
Today's session concluded with a dance on the popular song 'Zing Zing Zing Dhingat'.
A few snapshots.
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे
19 जुलै 2024
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे
ह्या आमच्या संस्थेच्या वतीने आमच्या सामाजिक प्रकल्पांतर्गत वाघबीळ येथील बालिकाश्रमात ‘आओ दिया जलाए’ हा उपक्रम नियमित राबविला जातो. आमचे सदस्य मुलींची नियमित भेट घेऊन त्यांना वेगवेगळ्या कला शिकवतात. विविध गोष्टींविषयी माहिती दिली जाते. आज दि.19 जुलै 2024 रोजी संस्थेच्या सदस्या रागिणी साने आणि स्नेहा रवंदे ह्यांनी मुलींची भेट घेतली. काही दिवसांतच श्रावण महिना सुरु होणार आहे. श्रावणामध्ये मंगळागौरीचे पूजन केले जाते. मंगळागौरीचे खेळ खेळून जागरण केले जाते. मंगळागौर म्हणजे काय, तिची सुरुवात कशी झाली ह्याविषयी त्यांनी मुलींना माहिती दिली. मंगळागौर म्हणजे पार्वती देवी आणि महादेवाची पूजा आणि आराधना. प्राचीन परंपरा असलेली मंगळागौर पूजन आपल्या संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे. पूर्वीच्या काळी गावागावांमधे महिला शेतांमधे, घरामधे अविरत कामे करायच्या. कामामधून थोडा विसावा मिळावा ह्या उद्देशाने एकत्र येऊन झिम्मा, फुगड्या असे वेगवेगळे खेळ त्या खेळू लागल्या. नवीन लग्न होऊन मुलगी जेव्हा माहेरुन सासरी येते तेव्हा तिची सर्वांशी ओळख व्हावी, तिचा बुजरेपणा कमी व्हावा, ती सासरी रुळावी ह्या हेतूने ह्या खेळांना सुरुवात झाली. नातलग तसेच परिसरातील सर्वांशी तिचं संभाषण वाढावं, नाती दृढ व्हावी हा एक महत्वाचा उद्देश ह्यामागे होता. ‘आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो’ अशा प्रकारचे झिम्मा तसेच फुगड्यांचे विविध प्रकार त्यांनी मुलींना शिकवले. मंगळागौरीचे खेळ खेळताना मुलींना खूपच मजा वाटली.
श्रावणात पिकणार्या रानभाज्या, त्यांचे महत्व, तसेच श्रावणात बहरणारी छान छान फुलं ह्याचीसुध्दा माहिती मुलींना मिळाली.
लोककला म्हणजे काय हे सांगून लोकगीतांवर आधारित सुंदर नृत्य सुध्दा त्यांनी शिकवले.
नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीनिमित्ताने विठ्ठलाबद्दलची माहिती सुध्दा सांगण्यात आली.
नृत्य केल्याने आपले मन प्रसन्न होते, नकारात्मक विचार मनातून निघून जातात, शरीराला चांगला व्यायाम सुध्दा होतोअसे नृत्याचे महत्व आहे. नृत्याचे विविध प्रकार कोणकोणते आहेत जसं की भरतनाट्यम, कथ्थक, ओडिसी, कुचीपुडी वगैरे ह्याविषयी माहिती सांगितली. नृत्य केल्याने आपण आनंदी होतो. नृत्य हे अभिव्यक्तीचे एक सशक्त माध्यम आहे. अशा प्रकारे नृत्यविषयक माहिती देणारे हे सत्र मुलींना अतिशय आवडले.
‘झिंग झिंग झिंग धिंगाट’ ह्या लोकप्रिय गाण्यावरील नृत्याने आजच्या सत्राची सांगता झाली.
काही क्षणचित्रं.
12 July 2024
Prarambha Kala Academy, Thane
12 July 2024
On behalf of our organization 'Prarambha' Kala Academy, Thane, as part of our social activities, the activity 'Ao Diya Jalaye' is being implemented in Balikashram at Waghbeel. We try to give good morals to the children in this cultured age, to give positive direction to their thoughts and to increase their mental strength. Smita Salgaonkar and Vrishali Sawant, members of the organization, today d. Met girls on 12th July 2024.
He taught the girls today the hymn of Mahishasur Mardini Devi, 'Ayigiri Nandini Nandit Medini'. Goddess Parvati kills the demon Mahishasur while in Durgavtar. Hence she got the name Mahishasur Mardini. Ayigiri means mountain girl. It is said that Adi Shankaracharya composed this stotra.
Chanting this hymn helps to ward off bad thoughts, disappointments. The mind becomes calm. Helps to balance thinking, develops right decision making ability. Morale increases. A mindset is created to accept good and bad things.
The girls sang this hymn in a very beautiful way, in a rhythmic move. He liked it a lot. A few came forward on their own and started speaking on the mic.
Also taught some goddess songs.
A few snapshots.
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे
12 जुलै 2024
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने आमच्या सामाजिक उपक्रमांतर्गत ‘आओ दिया जलाए’ हा उपक्रम वाघबीळ येथील बालिकाश्रमामधे राबविला जातो. ह्या संस्कारक्षम वयात मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांच्या विचारांना सकारात्मक दिशा मिळावी, त्यांचे मानसिक बळ वाढावे, ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. संस्थेच्या सदस्या स्मिता साळगांवकर आणि वृषाली सावंत ह्यांनी आज दि. 12 जुलै 2024 रोजी मुलींची भेट घेतली.
‘अयिगिरि नंदिनी नंदित मेदिनी’ हे महिषासूर मर्दिनी देवीचे स्तोत्र त्यांनी आज मुलींना शिकवले. देवी पार्वती दुर्गावतारात असताना महिषासूर राक्षसाचा वध करते. म्हणून तिला महिषासूर मर्दिनी हे नांव पडले. अयिगिरी म्हणजे पर्वतकन्या . असं म्हटलं जातं की आदि शंकराचार्यांनी हे स्तोत्र रचले आहे.
हे स्तोत्र म्हटल्याने वाईट विचार, निराशा दूर ठेवण्यास मदत होते. मन शांत होते. विचार समतोल होण्यास मदत होते, योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते. मनोबल वाढते. चांगल्या वाईट गोष्टी स्वीकारण्याची मानसिकता तयार होते.
मुलींनी अतिशय सुंदर पध्दतीने, लयबध्द चालीमधे हे स्तोत्र उत्तम रीतीने म्हटलं. त्यांना खूप आवडलं. काही जणी स्वत:हून पुढे येऊन माईकवर म्हणू लागल्या.
तसेच काही देवीची गाणी सुध्दा शिकवली.
काही क्षणचित्रं.
5 July 2024
Prarambha Kala Academy, Thane
5 July 2024
A social activity "Aao Diya Jalaye" is being implemented by our organization 'Prarambha' Kala Academy, Thane in Balikashram at Waghbeel. Smita Salgaonkar and Vrishali Sawant, members of the organization, today d. Met girls on 5th July 2024. He taught Srisukta to the girls. Explained its meaning. This Vedic hymn from the Rigveda in praise and adoration of Sri Lakshmi Devi is sung in Chhandbaddha rhythm. The girls embraced it wholeheartedly. These stotras to be chanted in the morning or in the evening for the worship of the Goddess not only improve our pronunciation but more importantly create an envelope of positive energy around us. Saying this gives the strength to face the difficulties or troubles due to the power gained. Some examples show that bad thoughts are kept away from the mind. The structure of the mind is good. Attitude becomes positive. The mind becomes calm. The girls were harmoniously saying Srisukta in a nice way. A few snapshots.
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे
5 जुलै 2024
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेतर्फे वाघबीळ येथील बालिकाश्रमात “आओ दिया जलाए” हा सामाजिक उपक्रम राबविला जातो. संस्थेच्या सदस्या स्मिता साळगांवकर आणि वृषाली सावंत ह्यांनी आज दि. 5 जुलै 2024 रोजी मुलींची भेट घेतली. त्यांनी मुलींना श्रीसूक्त शिकवले. त्याचा अर्थ समजावून सांगितला. ऋग्वेदामधील हे श्री लक्ष्मी देवीची स्तुती आणि आराधना करणारे वैदिक स्तोत्र छंदबध्द लयीत म्हटले जाते. मुलींनी अतिशय मनापासून ते आत्मसात केले. देवीच्या पूजेसाठी सकाळी किंवा संध्याकाळी म्हणावयाचे हे स्तोत्र आपले उच्चार तर सुधारतातच पण महत्वाचे म्हणजे आपल्याभोवती सकारात्मक शक्तीची कवचकुंडलं निर्माण करतात. हे म्हटल्याने मिळालेल्या शक्तीमुळे आलेल्या अडचणी किंवा संकटांचा सामना करण्याचे बळ मिळते. वाईट विचार मनात येण्यापासून दूर रहातात हे काही उदाहरणांनी सांगितले. मनाची जडण-घडण चांगली होते. वृत्ती सकारात्मक बनते. मन शांत होते. मुली समरस होऊन श्रीसूक्त छान पध्दतीने म्हटत होत्या. काही क्षणचित्रं.
28 June 2024
Prarambha Kala Academy, Thane
28 June 2024
Prarambha Kala Academy, Thane
Through our organization, under our social activities, the activity 'Aao Diya Jalaye' is implemented in Balikashram. Members of the organization Ragini Sane and Sneha Ravande d. On June 28, 2024, met the girls in the Balikashram at Waghbeel. Today's topic was - Painting on pottery.
At the beginning, he told the information about when pottery started to be made, what these pots are used for. Primitives started cooking by making clay pots. As humans progressed, copper, brass and steel vessels were used instead of clay. And now back to the importance of earthenware, earthenware for cooking is available in the market.
Beautifully designed, painted in various colors, various shapes and types of pots are used for wall hangings and decorative and many other useful items in the home as well as in the office. Ornamental objects made of clay, painted in attractive colors, quickly attract attention and enhance the beauty of the place where it is placed.
There are different colors for painting glass, acrylic, pottery. He also told what colors and how to use brushes to paint pottery. She was also asking the girls questions with an inquisitive attitude.
Our creatively painted earthenware with beautiful designs and attractive color schemes not only gives us the joy of creation but also enthralls the onlookers.
The girls were very happy. A few snapshots.
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे
28 जून 2024
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे
ह्या आमच्या संस्थेतर्फे आमच्या सामाजिक उपक्रमांतर्गत ‘आओ दिया जलाए’ हा उपक्रम बालिकाश्रमामधे राबविला जातो. संस्थेच्या सदस्या रागिणी साने आणि स्नेहा रवंदे ह्यांनी दि. 28 जून 2024 रोजी वाघबीळ येथील बालिकाश्रमातील मुलींची भेट घेतली. आजचा विषय होता- मातीच्या भांड्यांवरील रंगकाम.
मातीची भांडी बनवायला कधी सुरुवात झाली, ही भांडी कशाकशासाठी वापरली जातात अशी माहिती त्यांनी सुरुवातीला सांगितली. आदिमानवाने मातीची भांडी बनवून त्यात स्वयंपाक करण्यास सुरुवात केली. मानव जसजसा प्रगत होत गेला, तसतसं मातीऐवजी तांबं, पितळं, स्टील अशा भांड्यांचा वापर होऊ लागला. आणि आता परत मातीच्या भांड्यांचं महत्व लक्षात घेऊन , स्वयंपाकासाठी मातीची भांडी बाजारात उपलब्ध आहेत.
सुंदर डिझाइन्सची, विविध रंगांनी रंगवलेली, विविध आकार आणि प्रकारची भांडी घरामध्ये तसेच ॲाफिसमधे वॅाल हॅंगिंग आणि शोभेच्या व इतर अनेक उपयुक्त वस्तू ठेवण्यासाठी वापरली जातात. मातीपासून बनवलेल्या , आकर्षक रंगांनी रंगवलेल्या शोभेच्या वस्तू पटकन लक्ष वेधून घेतात आणि ज्या ठिकाणी ठेवू तेथील शोभा वाढवतात.
ग्लास, अॅक्रेलिक, मातीची भांडी रंगवण्यासाठी वेगळे रंग असतात. मातीची भांडी रंगवण्यासाठी कोणते रंग, कसे ब्रश वापरावेत हे सुध्दा त्यांनी सांगितले. जिज्ञासू वृत्तीने मुलींना पडणारे प्रश्नही त्या विचारत होत्या.
आपल्या कल्पकतेने सुंदर डिझाईन्स आणि आकर्षक रंगसंगतीने रंगवलेली मातीची भांडी आपल्याला निर्मितीचा आनंद तर देतात शिवाय बघणाऱ्यालही मोहित करतात.
मुली खूप खूष झाल्या. काही क्षणचित्रं.
21 June 2024
On behalf of our organization 'Prarambha' Kala Academy, Thane, the activity 'Aao Diya Jalaye' is implemented in Balikashram as part of our social activities. Today On June 21, 2024, the members of the organization, Ragini Sane and Sneha Ravande, met the girls in the Balikashram at Waghbeel. Today is June 21. International Yoga Day. International Yoga Day, which is celebrated with enthusiasm all over the world, is a priceless gift of India to the world. He explained to the girls how yoga is a great way of life beyond yoga and pranayama. Convinced the importance of Yogasana. He said since when it became popular as International Yoga Day.
Later he taught the girls to draw henna. A brief history of henna was told where henna is found, how it is prepared, in which countries it is found. Henna is a medicinal plant and it is used for some purposes. In India, henna is removed on auspicious occasions and festivals. He informed that henna is grown in some countries outside India, but the henna extracted there is called tattoo outside India. Henna, which is cold in quality, is also used to apply to the hair. He taught the girls the various designs of henna. He showed how to create a beautiful design by removing small different patterns and adding them together. From how to hold the angle of henna to how to draw henna on the entire hand, he taught with demonstration. The girls were enthusiastically understanding, asking their questions. He also gave valuable advice that things learned at a young age are remembered forever, practice makes them solid, so keep practicing whenever you get time. Any art is a sadhana. Practicing the art will benefit us for our progress in our next life.
The girls loved learning henna designs and Ragini and Sneha agreed to come back to teach mehndi at their loving insistence. The girls were very happy. A few snapshots.
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने आमच्या सामाजिक उपक्रमांतर्गत ‘आओ दिया जलाए’ हा उपक्रम बालिकाश्रमामधे राबविला जातो. आज दि. 21 जून 2024 रोजी संस्थेच्या सदस्या रागिणी साने आणि स्नेहा रवंदे ह्यांनी वाघबीळ येथील बालिकाश्रमातील मुलींची भेट घेतली. आज 21 जून. आंतरराष्ट्रीय योग दिवस. संपूर्ण जगभर उत्साहाने साजरा केला जाणारा हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणजे भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. योगासने आणि प्राणायाम ह्यापलीकडे जाऊन योग ही एक उत्तम जीवनपध्दती कशी आहे ते त्यांनी मुलींना समजावून सांगितले. योगासनांचे महत्व पटवून दिले. हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून केव्हापासून प्रचलित झाला ते सांगितले.
