Women Festival
Women Festival 2024
ठाणे शहरातील प्रारंभ कला अकॅडमीच्या महिला महोत्सव अर्थात आम्ही साऱ्याजणी या कार्यक्रमाचा तपपूर्ती सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार, दिनांक १ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३ ते रात्री नऊ या वेळेत आर मॉल मधील आय लीफ बँक्वेट हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. संस्थापक-संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांच्या नेतृत्वाखाली या शैक्षणिक सांस्कृतिक, आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने यंदा २३ वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण केला. या २३ वर्षातील मैलाचा दगड असलेल्या महिला महोत्सव वअर्थात आम्ही साऱ्याजणीव या कार्यक्रमाचे यंदाचे १२ वे वर्ष. या निमित्ताने आयोजित केलेल्या समूह नृत्य मंगळागौर, गायन, मुलाखत आणि सांगीतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचा आस्वाद ठाणेकरांनी घेतला. यावेळी 15 नोव्हेंबरला या महोत्सवांतर्गत ज्या आठ स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याचा बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवातीला ठाण्यातील विविध महिला नृत्य गटांनी भारतातील विविध प्रादेशिक संस्कृतीचे पारंपरिक नृत्य सादर करत केले. बिहू, कोळी, मंगळागौर, राजस्थानी अशा विविध सांस्कृतिक नृत्य प्रकारांनी उपस्थितांची दाद मिळवली. या शिवाय गाण्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढवली. ह्या कार्यक्रमातील विशेष आकर्षण होते ते म्हणजे ८२ वर्षीय आजींचे रोमांचक नृत्य आणि ७० ते ८० वयोगटातील महिलांचे जल्लोषात सादर झालेले मंगळागौर नृत्य. त्यांच्या उत्साहाने आणि अदाकारीने संपूर्ण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
मधुराज रेसिपीच्या मधुरा बाचल यांच्याशी प्रारंभ कला अकादमीच्या संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांनी त्यांचा संघर्ष आणि प्रेरणादायी प्रवास संबंधित मुलाखत रूपान संवाद साधला. प्रारंभच्या वतीने त्यांचा सन्मान केला गेला.
१२व्या महिला महोत्सवाचा औपचारिक कार्यक्रम मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलावंत श्रेया बुगडे, अदिती सारंगधर, ज्युपिटर हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर विजय सुरासे म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्ष सुधाताई म्हसकर, उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई आणि टीजेएसबी च्या अधिकारी या मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित लावली होती. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर आशिष भूमकर प्रिया भूमकर राहुल लोंढे भिवंडी महापालिका आयुक्त आजय वैद्य नेहा मटकर डॉक्टर प्रज्ञा बापट प्रणाली राजे विद्यालय ठाणेकर नितल वढावकर डॉक्टर प्रदीप ढवळ विलास जोशी रूपाली तेलवणे डॉक्टर मनीषा बनकर डॉक्टर दीपश्री डोंबे माननीय नेहा दळवी मॅडम आणि विविध व्यक्तींचा प्रारंभच्या वतीने सन्मान करण्यात आला. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी सभागृहात आयोजित केलेल्या विविध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याने औपचारिक कार्यक्रमाचा समारोप झाला.
दिग्दर्शक अभिजित पानसे, पंडित विवेक सोनार, , मनसेचे श्री नैनेश पाटणकर, अशा विविध क्षेत्रातील ठाण्यातील प्रथितयश व्यक्तिमत्त्व या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहिले. प्रारंभाच्या वतीने डॉ. अरुंधती भालेराव यांनी यांचा सन्मान केला. यावेळी दा. कृ.आणि मेधा सोमण, प्रिया आणि परीक्क्षित प्रभूदेसाई आणि हेमंत मेघना साने यांना प्रारंभच्या वतीने विशेष सन्मानित करण्यात आलं.
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतांचा सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन महिला महोत्सवाच्या संध्येत करण्यात आले होते. गायक मनोज देसाई, गायिका प्रीती जोशी, सुप्रसिद्ध निवेदिका दीपाली केळकर आणि तबलावादक स्वप्नील भाटे या कलाकारांनी या कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
प्रारंभ कला अकॅडमी या संस्थेच्या संस्थापिका डॉ. अरुंधती भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभाच्या विश्वस्त कीर्ती केरकर, मनीषा आचार्य वैशाली कुलकर्णी मनीषा शितूत वैशाली परड टीना पाटील रजनी जैन स्नेहा रवंदे रागिणी साने आणि इतर सर्व सदस्य यांनी यशस्वीपणे कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता माळी आणि मानसी जंगम यांनी केले.प्रारंभ कला अकादमीचा १२ वा महिला महोत्सव अत्यंत दिमाखात पार पडला. साडेपाचशे च्या वर महिला आणि पुरुषांनी कार्यक्रमाला गर्दी केली होती.
