Social Work

Vaccination awareness in Tribal area zone

On behalf of Prarambha Kala Academy, we were walking for vaccination awareness campaign in Patilwadi area of ​​Yeoor. While walking around, people were more willing to listen to us this time than last time. Few were willing to take the vaccine. Some people were not ready. But after going door to door and talking personally, we realized that the entire community of Yeoor is very disappointed about vaccination. And who will come to Thane and pay attention to us? Who gave us the vaccine? We will not go there. So if you arrange the vaccine for us in Yeur then we will definitely take the vaccine. He has given us this kind of assurance at least today. Hon'ble Mayor Naresh Mhaske kindly request you to listen the below video and give us an appointment from that point of view.Understand what we are saying. And support us in how we can make vaccination happen in Europe


Do it. If we want to completely eradicate Corona from Thane, then it is very necessary that all these people get vaccinated.

प्रारंभ कला अकॅडमीच्या वतीनं आम्ही येऊर येथील पाटीलवाडी परिसरात लसीकरण जनजागृती मोहिमेसाठी फिरत होतो. फिरताना असं लक्षात येत होतं ,लोक मागच्या वेळेपेक्षा यावेळेला किमान आमचं बोलणं ऐकायला तयार होते. लस घेण्यासाठी काहीजण तयार होते. काहीजण तयार नव्हते .परंतु दारोदारी जाऊन घरोघरी जाऊन व्यक्तिशः बोलून आमच्या असं लक्षात आलं की येऊरची सगळी मंडळी लसीकरणाच्या बाबतीत अतिशय निराश आहेत. आणि ठाण्यात येऊन आमच्याकडे कोण लक्ष देणार? आम्हाला कोण लस द? आम्ही नाही तिथे जाणार. तर तुम्ही येऊरमध्ये आमच्यासाठी लसीची व्यवस्था केली तर मग आम्ही लस नक्की घे। अशा प्रकारच आश्वासन किमान आज त्यांनी आम्हाला दिलंय. माननीय महापौर नरेश म्हस्के यांना नम्र विनंती आहे की, त्यांनी खालचा व्हिडिओ ऐकावा आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला भेटीची वेळ द्यावी .आमचं म्हणणं समजून घ्याव. आणि येऊरमध्ये लसीकरण कसं काय घडवून आणता येईल यासाठी आम्हाला सहकार्य

कराव .आपल्याला जर समूळ नष्ट करायचा असेल ठाण्यामधून करोना , तर या सगळ्याच लोकांचं लसीकरण होणं अत्यंत आवश्यक आहे.


Today our initial team came back and went to spread awareness about vaccination in the tribal areas. It is very difficult to create public awareness. People are not ready to talk. Not ready to open the door. Not ready to give the number. But still we are going to every house. Our team is going to every door. We have managed to get 60 to 70 mobile numbers and names. Our effort is to capture the entire number and we will not lose. We keep trying. Because if Corona is to be eradicated from Thane area, it is essential that everyone gets vaccinated.

आज प्रारंभीची आमची चमू परत येऊरला जाऊन आदिवासी भागामध्ये लसीकरणासाठी जनजागृती करायला गेली. अतिशय कठीण जातंय ही जनजागृती करणं.लोकं बोलायला तयार नाही। दरवाजा उघडायला तयार नाहीत.नंबर द्यायला तयार नाही। पण तरीसुद्धा आम्ही प्रत्येक घरोघरी जातोय.प्रत्येक दारात आमची चमू जातेय। आम्ही साठ ते सत्तर मोबाईल नंबर आणि नावं मिळवण्यात यशस्वी झालोय.आमचा प्रयत्न आहे संपूर्ण येऊर पिंजून काढताना आम्ही हरणार नाही. आम्ही प्रयत्न करत राह. कारण ठाणे परिसरातून कोरोनाचा नायनाट करायचा असेल तर सगळ्यांनीच लसीकरण घेणं अत्यावश्यक आहे .