नंतर त्यांनी मुलींना मेंदी काढायला शिकवली. मेंदी कुठे मिळते, कशी तयार केली जाते, कोणकोणत्या देशांत मिळते असा मेंदीचा थोडक्यात इतिहास सांगितला. मेंदी ही एक औषधी वनस्पती असून तिचा कशाकशासाठी वापर केला जातो ही माहिती दिली. भारतामधे शुभप्रसंगी आणि सणावाराला मेंदी काढली जाते. भारताबाहेरही काही देशांमधे मेंदी पिकते, पण तिथे काढलेल्या मेंदीला भारताबाहेर टॅटू म्हटले जाते अशी माहिती त्यांनी दिली. गुणाने थंड असलेली मेंदी केसांना लावण्यासाठी सुध्दा वापरतात. मेंदीची तरतऱ्हेची डिझाईन्स त्यांनी मुलींना शिकवली. छोटे छोटे वेगवेगळे पॅटर्न्स काढून ते जोडले की कसे सुंदर डिझाईन तयार होते ते दाखवले. मेंदीचा कोन कसा पकडायचा इथपासून ते पूर्ण हातावर मेंदी कशी काढावी हे त्यांनी प्रात्यक्षिकासहित शिकविले. मुली अत्यंत उत्साहाने समजून घेत होत्या, त्यांचे प्रश्न विचारत होत्या. लहान वयात शिकलेल्या गोष्टी कायम स्मरणात रहातात, सरावाने त्या पक्क्या होतात, म्हणून तुम्ही वेळ मिळेल तेव्हा सराव करत रहा असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला. कोणतीही कला ही एक साधना असते. कलेची साधना केल्याने आपल्या पुढील आयुष्यात आपल्याला त्याचा फायदा आपल्या प्रगतीसाठी होतो.
मुलींना मेंदी डिझाईन्स शिकायला फारच आवडले आणि त्यांच्या प्रेमळ आग्रहाखातर परत मेंदी शिकवायला येण्याचे रागिणी आणि स्नेहा ह्यांनी कबूल केले. मुली खूप खूष होत्या. काही क्षणचित्रं.
14 June 2024
On behalf of our organization 'Prarambha' Kala Academy, Thane, the activity 'Ao Diya Jalaye' is implemented in Balikashram as part of our social activities. Keeping in mind the society, the girls there are given free training in various arts. We try to set an example before them by telling them the stories and biographies of many great people. Today on June 14, 2024, Rohini Rasal, the inaugural member, met the girls in the Balikashram at Waghbeel. Today's session started with the prayer 'Vandan Devila Karuya'. Rain was invoked. Taught some rain songs like 'Rimzim Sari Iwili Iwili Chandni'. The given word should appear twice in the song, singing songs where the word Chandra or Chand appears and also singing songs where the number appears in the song. Singing songs with such words and numbers is a memory booster. Words were taken. Playing so many intellectually stimulating games kept the girls excited. Fun ball games are also taken to improve concentration, agility. In which the girls had a lot of fun.
He shared the stories of some people who told him how to find joy in the little things. The story of Shivaji Maharaj is the origin of the phrase Pedgaon shahane or going to Pedgaon.
The session ended with a song on Krishna called 'Come here My Dear Krishna'.
The girls were very happy. Learned songs were humming. They were inviting me to come and meet again with happiness.
A few snapshots
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने आमच्या सामाजिक उपक्रमांतर्गत ‘आओ दिया जलाए’ हा उपक्रम बालिकाश्रमामधे राबविला जातो. सामाजिकतेचे भान ठेवून तेथील मुलींना विविध कलांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. अनेक थोर व्यक्तींच्या गोष्टी, चरित्रे त्यांना सांगून त्यांच्यापुढे आदर्श ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आज दि.14 जून 2024 रोजी प्रारंभच्या सदस्या रोहिणी रसाळ ह्यांनी वाघबीळ येथील बालिकाश्रमातील मुलींची भेट घेतली. ‘वंदन देवीला करुया’ ह्या प्रार्थनेने आजच्या सत्राची सुरुवात झाली. पावसाला आवाहन करण्यात आले. ‘रिमझिम सरी इवली इवली चांदणी’ अशी काही पावसाची गाणी शिकवली. दिलेला एकच शब्द गाण्यामधे दोनदा आला पाहिजे , चंद्र किंवा चांद शब्द येईल अशी गाणी म्हणणे तसेच गाण्यात अंक येईल अशी गाणी म्हणायला सांगितली. असे शब्द आणि अंक असलेली गाणी म्हणणे म्हणजे स्मरणशक्तीला चालना देणे. शब्दांच्या भेंड्या घेतल्या. असे अनेक बुध्दीला चालना देणारे खेळ घेतल्याने मुलींचा उत्साह दुणावला. एकाग्रता , चपळता वाढवणारे गंमतीशीर चेंडूचे खेळही घेतले. ज्यामधे मुलींना खूपच मजा आली.
छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद कसा घ्यावा हे सांगणार्या काही लोकांच्या कथा त्यांनी सांगितल्या. पेडगावचे शहाणे किंवा पेडगावला जाणे हे वाक्प्रचार कशावरुन आले ती शिवाजी महाराजांची कथा सांगितली.
‘Come here My Dear Krishna’ ह्या कृष्णावरच्या गाण्याने सत्राची सांगता झाली.
मुली अगदी मनापासून रमून गेल्या. शिकवलेली गाणी गुणगुणत होत्या. खुष होऊन परत भेटायला या असे आग्रहाचे आमंत्रण देत होत्या.
काही क्षणचित्रं
03-05-2024
"Ao Diya Jalaye" activity is being conducted every Friday by Prarambha Kala Academy at Balikashram at Waghbeel. Today the inaugural member Snehal Purandare visited Balikashrama.
All together started as Ganapati Stotra and Devi Stotra. After that, Snehal Purandare explained the importance of chanting hymns.
While interacting with the girls, the girls were informed about the current changing and rising temperatures. The girls were told what simple measures we can take to prevent this rise in temperature. Like, making seedballs of fruit seeds, using water sparingly, minimizing the use of plastic, etc.
After that, Snehal Purandare did Omkar Sadhana from all the girls. Yogasanas such as Padmasana, Parvatasana, Bhujangasana, Tadasana, Shavasana, etc. were performed scientifically by girls. He also explained how to do it properly, when to inhale and exhale. He also told the benefits of doing yoga properly.
Then there was a memory competition to recall items from the items placed in front of them, which the girls enjoyed a lot.
We talked about what we can do during the summer vacation that has just started. Apart from playing during the holidays, we were guided on helping others, making sustainable items from waste, getting to know a little about next year's topics and preparing our raw topics.
Finally it concluded with the prayer GururBrahma Guruvishnu.
A few snapshots of today's program
"आओ दिया जलाये"
०३-०५-२०२४
प्रारंभ तर्फे वाघबीळच्या बालिकाश्रमात "आओ दिया जलाये" हा उपक्रम दर शुक्रवारी घेण्यात येतो. आज प्रारंभच्या सभासद स्नेहल पुरंदरे ह्यांनी बालिकाश्रमाला भेट दिली.
सगळ्यांनी एकत्रितपणे गणपती स्तोत्र आणि देवी स्तोत्र म्हणून सुरुवात केली. त्यानंतर स्नेहल पुरंदरे ह्यांनी स्तोत्र म्हणण्याचं महत्त्व समजावून सांगितलं.
मुलींशी संवाद साधताना आत्ताच्या बदलत्या आणि वाढलेल्या तापमाना विषयीची माहिती मुलींना करून दिली. ही तापमान वाढ रोखण्याकरता आपण साधे साधे कुठले उपाय करू शकतो ते उपाय मुलींना सांगितले. जसं की, फळांच्या बियांचे सीडबॉल्स करणे, पाणी जपून वापरणे, प्लास्टिकचा वापर कमीत कमी करणे, इत्यादी.
त्यानंतर स्नेहल पुरंदरे ह्यांनी सगळ्या मुलींकडून ओंकार साधना करून घेतली. पद्मासन, पर्वतासन, भुजंगासन, ताडासन, शवासन, इत्यादी योगासनांचे प्रकार शास्त्रोक्त पद्धतीने मुलींकडून करून घेतले. ते योग्य प्रकारे कसे करायचे, श्वास-उछवास कधी करायचा तेही समजावून सांगितले. तसंच योग्य पद्धतीने योगासनं करण्याचे फायदेही सांगितले.
त्यानंतर समोर ठेवलेल्या वस्तूंपैकी वस्तू आठवून सांगण्याची एक स्मरणशक्ती स्पर्धा घेतली, ज्यात मुलींना खूप मजा आली.
नुकत्याच सुरू झालेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत काय काय करू शकतो याबद्दल संवाद साधला. सुट्टीत खेळण्याबरोबरच इतरांना मदत करणे, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे, पुढच्या वर्षीच्या विषयांची थोडीफार ओळख करून घेणे आणि आपल्या कच्च्या विषयांची तयारी करणे याविषयी मार्गदर्शन केलं.
शेवटी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु या प्रार्थनेनी समारोप झाला.
आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं
26-04-2024
"Let's Light the Day"
26-04-2024
"Ao Diya Jalaye" activity is being conducted every Friday in Balikashram of Vaghbeel by Prarambha. Today, the inaugural member Neha Bagve visited the Balikashram.
Neha Bagwe is a Kathak master herself. Today he taught the Rajasthani folk dance 'Ghumar' to the girls. Before that, he gave detailed information about the dance form of Ghumar. How and when this dance is performed by Rajasthani women is told. After that, a dance based on Ghumar folk dance was performed by the girls.
All the girls also participated in the dance with great interest and enjoyed it.
He also performed a Kathak poem to satisfy the insistence of the girls. Finally, he concluded the program with a song on the insistence of the girls.
A few snapshots of today's program.
"आओ दिया जलाए"
२६-०४-२०२४
प्रारंभ तर्फे वाघबीळच्या बालिकाश्रमात दर शुक्रवारी "आओ दिया जलाए" हा उपक्रम घेण्यात येतो. आज प्रारंभच्या सभासद नेहा बागवे ह्यांनी बालिकाश्रमाला भेट दिली.
नेहा बागवे या स्वतः कथ्थक विशारद आहेत. आज त्यांनी मुलींना राजस्थानी लोकनृत्य 'घुमर' शिकवलं. त्याआधी त्यांनी घुमर ह्या नृत्य प्रकाराची सविस्तर माहिती सांगितली. हे नृत्य राजस्थानी महिला कशाप्रकारे आणि कधी करतात ते सांगितलं. त्यानंतर घुमर लोकनृत्यावर आधारित एक नृत्य मुलींकडून बसवून घेतलं.
सगळ्या मुलींनीही खूप आवडीने नृत्य करण्यात भाग घेतला आणि आनंद लुटला.
मुलींचा हट्ट पुरवत कथ्थकचं एक कवित्तही त्यांनी करून दाखवलं. शेवटी मुलींच्या आग्रहावरून एक गाणं म्हणून त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली.
आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं.
19-04-2024
"Aao Diya Jalaye"
19-04-2024
"Ao Diya Jalaye" activity is conducted every Friday by Prarambha in Balikashram of Waghbeel. Today, the inaugural members Sunita Shejwalkar and Rashmi Joshi visited Balikashram.
In the beginning, Sunita Shejwalkar started the program by taking Omkar three times from the girls. Omkar means Ganesha and is always worshiped at the beginning of the work. Then Ganeshstavan was sung and a Shloki Ganesh Stotra composed by Shankaracharya and its meaning was narrated.
Rashmi Joshi introduced the month of Chaitra and told the story of Gudi Padwa.
'Karaskarya' and 'Neela Pani' were two fun yet physically demanding games in which the girls thoroughly enjoyed themselves. After playing and playing, a quiz program was conducted on proverbs to boost the intellect.
Information about Ram Navami, importance of cleanliness etc. was given to the girls.
Later, some time went into songs and poems.
Finally, the program concluded with Ganapati Stotra.
A few snapshots of today's program.
"आओ दिया जलाए"
१९-०४-२०२४
वाघबीळच्या बालिकाश्रमात प्रारंभ तर्फे "आओ दिया जलाये" हा उपक्रम दर शुक्रवारी घेण्यात येतो. आज प्रारंभच्या सभासद सुनीता शेजवलकर आणि रश्मी जोशी ह्यांनी बालिकाश्रमाला भेट दिली.
सुरुवातीला तीन वेळा मुलींकडून ओंकार म्हणून घेऊन सुनीता शेजवलकर ह्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. ओंकार म्हणजे गणपती व त्याची नेहमीच कार्यारंभी पूजा केली जाते. त्यानंतर गणेशस्तवन गाऊन आणि शंकराचार्य रचित एक श्लोकी गणेश स्तोत्र व त्याचा अर्थ सांगण्यात आला.
रश्मी जोशी ह्यांनी चैत्र महिन्याची तसंच वसंत ऋतूची ओळख करून देत गुढीपाडव्याची गोष्ट सांगितली.
'कारसकार्या' आणि 'नीला पानी' असे दोन मजेशीर पण शारीरिक व्यायाम करून घेणारे खेळ घेतले ज्यात मुली मनापासून रमल्या. खेळून दमल्यावर जरा बुद्धीला चालना देणारा म्हणींवरचा प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम घेण्यात आला.
रामनवमीची माहिती, स्वच्छतेचे महत्व इत्यादी वेगवेगळ्या विषयांवर मुलींना माहिती दिली.
नंतर थोडा वेळ गाणी गोष्टी आणि कवितांमध्ये गेला.
अखेरीस गणपती स्तोत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं.
22-03-2024
Prarambha Kala Academy, Thane
"Aao Diya Jalaye"
22-03-2024
The initiative "Ao Diya Jalaye" by Prarambha is conducted every Friday at the Balikashram of Waghbeel. Today, the Prarambha member Neeta Kolhatkar interacted with the girls in the orphanage.
As March 22 is World Water Day, he created a discussion among the girls on how to save water. The girls also expressed their opinions very enthusiastically.
Following the Holi festival coming up two days later, he narrated a mythological story about Holi and told how to burn off your shortcomings and inculcate the Sagun Angi in Holi. While saying this, each girl was asked to tell which of her faults she wanted to remove, from which the girls were made to talk a little. All the girls expressed themselves very freely.
After that, two group games were played to increase concentration and alertness. The girls had a lot of fun with it.
Finally, meditation was done by the girls for ten minutes and the program ended with the opening prayer.
A few snapshots of today's program.
प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे
"आओ दिया जलाए"
२२-०३-२०२४
प्रारंभ तर्फे "आओ दिया जलाए" हा उपक्रम वाघबीळच्या बालिकाश्रमात दर शुक्रवारी घेण्यात येतो. आज प्रारंभच्या सदस्या नीता कोल्हटकर ह्यांनी बालिकाश्रमातील मुलींशी संवाद साधला.
22 मार्च हा जागतिक जल दिन असल्यामुळे त्यांनी पाणी कशाप्रकारे वाचवता येईल ह्यावर मुलींमध्येच चर्चा घडवून आणली. मुलींनीही खूप हिरीरीने आपली मत मांडली.
दोन दिवसांनी येणाऱ्या होळी उत्सवाला अनुसरून त्यांनी होळी बद्दल एक पौराणिक कथा सांगितली व होळीत आपल्या अवगुणांचं दहन करून सगुण अंगी कसे रुजवायचे ते सांगितलं. हे सांगताना प्रत्येक मुलीला आपल्यातला कुठचा अवगुण तीला काढावासा वाटतो ते सांगायला सांगितलं, ज्यातून मुलींना थोडं बोलतं केलं. सगळ्याच मुली खूप मोकळेपणाने व्यक्त झाल्या.
त्यानंतर एकाग्रता आणि हजरजबाबीपणा वाढेल असे दोन ग्रुप गेम्स घेतले. मुलींना त्यात खूपच मजा आली.
शेवटी दहा मिनिटांसाठी मुलींकडून ध्यानधारणा करून घेतली आणि प्रारंभच्याच प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं.
15-03-2024
Prarambha Kala Academy, Thane
"Aao Diya Jalaye"
15-03-2024
As part of the Prarambha "Aao Diya Jalaye" today, member of the Prarambha, psychiatrist Shreya Kulkarni and her colleague Prasanna Adavadkar visited the Balikashrama of Waghbeel.
At the beginning of today, they played a fun game called 'Chinese Tale'. Three groups of girls were formed. The first girl in each group was told a sentence which the girls enjoyed seeing how it changed as it progressed through all the girls in the group to the last girl. Through this, he convinced the girls that it is important to listen carefully to something.
