Village Adoption Project
Date:
प्रारंभ कला अकॅडमी ने 15 ऑगस्ट 2024 रोजी वाड्यापासून पंधरा किलोमीटरवर असलेल्या 'धावरपाडा' येथे आदिवासी महिलांना सक्षम करण्याचा उपक्रम हाती घेतला.त्यांना सुरुवातीला वारली पेंटिंग प्रशिक्षण दिलं. पिशव्या शिवायला कपडा आणि रंग देण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांना वारली पेंटिंगच पहिल्यांदा प्रशिक्षणही देण्यात आलं. एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते ती म्हणजे त्या फार कोंडलेल्या आहेत.त्याच्यामध्ये ऊर्जा आणि उत्साह निर्माण करण्याची नितांत गरज आहे. साlतत्याने त्यांच समुपदेशन करणं महत्त्वाचं आहे. आपण आपल्या पायावर उभ राहिल पाहिजे ही जाणीव त्यांना करून देणं फार गरजेचं वाटतं. त्यांना स्वप्न दाखवणं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करणं हे देखील महत्त्वाचं वाटतं.अर्थात हे सगळं एका रात्रीतून बदलणार नाही. त्यासाठी भरपूर अवधी द्यावा लागेल.परंतु मी आणि माझी संपूर्ण टीम हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी अहोरात्र काम करणार आहोत. अडीच महिन्यामध्ये त्यांना शिलाई मशीन दिल्यानंतर पिशव्या आणि त्यावर वारली पेंटिंग तसेच गोधड्या शिवण्याचं काम त्यांच्यातील काही महिलांनी उत्तम रीतीने केलं.आमच्या व्हाट्सअप वरनं आम्ही आवाहन केल्यानंतर आमच्याच परिचित मैत्रिणींनी अतिशय उत्साहाने त्या पिशव्या आणि गोधड्या विकत घेतल्या. काल याबाबत आढावा मीटिंग घेण्यात आली आणि या महिलांची आम्ही प्रमुख म्हणून नेमलेली वाड्यातील मेघना हिच्या ताब्यात आम्ही शिवलेल्या पिशव्यांचे पैसे आणि गोधड्यांचे पैसे सुपूर्त केले.
त्यांना जर उत्तम मार्गदर्शन केल,त्यांना हिम्मत दिली तर या महिला नक्कीच स्वतःच्या पायावर अधिक खंबीरपणे उभ्या राहतील असं वाटतं. प्रारंभ सामाजिक उपक्रमातून जो निधी गोळा करते त्यातूनच हे उपक्रम राबवते.त्यामुळे या महिलांना लागणारे सगळे साहित्य प्रारंभ कला अकॅडमी त्यांना पुरवते. कुठलाही फायदा प्रारंभ कला अकॅडमी घेत नाही. काल अधिक 25 मीटर कपडा महिलांना सुपूर्त करण्यात आला.यावेळी प्रारंभ कला अकॅडमीच्या ऑफिसमध्ये प्रारंभ च्या कार्यकर्त्या वैशाली, मनीषा, कीर्ती, मनीषा शितुत, जयश्री,मी स्वतः, वैशाली पराड, आणि वाड्याहून आलेली आमची तिथली प्रतिनिधी मेघना आणि आमच्या त्या प्रकल्पाला वाड्यातील मदत करणारे कार्यकर्ते विजय सर आणि बागुल सर उपस्थित होते.