Today Prarambha Kala Academy launched a new campaign. Today we launched a covid vaccination awareness campaign in the tribal padas of Yeoor, Thane, especially in the area of ​​'Patanpada'. We had our army with me. Kirti Kerkar, Manisha Acharya, Yajnesh Daund, Vijay Patil, Vishal Bhalekar, Prasad Joshi, Sanjay Bhirud, Manoj Joshi, we all entered Yeur at 8:30 in the morning by our first "Aksharyan" bus. The picture there is very sad. When we were going to different padas, we noticed that no one was ready to take the vaccine. There is a lot of misconception in the minds of the people about the vaccine, that a person will die after taking the vaccine. Corona is caused by taking the vaccine. So much so that the brothers there were not ready to give us their names and phone numbers. We are constantly listening to everyone on the mic. Get vaccinated. How important it is. After taking the vaccine, the intensity of Corona decreases. There is no fear of death. Many such things were often told through the mic in the alleys there. But people were not ready to give the number at all. Not willing to give names, not willing to talk to us. Finally, with the help of Santosh, a Shantaram teacher in that area who works in MACB, we reached some people. But one realized that there is an urgent need for vaccination awareness campaign here. Otherwise, these tribal brothers remain deprived of this vaccination. Because our main duty is to remove the misunderstandings in their minds. So now tomorrow at nine o'clock under a tree we will try to increase the morale of people to take the vaccine. Even if it happens, we will think that we have won. Because we realized that there is a lot of fear and misunderstanding in the minds of these people regarding the vaccine.Thank you very much to the Mayor of Thane, Hon'ble Naresh Mhaske, for preparing us the identity card.

आज प्रारंभ कला अकादंमी ने एका नवीन मोहिमेला सुरुवात केली. आज आम्ही ठाण्याच्या येऊर इथल्या आदिवासी पाड्यांमध्ये विशेषतः 'पाटणपाडा' या परिसरामध्ये कोविद लसीकरण जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला. माझ्याबरोबर आमची फौज होती ।कीर्ती केरकर ,मनीषा आचार्य, यज्ञेश दौंड ,विजय पाटील, विशाल भालेकर, प्रसाद जोशी, संजय भिरुड, मनोज जोशी ,असे आम्ही सगळे आमच्या प्रारंभचा "अक्षरयान" बसने सकाळी साडेआठ वाजता येऊरला दाखल झालो. मंडळी तिथं चित्र फार विषण्ण करणारे आह। आम्ही जेव्हा वेगवेगळ्या पाडय़ांमध्ये जात होतो त्या वेळेला कुणीही लस घ्यायला तयार नाही हे आमच्या लक्षात येत होतं. लसी बाबतीत तिथल्या लोकांच्या मनामध्ये खूप गैसमज आहे ,की लस घेतली की माणूस मरतो .लस घेतल्यामुळे कोरोना होतो।इतकं की तिथले बांधव आपलं नाव व फोन नंबर काहीच आम्हाला द्यायला तयार नव्हत. आम्ही माइकवरून सतत सगळ्यांनी ऐक। लस घ्य. ते किती महत्त्वाचं।लस घेतल्यानंतर कोरोनाची तीव्रता कमी होते.मृत्यूचं भय राहत नाह। अशा अनेक गोष्टी वारंवार तिथल्या गल्लीगल्लीत जाऊन माइकवरून सांगत होत. परंतु लोक अजिबात नंबर द्यायला तयार नव्हत। नाव सांगायला तयार नव्हते आमच्याशी बोलायला तयार नव्हत. शेवटी त्या परिसरातले शांताराम शिक्षक एमएसीबीमध्ये काम करणारे संतोष यांची मदत घेऊन आम्ही काही लोकांपर्यंत पोहचलो . मात्र एक लक्षात आले कि याठिकाणी लसीकरण जनजागृती मोहिमेची नितांत गरज आहे .अन्यथा हे आदिवासी बांधव या लसीकरणापासून वंचित राहती। कारण त्यांच्या मनामध्ये असलेले गैरसमज दूर करणं हे आमचं प्रमुख कर्तव्य.म्हणून आता उद्या नऊ वाजता एका झाडाखाली आम्ही काही लोकांना दहा दहा 'पंधरा पंधरा ,च्या ग्रुपने आम्ही लोकांचं लस घेण्यासाठी मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत .आमच्या अपेक्षेनुसार पन्नास मधले दहा लोक जरी लस घ्यायला तयार झाले तरी आम्ही जिंकलो असं आम्ही समजू. कारण लसीच्या बाबतीत या लोकांच्या मनामध्ये प्रचंड भीती आहे आणि गैरसमज आहेत हे आमच्या लक्षात आलं .ठाण्याचे महापौर माननीय नरेश म्हस्के यांनी आम्हाला ओळखपत्र तयार करून दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार .


Coaching to the Children, for Hygeine and cleanliness

Workshop with the Tribal Children.

Felicitation of the Dumping ground Children and Financial Support by Prarambha for their further Education.