Then told the story of two twins. Rupa explained how we become good or bad because of our attributes. That is why it is understood that we should inculcate good qualities in ourselves and give up bad qualities with effort.
Then he explained the concept of 'Brain Gym' to the girls while explaining that we have to put in a lot of effort to change our bad habits. In this, he has to try for a certain period of time to get rid of any bad habit, to inculcate a good habit in its place and to strengthen it, giving the example of making a habit of working with the left hand. Without it, it convinced us that we cannot change our habits.
He gave valuable guidance to the girls today on how to communicate, listen attentively and change habits.
A few snapshots of today's program.
प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे
"आओ दिया जलाए"
१५-०३-२०२४
प्रारंभच्या "आओ दिया जलाए" या उपक्रमांतर्गत आज प्रारंभच्या सभासद, मानसोपचार तज्ञ श्रेया कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी प्रसन्न अडावदकर ह्यांनी वाघबीळच्या बालिकाश्रमाला भेट दिली.
आज सुरुवातीला त्यांनी 'चायनीज टेल' नावाचा एक मजेशीर खेळ घेतला. मुलींचे तीन गट बनवले. प्रत्येक गटात सुरुवातीच्या मुलीला एक वाक्य सांगण्यात आलं जे गटातील सगळ्या मुलींमार्फत शेवटच्या मुलीपर्यंत पोहोचलं तेव्हा कसं बदललं गेलं होतं याची मजा मुलींनी अनुभवली. यातूनच एखादी गोष्ट लक्षपूर्वक ऐकणं किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी हसत खेळत मुलींना पटवून दिलं.
त्यानंतर दोन जुळ्या मुलांची गोष्ट सांगितली. आपल्यातल्या गुणधर्मामुळे आपण चांगले किंवा वाईट कसे घडतो ते गोष्टी रूपाने समजावून सांगितलं. त्यामुळेच आपण आपल्यात चांगले गुण रुजवले पाहिजेत आणि वाईट गुणांचा प्रयत्नपूर्वक त्याग केला पाहिजे हे समजावलं.
मग आपल्या वाईट सवयी बदलण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात हे समजवताना त्यांनी 'ब्रेन जिम' ही संकल्पना मुलींना समजावून सांगितली. ह्यात त्यांनी डाव्या हाताने काम करण्याची सवय लावून घेण्याचं उदाहरण देऊन, कुठचीही वाईट सवय सोडण्यासाठी, त्या जागी चांगली सवय रुजवण्यासाठी आणि ती दृढ करण्यासाठी एक ठराविक कालावधी प्रयत्न करावा लागतो. त्याशिवाय आपल्या सवयी आपण बदलू शकत नाही हे पटवून दिलं.
अशाप्रकारे संवाद साधणे, लक्षपूर्वक ऐकणे आणि सवयी बदलणे या विषयांवर त्यांनी आज मुलींना मोलाचं मार्गदर्शन केलं.
आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं
08-03-2024
Vardat Kala Academy, Thane
"Aao Diya Jalaye"
08-03-2024
"Ao Diya Jalaye" activity is being conducted by Pradham every Friday in the Balikashram of Waghbeel. Today the inaugural member Neeta Kolhatkar interacted with the girls.
As today 8th March has dual significance as Maha Shivratra and International Women's Day, he informed the girls about both these things. In the beginning, Shiv Panchakshara was taken as a hymn from the girls. This stotra written by Nandi Rishi told how he composed the five syllables 'Namah Shivaya'.Then told the Puranic story of Mahashivratri. Shiva is the god of knowledge and explained how we can try to imbibe the qualities of that Shiva by worshiping him.
March 8 is International Women's Day. The history of how the day started with women marching for their rights in New York in 1908. Later he told how this day started to be celebrated in India as well. It also tells the history of some social reformers who risked their lives for the education of women in India and for raising the status of women in the society.
Through a short quiz, women who have achieved achievements in various fields were introduced.
Wished all the girls a Happy Women's Day, gave them a small talk and interacted with them by asking them what they wanted to be. He explained how he should empower himself physically and mentally to fulfill his dream.
Later there was a little game of musical chairs and alertness which the girls thoroughly enjoyed. Today's program ended with celebrating Women's Day by dancing to a couple of songs.
A few snapshots of today's program.
प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे
"आओ दिया जलाए"
०८-०३-२०२४
प्रारंभ तर्फे दर शुक्रवारी वाघबीळच्या बालिकाश्रमात "आओ दिया जलाए" हा उपक्रम राबवला जातो. आज प्रारंभच्या सदस्या नीता कोल्हटकर ह्यांनी मुलींशी संवाद साधला.
आज 8 मार्च हा दिवस महाशिवरात्र आणि जागतिक महिला दिन असं दुहेरी महत्व असलेला असल्याने त्यांनी या दोन्ही गोष्टींची मुलींना माहिती दिली. सुरुवातीला मुलींकडून शिवपंचाक्षर स्तोत्र म्हणून घेतलं. हे नंदी ऋषींनी लिहिलेलं स्तोत्र 'नमःशिवाय' या पाच अक्षरांना धरून कसं रचलंय ते सांगितलं. नंतर महाशिवरात्रीची पुराणातील कथा सांगितली. शिव म्हणजे ज्ञानाची देवता आणि त्याची आराधना करून त्या शिवाचे गुण आपणही आपल्या अंगी बाणवण्याचा कसा प्रयत्न करू शकतो ते समजावून सांगितले.
8 मार्च हा जागतिक महिला दिन. न्यूयॉर्कमधील महिलांनी 1908 मध्ये त्यांच्या अधिकारांसाठी काढलेल्या मोर्चातून या दिवसाची सुरुवात कशी झाली ह्याचा इतिहास सांगितला. पुढे भारतातही हा दिवस कसा साजरा होऊ लागला ते सांगितले. भारतातील महिलांच्या शिक्षणासाठी आणि महिलांचा समाजातील स्तर उंचावण्यासाठी कोणकोणत्या समाजसुधारकांनी आपले आयुष्य पणाला लावले याचाही इतिहास सांगितला.
एका छोट्याशा प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिलांची ओळख करून दिली.
सगळ्या मुलींना महिला दिनाच्या शुभेच्छा देत त्यांना थोडं बोलतं केलं आणि त्यांना काय बनायची इच्छा आहे ते विचारून त्यांच्याशी संवाद साधला. त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःला शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसं सक्षम बनवायला पाहिजे हे समजावलं.
नंतर संगीत खुर्ची आणि सतर्कता वाढवणारा एक छोटासा खेळ घेतला ज्यात मुली खूप रमल्या. एखाद दोन गाण्यांवर नाच करून महिला दिनाचा आनंद साजरा करत आजचा कार्यक्रम संपला.
आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं.
01-03-2024
Prarambha Kala Academy, Thane
"Aao Diya Jalaye"
01-03-2024
Psychiatrist Shreya Kulkarni, the inaugural member, visited Waghbeel's Balikashram today under the initiative "Ao Diya Jalaye". Today he gave guidance on mental health.
Initially, he made the girls do a clapping act to increase their concentration. The thinking process of our mind is explained when we say that what we think means what we do. In doing this the most important technique taught is 'how to communicate'.
Guided how and what to think to overcome a problem or crisis. While solving the problem, without getting confused, it was explained how to create a proper thought process by using the technique of calmly putting the thoughts of your mind on paper, giving positive instructions to yourself. Two relevant things about Hirakani and one more were also told for that. It also demonstrated the wrong and right communication between our mind and ourselves.
In this way, the girls got to learn how to increase their self-confidence by tracking their inner mind. The session ended today by looking in the mirror every morning and deciding to say what we want to happen.
A few snapshots of today's program.
प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे
"आओ दिया जलाए"
०१-०३-२०२४
आज "आओ दिया जलाए" ह्या प्रारंभच्या उपक्रमांतर्गत वाघबीळच्या बालिकाश्रमाला प्रारंभच्या सभासद, मानसोपचारतज्ञ श्रेया कुलकर्णी ह्यांनी भेट दिली. आज त्यांनी मानसिक स्वास्थ्या विषयी मार्गदर्शन केले.
सुरुवातीला मुलींची एकाग्रता वाढवण्यासाठी त्यांनी टाळ्या वाजवण्याची एक कृती मुलींकडून करून घेतली. आपण विचार करतो म्हणजे नक्की काय करतो हे सांगताना आपल्या मनाची विचार करण्याची प्रक्रिया समजावली. हे करताना सगळ्यात महत्त्वाचं तंत्र म्हणजे 'स्वसंवाद कसा साधावा' हे शिकवलं.
एखादी समस्या किंवा संकट आलं तर त्यावर मात करण्यासाठी कसा आणि काय विचार करायचा याचं मार्गदर्शन केलं. समस्या सोडवताना गोंधळून न जाता शांतपणे कागदावर आपल्या मनातील विचार मांडणे, स्वतःला होकारार्थी सूचना देणे अशी तंत्र वापरून योग्य विचारशृंखला कशी तयार करायची हे समजावलं. त्यासाठी हिरकणीची आणि अजून एक अशा दोन समर्पक गोष्टीही सांगितल्या. तसंच आपलं मन आणि आपण स्वतः यांच्यामधील चुकीच्या आणि योग्य संवादाचं प्रात्यक्षिकही घेतलं.
अशाप्रकारे आपल्या मनाच्याही आतल्या मनाचा म्हणजेच आपल्या अंतर्मनाचा मागोवा घेत स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवता येईल ते मुलींना शिकायला मिळालं. रोज सकाळी आरशात बघून स्वसंवाद साधत आपल्याला काय व्हायचंय ते म्हणायचं असा निश्चय करत आजच सत्र संपलं.
आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं
23-02-2024
Prarambha Kala Academy, Thane
"Aao Diya Jalaye"
23-02-2024
Today, for the third time in a row, the initial member Shubhangi Sansare visited the Balikashram of Waghbeel under the initiative "Aao Diya Jalaye".
The program started quietly with a beautiful prayer. The girls were divided into two groups, one for younger girls and one for older girls.
Little girls were taught to make two kinds of fish by wearing paper clocks. He also taught me how to make beautiful flowers by cutting paper. The colourful fish and flowers made by all the little girls looked so beautiful.
The older girls were taught to make ornaments from old CDs. Paper pasted on old waste CDs, ticks, glass pieces of various sizes, beads, and sparkles and beautifully decorated them were used to make wallpapers, ready-made rangoli designs, and ornamental plates for the table. All the older girls created different beautiful works of art according to their imagination.
Today the girls learned with great joy two arts of origami and sustainable from waste. This gave a lot of scope to their creativity and imagination.
Thus introducing new arts, today's session ended happily.
A few snapshots of today's program.
प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे
"आओ दिया जलाए"
२३-०२-२०२४
आज सलग तिसऱ्यांदा वाघबीळच्या बालिकाश्रमाला प्रारंभच्या सभासद शुभांगी संसारे ह्यांनी "आओ दिया जलाए" ह्या उपक्रमाअंतर्गत भेट दिली.
छानशा प्रार्थनेने शांतपणे कार्यक्रमाची सुरुवात झाली. लहान मुलींचा एक आणि मोठ्या मुलींचा एक असे मुलींचे दोन गट बनवण्यात आले.
लहान मुलींना कागदाच्या घड्या घालून दोन प्रकारचे मासे बनवायला शिकवण्यात आले. तसंच कागद कातरून त्याची सुंदर फुलेही बनवायला शिकवले. सगळ्या छोट्या मुलींनी बनवलेले रंगीबेरंगी मासे आणि फुले खूपच सुंदर दिसत होती.
मोठ्या मुलींना जुन्या सीडी पासून शोभेच्या वस्तू बनवायला शिकवले. जुन्या टाकाऊ सीडीवर कागद चिकटवून, त्यावर टिकल्या, विविध आकाराचे काचांचे तुकडे, मणी, चमकी यांची सुंदर सजावट करून त्यापासून वॉलपीस, तयार रांगोळी डिझाईन आणि टेबलावर ठेवायच्या शोभेच्या तबकड्या बनवल्या गेल्या. सर्व मोठ्या मुलींनी आपापल्या कल्पनेप्रमाणे वेगवेगळ्या सुंदर कलाकृती तयार केल्या.
ओरिगामी आणि टाकाऊ पासून टिकाऊ अशा दोन कला आज मुली खूप आनंदाने शिकल्या. ह्यातून त्यांच्या सृजनशीलतेला आणि कल्पनाशक्तीला खूप वाव मिळाला.
अशाप्रकारे नव्या कलांची ओळख करून घेत, आनंदात आजच्या सत्राची सांगता झाली.
आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं
16-02-2024
Prarambha Kala Academy, Thane
"Aao Diya Jalaye"
16-02-2024
Today, under the initiative 'Ao Diya Jalaye', which is being implemented by Prarambha, Shubhangi Sansare, a member of Prarambha, visited the children's home of Waghbeel.
Today, Shubhangi Madam taught the girls the skill of 'Paper Craft'. Learned how to make beautiful card paper flowers. She demonstrated how to cut card paper, cut it into small pieces, and make small flowers out of it. The amateur girls in the children's ashram also immediately imbibed what was taught and showed it by making flowers in the same way.
The girls were so engrossed in making colourful flowers that they did not know when the session was over.
A few snapshots of today's program.
प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे
'आओ दिया जलाए'
१६-०२-२०२४
आज प्रारंभ तर्फे राबविल्या जाणाऱ्या 'आओ दिया जलाए' ह्या उपक्रमा अंतर्गत वाघबीळच्या बालिकाश्रमात प्रारंभच्या सभासद शुभांगी संसारे ह्यांनी भेट दिली.
आज शुभांगी मॅडमनी मुलींना 'पेपर क्राफ्ट' अर्थात कागदापासून कला कौशल्य शिकवले. कार्ड पेपरची सुंदर फुले बनवायला शिकवले. कार्ड पेपर कापून, त्याचे छोटे तुकडे करून, त्यापासून छोटी छोटी फुले कशी बनवायची याचं प्रात्यक्षिक दाखवलं. बालिकाश्रमातील हौशी मुलींनीही लगेच शिकवलेले आत्मसात करून तशीच फुले बनवून दाखवली.
रंगीबेरंगी फुले बनवण्यात मुली इतक्या रंगून गेल्या की सत्र कधी संपलं त्यांना कळलंच नाही.
आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं
09-02-2024
Prarambha Kala Academy, Thane
"Aao Diya Jalaye"
09-02-2024
The "Ao Diya Jalaye" activity is being implemented every Friday of every month by Prarambha at Balikashram in Waghbeel. Under it, girls are always taught new things, so that their overall development is achieved.
Even today, our early member Shubhangi Sansare met the girls in the Balikashram. It started with a nice prayer.
Today he did a nice demonstration of art from garbage. Learned how to cut strips of old waste calendar leaves, roll them up, and glue them together to make beautiful beads. This gave a great scope to the creativity of the girls. Not only did they get to learn something new, but the joy of making something nice could be seen on the faces of the girls. Around one hundred to seven hundred beads were made by the girls. The girls were so delighted that they lost track of time.
Finally, to make some more paper beads, Shubhangi Tai gave the paper to the girls and asked them to think about what could be made from all these beads.
In this way, today's session was concluded giving opportunity to the creativity of the girls.
A few snapshots of today's program.
प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे
"आओ दिया जलाए"
०९-०२-२०२४
प्रारंभ तर्फे दर महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी वाघबीळ येथील बालिकाश्रमात "आओ दिया जलाए" हा उपक्रम राबविला जातो. त्याअंतर्गत मुलींना नेहमीच नवनवीन गोष्टी शिकवल्या जातात, जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास साधला जाईल.