Date:
प्रारंभ केला अकॅडमीच्या वतीने 12 व्या महिला महोत्सवा संदर्भात आज ठाण्याच्या अत्रे कट्ट्यावर पत्रकार परिषद घेण्यात आली. डॉक्टर अरुंधती भालेराव संस्थेच्या संचालिका संस्थापिका, संस्थेच्या विश्वस्त मनीषा आचार्य कीर्ती केरकर वैशाली कुलकर्णी सल्लागार मनीषा शितूत आणि सदस्य वैशाली पराड या वेळेला उपस्थित होते.
Date:
प्रारंभ कला अकॅडमी ठाणे या आमच्या संस्थेतल्या 22 वर्षांच्या कारकिर्दीतल्या बाराव्या महिला महोत्सवांतर्गत विविध स्पर्धा घाणेकर लघु नाट्यगृहामध्ये अडीचशे च्या वर सहभागी स्पर्धाकांच्या उपस्थितीत सकाळी आठ ते संध्याकाळी सात या वेळेत संपन्न झाल्या. पितांबरी प्रस्तुत 'शीघ्र काव्य स्पर्धा 'ज्याला डॉक्टर भारती मेहता आणि उर्मिला भुतकर मॅडम परीक्षक होत्या. आय आर बी प्रस्तुत 'अती लघुकथा लेखन स्पर्धा' ज्याला प्रसिद्ध साहित्यिका अनुपमा उजगरे आणि डॉक्टर विमुक्ता राजे परीक्षक होत्या. सोलो नृत्य आणि समुह नृत्याला मानसी लिमये टेंभे आणि आणि सुगत गमरे परीक्षक होते. धान्य ओळख स्पर्धेला प्राध्यापिका मानसी जंगम तर मंगळागौर स्पर्धेला डॉक्टर अश्विनी बापट आणि अरुणा वाणी परीक्षक म्हणून लाभले होते. एकल गायन स्पर्धेला प्रशांत आणि मेघना काळुंद्रीकर यांनी परीक्षण केलं. वेशभूषा स्पर्धेला अनुजा काकतकर आणि श्वेता इनामदार यांनी परीक्षण केलं. 18 ते 80 वयोगटातील महिलांचा सहभाग हा कौतुकास्पद होताच, परंतु सत्तरीच्या पुढच्या ज्येष्ठ महिलांनी विविध स्पर्धांमधून जे सादरीकरण केलं त्यांची ऊर्जा पाहून मन धन्य झाल. या माझ्या सगळ्या सख्यांना ईश्वर उदंड आयुष्य देवो. या सगळ्या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा आणि महिलांचा भव्य महोत्सव एक डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. ज्याप्रमाणे स्पर्धा या विनामूल्य होत्या, त्याचप्रमाणे महोत्सव सुद्धा विनामूल्य असणार आहे. आणि महिला महोत्सव असला तरी बंधू वर्गाला देखील अगत्याच आमंत्रण आहे. आजच्या विविध स्पर्धांची काही झलक. प्रारंभच्या सगळ्या टीमने अतिशय मेहनतीने आजचा कार्यक्रम यशस्वी केला.
Through Women Festival, Prarambha Kala Academy has been organizing various Contests as well as Cultural and Social activities, for the Women busy in Married life but wanting to protect their Self-Esteem of the age group 18 to 80, in order to regain their Confidence. The Festival, which runs for 2 days in a row, consists of 1000 to 2000 women from last 10 years.
WOMEN FESTIVAL 2023
The Vanita Thorat Smriti Prityartha Women's Festival (11th year of this year) of Prarambh Kala Academy was concluded in the morning on Sunday 26 November 2023 at Gadkari Rangayatan, Thane. Pitambari, Bhumi World Industrial Park, The festival was organized in association with D. Y Mhaiskar Foundation Union Bank and Peshwai Kala Kendra. The funds collected from this program will be used for free cancer testing to be held on December 10, 2023 in Adivasi Pada.
Today started with two separate seminars. Former mayor Meenakshitai Shinde, Thane City Women President Mrinal Pendse, actor Shekhar Phadke and writer Sulabha Kore participated in the first seminar. Producer journalist Vyjayanti Apte, famous serial writer Shirish Latkar, actress Aditi Sarangdhar, news reporter editor Ajit Chavan, journalist Madhura Saraf participated in the second seminar. Dr. Arundhati Bhalerao, founder and director of the event, addressed the speakers in both the seminars with their questions.
Meanwhile, Sujay Patki, Medhatai Soman, Pragya Mhatre (journalist Lokmat), Rohini Dewan (journalist Manadesh) etc. were present.