आजही प्रारंभच्या आमच्या सभासद शुभांगी संसारे यांनी बालिकाश्रमातील मुलींची भेट घेतली. सुरुवात छानशा प्रार्थनेने झाली.
आज त्यांनी कचऱ्यातून कला ह्याचं एक छान प्रात्यक्षिक घेतलं. जुन्या टाकाऊ कॅलेंडरच्या पानांच्या पट्ट्या कापून, त्या गुंडाळून आणि चिकटवून त्यापासून सुंदर छोटे-मोठे मणी कसे बनवायचे ते शिकवलं. यातून मुलींच्या सर्जनशीलतेला छान वाव मिळाला. काहीतरी नवीन शिकायला तर मिळालंच पण आपण काहीतरी छान बनवल्याचा आनंदही मुलींच्या चेहऱ्यावर दिसत होता. जवळपास शंभर ते सव्वाशे मणी मुलींनी बनवले. यात मुली इतक्या रममाण झाल्या होत्या की त्यांना वेळेचं भानच उरलं नाही.
शेवटी आणखीन कागदाचे काही मणी बनवण्यासाठी शुभांगी ताईंनी मुलींना पेपर देऊन ठेवले आणि या सगळ्या मण्यांपासून काय काय बनवता येईल त्याचा विचार करून ठेवायला सांगितलं.
अशा प्रकारे मुलींच्या कल्पकतेला संधी देत आजच्या सत्राची सांगता झाली.
आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं.
02-02-2024
Prarambha Kala Academy, Thane
"Aao Diya Jalaye"
02-02-2024
Snehal Purandare, a member of our organization, started today's visit to the Balikashram in Waghbeel by giving information about different types of claps, such as welcome clap, rocket clap, rain clap, and so on. It created a different energy and enthusiasm among the girls there.
As today 2nd February is Swami Vivekananda's birth anniversary as per the date, an instructive story of Vivekananda, in which he told us how to remove vices cultivate virtues, and move towards the fulfillment of our goals.
On the occasion of the recently held Republic Day, the importance of the Republic, a brief introduction, and the importance of the Constitution of our country were told. Also, by telling how children can protect the constitution through such small things as maintaining friendship among themselves, respecting the elders, and preserving the environment, they all made a resolution on the occasion of Amrit Mahotsava year. Turning to a little study, an attempt was made to establish the foundation of Chaudakhadi in Marathi grammar as well as consonants, vowels, Kanha, matra, ukar, velanti, and some couplets through charts. Moreover, the responsibility of practicing it from the younger girls was entrusted to the older students.
Towards the end of the session, the text of the Constitution at the beginning of the textbook was read. While introducing the inaugural founder, Arundhati Bhalerao, giving information about her work in various fields and the awards she has received, the girls were also inspired to set their own goals and move towards fulfilling their dreams.
As always, the session concluded with a prayer.
A few snapshots of today's program.
प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे
"आओ दिया जलाये"
०२-०२-२०२४
स्वागत टाळी, रॉकेट टाळी, पाऊस टाळी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टाळ्यांची माहिती देत, टाळ्यांच्या गजरात, आजच्या वाघबीळ मधल्या बालिकाश्रमातील भेटीची सुरुवात, आमच्या संस्थेच्या सभासद स्नेहल पुरंदरे यांनी केली. तिथल्या मुलींमध्ये त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साह निर्माण झाला.
आज 2 फेब्रुवारी हा स्वामी विवेकानंदांचा तिथीप्रमाणे जयंती दिन असल्याने, विवेकानंदांची एक बोधपर गोष्ट, ज्यात आपल्यातले दुर्गुण काढून सदगुणांची जोपासना करत आपल्या ध्येयपूर्ती कडे कशी वाटचाल करायची ते सांगितलं.
नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रजासत्ताकाचे महत्व, आपल्या देशाच्या संविधानाची थोडक्यात ओळख आणि महत्व सांगितलं. तसंच आपापसातील मैत्री जपणं, ज्येष्ठांचा मान राखणं, पर्यावरण संवर्धन करणे, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून मुलंही संविधानाची जपणूक कशी करू शकतात हे सांगून, तसा सगळ्यांनी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संकल्पही केला.
थोडसं अभ्यासाकडे वळवत मराठी व्याकरणातील चौदाखडीची ओळख तसेच व्यंजन, स्वर, कान्हा, मात्रा, उकार, वेलांटी आणि काही जोडशब्द यांचा तक्त्यांच्या माध्यमातून पाया पक्का करून घ्यायचा प्रयत्न केला गेला. शिवाय लहान मुलींकडून त्याचा सराव करून घेण्याची जबाबदारी मोठ्या विद्यार्थिनींवर सोपवण्यात आली.
सत्राच्या शेवटा कडे जाताना पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला असलेल्या संविधानाच्या साराच वाचन करण्यात आलं. प्रारंभच्या संस्थापिका, अरुंधती भालेराव यांची ओळख करून देताना त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामाची माहिती आणि त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची माहिती देत मुलींनाही अशाच प्रकारे आपलंही ध्येय निश्चित करून आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची उर्मी मिळाली.
नेहमीप्रमाणेच प्रार्थनेने सत्राची सांगता झाली.
आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं
19 January 2024
'Prarambha' Kala Academy, Thane
"Aao Diya Jalaye"
'Sri Ganeshaya Namah'
Asya Sri Ramraksha Stotra Mantrasya' started as Ramraksha, the visit to Balikashram. The occasion was 'Aao Diya Jalaye', an activity organized by Prarambha every Friday.
Under this On January 19, 2024, Snehal Purandare, a member of the organization, met the girls in the orphanage at Waghbeel. Initially, he took it from the girls as Ram Raksha.
Inauguration of the grand Ram Temple on January 22 and the Ram Utsav to be held accordingly. Also gave information in the form of the story of Sri Rama.
On the occasion of the recent Sankranti, he introduced his culture by telling how this festival is celebrated for three days namely Bhogi, Sankrant, and Kinkrant.
At the same time, the importance of Surya Namaskar for physical and mental health was also told while giving information about the Capricorn transit of the Sun.
His student Sanchika demonstrated how to perform Surya Namaskar in a certain and proper manner and took Surya Namaskar from all the girls accordingly.
Then a short concentration game and an instructive story were told. After that, the session ended as Shubhankaroti.
Eventually, the meeting ended sweetly by deciding to act and speak sweetly like Tilgula.
Surely the visit of Snehal Purandare will be memorable for the girls in the orphanage.
Some snapshots of the event
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे
'आओ दिया जलाए’
'श्री गणेशाय नमः
अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य' अशी रामरक्षा म्हणून सुरूवात झाली बालिकाश्रमातील भेटीची. निमित्त होतं 'प्रारंभ' तर्फे दर शुक्रवारी राबविला जाणारा 'आओ दिया जलाए’ हा उपक्रम.
ह्या अंतर्गत दि. 19 जानेवारी 2024 रोजी संस्थेच्या सभासद स्नेहल पुरंदरे ह्यांनी वाघबीळ येथील बालिकाश्रमातील मुलींची भेट घेतली. सुरुवातीला त्यांनी मुलींकडून रामरक्षा म्हणून घेतली. 22 जानेवारीला होणार्या भव्य राम मंदिराचे उद्घाटन अणि त्या अनुषंगाने होणार्या राम उत्सवाची माहिती दिली. तसंच श्रीरामाची कथा स्वरुपात माहिती दिली.
नुकत्याच झालेल्या संक्रांतीचं औचित्य साधून हा सण भोगी, संक्रांत आणि किंक्रांत असा तीन दिवस कसा साजरा केला जातो ते सांगत आपल्या संस्कृतीची ओळख करून दिली.
त्याच बरोबर सूर्याच्या मकर संक्रमणाची माहिती देत सूर्यनमस्काराचं शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वही सांगितलं. ठराविक आणि योग्य पद्धतीनी सूर्यनमस्कार कसे घालावे ह्याचं प्रात्यक्षिक त्यांची विद्यार्थिनी संचिका हिने दाखवलं व त्यानुसार सर्व मुलींकडून सूर्यनमस्कार घालून घेतले.
नंतर एक छोटासा एकाग्रता वाढविणारा खेळ आणि एक बोधपर गोष्ट सांगीतली गेली. त्यांनंतर शुभंकरोती म्हणून सत्र संपले.
अखेरीस तिळगूळा सारखं गोड वागायचं आणि बोलायचं ठरवून भेटीची गोड सांगता झाली.
निश्चितच स्नेहल पुरंदरे ह्यांची भेट बालिकाश्रमातील मुलींसाठी संस्मरणीय ठरेल.
कार्यक्रमाची काही क्षणचित्रं
12 जानेवारी 2024
On behalf of our organization 'Prarambha' Kala Academy, Thane, as part of our social activities, the activity 'Ao Diya Jalaye' is regularly implemented in Balikashram. Today On January 12, 2024, the members of the organization, Smita Saalgaonkar, Suresh Saalgaonkar and Vrushali Sawant met the girls in the orphanage. Manners inculcated in childhood are remembered forever. It gives a direction of thinking for how to face the challenges faced in daily life. It is as if a child gets a correct ideology from this value education. He understood the importance of meditation and why it should be done. Ganapati Stotra, Mahalakshmi Ashtak, various prayers, some songs taught to girls today. The girls listened attentively and absorbed everything.
A few snapshots
‘प्रारंभ’ कला अकॅडमी , ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने आमच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत ‘आओ दिया जलाए’ हा उपक्रम नियमितपणे बालिकाश्रमामधे राबविला जातो. आज दि. 12 जानेवारी 2024 रोजी संस्थेचे सभासद स्मिता सांळगावकर, सुरेश सांळगावकर आणि व्रुषाली सावंत ह्यांनी बालिकाश्रमातील मुलींची भेट घेतली. बालवयात रुजवलेले संस्कार कायम स्मरणात रहातात. दैनंदिन जीवनात येणाऱ्या आव्हानांना कसे सामोरं जायचं ह्यासाठी विचारांची दिशा मिळते. योग्य अशा विचारधारेचं जणू बाळकडूच ह्या मूल्यशिक्षणातून मिळते.ध्यानधारणा म्हणजे काय, ती का करावी ह्याचे महत्व त्यांना समजावले. गणपती स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक, विविध प्रार्थना, काही गाणी आज मुलींना शिकवली. मुलींनी लक्षपूर्वक सर्व ऐकून आत्मसात केले.
काही क्षणचित्रं
5 January 2024
'प्रारंभ ' कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने 'आओ दिया जलाए' ह्या आमच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत आमचे सदस्य बालिकाश्रमाला भेट देत असतात. आज दि.5 जानेवारी 2024 रोजी संस्थेच्या सदस्य अल्का आडगावकर ह्यांनी वाघबीळ गाव येथील बालिकाश्रमाला भेट दिली. ‘ प्रारंभ ' तसेच संस्थेच्या संस्थापिका संचालिका डॉ.अरूंधती भालेराव ह्यांचा परिचय करून दिला. त्याचबरोबर स्वतः चा ही परिचय करून दिला. शालेय शिक्षणाबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात केल्यास दैनंदिन जीवनात आपल्याला त्याचा फायदा होतो.छंद म्हणून जोपासल्या जाणाऱ्या कलांचे पुढील आयुष्यात व्यवसायात रूपांतर होऊ शकते. त्यामुळे मुलांना घडवताना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील असतो. आज अल्काताईंनी मुलींना टिश्यू पेपरपासून विविध प्रकारची फुले बनवायला शिकवले. आपण बनवलेली सफेद आणि क्रीम कलरची फुले बघून मुलींना खूपच आनंद झाला. नवीन काही शिकण्याचा मुलींचा उत्साह अगदी वाखाणण्याजोगा आहे. मुलींमधील कलागुण ओळखून, त्यांना प्रोत्साहन देत, योग्य ते मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आपण आपल्या हातांनी बनवलेली फुलं पाहून मुली हरखून गेल्या.नवनिर्मितीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.
काही क्षणचित्रे.
15 December 2023
'प्रारंभ ' कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने 'आओ दिया जलाए' ह्या आमच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत आमचे सदस्य बालिकाश्रमाला भेट देत असतात.आज दि.15 डिसेंबर 2023 रोजी संस्थेच्या सदस्य स्वाती नाईक ह्यांनी वाघबीळ गाव येथील बालिकाश्रमाला भेट दिली.शालेय शिक्षणाबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात केल्यास दैनंदिन जीवनात आपल्याला त्याचा फायदा होतो.छंद म्हणून जोपासल्या जाणाऱ्या कलांचे पुढील आयुष्यात व्यवसायात रूपांतर होऊ शकते. त्यामुळे मुलांना घडवताना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील असतो.आज स्वातीताईंनी मुलींना (कागदी) पिवळा गुलाब आणि केशरी रंगाचा गुलाब तसेच फिलर फुले बनवायला शिकवली. मुलींनी फुले बनवण्याची पद्धत अगदी चटकन आत्मसात केली.नवीन काही शिकण्याचा त्यांचा उत्साह बघण्याजोगा होता.आपण आपल्या हातांनी बनवलेली फुलं पाहून नवनिर्मितीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.
काही क्षणचित्रे.
8 December 2023
On behalf of our organization 'Prarambh Kala Academy Thane' under our social activity 'Ao Diya Jalae' our members are visiting the orphanage. Today on 8th December 2023 Swati Naik, a member of the organization visited the orphanage at Waghbeel village. If done, we benefit from it in our daily lives. Arts that are cultivated as a hobby can turn into a business later in life. So while making children we strive for their overall development. Today Swati Tai taught the girls to make (paper) Mexican Petunia flowers, leaves, and petals. The joy of innovation was overflowing from his face.
A few snapshots.
'प्रारंभ ' कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने 'आओ दिया जलाए' ह्या आमच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत आमचे सदस्य बालिकाश्रमाला भेट देत असतात.आज दि.8 डिसेंबर 2023 रोजी संस्थेच्या सदस्य स्वाती नाईक ह्यांनी वाघबीळ गाव येथील बालिकाश्रमाला भेट दिली.शालेय शिक्षणाबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात केल्यास दैनंदिन जीवनात आपल्याला त्याचा फायदा होतो.छंद म्हणून जोपासल्या जाणाऱ्या कलांचे पुढील आयुष्यात व्यवसायात रूपांतर होऊ शकते. त्यामुळे मुलांना घडवताना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील असतो.आज स्वातीताईंनी मुलींना (कागदी) मेक्सिकन पेट्युनिया ही फुले , पाने, पाकळ्या बनवायला शिकवली.मुलींनी फुले बनवण्याची पद्धत अगदी चटकन आत्मसात केली.नवीन काही शिकण्याचा त्यांचा उत्साह बघण्याजोगा होता.आपण आपल्या हातांनी बनवलेली फुलं पाहून नवनिर्मितीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.
काही क्षणचित्रे.
December 1, 2023
As part of our social activity 'Ao Diya Jalaye' on behalf of our organization 'Prarambh' Kala Academy, Thane, our members regularly visit the Balikashram. d. On December 1, 2023, Swati Naik, a member of the organization, visited the Balikashrama at Waghbeel village. Institute, as well as Dr. Arundhati Bhalerao (Founder, Director-Startup) and Swati Tai introduced herself.
Acquiring various skills along with schooling helps us in our daily lives. Arts cultivated as a hobby can turn into a business later in life. So, while making children, we strive for their overall development. Today Swatitai taught the girls to make (paper) aster flowers. The girls quickly learned how to make flowers. His enthusiasm to learn something new was admirable. The joy of creation overflowed from their faces when they saw the flowers they had made with their own hands.
A few snapshots.