Sudhatai Mhaiskar (Trustee, DP Mhaiskar Foundation) was honoured.
Senior actress Shubhangi Gokhale, Nanjibhai Patel (Head of Bhumiworld and Gebi Industrial Park) presided over the closing ceremony.
Sampada Wagle (Founder,
Acharya Atre Katta Thane),
Vishvas Damale (Representatives,
Pitambari Products Pvt. Ltd.),
Rajendra Alshi (Peshwai Kalakendra), Sunil Sharma (Union Bank Officer) were also honoured on this occasion. Vijay Barathe, Yojantai Gharat, Anjali Aadhwade, Dhanshree Wagh Patil, Bhimrao Bagul who are doing remarkable work in various fields were honored with certificates and gifts. Winners of seven different competitions held in the festival were given certificates and prizes.
At the end of the program, Prachi Kokiel Marathe presented Pasaydan.
Nilima Sabnis and Mithila Gaitonde presented the closing ceremony. Many of my activist friends from the beginning worked continuously to make the festival
a success. Sharing some snapshots with you
Mahila Mahotsav 2023
महिला महोत्सव प्रारंभ कला अकँडमी ठाणे तर्फे "आम्ही साऱ्याजणी " चे आयोजन
ठाणे :- वनिता थोरात स्मृती, महिला महोत्सव 2023, प्रारंभ कला अकॅडमी ठाणे ह्या संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे आम्ही साऱ्याजणी चे आयोजन करण्यात आले आहे, यंदा या संस्थेचे अकरावे वर्ष आहे, डॉ काशिनाथ घाणेकर मिनी थियेटर येथे शनिवारी 25 नोव्हेंबर 2023 रोजी दिवसभर विविध स्पर्धाचे आयोजन केले आहे,महिलांना आपल्या मधील सुप्त गुणांचा शोध घेता यावा, त्यांना व्यक्त होण्यासाठी एक हक्काचा असं व्यासपीठ मिळावं ह्या उद्धेशाने दरवर्षी महिला महोत्सव प्रारंभ तर्फे भरविण्यात येतो,वय वर्ष 18 व त्या पुढील सर्व महिलांसाठी ही स्पर्धा ठेवण्यात आली आहे, ही स्पर्धा विनामूल्य असून स्पर्धक एका पेक्षा जास्त कितीही स्पर्धामध्ये सहभाग होऊ शकतो, ह्या स्पर्धा अठरा ते पत्तीसआणि छत्तीस ते पुढे अशा दोन वयोगटात विभागण्यात आल्या आहेत.
रविवारी दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते 2 ह्या वेळेत गडकरी रंगायतन ठाणे येथे बक्षीस वितरण आणि विविध कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे, या संपूर्ण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले, पितांबरी चे प्रतिनिधी विश्वास दामले, डी पी म्हैसकर फाउंडेशनचे विश्वस्त सुधाताई म्हैसकर, भूमी वर्ल्डचे प्रमुख नानाजी पटेल, अत्रे कट्ट्याच्या संपदा वागळे, यूनियन बँकेचे सुनिलकुमार शर्मा, पेशवाई कला केंद्राचे राजेंद्र आळशी उपस्थित राहणार आहेत, हा महोत्सव सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांसाठी प्रेक्षक म्हणून सहभागी होण्यास खुला आहे, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर आसनव्यवस्था असेल,
तरी या महोत्सवला जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थेच्या संस्थापिका आणी संचालिका डॉ. अरुंधती भालेराव ह्यांनी केले आहे.ह्या बाबत अधिक माहिती हवी असल्यास 9821108156,
9987091067
9820840634 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा.