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने ‘आओ दिया जलाए’ ह्या आमच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत आमचे सदस्य बालिकाश्रमाला नियमित भेट देत असतात. दि. 1 डिसेंबर 2023 रोजी संस्थेच्या सदस्य स्वाती नाईक ह्यांनी वाघबीळ गांव येथील बालिकाश्रमाला भेट दिली. संस्थेचा, तसेच डॅा. अरुंधती भालेराव (संस्थापिका, संचालिका-प्रारंभ) आणि स्वत:चा परिचय स्वातीताईंनी करुन दिला.
शालेय शिक्षणाबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात केल्यास दैनंदिन जीवनात आपल्याला त्याचा फायदा होतो. छंद म्हणून जोपासल्या जाणाऱ्या कलांचे पुढील आयुष्यात व्यवसायात रुपांतर होऊ शकते. त्यामुळे मुलांना घडवताना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील असतो. आज स्वातीताईंनी मुलींना (कागदी) अस्टरची फुले बनवायला शिकवली. मुलींनी फुले बनवण्याची पध्दत अगदी चटकन आत्मसात केली. नवीन काही शिकण्याचा त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. आपण आपल्या हातांनी बनवलेली फुलं पाहून नवनिर्मितीचा आनंद त्यांच्या चेहर्यावरुन ओसंडून वहात होता.
काही क्षणचित्रं.
November 24, 2023
On behalf of our organization 'Prarambha' Kala Academy, an annual activity "Aao Diya Jalaye" is being conducted in the children's home of Waghbeel Village Thane under the social initiative. On November 24, 2023, Anagha Jadhav, a member of Prarambha Kala Academy, visited Balikashrama. He introduced Prarambha Kala Academy Thane and Dr. Arundhati Bhalerao, the director and founder of Prarambha Kala Academy. In the beginning, girls were taught the importance of concentration by playing recreational games. While teaching this, the girls responded with great joy and enthusiasm. Evening time is a pleasant atmosphere. At that time, the surrounding atmosphere was happy. While taking Sanskar lessons, he told an instructive story from which dream and try to fulfill it. Nothing is impossible. Also gave a message to the girls to love themselves and finally boosted the intelligence of the girls with a word puzzle. All the girls created their own puzzles and enjoyed the crossword puzzles and the program concluded with a relaxed and open-minded dialogue.
A few snapshots.
'प्रारंभ ' कला अकॅडमी ह्या आमच्या संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रमाअंतर्गत "आओ दिया जलाए" हा वार्षिक उपक्रम वाघबीळ गाव ठाणे येथील बालिकाश्रमात राबवला जातो. दि.24 नोव्हेंबर 2023 रोजी प्रारंभ कला अकॅडमीच्या सभासद अनघा जाधव यांनी बालिकाश्रमाला भेट दिली.प्रारंभ कला अकॅडमी ठाणे तसेच प्रारंभ कला अकॅडमीच्या संचालिका आणि संस्थापिका डॉ.अरुंधती भालेराव यांचा परिचय करून दिला . सुरूवातीला मुलींना मनोरंजनात्मक खेळ घेऊन एकाग्रतेचे महत्व पटवून दिले. .हे शिकवत असताना मुली ही खुप आनंदी उत्साही पणे प्रतिसाद देत होत्या. संध्याकाळ ची वेळ म्हणजे प्रसन्न असं वातावरण असते. अशा वेळी आजूबाजूचे वातावरण ही प्रसन्न मय झाले होते. संस्कारचे धडे घेऊन असताना त्यांनी बोधप्रद कथा सांगितली त्यातून स्वप्न पहा ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. अशक्य काहीच नसते. तसेच स्वतःवर प्रेम करा हा मुलींना संदेश दिला आणि शेवटी शब्दकोडी घेऊन मुलींच्या बुद्धीला चालना दिली. सर्व मुलींनी स्वतः कोडी तयार करून शब्दकोड्यांचा आनंद घेतला मन मोकळे होऊन संवाद साधला अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला.
काही क्षणचित्रे.
November 3, 2023
As part of the social activities of our organization 'Prarambha' Kala Academy Thane, the annual activity "Ao Diya Jalaye" is conducted at the orphanage in Waghbeel Village Thane. On November 3, 2023, Vasudha Nigudkar, a member of Pradham Kala Academy, visited the Balikashrama. The girls were taught prayers, nice things, songs, and laughter yoga. The girls were also smiling and playing and listening and responding enthusiastically. This is how the activity was carried out and will continue continuously throughout the year.
A few snapshots.
'प्रारंभ' कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत "आओ दिया जलाए" हा वार्षिक उपक्रम वाघबीळ गाव ठाणे येथील बालिकाश्रमात राबवला जातो. दि.3 नोव्हेंबर 2023 रोजी प्रारंभ कला अकॅडमी च्या सभासद वसुधा निगुडकर यांनी बालिकाश्रमाला भेट दिली.मुलींना प्रार्थना, छान छान गोष्टी, गाणी आणि हास्य योगा शिकवले.मुली पण छान हसत खेळत उत्साहाने ऐकून प्रतिसाद देत होत्या.अशाप्रकारे हा उपक्रम पार पडला आणि वर्षभर सातत्याने सुरू राहील.
काही क्षणचित्रे.
20th October 2023
Dr. Anjusha Patil and Anjali Borole, members of Prarambha Kala Academy, visited the Balikashram at Waghbeel Village Thane on 20th October 2023 under the social activities of our organization, Prarambha Kala Academy Academy Thane. Dr. Anjusha Patil guided Navratri's greatness, values, all-roundness, and development. Anjali Borole also taught children's songs to girls. Things made the Enlightenment speak. All the girls were dancing with joy and singing to Jogwa Magit. Thus, the two together ended the program starting from Balgita with Jogwa Magit.
A few snapshots.
'प्रारंभ 'कला अकॅडमी अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत दिनांक 20 ऑक्टोबर 2023 हजर रोजी वाघबीळ गाव ठाणे इथल्या बालिकाश्रमला "आओ दिया जलाए" ह्या वार्षिक उपक्रमांतर्गत प्रारंभ कला अकॅडमी सभासद डॉ.अंजूषा पाटील आणि अंजली बोरोले यांनी भेट दिली . डॉ.अंजूषा पाटील यांनी नवरात्री चे माहात्म्य, मुल्य संस्कार, सर्वांगिण, विकास कसा व्हावा यांचे मार्गदर्शन केलं. तसेच अंजली बोरोले यांनी बालगीते मुलींना शिकवले. गोष्टी प्रबोधन बोलते केले . जोगवा मागितला सर्व मुलीं उत्साहाने आनंदाने नाचत होत्या गात होत्या.अशा प्रकारे या दोघांनी मिळून बालगिता पासून चालू झालेला कार्यक्रम जोगवा मागत संपवला.
काही क्षणचित्रे.
13th October 2023
On 13th October 2023, Deepshri Jadaye visited the children's home at Waghbeel Village Thane on behalf of Prarambha Kala Academy Thane under the annual activity "Ao Diya Jalaye". Introduction of Dr. Arundhati Bhalerao, Founder Director of Prarambha Kala Academy, and Mrs. Jayashree Madane, Coordinator of Prarambha Kala Academy. Done by Deepshree Jadaye, an inaugural member, taught the Navagraha stotra to the girls. At the same time, he made the surroundings auspicious by teaching Mahalakshmi Ashtaka. He taught songs and verses with meaning. Taught Navagraha Stotra and Mahalakshmi Ashtaka with correct pronunciation by telling how pronunciation is important while chanting shlokas as well as stotras. The girls responded enthusiastically. Their happiness could be seen in the smile on his face. The girls looked like Navadurga.
A few snapshots
दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी प्रारंभ कला अकॅडमी ठाणे च्या वतीने वाघबीळ गाव ठाणे इथल्या बालिकाश्रमाला "आओ दिया जलाए" ह्या वार्षिक उपक्रमाअंतर्गत दीपश्री जडये ह्यांनी भेट दिली.प्रारंभ कला अकॅडमी संस्थेच्या संस्थापिका संचालिका डॉ.अरुंधती भालेराव ह्यांचा आणि प्रारंभ संस्थेचा परिचय प्रारंभच्या समन्वयिका सौ जयश्री मदने यांनी करून दिला. प्रारंभच्या सदस्या दीपश्री जडये यांनी मुलींना नवग्रह स्तोत्र शिकवले. त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टक शिकवून त्यांनी आजूबाजूचा परिसर मंगलमय केला.गाणी , श्लोक अर्थासहित शिकवले. श्लोक तसेच स्तोत्र म्हणताना उच्चार कसे महत्वाचे असतात ते सांगून योग्य उच्चारासहित नवग्रह स्तोत्र आणि महालक्ष्मी अष्टक शिकवले. मुलींनी उत्साहाने प्रतिसाद दिला. त्यांचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरील हास्य बघून लक्षात येत होता. मुली जणू नवदुर्गा भासत होत्या.
काही क्षणचित्रे
October 6, 2023
On October 6, 2023, Deepshri Jadaye visited the Balikashram at Waghbeel Village Thane on behalf of Prarambh Kala Academy Thane under the annual activity "Ao Diya Jalaye". Founder Director of Pradham Academy Dr. Ms. Jayashree Madane, Coordinator of the Commencement, introduced Arundhati Bhalerao and the initiation organization. Deepshree Jadaye, an inaugural member, taught the Navagraha stotra to the girls. Navagraha Stotra Shri. Composed by Sage Vyas. This gives us an idea of the progress of ancient Indian astronomy. He gave such information. He explained the meaning of the hymn in very simple and clear words. So the girls responded enthusiastically. In this way, this activity will continue continuously throughout the year.
A few snapshots
दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी प्रारंभ कला अकॅडमी ठाणे च्या वतीने वाघबीळ गाव ठाणे इथल्या बालिकाश्रमला "आओ दिया जलाए" ह्या वार्षिक उपक्रमांतर्गत दीपश्री जडये ह्यांनी भेट दिली . प्रारंभ अकॅडमी संस्थेच्या संस्थापिका संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांचा आणि प्रारंभ संस्थेचा परिचय प्रारंभच्या समन्वयिका सौ जयश्री मदने यांनी करून दिला . प्रारंभच्या सदस्या दीपश्री जडये यांनी मुलींना नवग्रह स्तोत्र शिकवले. नवग्रह स्तोत्र श्री. व्यास ऋषींनी रचले आहे. यावरून आपल्याला प्राचीन भारतीय खगोलशास्त्राच्या प्रगतीचा अंदाज येतो. अशी माहिती त्यांनी दिली. अगदी सोप्या आणि स्पष्ट शब्दांत स्तोत्राचा अर्थ त्यांनी समजावून सांगितला . त्यामुळे मुलींनी उत्साहाने प्रतिसाद दिला.अशाप्रकारे आता वर्षभर हा उपक्रम सातत्याने सुरू राहील.
काही क्षणचित्रे
September 15, 2023
On September 15, 2023, Aparna Sawant and Madhuri Tambe visited the children's home in Waghbeel Village Thane on behalf of Prarambha Kala Academy Thane as part of the annual activity 'Ao Diya Jalae'. Arundhati Bhalerao and the initiation organization were introduced by the initiation coordinator Mrs. Jayashree Madane. The inaugural members Aparna Sawant and Madhuri Tambe taught Sri Sukta to the girls. He also taught Ganapati Stotra, Hanuman Chalisa, Gayatri Mantra and Mahalakshmi Mantra. As the last Friday of the month of Shravan, Bhondalya songs were sung at the end of the program. The girls responded to him by joyfully circling the circle in great excitement, singing Bhondlya songs with great joy. So the colour of this program increased. In this way, this activity will continue continuously throughout the year.
A few snapshots
दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी प्रारंभ कला अकॅडमी ठाणे च्या वतीने वाघबीळ गाव ठाणे इथल्या बालिकाश्रमाला आओ दिया जलाए’ ह्या वार्षिक उपक्रमाअंतर्गत अपर्णा सावंत आणि माधुरी तांबे ह्यांनी भेट दिली .प्रारंभ कला अकॅडमी संस्थेच्या संस्थापिका संचालिका डॉ. अरुंधती भालेराव ह्यांचा आणि प्रारंभ संस्थेचा परिचय प्रारंभच्या समन्वयिका सौ जयश्री मदने ह्यांनी करुन दिला. प्रारंभच्या सदस्या अपर्णा सावंत आणि माधुरी तांबे यांनी मुलींना श्री सूक्त शिकवले. त्याचबरोबर गणपती स्तोत्र, हनुमान चालीसा, गायत्री मंत्र आणि महालक्ष्मी मंत्र हे सुध्दा शिकवले. श्रावण महिन्यातला शेवटचा शुक्रवार म्हणून कार्यक्रमाच्या शेवटी भोंडल्याची गाणी म्हटली. मुलींनी मोठ्या उत्साहात आनंदाने गोल फेरा धरून , अतिशय आनंदाने भोंडल्याची गाणी म्हणत त्याला प्रतिसाद दिला . त्यामुळे या कार्यक्रमाची रंगत अजून वाढली. अशा प्रकारे आता वर्षभर हा उपक्रम सातत्याने सुरू राहील.
काही छायाचित्रे.
September 8, 2023
On September 8, 2023, Vasanthi Kulkarni and Rashmi Kulkarni, members of Prarambh Kala Academy, taught Srisukta to the girls under the annual activity "Aao Diya Jalaen" on behalf of Prarambh Kala Academy Thane at Balikashram at 'Waghbeel' Village Thane. Explained their pronunciation as well as meaning. Hanuman Chalisa and Ganpati songs were responded to by the girls with great enthusiasm. The girls were happy to learn something new. Because of that today's session of teaching Srisukta was very good. In this way, this activity will continue continuously throughout the year.
A few snapshots.
दिनांक ८ सप्टेंबर २०२३ रोजी प्रारंभ कला अकॅडमी ठाणे च्या वतीने 'वाघबीळ 'गाव ठाणे इथल्या बालिकाश्रम येथे "आओ दिया जलाएं" ह्या वार्षिक उपक्रमा अंतर्गत श्रीसूक्त शिकवण्यासाठी प्रारंभ कला अकॅडमी च्या सभासद वासंती कुलकर्णी आणि रश्मी कुलकर्णी यांनी मुलींना श्रीसूक्त शिकवले. त्यांचा उच्चार तसेच अर्थ समजावून सांगितले. हनुमान चालीसा आणि गणपती ची गाणी ह्याला मुलींनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला. नवीन काही शिकण्याने मुली आनंदी झाल्या. त्या मुळे श्रीसूक्त शिकवण्याचे आजचे सत्र खूपच छान झाले. अशाप्रकारे आता वर्षभर हा उपक्रम सातत्याने सुरू राहील.
काही क्षणचित्रे
वार्षिक प्रकल्प शुभारंभ 3 Sept 2023
A social activity 'Ao Diya Jalaye' is conducted by our organization 'Prarambh' Kala Academy, Thane throughout the year. This is our small effort to inculcate good morals in the children at an inculcating age, improve their mental structure, and make them intelligent citizens of tomorrow. Today, on behalf of the organization, Asha met the children of Naikodi Balkashram. The session started with meditation. He told the children nine eternal truths. Taught singing. Told the story of Shyam. Children were taught various verses. Explained the meaning of the verses. Recited the verses. The children participated very happily.
‘प्रारंभ’ कला अकॅडमी,ठाणे ह्या आमच्या संस्थेतर्फे ‘आओ दिया जलाए’ हा सामाजिक उपक्रम वर्षभर राबवला जातो. संस्कारक्षम वयात मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांची मानसिक जडण-घडण चांगली व्हावी, उद्याचे सुजाण नागरिक घडावेत ह्यासाठी आमचा हा अल्पसा प्रयत्न. आज संस्थेच्या वतीने आशा नायकोडी बालकाश्रमातील मुलांना भेटल्या. सत्राची सुरुवात ध्यानधारणेने करण्यात आली.त्यांनी नऊ शाश्वत सत्य मुलांना सांगितली. गाणं शिकवले. श्यामची गोष्ट सांगितली. मुलांना विविध श्लोक शिकवले. श्लोकांचे अर्थ समजावून सांगितले. श्लोक पाठ करुन घेतले. मुलं अतिशय आनंदाने सहभागी झाली.
31 July 2022
'Ao Diya Jalaye' is a social activity for children in orphanages conducted by our organization 'Prarambh' Kala Academy, Thane throughout the year. Our members meet children with the aim of learning many arts along with studies. On behalf of 'Prarambh' Mrs. Gautami Pujare and primary student Animesh Pujare met the children. He taught various types of songs like prayers, ballads, bhajans, patriotic songs, and film songs to the children. All the children responded very enthusiastically. The boy asked the little animesh to sing his favorite songs and the friend learned the nice songs and said.
A few snapshots. (31 July 2022)
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेतर्फे बालकाश्रमातील मुलांसाठी ‘आओ दिया जलाए’ हा सामाजिक उपक्रम वर्षभर राबवला जातो. अभ्यासाच्या जोडीने मुलांनी अनेक कला आत्मसात कराव्या, ह्या हेतूने आमचे सदस्य मुलांना भेटतात. ‘प्रारंभ’ च्या वतीने सौ. गौतमी पुजारे व प्रारंभ चा विद्यार्थी अनिमेश पुजारे या मुलांना भेटले. त्यांनी प्रार्थना, बालगीतं, भजनं, देशभक्तीपर, चित्रपटातली अशी विविध प्रकारची गाणी मुलांना शिकवली. सगळया मुलानी खुप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. मुलानी छोट्या अनिमेश ला त्यांच्या आवडत्या गाण्यांची फर्माईश केली व सोबती ने छान गाणी शिकली आणि म्हटली.
काही क्षणचित्रं. (३१ जुलै २०२२)
24 July 2022
Ao Diya Jalaye' is a social activity for children in orphanages conducted by our organization 'Prarambh' Kala Academy, Thane throughout the year. Our members meet children with the aim of learning many arts along with studies. Manisha Ghadge met the children on behalf of 'Pramambah'. He taught the children various kinds of songs like many verses, prayers, balgitam, badbadgitam, Guruvandana, and bhajans. Some Snapshots. (24 July 2022)
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेतर्फे बालकाश्रमातील मुलांसाठी ‘आओ दिया जलाए’ हा सामाजिक उपक्रम वर्षभर राबवला जातो. अभ्यासाच्या जोडीने मुलांनी अनेक कला आत्मसात कराव्या, ह्या हेतूने आमचे सदस्य मुलांना भेटतात. ‘प्रारंभ’ च्या वतीने मनिषा घाडगे मुलांना भेटल्या. अनेक श्लोक, प्रार्थना, बालगीतं, बडबडगीतं, गुरुवंदना, भजनं अशी विविध प्रकारची गाणी त्यांनी मुलांना शिकवली. काही क्षणचित्रं.(24 जुलै 2022)
17th July 2022
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने ‘आओ दिया जलाए’ हा सामाजिक उपक्रम अनाथाश्रमात राबवला जातो. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा ह्याकरिता विविध कला आम्ही मुलांना शिकवतो. ह्या अंतर्गत पंकज पाडाळे सरांनी प्रारंभच्या वतीने मुलांची भेट घेतली. वेगवेगळी गाणी त्यांनी मुलांना ऐकायला, म्हणायला शिकवली. त्या गाण्यांवर त्यांनी मुलांना नृत्य प्रशिक्षण दिले. मुलांनी उत्साहाने ते आत्मसात केले. काही क्षणचित्रं. 17 जुलै 2022
10th July 2022
Sunday On 10th July 2022, a social activity 'Ao Diya Jalae' is being conducted on behalf of our organization 'Prarambh' Kala Academy Thane. Under that, Mr. Sunil Bhagat sir met the children of the orphanage. It is our intention that children should learn other arts along with studies. With that vision Mr. Sunil Bhagat sir trained the children in singing. Sir taught the children prayers, inculcating positive thoughts, and melodious songs that the children would quickly assimilate. Today's session concluded with Pasaydana. A few snapshots.
रविवार दि. १० जुलै २०२२ रोजी ‘प्रारंभ’ कला अकॅडमी ठाणे, ह्या आमच्या संस्थेच्या वतीने ‘आओ दिया जलाए’ हा सामाजिक उपक्रम राबवला जातो. त्या अंतर्गत श्री. सुनील भगत सर अनाथाश्रमातील मुलांना भेटले. अभ्यासाबरोबरच इतरही कला मुलांना शिकायला मिळाव्या हा आमचा मानस आहे. त्या द्रुष्टीने श्री. सुनील भगत सरांनी मुलांना गाण्याचे प्रशिक्षण दिले. प्रार्थना, सकारात्मक विचार रुजवणारी, मुलांना चटकन आत्मसात होतील अशी नादमय गाणी सरांनी मुलांना शिकवली. पसायदानाने आजच्या सत्राचा समारोप झाला. काही क्षणचित्रं.
6th July 2022
Pankaj Padale gave a beautiful training to the children of our orphanage at Bharuda under the Orphanage project of our organization Prarambh Kala Academy 6th July 2022.
प्रारंभ कला अकॅडमी या आमच्या संस्थेच्या अनाथाश्रम प्रकल्पाच्या अंतर्गत पंकज पाडाळे यांनी भारुडावर आमच्या अनाथाश्रमातल्या मुलांना अतिशय सुंदर प्रशिक्षण दिलं त्यातले काही अंश ६ जुलै २०२२
June 25, 2022
Ao Diya Jalaye is a year-round social activity on behalf of our institution, Prarambh Kala Academy, Thane. On behalf of the organization, Pankaj Padale visited the children of the orphanage on June 25, 2022. Children are given training in various arts during this time. Pankaj introduced Bharuda to the children with the intention of making them children aware of folk arts. A few snapshots.
प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने ‘आओ दिया जलाए’ हा वर्षभर राबवला जाणारा सामाजिक उपक्रम. संस्थेच्या वतीने पंकज पाडाळे ह्यांनी बालकाश्रमातील २५ जुन २०२२ मुलांना भेट दिली. विविध कलांचे प्रशिक्षण ह्या वेळी मुलांना देण्यात येते. लोककलांची मुलांना माहिती व्हावी,ह्या हेतूने पंकज ह्यांनी मुलांना भारुडाची ओळख करुन दिली. काही क्षणचित्रं.
5 June 2022
प्रारंभ कला अकडमी ठाणे या संस्थेच्या वतीने अनाथआश्रम प्रकल्पाच्या वार्षिक उपक्रमांचा अंतर्गत काल दि. ५ जून २०२२ रोजी प्रारंभ कला अकॅडमी ची माजी विद्यार्थिनी तेजश्री मुळे हिने मुलांना समूह नृत्याच प्रशिक्षण दिलं याचा काही अंश...
May 22, 2022
A social activity 'Ao Diya Jalaye' is conducted throughout the year on behalf of our organization 'Prarambh' Kala Academy, Thane. Secretary of the organization Kirti Kerkar today. On May 22, 2022, met the children of Balikashram. The purpose of these visits is to strengthen the senses of children and to reach the thoughts of great thinkers. Keerthi told the children the inspiring story of Steve Jobs from the book 'Hati Jyanchya Shunya Hote' written by Mr. Arun Shewte. He also narrated the enlightening stories of Praveen Daven in his humorous style. The children responded well. A few snapshots.
‘प्रारंभ’ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने ‘आओ दिया जलाए’ हा सामाजिक उपक्रम वर्षभर राबवला जातो. संस्थेच्या सचिव कीर्ति केरकर ह्यांनी आज दि. २२ मे २०२२ रोजी बालिकाश्रमातील मुलांची भेट घेतली. मुलांच्या जाणिवा सशक्त व्हाव्यात, मोठ्या विचारवंतांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावेत हा ह्या भेटींमागचा उद्देश असतो. श्री.अरुण शेवते लिखित ‘हाती ज्यांच्या शून्य होते’ ह्या पुस्तकातील स्टीव्ह जॅाब्स ह्यांची प्रेरणादायक गोष्ट कीर्ति ह्यांनी मुलांना सांगितली. तसेच प्रवीण दवणे ह्यांच्या उद्बोधक कथा त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत सांगितल्या. मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. काही क्षणचित्रं.
May 15, 2022
A social activity 'Ao Diya Jalaye' is being implemented by our organization 'Prarambh' Kala Academy, Thane. Our aim is to inculcate good morals in the children at a formative age, let them understand the thoughts of the elders, and take inspiration from them to develop the children. On behalf of the organization, Manisha Acharya, trustee of 'Prarambha', met the children of the orphanage today May 15, 2022. The stories of Krushnamegh Kunte, tell how to be successful by achieving your goals without getting tired of failure. Tetsuko Kuroyanagi's Totochan tells how children's overall development takes place along with learning in a playful, loving environment.
The story in this book, Dr. Read some excerpts from APJ Abdul Kalam's book 'Agnipankh'.
Dilip Prabhavalkar's 'Bokya Satbande', which gave sheer joy, created a sensation.
A few snapshots.
‘प्रारंभ‘ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने ‘आओ दिया जलाए’ हा सामाजिक उपक्रम राबवला जातो. संस्कारक्षम वयात मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, मोठ्या व्यक्तिंचे विचार त्यांना समजावेत, त्यामधून स्फूर्ती घेऊन मुलांची जडण-घडण व्हावी हा आमचा उद्देश आहे. संस्थेच्या वतीने ‘प्रारंभ’ च्या विश्वस्त मनीषा आचार्य ह्यांनी आज दि.15 मे 2022 रोजी बालकाश्रमातील मुलांची भेट घेतली. अपयशाने मुळीच खचून न जाता, आपले ध्येय साध्य करत यशस्वी कसं व्हावं, हे सांगणार्या क्रुष्णमेघ कुंटे ह्यांच्या गोष्टी सांगितल्या. हसत्या - खेळत्या, प्रेमळ वातावरणात, अभ्यासाबरोबरच मुलांचा सर्वांगीण विकास कसा होतो, हे सांगणार्या तेत्सुको कुरोयानागी ह्यांच्या तोत्तोचान
ह्या पुस्तकातील कथा, डॅा. ए.पी.जे.अब्दुल कलाम ह्यांच्या ‘अग्निपंख’ पुस्तकातील काही उतारे ह्यांचे वाचन केलं.
निखळ आनंद देणार्या दिलीप प्रभावळकरांच्या ‘बोक्या सातबंडे’ च्या गोष्टीने तर धमाल उडवून दिली.
काही क्षणचित्रं.
May 1, 2022
The activity 'Ao Diya Jalaye' is implemented by our organization Prarambh Kala Academy, Thane throughout the year. In order to inculcate good morals in the children at an early age, our members visit the children in the orphanage. Today on May 1, 2022, Vaishali Ghangrekar told the children wonderful things. He told many great stories to the children like stories of Guru-disciple relationships, stories about friendship written by Narayan Murthy, and stories about ghost mercy by Swami Vivekananda. The children were completely enthralled in this story session. A few snapshots.
प्रारंभ कला अकॅडमी,ठाणे ह्या आमच्या संस्थेतर्फे ‘आओ दिया जलाए’ हा उपक्रम वर्षभर राबवला जातो. संस्कारक्षम वयात मुलांवर चांगले संस्कार व्हावेत ह्या उद्देशाने प्रारंभच्या वतीने आमचे सदस्य बालकाश्रमातील मुलांची भेट घेतात. आज दि 1 मे 2022 रोजी वैशाली घांगरेकर ह्यांनी मुलांना छान छान गोष्टी सांगितल्या. गुरु-शिष्य नात्याच्या गोष्टी, नारायण मूर्ती लिखित मैत्री विषयी कथा,भूतदयेविषयी स्वामी विवेकानंदांची कथा अशा अनेक उत्तम कथा त्यांनी मुलांना सांगितल्या. ह्या कथासत्रात मुलं अगदी रंगून गेली. काही क्षणचित्रं.
16 April 2022
Activities are conducted throughout the year at Yeoor Balakashramam on behalf of our institution, Prarambh Kala Academy, Thane. Today on April 16, 2022, the founder and director of the organization Dr. Along with Arundhati Bhalerao, Trustee of the organization Manisha Acharya went to meet the children. Our annual activities were reviewed by the students. Chatted with the children. Food was distributed to them. The children were very happy and had fun. Don't know how two hours passed.
प्रारंभ कला अकॅडमी , ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने येऊर बालकाश्रमममधे वर्षभर उपक्रम राबवले जातात. आज १६ एप्रिल २०२२ रोजी संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका डॅा. अरुंधती भालेराव ह्यांच्या सह संस्थेच्या विश्वस्त मनीषा आचार्य मुलांना भेटायला गेलो. आमच्या वार्षिक उपक्रमाचा विद्यार्थ्यांकडून आढावा घेतला. मुलांशी गप्पा मारल्या. त्यांना खाऊ वाटप केलं. मुलं खूप खुश होती त्यांनी मज्जा केली. दोन तास कसे गेले कळलेच नाही.
17 April 2022
The project 'Aao Diya Jalaye' is implemented in Balkashrams throughout the year by our organization Prarambh Kala Academy, Thane. The members of the foundation are meeting the children with the awareness that the children should get to know great people, the importance of their work should be understood by the children and the children should be inspired by it.
Today 17 April 2022 Shalaka Desai met the children. He gave an inspiring lecture about freedom hero Vinayak Damodar Savarkar. Many things about Savarkar and his work were introduced to the children. He taught the children the Aarti on Shivaji Maharaj composed by Savarkar. Many of his poems were shown to children.
A few snapshots.
प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेतर्फे ‘आओ दिया जलाए’ हा प्रकल्प वर्षभर बालकाश्रमामधे राबवला जातो. थोर व्यक्तींची ओळख मुलांना व्हावी, त्यांच्या कार्याची महती मुलांना समजावी, त्यातून प्रेरणा घेऊन मुलांची चांगली जडणघडण व्हावी ह्या जाणीवेतून प्रारंभचे सदस्य मुलांना भेटत असतात.
आज दि १७ एप्रिल २०२२ शलाका देसाई ह्यांनी मुलांची भेट घेतली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांविषयी स्फूर्तीदायक व्याख्यान त्यांनी दिले. सावरकरांच्या अनेक गोष्टी, त्यांचे कार्य ह्यांची ओळख मुलांना करुन दिली. सावरकररचित शिवाजी महाराजांवरील आरती त्यांनी मुलांना शिकवली. त्यांच्या अनेक कविता मुलांना म्हणून दाखवल्या.
काही क्षणचित्रे.
10 April 2022
On behalf of our organization Prarambh Kala Academy, Thane, under our social initiative, the project 'Ao Diya Jalaye' is being implemented in a children's home in Yeur. Today on behalf of the organization. On 10th April 2022, Anagha Jadhav revealed the biography of Hon'ble Atal Bihari Vajpayee to children. The purpose behind these inspiring lectures is to introduce great personalities to the children and get inspiration from them. Today's session started with the prayer 'This is our prayer'. He told the children about Vajpayee through positive things. His work was introduced to the children.
Taught many poems of Vajpayeeji to children. Today's session concluded with various useful puzzles and games.
A few snapshots.
प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने, आमच्या सामाजिक उपक्रमा अंतर्गत ‘आओ दिया जलाए’ हा प्रकल्प येऊर येथील बालकाश्रमामधे राबवला जातो. संस्थेच्या वतीने आज दि. 10 एप्रिल 2022 रोजी , अनघा जाधव ह्यांनी माननीय अटलबिहारी वाजपेयी ह्यांचा जीवनपट मुलांना उलगडून दाखवला. थोर व्यक्तिमत्वांची ओळख मुलांना व्हावी, त्यातून मुलांनी स्फूर्ती घ्यावी, हा उद्देश ह्या प्रेरणादायी व्याख्यानांमागे आहे. आजच्या सत्राची सुरुवात ‘हीच आमुची प्रार्थना’ ह्या प्रार्थनेने झाली. सकारात्मक गोष्टींच्या माध्यमांतून वाजपेयीजींची माहिती त्यांनी मुलांना सांगितली. त्यांच्या कार्याची ओळख मुलांना करुन दिली.