प्रारंभ कला अकॅडमीच्या आमच्या 18 आणि 19 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या महिला महोत्सवातील ही पोस्ट प्रचंड VIRAL होत आहे.. आजी तुम्हाला धन्यवाद
WOMEN FESTIVAL 2022
प्रारंभ कला अकॅडमी ठाण्याच्या आमच्या संस्थेच्या दोन दिवस सुरू असलेल्या दहाव्या महिला महोत्सवाचा गडकरी रंगायतनला भव्य समारोप झाला. सुरुवातीला काही बौद्धिक खेळ खेळत जिंकणाऱ्या महिलांना अस्थटिक आर्ट्स, इनामदार ब्लाउज, नीता ब्युटी पार्लर ,Volga,जागृती संस्था यांच्यातर्फे कूपन्स भेट देण्यात आले. त्यानंतर प्रारंभ कला अकॅडमीच्या विश्वस्त मनीषा आचार्य आणि सचिव कीर्ती केरकर यांनी वैमानिक अंकिता धनावडे, बस ट्रक टॅक्सी चालिका रिंकू शर्मा आणि रिक्षा चालिका सरोज डोईफोडे यांना मुलाखतीच्या माध्यमातून बोलत केलं. कार्यक्रमाचा दुसरा टप्पा होता, 'ती आणि मी ' हा स्त्रीच्या जन्मापासून तिच्या आयुष्यातल्या वार्धक्य पर्यंतचा सहजीवनाचा संगीतमय प्रवास प्राची कोकीळ आणि मी अरुंधती भालेराव आम्ही दोघींनी तो सादर केला त्यानंतरचा तिसरा टप्पा होता मालिका लिहिणाऱ्या संवाद लेखिकांची आणि लेखकाशी गप्पा. त्यामध्ये रोहिणी निनावे, मुग्धा गोडबोले आणि अमोल पाटील .यांना मी मुलाखतीच्या माध्यमातून बोलत केलं. त्यानंतर भव्य बक्षीस वितरण सोहळा . आदल्या दिवशी संपन्न झालेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, परिवहन समिती सभापती विलास जोशी ,प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ, माननीय इम्तियाज खान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .विविध स्पर्धांच्या महिलांना यावेळी बक्षीस देण्यात आले .कार्यक्रमाचे अतिशय नेटकं सूत्रसंचालन निकिता भागवत यांनी केलं. यावेळी यावर्षीचा 'सौदामिनी' पुरस्कार जयश्री कलेक्शनच्या जयश्री रामाने यांना देण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे काही फोटोज आपल्याबरोबर शेअर करत आहोत . पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सुपरमॅक्स बॉयलर, तनवी हर्बल यांचे आम्ही आभारी आहोत यावेळी माध्यम प्रतिनिधी सारिका साळुंखे प्रज्ञा सोपारकर आणि अनुपमा गुंडे उपस्थित होत्या.
Women Festival Of Prarambha Kala Academy 2021
Women Festival Of Prarambha Kala Academy 2020
प्रारंभ कला अकॅडमी चा. आठवा महिला महोत्सव ,'अर्थात आम्ही साऱ्या जणी' दिनांक 30 31 ऑक्टोबर आणि 1 आणि 2 नोव्हेंबर 2020 रोजी संपन्न होतो आहे..आमची मैत्रीण प्रारंभ कला अकॅडमी ची सदस्य आणि सच्ची कार्यकर्ती वनिता थोरात हिच्या नावाने मागील दोन वर्षांपासून हा महोत्सव आम्ही करतो..ह्या वर्षी महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून स्वर्गीय वनिता थोरात महिला महोत्सवात यंदा ऑनलाईन f b लाईव्ह विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विनामूल्य आयोजित केला आहे ..आपल्या सर्वांना ह्या ऑनलाईन महोत्सवात सहभागी होण्यासाठी मी हे आग्रहाचे
आमंत्रण आपणास देते आहे..त्याचा स्वीकार करावा..आपले प्रेम आणि स्नेह कायम आमच्या सोबत आहेच..संपूर्ण कार्येक्रम पत्रिका सोबत न देता मी चार दिवस रोज आपल्याला त्या --त्या दिवशी कोणकोणते कार्येक्रम आहेत ते कळवत राहीन..म्हणजे आपल्याला स्मरण ठेवणे सोपे जाईल आणि आपण अवश्य आम्हाला ऑनलाईन जॉईन व्हाल. चला तर भेटूया 30 31 ऑक्टोबर आणि 1 व 2 नोव्हेंबर 2020 प्रारंभ कला अकादमी ह्या fb पेज वर.
आपली नम्र
डॉ अरुंधती भालेराव
संस्थापिका संचालिका प्रारंभ कला अकॅडमी ठाणे
आणि संपूर्ण प्रारंभ कला परिवार
ह्या सगळ्या स्पर्धांचा त्या त्या वेळेत अवश्य आनंद घ्या
Actors Renuka Shahane, Uday Tikekar, Sukanya Kulkarni, Aditi Sarangdhar, Director Abhijit Panse, Veena's World Director Veena Patil, Actress Ashwini Ekbote. Dr. Medha Mehendale, Honorable Ravindra Prabhudesai, Honorable Ajay joshi, Honorable Sachin Sinnarkar (Nashik), Harmesh desai from P.N. Gadgil, Honorable Manjushree Ahirrao, Dr. Alka Natu, Sudhatai Mhaiskar, Sulekha Chavan, Deputy Commissioner of Police Rashmi Karandikar, Actress Vrunda Gajendra, Shilpa Anaspure, Alka Sayaji Shinde and many more Honorable Personalities have visited Prarambha Kala Academy's Women Festival.
Womens Festival 2019
Womens Festival 2018
Womens Festival 2017
Womens Festival 2016
Womens Festival 2015
Womens Festival 2014
Womens Festival 2013