वाजपेयीजींच्या अनेक कविता मुलांना शिकवल्या. विविध उपयुक्त कोडी आणि खेळांद्वारे आजचे सत्र संपन्न झाले.
काही क्षणचित्रे
March 27, 2022
On behalf of our organization Prarambh Kala Academy, Thane, the project 'Ao Diya Jalaye' is implemented throughout the year in the children's camp at Yeur as part of our social activities. Today On March 27, 2022, on behalf of the initiation, Sujata Kurumbhate went to this orphanage and interacted with the children on the topic of 'Mental Health'.Through various stories and some games, the children were convinced of the importance of mental health. Giving examples of children's experiences, he explained well how to think positively in a discursive manner, and how its good results are important.
A few snapshots.
प्रारंभ कला अकॅडमी, ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या वतीने ‘आओ दिया जलाए’ हा प्रकल्प आमच्या सामाजिक उपक्रमा अंतर्गत येऊर येथील बालकाश्रमात वर्षभर राबवण्यात येतो. आज दि. 27 मार्च 2022 रोजी प्रारंभच्या वतीने सुजाता कुरुंभटे ह्यांनी ह्या बालकाश्रमामधे जाऊन ‘मानसिक आरोग्य’ ह्या विषयावर मुलांशी संवाद साधला. विविध कथांच्या माध्यमातून तसेच काही खेळ घेऊन ,मानसिक आरोग्य म्हणजे काय, त्याचे महत्व मुलांना पटवून दिले. मुलांच्या अनुभवांचे दाखले देत, चर्चात्मक पध्दतीने सकारात्मक विचार कसा करावा, त्याचे चांगले परिणाम कसे महत्त्वाचे असतात हे त्यांनी छान समजावून दिले.
काही क्षणचित्रे.
15 March 2022
Another annual activity of Prarambh Kala Academy is to carry out activities on various subjects in the Orphanage Ashram throughout the year. 15 March 2022 Our topic for this month is Self Cleanliness. We found this topic very important. That is why Varsha Palshetkar, a teacher friend of ours, gave self-hygiene lessons to the children at the children's ashram in Yeur today. A few snapshots
प्रारंभ कला अकॅडमी चा आणखीन एक वार्षिक उपक्रम म्हणजे अनाथ आश्रम मध्ये विविध विषयांवर वर्षभर उपक्रम राबवणे .त्याअंतर्गत आज दि. १५ मार्च २०२२ आमचा विषय या महिन्यासाठी आहे स्व स्वच्छता. हा विषय आम्हाला अतिशय महत्त्वाचा वाटला. म्हणूनच येऊर येथील बालक आश्रमात आज वर्षा पालशेतकर या आमच्या शिक्षिका मैत्रिणी ने मुलांना स्व स्वच्छतेचे धडे दिले. काही क्षणचित्रे
February 13, 2022
On February 13, 2022, Pankaj Padale, a friendly dance teacher who participates in every activity of Prarambh Kala Academy, trained the children under our year-round social initiative "Aao Diya Jalaye" at the Children's Ashram at "Yeur". The children of the Balkashram were definitely happy with it. A few snapshots
दि. १३ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रारंभ कला अकॅडमीच्या "आओ दिया जलाये" या आमच्या वर्षभर राबवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमाच्या अंतर्गत "येऊर "येथील बालक आश्रमामध्ये प्रारंभ चा आमच्या प्रत्येक उपक्रमांमध्ये सहभागी होणारा मित्र नृत्य शिक्षक ,पंकज पाडाळे याने मुलांना भारुडाच प्रशिक्षण दिलं. बालकाश्रम मधील मुलांना घटका दोन घटका त्यामुळे नक्कीच आनंद मिळाला. काही अंश.
31st January 2022
On Sunday 31st January 2022 at Balik Ashram at Yeoor as part of the social activities of our organization Prarambh Kala Academy.
The children, loved by our Vardhya Kala Academy, sakhi Neha Bagve, connected through our various activities, and taught group songs one by one.
प्रारंभ कला अकॅडमी या आमच्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत रविवारी ३१ जानेवारी २०२२ रोजी येऊर येथे बालिकाश्रमामध्ये मुलांना, आमच्या प्रारंभ कला अकॅडमी वर प्रेम करणारी, आमच्या विविध उपक्रमांमधून जोडल्या गेलेली सखी नेहा बागवे यांनी एकाहून एक सरस अशी समूहगीत शिकवली .मुलांनी ताल, लय ,शब्द याचा मनापासून आनंद घेतला.
23 January 2022
Today On 23 January 2022, on behalf of Prarambh Kala Academy Thane, under our Orphanage project at Yeur, a loving member of Prarambh, Neha Bagwe told the best motivational children's stories and also taught group songs to the children. Children loved the songs taught by Neha Bagwe after our Sunil Bhagat sir.
आज दि. २३ जानेवारी २०२२ रोजी प्रारंभ कला अकॅडमी ठाण्याच्या वतीनं येऊर येथील आमच्या अनाथाश्रम प्रकल्पा अंतर्गत प्रारंभच्या प्रारंभ वर प्रेम करणार्या सदस्या नेहा बागवे यांनी मुलांना उत्तमोत्तम प्रेरक बोधपर बालकथा सांगितल्या आणि त्याचबरोबर मुलांना समूह गीतं शिकवली .आमच्या सुनील भगत सरानंतर नेहा बागवेंनी शिकवलेली गाणी मुलांना खूप आवडली.
January 15, 2022
Yesterday On January 15, 2022, our Sunil Bhagat sir and Nawale sir taught various group song forms to the children at Vivekananda Balikashram at Yeoor as part of this year's Balikashram activities of Prarambh Kala Academy. Few snapshots...
काल दि. १५ जानेवारी २०२२ रोजी प्रारंभ कला अकॅडमीच्या यावर्षीच्या बालिकाश्रम उपक्रमांतर्गत येऊर येथील विवेकानंद बालिकाश्रमात आमचे सुनील भगत सर आणि नवाळे सर यांनी मुलांना विविध समूह गीत प्रकार शिकवलेत. त्याची क्षणचित्रे ...
Balikashram Initiative 2022 of Prarambh Kala Academy
Last whole year we were working in an orphanage at Angaon near Bhiwandi with arts that are not reaching the children. Many subjects like drama, dance, music, self-hygiene, and mental health were being dealt with. I was taking the drama myself and for the rest of the subjects we were working together with the experts in that subject throughout the year.
And now we have turned our march to Yeoor's Balikashram. Our activity started in the month of January 2022 with the subject of music. Now we will be in Yeoor's Balikashram for a whole year. Our Sunil Bhagat sir is taking the subject of group song.
प्रारंभ कला अकॅडमीचा बालिकाश्रम उपक्रम २०२२
मागच संपूर्ण वर्षभर आम्ही भिवंडीजवळ आनगाव येथे अनाथाश्रमामध्ये ज्या कला या मुलांपर्यंत पोचत नाहीत त्या घेऊन काम करत होतो. नाट्य ,नृत्य, संगीत ,स्व स्वच्छता, मानसिक आरोग्य असे अनेक विषय हाताळत होते .नाटक मी स्वतः घेत होते आणि बाकी विषयांसाठी त्या त्या विषयाचे तज्ज्ञ मिळून आम्ही वर्षभर काम करत होतो .तीन जानेवारीला आम्ही आनगावच्या बालिकाश्रमामध्ये आमच्या या उपक्रमाचा समारोप केला.
आणि आता आमचा मोर्चा आम्ही वळवलाय येऊरच्या बालिकाश्रमामध्ये .संगीत या विषयापासून जानेवारी २०२२ महिन्यापासून आमच्या या उपक्रमाला सुरुवात झाली .आता वर्षभर आम्ही असू येऊरच्या बालिकाश्रमात .समूहगीत हा विषय घेताना आमचे सुनील भगत सर .
First of all Happy New Year everyone. It is not known when the institution started by me, Prarambha Kala Academy, has been twenty years. The various activities of the organization, my various workshops, my friends of different age groups who participate and join in various activities, their energy, and my growing enthusiasm with their cooperation. The joy of taking a new step through various activities every year. Each of our social activities is connected through art. We don't give up on our original passion for art. But we always try to do something different keeping in mind society. Similarly, our next step is Balikashram.Dance. I have done a course with the help of friends from my organization to teach drama, music, and many other things to children who are unable to study in private classes due to their circumstances. This activity started yesterday with a dance class. Our friend Varsha Ogle, a great dancer, actress, director, and singer, enthusiastically participated in this activity and yesterday launched our activity "Ao Diya Jalaye" by giving folk dance lessons to the girls of the Balikashram. Prasad Sawant of our organization, who is the coordinator of this activity, is an added bonus. some view
सगळ्यांना सर्व प्रथम नविन वर्षाच्या खुप शुभेच्छा. प्रारंभ कला अकॅडमी ह्या मी सुरु केलेल्या संस्थेला वीस वर्ष कधी झाली कळलच नाही..माझ्या संस्थेपासून आमची संस्था म्हणणार्या अनेक सख्या सातत्याने जोडल्या गेल्या आणि जात आहेत..संस्थेचे विविध उपक्रम, माझ्या विविध कार्यशाळा, त्यात सहभागी होणाऱ्या अणि त्यासह विविध उपक्रमात सामील होणार्या वेगवेगळया वयोगटातील मैत्रिणी ,त्यांची ऊर्जा आणि त्यांच्या सहकार्याने माझा वाढणारा उत्साह . दरवर्षी विविध उपक्रमातून एक एक नविन पाऊल टाकताना होणारा आनंद. माझे ,आमचे प्रत्येक सामाजिक उपक्रम हे कलेच्या माध्यमातून जोडलेले असतात..आमच्या कलेच्या मूळ छंदाला आम्ही सोडत नाही. पण सामाजिकतेच भान ठेवत काही वेगळं करण्याचा आमचा कायम प्रयत्न असतो. असेच आमचे पुढचे पाऊल म्हणजे बालिकाश्रम .नृत्य. नाट्य,संगीत आणि इतर अनेक गोष्टी इच्छा असूनही परिस्थिती मुळे ज्या मुलांना खाजगी वर्ग लावून शिकता येत नाही अश्या मुलांना त्यांच्या पर्यंत वर्षभर जाऊन त्यांना विनामूल्य शिकविण्यासाठी मी एक अभ्यासक्रम माझ्या संस्थेच्या सख्यांच्या मदतीने केलाय. हा उपक्रम काल पासुन नृत्य वर्गाने सुरू झाला.आमची मैत्रीण उत्तम नर्तिका , अभिनेत्री ,दिग्दर्शिका गायिका, वर्षा ओगले हिने स्वतःहून उत्साहाने ह्या उपक्रमात सहभागी होत काल आमच्या "आओ दिया जलाये" ह्या उपक्रमाचा बालिकाश्रम मधील मुलीना लोक नृत्याचे धडे देत शुभारंभ केला. आमचा संस्थेचा प्रसाद सावंत जो ह्या उपक्रमाचा समन्वयक आहे त्याची मोलाची साथ ही आणखीन जमेची बाजु...नवीन वर्षाची सुरवात मस्त झाली. काही दृश्य
Jan 4, 2021
Today's day at Angaon for the Ao Diya Jalaye or "Saathi Haat Badhana" initiative we started for the children of the Balikashram of our institution, Prarambha Kala Academy. A few snapshots.
प्रारंभ कला अकॅडमी ह्या आमच्या संस्थेच्या बालिकाश्रम येथील मुलांसाठी आम्ही सुरू केलेल्या आओ दिया जलाये अर्थात "साथी हात बढाना " ह्या उपक्रमाचा आजचा आनगाव येथील दिवस..मुलानी वर्षा मावशीचे लोक नृत्याचे धडे एन्जॉय केलेत. काही क्षणचित्रे.
The joy seen on the faces of these orphans not only gives me energy but also the mantra of being content with what we have. Life is one. Continually encourages me to think of what I can give them, me, and us rather than what I will get.
ह्या अनाथ मुलांच्या चेहर्यावर दिसणारा आनंद मला ऊर्जा तर देतोच पण जे आहे त्यात समाधानी राहण्याचा मंत्रही..एकच आयुष्य आहे ..मला काय मिळेल ह्या पेक्षा ह्याना, मला ,आम्हाला काय देता येईल हा विचार करायला सतत प्रोत्साहित करतो.
Today's balikashram activity of our institution Prarambha Kala Academy and its glimpse.. Heartfelt appreciation to Ogle and our Prasad Sawant.
प्रारंभ कला अकॅडमी ह्या आमच्या संस्थेचा आजचा बालिकाश्रम उपक्रम आणि त्याची झलक..वर्षा ओगले आणि आमचा प्रसाद सावंत ह्यांच मनापासून कौतुक
31 January 2021
Prarambha's Balik Ashram activities on 31 January 2021
प्रारंभ चा बालिकाश्रम ३१ जानेवारी २०२१ रोजीचा उपक्रम
7th February 2021
Today On 7th February 2021, my day at Balikashram Ashram was fun with the kids. After the lock down, I took up my beloved subject of acting and personality development with the children after about ten months. Very satisfied.
आज दि. ७ फेब्रुवारी २०२१ रोजी बालिकाश्रम आश्रमातील माझा दिवस मुलांच्या बरोबर मजेत गेला. मी लॉक डाऊन नंतर अभिनय आणि त्यातून व्यक्तिमत्त्व विकास हा माझा लाडका विषय तब्बल दहा महिन्याच्या नंतर मुलांच्या बरोबर घेतला..बालिकाश्रम मधील ह्या पासुन लांब असणारी आणि इच्छा असुनही शिकायला न मिळणारया मुलींचा उत्साह आणि ऊर्जा मला दुप्पट आनंद देऊन गेला.. खुप समाधान मिळाले.
14 February 2021
14 February 2021 Under the project 'Ao Diya Jalaye' of our institute Prarambha Kala Academy Thane, the theme of this month is drama and personality development. I don't know how time passes...
I don't know what those poor girls in Balikashram learn from me. But how can I be happy, smile, and accept the situation? And learning from them to happily accept what is there.. Some snapshots
१४ फेब्रुवार २०२१ प्रारंभ कला अकॅडमी ठाणे ह्या आमच्या संस्थेच्या '"आओ दिया जलाये "ह्या प्रकल्पाच्या अंतर्गत सध्या ह्या महिन्याची थीम नाटक आणि व्यक्तिमत्त्व विकास आहे..मी दर रविवारी आणगाव ह्या गावांत दिड तासाच्या अंतरावर नाटक विष य घ्यायला जातेय. वेळ कसा जातो कळत नाही..
बालिकाश्रम मधील त्या गोजिरवाण्या मुली माझ्याकडून काय शिकतात माहिती नाही .पण मी मात्र आनंदी कस रहायचे ,प्राप्त परिस्थितीत हसत त्याचा स्विकार कसा करायचा. आणि आहे ते आनंदात स्विकारायला त्यांच्या कडून शिकतेय..काही क्षणचित्रे
February 21, 2021
Sunday February 21, 2021, at Balika Ashram near Bhiwandi, I trained girls in communication, body language, pronunciation and voice through drama. While doing this preparation, it was noticed that these girls have a lot of enthusiasm. And also the ability to absorb what is taught.
रविवार दि. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी भिवंडी जवळील बालिका आश्रमामद्ये मी नाटकाच्या माध्यमातून मुलींना संवाद , देहबोली , उच्चार व आवाज यांचे प्रशिक्षण दिले. हि तयारी करून घेताना असं लक्षात आलं कि ह्या मुलींमद्ये खुप उत्साह आहे. आणि त्याचबरोबर शिकवलेल आत्मसात करण्याची क्षमता सुद्धा
February 28, 2021
On February 28, 2021, girls were trained in pronunciation, language, confidence, body language, and communication in the acting and personality development training class held at Balika Ashram under Prarambha Kala Academy. While doing it, they seemed more confident than before. Soon a colourful program of these girls from the ashram will be presented in front of us. May your blessings always be with these girls.
दि. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रारंभ कला अकॅडमी च्या अंतर्गत बालिका आश्रम येथे झालेल्या अभिनय आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण वर्गात मुलींना उच्चार, भाषा, आत्मविश्वास, देहबोली, संवाद याचे सराव करून घेण्यात आले. ते करून घेत असताना त्यांच्यामद्ये पहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्वास दिसून आला. लवकरच आश्रमातील ह्या मुलींचा विविधरंगी कार्यक्रम आपल्या समोर सादर होईल. आपले आशिर्वाद सदैव ह्या मुलींच्या पाठीशी असुद्या.
Varsha Palshetkar guided the girls under our project 'Ao Deep Jalaye' under the social work of Prarambha Kala Academy at Aajcha Balikashram discussing the topic of muscle flexibility and bone strength with demonstrations.
स्नायू लवचिकता आणि हाडांची बळकटी ह्या विषयाचे प्रात्यक्षिकांसह विवेचन करीत आजचा बालिकाश्रम येथील प्रारंभ कला अकॅडमी च्या सामाजिक कार्या अंतर्गत आमच्या 'आओ दीप जलाये' ह्या प्रकल्पा अंतर्गत वर्षा पालशेतकर ह्यांनी मुलींना मार्गदर्शन केले
Our Varsha Palshetkar will guide the girls in very simple words about how to take care of menstruation and how to take care of it for the girls at Balikashram under the social project of Prarambha Kala Academy Thane..Some snapshots from it.(24 Mar 2021)
प्रारंभ कला अकॅडमी ठाणे च्या सामाजिक प्रकल्पाच्या अंतर्गत बालिकाश्रम येथील मुलींसाठी आम्ही मासिक पाळी आणि त्यासंबंधीची काळजी कशी घ्यावी त्यामधील आरोग्य कसे सांभाळावे ह्या बाबत आमच्या वर्षा पालशेतकर ह्यांनी अतिशय सोप्या शब्दात मुलीना मार्गदर्शन केल..त्यातील काही क्षणचित्रे.
4th April 2021
Today 4th April 2021 Prarambha Kala Academy This month started with music as the subject of our organization 'Ao Diya Jalaya' under Balikashram. My friends Angha Bodus and Rajshree Lele sang to the girls with Sargam, Swagat Geet, and other musical notes. Girls can sing well just need a little training I think. Through all these arts up to them, we have this small artistic share in society. The purpose of Prarambha Kala Academy is to give back to society what we take from society in some form keeping the consciousness of sociality.
आज दि. ४ एप्रिल २०२१ प्रारंभ कला अकॅडमी ह्या आमच्या संस्थेच्या 'आओ दिया जलाये ' ह्या बालिकाश्रम अंतर्गत उपक्रमात ह्या महिन्याची सुरवात संगीत ह्या विषयाने झाली. सरगम, स्वागतगीत आणि इतर सांगीतिक स्वरांनी माझा मैत्रिणी अनघा बोडस आणि राजश्री लेले ह्यांनी मुलीना गाते केले..मुलीना उत्तम गाता येते फक्त बस थोडेसे प्रशिक्षण द्यावे लागेल असे वाटतेय..त्यांच्या पर्यंत ह्या सगळ्या कलांच्या माध्यमातून आमचा हा सामाजिक छोटासा कलात्मक वाटा. समाजातून जे घेतो ते काही रुपाने सामाजिकतेचे भान ठेवत समाजाला परत द्यावे हाच प्रारंभ कला अकॅडमी चा उद्देश
The point of using dummy text for your paragraph is that it has a more-or-less normal distribution of letters. making it look like readable English.
The commencement of Prarambha Kala Academy Thane's Balikashram ie 'Ao Diya Jalaye' katta concluded with the group song guidance of Sunil Bhagat Sir. This is an ongoing activity under the social activities of Prarambha Kala Academy. The girls enjoyed the music, but it was also noticed that many of the girls had good throats. And these students, who did not go out and take tuition, thoroughly enjoyed this activity. And are taking consistently. (6 June)
प्रारंभ कला अकॅडमी ठाण्याचा बालिकाश्रम अर्थात 'आओ दिया जलाए' कट्टा सुनील भगत सर यांच्या समूहगीत मार्गदर्शनाने संपन्न झाला. प्रारंभ कला अकॅडमीच्या सामाजिक उपक्रमां अन्तर्गत हा एक उपक्रम सातत्याने सुरू असणारा .मुलींनी संगीतप्रकारांचा आनंद घेतला, पण अनेक मुलींना उत्तम गळा आहे हेदेखील यानिमित्ताने लक्षात आल। आणि बाहेर जाऊन शिकवणी न घेणाऱ्या या विद्यार्थिनींनी या उपक्रमाचा मनापासून आनंद घेतला. आणि सातत्याने घेत आहेत .
Under the social activities of Prarambha Kala Academy Thane, Ao Diya Jalaye i.e. Sathi Haath Badana , under the musical guidance of Katta Sunil Bhagat Sir from Balikashram, Rangla sir taught the girls a very good group song. The beautiful ceremony of dance drama music of these girls will soon be over.
प्रारंभ कला अकॅडमी ठाण्याच्या सामाजिक उपक्रमांतर्गत आओ दिया जलाएं अर्थात साथी हाथ बढाना हा बालिकाश्रम मधील कट्टा सुनील भगत सरांच्या सांगीतिक मार्गदर्शनाखाली रंगला सरांनी मुलींना अतिशय उत्तम असं समूहगीत शिकवलं .बालिकाश्रम मधील सगळ्याच मुलींना गाण्याचं उत्तम अंग आहे हे सिद्ध झालं. या मुलींच्या नृत्य नाट्य संगीताचा देखणा सोहळा लवकरच संपन्न होईल.
27 June 2021
Today 27 June 2021 The theme of the activity on Balikashram kattas starting June 2021 is over for this month. Sunil Bhagat sir taught the girl's group songs better than one by one. The girls were happy with him. Realized that girls have very sweet throats. Sunil Bhagat sir was with me a few years ago when I was doing my BEd. Even then it is a great cow. In the meantime, we lost contact. But he came back because of Santosh Mhatre sir. And on my word, Bhagat sir taught the girls a very beautiful song with all his heart without any hindrances without giving any reason due to covid or any other reason. In this initial Balikashram activity, I took the subject of drama. Varsha Palshetkar till now took the initiative on cleanliness and menstrual hygiene. Varsha Ugle handled the dance side well. And that's how this katta gets dyed day by day. And it will be like this throughout the year.
आज दि. २७ २०२१ जून प्रारंभच्या बालिकाश्रम कट्ट्यांवरील उपक्रमाचा संगीत हा विषय या महिन्यांपुरता संपला. सुनील भगत सर यांनी मुलींना एका एकापेक्षा एक सरस समूह गीतं शिकवली .मुली त्यांच्याबरोबर खूश होत्य। मुलींकडे अतिशय गोड गळा आहे हे जाणवलं .सुनील भगत सर हे माझ्याबरोबर मी बीएड करत असताना काही वर्षांपूर्वी होत. तेव्हाही ते उत्तम गायच। मधल्या काळात आमचा संपर्क तुटला होत. परंतु संतोष म्हात्रे सरांमुळे तो परत आला. आणि माझ्या एका शब्दावर भगत सरांनी कोविद किंवा इतर कुठलंही कारण न सांगता कुठलेही आढेवेढे न घेता मुलींना अतिशय मनापासून फार सुंदर गाणे शिकवले. प्रारंभच्या या बालिकाश्रम उपक्रमात मी स्वतः नाट्यशास्त्र हा विषय घेतला. वर्षा पालशेतकर यांनी आत्तापर्यंत स्वच्छता आणि मासिक पाळीतील स्वच्छता याविषयी उपक्रम घेतला. वर्षा उगले यांनी नृत्याची बाजू उत्तम सांभाळल। आणि अशाप्रकारे हा कट्टा दरदिवशी रंगत जातो आह. आणि ववर्षभर असाच रंगत जाणार आहे .
11th July 2021
11th July 2021 Balikashram activity of our organization Prarambha Kala Academy and its glimpse.
प्रारंभ कला अकॅडमी ह्या आमच्या संस्थेचा ११ जुलै २०२१ बालिकाश्रम उपक्रम आणि त्याची झलक..वर्षा ओगले ह्यांच मनापासून कौतुक..
4th October 2021
On 4th October 2021, on behalf of our organization Kala Academy Thane, in the year-round social activities of Ao Diya Jalaye in the orphan age, folk artist Anil Kengar gave a very good demonstration and training to all our girls in the orphanage. The girls enjoyed this art very much. took Special thanks to folk artist Professor Shivaji Waghmare.
दि. ४ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रारंभ कला अकॅडमी ठाणे या आमच्या संस्थेच्या वतीने आमच्या सामाजिक उपक्रमांतर्गत वर्षभर सातत्याने सुरू असलेल्या आओ दिया जलाएं या बालिकाश्रमातील उपक्रमात लोककलावंत अनिल केंगार यांनी बालिकाश्रमातील आमच्या सगळ्या मुलींना गण, गवळण ,भारूड याचा अतिशय सुरेख प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण दिलं मुलींनी या कलेचा मनमुराद आनंद घेतला. लोक कलावंत प्राध्यापक शिवाजी वाघमारे यांचे विशेष आभार.
As part of the social activity 'Ao Diya Jalaye' of Prarambha Kala Academy, the performance of folk drama in Balikashram was performed yesterday and today. Folk drama teacher Anil Kengar introduced the children to various forms of folk drama for two days continuously. The girls in the ashram enjoyed learning and we can see it in their actions.
प्रारंभ कला अकॅडमीचा 'आओ दिया जलाएं' या सामाजिक उपक्रमाअंतर्गत बालिकाश्रमातील लोकनाट्याचा कट्टा काल आणि आज मस्त रंगला .लोकनाट्य शिक्षक अनिल केंगार यांनी मुलांना अतिशय मनापासून लोकनाट्याच्या विविध प्रकारांची दोन दिवस सातत्याने ओळख करून दिली . आश्रमातील मुलींना शिकत असताना याचा आनंद घेतला जो त्यांच्या कृतीतून आपल्याला बघायला मिळतो .
Saturday 23rd October
On behalf of Prarambha Kala Academy, as part of our initiative called Balikashram ie Ao Diya Jalaen, on Saturday 23rd October and Sunday 24th October, the folk theater artist Anish Bangar guided the girls of the Balikashram very well.
प्रारंभ कला अकॅडमीच्या वतीने बालिकाश्रम अर्थात आओ दिया जलाएं या आमच्या उपक्रमांतर्गत शनिवार २३ ऑक्टोबर रविवार २४ ऑक्टोबर रोजी बालिकाश्रमातील मुलींना लोकनाट्याच मार्गदर्शन लोकनाट्य कलाकर अनिश बांगर यांनी अतिशय उत्तमपणे केलं .त्यांचे आणि प्राध्यापक शिवाजी वाघमारे यांचे मनःपूर्वक आभार
28 October
On behalf of our institution Prarambha Kala Academy Thane, today 28th October under our social project 'Aji Ajoba Katta' we at Vanprasthasram Angaon. Some of the entries in Sakhi Gan Sakhi written by Parag Ghonge were greeted by my student and socially conscious artist Varsha Palshetkar, Prajakta Paranjpe Alka Rajarshi, and I, we interacted with the grandparents for an hour and a half. Manager of Vanaprasthashrama Jayant Gogte introduced. The great response from my grandparents was heartwarming.
प्रारंभ कला अकॅडमी ठाणे या आमच्या संस्थेच्या वतीने २८ ऑक्टोबर आज आमच्या 'आजी आजोबा कट्टा 'या सामाजिक प्रकल्पांतर्गत वानप्रस्थाश्रम आनगाव येथे आम्ही
सखी गं सखी या पराग घोंगे लिखित दीर्घांका तील काही प्रवेशांचे अभिवाचन केले माझ्या विद्यार्थिनी आणि नाटकातील सामाजिकतेचे भान असलेल्या कलावंत वर्षा पालशेतकर , प्राजक्ता परांजपे अलका राजर्षी आणि मी , आम्ही दीड तास आजी आजोबांशी संवाद साधला. वानप्रस्थाश्रमा चे व्यवस्थापक जयंत गोगटे यांनी प्रास्ताविक केले .आजी आजोबांचा उत्तम प्रतिसाद मनाला आनंद देऊन गेला
बालिकाश्रम सांगता समारंभ
आनगांव भिवंडी
3 January 2022
On behalf of our organization Prarambha Kala Academy, we have been conducting social activities through art in Angaon near Bhiwandi for the past year. On January 3, 2022, we concluded that activity by giving food and prizes to the girls. On this occasion, Dr. Ashwini Bapat, Trustee of Dada Vedak Balikashram of Rashtriya Seva Sangh, and Dr. Ashwini Bapat myself. Arundhati Bhalerao, Trustee Secretary of Prambha, Advisor, and many other dignitaries were present on this occasion. Dada Vedak conducted a Satsang of Vitthal Bhakti from all of us. The joy on the faces of the girls in the orphanage is beyond words. Some snapshots.Now our departure to the new Balikashram! Again social exchange through art.
प्रारंभ कला अकॅडमी या आमच्या संस्थेच्यावतीने आम्ही मागचं सबंध वर्षभर भिवंडीजवळ आनगाव येथे बालिकाश्रमामध्ये कलेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत होतो .आज दि. ३ जानेवारी २०२२ ला त्या उपक्रमाचा समारोप आम्ही मुलींना खाऊ आणि बक्षीस देऊन केला .यावेळी राष्ट्रीय सेवा संघाचे दादा वेदक बालिकाश्रमाच्या विश्वस्त डॉ अश्विनी बापट मी स्वतः डॉ. अरुंधती भालेराव ,प्रारंभच्या विश्वस्त सचिव ,सल्लागार आणि इतर अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते .दादा वेदक यांनी आम्हा सगळ्यांकडून विठ्ठल भक्ती करणारा सत्संग करुन घेतला .बालिकाश्रमातील मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद हा शब्दांच्या पलीकडचा .काही क्षणचित्रे .
आता आमची रवानगी नवीन बालिकाश्रमात !पुन्हा कलेच्या माध्यमातून सामाजिक देवाणघेवाण .
As part of the social activities of Prarambha Kala Academy, Tejashree Mule, who has been a student of Prarambha for many years and is currently a great dancer, started the dance concept of the month of February with a beautiful group dance. That joy is beyond words. This little glimpse of her session today is very satisfying.
प्रारंभ कला अकॅडमीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत आज येऊर येथील बालकाश्रमामध्ये प्रारंभ ची अनेक वर्ष नाट्यकलेची विद्यार्थिनी राहीलेली आणि सध्याची उत्तम नृत्यांगना तेजश्री मुळे हिने सगळ्या मुलांना अतिशय सुंदर समूह नृत्यानं या फेब्रुवारी महिन्याच्या नृत्य संकल्पनेची सुरवात केली .आपली विद्यार्थिनी जेव्हा दुसर्या विद्यार्थ्यांना एखादी कला शिकवते किंवा त्यांना घडवण्यासाठी प्रयत्न करते तो आनंद शब्दांच्या पलीकडचा .खूप समाधान देणारा आजच्या तिच्या सत्राची ही छोटीशी झलक.